Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुदिना पराठा रायता
पुदिना पराठा
रायता
पुदीना मायक्रोवेव्ह मध्ये
पुदीना मायक्रोवेव्ह मध्ये वाळवून ठेवता येतो. खाली लिंक दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=x092ZcOeAls
तसेच पुदीना पराठे , बिर्याणी, रायता , चहात घालून, पुदीना राईस, पुदीना तीळ चटणी हे सगळे प्रकार केले तर संपवता येईल.
गल्लीसाठी आणलाय, गल्लीला
गल्लीसाठी आणलाय, गल्लीला वाटून टाका, बायका दुवा देतील तुम्हाला. नाहीतर पाणीपुरीचं पाणी करून गल्लीला पापुची फीस्ट द्या, परत बायका दुवा देतीलच!
सिरियसली- पुदिन्याची पानं वाळवा. वाळल्यावर चुरून ठेवा, स्वादासहित टिकतात एक महिना तरी. नंतर लागतील तशी वापरता येतील.
anjut ग्रेट माईंड्ज!
anjut ग्रेट माईंड्ज!
पुदिना वाळवून ठेवण्याच्या
पुदिना वाळवून ठेवण्याच्या युक्तीसाठी धन्यवाद अंजुत. माझ्याकडेही बराच शिल्लक आहे.
तातडीच्या मदतीसाठी धन्यवाद..
तातडीच्या मदतीसाठी धन्यवाद.. ☺ सगळ्याच गोष्टी करुन बघेन. हाच थोडा पुदीना कुंडीत लावला तर वाढेल का?
हाच थोडा पुदीना कुंडीत लावला
हाच थोडा पुदीना कुंडीत लावला तर वाढेल का?>>> हो. पुदिन्याची नुसती काडी खोचली तरी तो छान वाढतो
मिंट ज्युलेप नावाचे कॉकटेल
मिंट ज्युलेप नावाचे कॉकटेल बनवता येईल. पुदिना घालून आईस्ड टी बनवता येईल. रायते - कोशिंबिरी - सलादमधे पुदिना सढळ हाताने वापरता येईल. पालेभाजी - दुधीच्या ग्रीन स्मूदीत स्वादासाठी घालता येईल. पुदिन्याची पाने जरा ओबडधोबड चिरून लिंबू किंवा संत्र्याच्या, आवळ्याच्या सरबतात छान लागतात.
एवढ्या मोठ्या प्रमाणात
एवढ्या मोठ्या प्रमाणात पुदिन्याचा वापर ??? गुगलवर पहा - Excess of everything is bad. Mint in small qty is good for health. Men are not supposed to consume Mint. आणि वर जशा भरभरुन रेसिप्स दिल्या आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणात चालणार का? ( या पोस्टला कोणती स्मायली द्यावी अशा कन्फ्युजनमधली मी.)
Pudina rice.. Yummy!
Pudina rice.. Yummy!
सावलीत सुकवा पाने . पूर्ण
सावलीत सुकवा पाने . पूर्ण सुकली की बारीक चुरा करुन डब्यात भरुन ठेवा. चाट, लस्सी, दही वडे अशा पदार्थांवर शिंपडायचा चुरा थोडा थोडा.
१. ज्याने आणला त्याची,
१. ज्याने आणला त्याची, त्याच्या समोर आणि मग जमेल तिकडे सगळीकडे अक्कल काढा (चेक)
२. इमाने इतबारे फ्रीज मध्ये १ महिना जागा अडवत ठेवा.
३. महिना संपला की कॉम्पोस्टला टाकून रिसायकलचं समाधान मिळावा. आम्ही हाच उपाय वापरतो.
लागतील तसे घ्या.
उपाय १ वारंवार जमेल तिथे
उपाय १ वारंवार जमेल तिथे वापरतो. वर्क्स एक्सलंट !!
मी वेगवेगळी तयार पीठं वापरून
मी वेगवेगळी तयार पीठं वापरून मल्टीग्रेन पीठ करते. कणकेच्या डब्यात खूप कणिक + एक-एक करून इतर पीठं असं साधारण तीन थर लावते. प्रत्येक थराला हाताने / उलतण्याने पीठं एकत्र करते. परंतु, पीठ नीट एकजीव मिसळले जात नाही. वेगवेगळी धान्य एकत्र दळून आणणे शक्य नाही. छान मिक्स कसे करावे काही आयडिया आहे का? प्लीज. रेडिमेड मल्टीग्रेन पीठ नकोय कारण त्यात मल्टीग्रेनचे प्रमाण खूपच कमी असते.
पिठं वेगवेगळीच ठेवायची. कणीक
पिठं वेगवेगळीच ठेवायची. कणीक मळतानाच मिक्स करायची.
