मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
माझ्या आईच्या मामाचे दोन्ही
माझ्या आईच्या मामाचे दोन्ही मुलं माझ्यापेक्षा वयाने लैच लहान आहेत
आता बघ अत्यांची मुलं म्हणजे माझी भावंड ती माया मुलांपेक्षा लैच लहान असणार.
माझ्या बाबांचे लहान काका आणि सगळ्यात मोठा चुलत भाऊ एका वर्गात होते
सो होता है होता है
सुषमा वयाने अभिरामापेक्षा
सुषमा वयाने अभिरामापेक्षा थोडी लहान वाटते. म्हणजे ठीक आहे.
बाकी भाषेची तिने जबर वाट लावलीये.
सुषमाची body language आवडली
सुषमाची body language आवडली गेल्या दोन भागातली
ओके समस्त भाच्यांनो....तुमचा
ओके समस्त भाच्यांनो....तुमचा नाते आणि वया संदर्भातील मुद्दा या मामाला पटला....योग्य आहे.
बाकी, सुषमाच्या प्रत्यक्ष संवादरुपी प्रवेशांनी आता मालिका कथानकात रंग भरत चालला आहे हे मान्य करावे लागेल. तरीही माधव, निलिमा आणि अर्चिस यांचीही उपस्थिती आवश्यक वाटत आहेच.
'आपल्याकडे कोंबड्या नाय' हा
'आपल्याकडे कोंबड्या नाय' हा प्रोमोमधील संवाद कधी आहे ?>> प्रोमोमधील वाक्यं फक्त जाहीरातीसाठी होती बहुदा... ती नसावीत.
एखाद - दुसरा भाग चुकला तरी काही वाटत नाहीये या सिरीयलचा... फार रंगत नाहीये ठोकळे दांपत्याचा मात्र खरंच कंटाळा आलाय. पाठवून द्या त्यांना परत.
अण्णी रडत होती तर ठोकळी का इतकी फणकारत होती. शास्त्रज्ञ की काय ते असून कित्ती ते इम्मॅच्युअर एक्स्प्रेशन्स!! हिच्या सवतीचं पोर इतकं दरियादिलाने स्वीकारलं असतं हिने? (मुळात शास्त्रज्ञ वै. (दिग्दर्शक, लेखक व अभिनेते यांना) न पेलणारे अवघड कॅरॅक्टर्स कशाला देतात... शहरी आहे, अंधश्रद्धेवर विश्वास नाही इतकं पुरेसं होतं.)
बाकी वाटणीबद्दल दत्ता-दत्तीची चिडचिड पटली.
बाकी, सुषमाच्या प्रत्यक्ष
बाकी, सुषमाच्या प्रत्यक्ष संवादरुपी प्रवेशांनी आता मालिका कथानकात रंग भरत चालला आहे हे मान्य करावे लागेल. तरीही माधव, निलिमा आणि अर्चिस यांचीही उपस्थिती आवश्यक वाटत आहेच.>.+१११११
ठोकळीला तिचा ठोमाधव या लोकान्च्यात अडकुन पडायला नको असे वाटतेय. कधी नव्हे ते काल तिने सासुला
विचारले काही बनवुन आणु का असे
हो वाटणीबद्दल दत्ता-दत्ती जे
हो वाटणीबद्दल दत्ता-दत्ती जे चिडतात ते योग्य होते, कारण गावाकडचे हे घर, येणारे-जाणारे नातेवाईक, त्यान्चे सोपस्कार, शेती करणे- मेहेनत करणे, बेरी नानाना साम्भाळणे हे त्यान्च्यावरच आहे. ठो३ फक्त खायला. अभिरामलाही यात काही स्वारस्य नाहीये. मग करणार कोण? बाकी काल् दत्ती कशासाठी ओरडली देव जाणे. सस्पेन्स चान्गला ठेवलाय.
'आपल्याकडे कोंबड्या नाय' हा
'आपल्याकडे कोंबड्या नाय' हा प्रोमोमधील संवाद कधी आहे ?>> आणि ठोकळी कामं करताना कधी दाखविणार? शिर्षक गीतात तीच्या हातात कळशी आहे तेवढीच बघीतली.
ठोकळी कोणती शास्त्रज्ञ आहे?
ठोकळी कोणती शास्त्रज्ञ आहे?
कालच्या भागात सुषमा चांगलीच
कालच्या भागात सुषमा चांगलीच पेटलेली होती. एक दिवस ती घरात धिंगाणा घालणार बहुतेक!
बाकी या सिरिअलची भुतं दिवसाची येत असल्याने- रात्री कोणाचा खेळ चालतो ते काय कळले नै!
नाईकन्ना पाणी बाधण्यचा आणि
नाईकन्ना पाणी बाधण्यचा आणि शेवन्ताच्या भुताच काही रीलेशन नै का??
आग लावण्या मागे तरी शेवन्ता च भुत आहे का ? की ते पण नै?
आणि ठोकळी कामं करताना कधी
आणि ठोकळी कामं करताना कधी दाखविणार?>>> आज ठोकळी अण्णीसाठी काहितरी खायला बनविणार आहे. थोडं व्हेरियेशन पाहिजे असेल तिला, इतके दिवस एव्हढे सारे एक्स्प्रेशन? देऊन थकली असेल बिचारी
आधी त्या विहिरीभोवती गुढ
आधी त्या विहिरीभोवती गुढ वाढवून ठेवलं होतं आता तर तिचा उल्लेख पण नाय. आता झाडावर कॅमेरा फिरवतात.
कालच्या भागात सुषमा चांगलीच पेटलेली होती. एक दिवस ती घरात धिंगाणा घालणार बहुतेक! >> +१.
