मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
इतक्या फेमस मालिकेचा रिपिट
इतक्या फेमस मालिकेचा रिपिट भाग दिवसा एकदाही का नाही दाखवत? इथे वाचून मात्र खूप मजा येते.
उत्पन्नाच्या १५ % तेका
उत्पन्नाच्या १५ % तेका दील्यानी>>>>>> हो. पण ह्येका साहावो वाटो म्हणतात का? उग्गीच त्या काळ्या कोटास ताणाताण करायला लावल्यानी दोन दिवस. सहावो वाटो सहावो वाटो करुन.
काळ्या कोटानी ताणाताण केली
काळ्या कोटानी ताणाताण केली आणि शेवटी कन्टाळून तुमचे तुम्हीच वाचा म्हणुन गेला निघुन
<< उग्गीच त्या काळ्या कोटास
<< उग्गीच त्या काळ्या कोटास ताणाताण करायला लावल्यानी दोन दिवस. सहावो वाटो सहावो वाटो करुन.>> माझ्या तुटपुंज्या ज्ञानानुसार, वडिलोपार्जित जमीन-जुमल्याची वाटणी प्रचलीत कायद्यानुसारच होते, मृत्युपत्रानुसार नाही. [ फक्त स्वकष्टार्जित प्रॉपर्टीबाबतच मृत्युपत्र करतां येतं]. म्हणानच, सिरीयलमधलो ' काळो कोट' फार सिरीयसली घेण्याची काय येक गरज नाय !
भाउ काका मस्त व्यन्गचित्र
भाउ काका मस्त व्यन्गचित्र
(No subject)
तो काळा कोट जेव्हा जेव्हा
तो काळा कोट जेव्हा जेव्हा येतो त्याचं वेळी तो अभी गायब. मग त्याला बोलावण धाडूचा . मागच्या वेळी धाडलाय. यावेळी नाही बहुतेक. हो सुषमाला १५% आणि छायाला १२ % . पण छाया इतके दिवस घरात राहिली ना. सुषमाच तस नाही . ती शांताची मुलगी ना ? काय मेल पुरुषांनी भानगडी करायचा आणि सगळे वाकडे तिकडे वाटे करून ठेवायचे आणि सगळ्यांमध्ये भांडण .काही खर नाय. आत्ता तो झोपाळा कधी हलतो ते बघायचं. सुषमा घरात आली तशी तीची आई शांता पण भुताच्या रुपात घरात आली कि काय ? झोपाळ्यावर बसायला
<< आत्ता तो झोपाळा कधी हलतो
<< आत्ता तो झोपाळा कधी हलतो ते बघायचं >> तो हलतो, कारण तो विचारतोय, " मी कोणाच्या वाट्याक, मीं कोणाच्या वाट्याक, तां माकां सांगा !" !!:डोमा:
भाउ
भाउ
" मी कोणाच्या वाट्याक, मीं
" मी कोणाच्या वाट्याक, मीं कोणाच्या वाट्याक, तां माकां सांगा !">>>
ह्लते हुये झोपाळे का रहस्य..
ह्लते हुये झोपाळे का रहस्य..
तुटपुंज्या ज्ञानानुसार,
तुटपुंज्या ज्ञानानुसार, वडिलोपार्जित जमीन-जुमल्याची वाटणी प्रचलीत कायद्यानुसारच होते, मृत्युपत्रानुसार नाही. [ फक्त स्वकष्टार्जित प्रॉपर्टीबाबतच मृत्युपत्र करतां येतं].>>>>>>>>> तुटपुंज्या कित्याक म्हणतासात भाउ,बरोबर असा तुमचा.हे आपले काय्येक दाखवतसत आणि आपण ओगी र्हवून बघूचा.हंसयर आयलंय की वाटता ही सिरियल विनोदी असा की काय.सिरियल बघताना हंयचे प्रतिसाद आठयतत.
'आपल्याकडे कोंबड्या नाय' हा
'आपल्याकडे कोंबड्या नाय' हा प्रोमोमधील संवाद कधी आहे ?
ठोकळी न्हाउन माज्घरात आल्यावर
ठोकळी न्हाउन माज्घरात आल्यावर
अण्णांचो म्हणजे, अंधारात
अण्णांचो म्हणजे,
अंधारात केला आनि उजेडात इला ....असाय.
---------------------------------------------------------------------------
सुषमा चेडवाक भुतुर घेतलान ?
कधी येणार ? ती तर आता
कधी येणार ? ती तर आता निघायच्या तयारीत आहे.
अण्णांची २५० एकर जमीन
अण्णांची २५० एकर जमीन शेवंताच्या नावावर करून दिली होती ना अण्णांनी? आता जी जमीन आहे ती त्यांनी कोणाकोणाला लुबाडून मिळवली आहे. त्यामुळे तीचं वाटप मृत्युपत्रानुसारच होणार ना?
" मी कोणाच्या वाट्याक, मीं कोणाच्या वाट्याक, तां माकां सांगा !">>> तू शेवंताच्या वाट्याक.