कालच्या भागात, सुशमा वर दिसते
कालच्या भागात, सुशमा वर दिसते अणी एकदम बाहेरुन आत जाते, हे टरकवेबल होते.तिचे आणी नाथाचे काहीतरी चाललेले असते. नाथाची पण बाजु समजत नाही, तो कधी इकडे तर कधी तिकडे वाट्तो.
आता कालच्या भागात शेवटी जे दाखवले ते पाहुन ठो आणी ठो ला गावीच जबरद्स्तीने थाम्बावे लागेल. सुशमा सग्ळ्याना नड्णार हे नक्की... सिरियलच्या स्क्रोल वर पन दाखवत होते... कि ठो आणी ठो ला गावीच जबरद्स्तीने थाम्बावे लागेल.
कि ठो आणी ठो ला गावीच
कि ठो आणी ठो ला गावीच जबरद्स्तीने थाम्बावे लागेल.>> हो आता काय शिरेल संपेपर्यंत ठो३ शहरात जावूक नाsssssssय
कि ठो आणी ठो ला गावीच
कि ठो आणी ठो ला गावीच जबरद्स्तीने थाम्बावे लागेल. >> हो, त्यांना थांबावेच लागणार कारण हे सगळं अतर्क्य का घडतेय ते ठोकळीच शोधून काढणार आहे.
ते ठोकळीच शोधून काढणार आहे.
ते ठोकळीच शोधून काढणार आहे. स्मित >> शिरेलीची लीड हीरोईन आहे ठोकळी. शोधून काढावेच लागणार तिला. उगीच नै सायन्टीस्ट ती
ब्रेकिंग न्यूजः- ठोकळी हसली
ब्रेकिंग न्यूजः-
ठोकळी हसली !! हो हो.. मी माझ्या या डोळ्यांनी काल पाहिलं. काल आठ्याधारी माधव ला जेव्हा आता आपण परत जायचंच्च असं ती म्हणते, आणि तो खाली जायला निघतो त्या वेळी (आईला सांगायला ), त्या क्षणी.. हो हो त्या क्षणी, ठोकळी हसली !
शायंटीस्ट वगैरे ठिक आहे पण
शायंटीस्ट वगैरे ठिक आहे पण तिची अॅक्टींगच्या बाबतीत इतकी बोंबाबोंब का आहे? एक धड एक्सप्रेशन नीट देत नाही ती!
त्या क्षणी.. हो हो त्या
त्या क्षणी.. हो हो त्या क्षणी, ठोकळी हसली !>>>>>> हो त्याचवेळी भयंकर दिसली.
ठोकळा ठोकळी जर मुंबईला गेले
ठोकळा ठोकळी जर मुंबईला गेले तर रहस्य उलगडणार कोण? बाकी सगळेच एकतर भुतावर विश्वास ठेवणारे आहेत किंवा मला काय करायचे ह्या मोडमधे आहेत.
@निल्सन...हो हो....होहोहो
@निल्सन...हो हो....होहोहो
मामा, बघताय का रोज ही मालिका?
मामा, बघताय का रोज ही मालिका?
हो मामा बघतायेत, आता
हो मामा बघतायेत, आता जानुबैनंतर ठोकळी मामांची आवडती भाची नाही झाली म्हणजे मिळवलं ;).
आजच्या भागात ठोकळी एका खोलीत
आजच्या भागात ठोकळी एका खोलीत जाते, तिने झिपर्या मागे सोडलेल्या असतात. दत्ती तिला हसून काय तरी सान्गते, नन्तर ठोकळी पाठमोरी असताना दत्ती बेफाम किन्चाळते. तिला काय दिसते? ठोकळीच्या ऐवजी नौवारीतली शेवन्ता ? की परकर पोलक्यातली सुसल्या? ( सुषमा) की अण्णा? की बेरी नाना?
अन्जू
अन्जू
अरे मालिका संपत आली की कळेल,
अरे मालिका संपत आली की कळेल, तोपर्यंत गुगली टाकत रहाणार, थिंका (विचार करा) तुम्ही असं.
वा. मस्त धम्माल चालू आहे
वा. मस्त धम्माल चालू आहे इथे.सिरीयल तर मी पहात नाही.पण हे सर्व वाचून खूप मजा आली.
नेहमी वाचत जाईन आता..एकसे एक प्रतिसाद आहेत
.शिरेलीची लीड हीरोईन आहे ठोकळी. खो खो शोधून काढावेच लागणार तिला.. हिरोईन ठोकळी..हा हा हा.
ठोकळी नाव ज्याने दिलय त्याला सलाम.!
भगवती.... ~ हो....पाहतो मी ही
भगवती....
~ हो....पाहतो मी ही मालिका. पहिल्या भागानंतर पुढेच दोन चुकले पण नंतर नेटद्वारे पाहिले. एक तर बंद फ्लॅट किंवा पॉश बंगलो वा मेट्रो सिटीतील घडामोडी नाहीत....रम्य कोकण आहे....शिवाय घरे, शेती, झाडेझुडपे, रस्ते सारे काही प्रसन्न वाटावीत अशीच. एकूण एक पात्र नवीनच आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयात नवखेपणा असला तरी तो क्षम्य मानावा असेच वाटत राहिले आहे. कथानक आता कुठे फुलते आहे. त्यामुळे "बेस्ट लक" म्हणावे.
अन्जू....जान्हवी ती जान्हवीच गं...! लै भारी !!
तिला काय दिसते? ठोकळीच्या
तिला काय दिसते? ठोकळीच्या ऐवजी नौवारीतली शेवन्ता ? की परकर पोलक्यातली सुसल्या? ( सुषमा) की अण्णा? की बेरी नाना? >> तो गणेश कायतरी विचित्र करत असणार.
Pages