कधी येणार ? ती तर आता
कधी येणार ? ती तर आता निघायच्या तयारीत आहे. >> निघून झाला की येत.
<< अण्णांची २५० एकर जमीन
<< अण्णांची २५० एकर जमीन शेवंताच्या नावावर करून दिली होती ना अण्णांनी? आता जी जमीन आहे ती त्यांनी कोणाकोणाला लुबाडून मिळवली आहे. त्यामुळे तीचं वाटप मृत्युपत्रानुसारच होणार ना? >> तुम्ही माझ्यासारख्या एका कोकणी माणसाक चॅलेंज करतास, तांय कायद्याच्या बाबतींत ? सिरीयल बाजूक सारून कोर्ट-कचेरीच हंय चालू करूंची आसा तुमकां ?
<< अण्णांचो म्हणजे, अंधारात केला आनि उजेडात इला ....असाय >> सिरियलच्या नांवाशी सुसंगतच आहे ना हे ? कां उगीचच चूका काढताय ?
[ गंमत म्हणून वरचं ठीक आहे. पण एकंदरच वातावरण निर्मिती, वास्तववादी पात्रं, वेळकाढूपणाचा अभाव, बर्यापैकी अभिनय व दिग्दर्शन यांमुळे ही सिरीयल मला इतर सिरीयल्सपेक्षां उजवी वाटते हें मनापासून सांगतो. ]
भाऊंनू, समजताय हां. :फीदी:
भाऊंनू, समजताय हां. :फीदी:
आज मज्जा येनार आहे.... सुशमा
आज मज्जा येनार आहे.... सुशमा मधेच गायब होनार....खेळ सुरु....
ती सुषमा छान आहे.
ती सुषमा छान आहे.
हो सुश्मा खूप गोड दिसते . ती
हो सुश्मा खूप गोड दिसते .
ती वर माडीवर येते तेन्व्हा मागच्या घड्याळात पावणॅ चार वाजले आहेत.
खुर्चीवर बसायला जाते तेन्व्हा लॉन्ग शॉट मध्ये साडे बारा आणि मग १२ २०
सुशमा मधेच गायब होनार..>>>>>
सुशमा मधेच गायब होनार..>>>>> हो??? हे ट्रेलर मध्ये दाखवले का??
स्वस्ति यांना या मालिकेचा
स्वस्ति यांना या मालिकेचा 'फॅन ऑह दि इयर' देऊन टाका रे. किती ते निरिक्षण. ह.घे.
अग , जुनी सवय आहे माझी
अग , जुनी सवय आहे माझी .घड्याळ्यावर लक्श असत माझ. त्यामुळे शॉटची कन्ट्युनिटी कळते .
आणि काही वेळा चुका सापडतातच.
तुम्ही माझ्यासारख्या एका
तुम्ही माझ्यासारख्या एका कोकणी माणसाक चॅलेंज करतास, तांय कायद्याच्या बाबतींत ? सिरीयल बाजूक सारून कोर्ट-कचेरीच हंय चालू करूंची आसा तुमकां ? डोळा मारा. >> भाऊ, मी नाय हो चॅलेंज करत. एक शंका आली मनात ती इचारलय.
क्लिओपात्रा, हो, ट्रेलरमधी दाखवलं. सगळे अंगणात असतात तेव्हा सुषमा आधी माडीवर उभी असते. परत बघतात तेव्हा नसते आणि लगेचच बाहेरुन येऊन घरात जायला लागते.
जेवढे येईल शेतीतुन त्याच्या
जेवढे येईल शेतीतुन त्याच्या १५ % असावे , सुशमाला आणि छाया ला मात्र १२ % >>
हा प्रकार काय नक्की? कोणाच्या शेतीतून यांना वाटा मिळणार? तीन भावांना आणि अण्णीला जमिन वाटुन दिली ना.
ठोकळा-ठोकळी काय शेती करत बसणार नाही. अभि पोस्टींग होईल तिथेच सेटल होणारे.
शेती पिकवणार कोण तर दत्ता आणि दत्ती. आधीच त्यांच्या वाट्याला मांगरावरची नापीक जमीन त्यात राबराब राबणार आणि मग त्यातले २७% या दोघींना देणार? दत्ती पिसाळेल नैतर कै करेल?
ओह्ह !! म्ह्णजे ठोकळा ठोकळी
ओह्ह !! म्ह्णजे ठोकळा ठोकळी काय जाणर नाय वाटत अजुन म्हम्बई ला..!
दत्ती च चिडणं अगदीच बरोबर
दत्ती च चिडणं अगदीच बरोबर आहे. त्या ठोकळ्या ला कशाला हवी जमीन? काय तर म्हणे अर्चिस ला भविष्यात सांगायला कि आमची गावाकडे जमीन आहे. आधी बायको ला घरी कामं करायला शिकव...मुलासाठी जमीन घेतोय हा...
Pages