चांगली आयडिया आहे; सुरुवातीला
चांगली आयडिया आहे; सुरुवातीला असंच करत होते पण सकाळच्या घाईत चार-पाच डबे उघड-बंद एक काम होत आणि जास्तीची कणिक भिजवली जाते. रोज ठराविकच पोळ्या लागतात. जास्तीची एखाद-दुसरी उरते. कणकेची मापाची वाटी आहे त्या मापानी बरोबर पोळ्या होतात.
जी पिठं कमी प्रमाणात मिसळता
जी पिठं कमी प्रमाणात मिसळता ती सगळी एकत्र नीट मिसळून ठेवता येतील. म्हणजे दोनच डबे उघडायला लागतील.
भमंची आयडिया चांगली आहे.
भमंची आयडिया चांगली आहे. किंवा सपोज पाच किलो कणीक असेल, तर एक किलो दुसर्या डब्यात काढायची आणि त्या एक किलोतच पाहिजेत ती पीठं हव्या त्या प्रमाणात मिसळून ठेवायची. सुट्टीच्या दिवशी पुढचं एक किलो पीठ तयार करून ठेवायचं असंही करता येईल. थोडक्यात, एकदम सगळी कणीक घ्यायची नाही, तर कमी पीठ 'तयार' करून ठेवायचं.
छान मिक्स कसे करावे काही
छान मिक्स कसे करावे काही आयडिया आहे का?>>>
१. चाळणीने दोन-तीनदा चाळून घेणे.
२. स्वच्छ कोरड्या फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेणे.
माझ्याक डे एक बारकी काचेची
माझ्याक डे एक बारकी काचेची बाटली होती. त्यात मी लिंबू सरबत भरून डीप फ्रीझर मध्ये ठेवायची आणि हपिसात येताना घेउन यायची व डेस्क वर बसून गारेगार पीत असे. काल ती फ्रीझर मध्येच विसरले. आज काढली तर बर्फ झालेले सर्व आणि बाटली हातातच फुटली व काचा झाल्या. थोडेसेच लागले पण हळद दडपली.
सांगायचा उद्देश हा की. काचेची बाटली डीप फ्रीझर मध्ये ठेवू नका. ज्येना किंवा लहान मुलांनी चुकून उचलली व फुटली तर कापेल. मी आजपासून स्टीलचा मग झाकणाचा किंवा प्लास्टिकचा सिप्पी वापरणार आहे.
अमा, काचेच्या बाटल्या
अमा, काचेच्या बाटल्या तपमानातील फरकाने तडकणारच. अश्या सरबतासाठी बर्फाचे ट्रे उत्तम. हवे तेवढे क्यूब्ज फ्लास्क मधे घालून न्यायचे.
काचेची बाटली भरताना ice
काचेची बाटली भरताना ice होताना expand होणार आहे हे लक्षात घेवून भरली तर नाही फुटणार.
थोडी कमी भरून बघा.
पुदीना सुकवायची रित. ताजी
पुदीना सुकवायची रित.
ताजी पाने स्वच्छ धुवून घ्या.
एका बोलमधे बर्फाचे थंडगार पाणी घ्या.
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवा.
पुदीन्याची पाने एका मोठ्या गाळणीत किंवा पुरचुंडीत घ्या.
पाण्याला उकळी आली कि त्यात गाळणी वा पुरचुंडी २० ते ३० सेकंद धरा, ( वेळ क्वांटीटीनुसार लागतो, पानांचा रंग थोडासा बदलेल पण ती आक्रसणार नाहीत एवढाच वेळ ) मग लगेच बर्फाच्या पाण्यात टाका. थोड्या वेळाने निथळून, सावलीतच कडक वाळवा. रंग व स्वाद दोन्ही टिकेल.
माझ्या फ्रिज मध्ये वर एका
माझ्या फ्रिज मध्ये वर एका डब्यात पाणी घातले की क्यूब उतरून खाली येतात. त्यामुळे ट्रे नाहीत. बाटलीत जागा होती बरीच. पण ती फुटली खरी. नशीब बाहेर काढल्यावर फुट्ली नाहीतर आतले सामान खराब झाले असते.
धन्यवाद भरत, पूनम आणि मंजूडी
धन्यवाद भरत, पूनम आणि मंजूडी तिन्ही आयडिया मस्त आहेत, फुडप्रो ने मिक्स >> एक किलो मिक्स >> मल्टीग्रेन मिक्स एका डब्यात. पुढ्च्या लॉटला नक्की ह्या आयडिया वापरणार. माझ्या पद्धतीने रोज किंचित वेगळ्या चवीची, दिसायला वेगळी, मऊ/कोरडी असा फरक पडतोय
रोजच्या चहात कंटाळा
रोजच्या चहात कंटाळा येईपर्यंत रोज ५-६ पाने चुरडून टाका.
btw मल्टीग्रेन म्हणजे काय काय
btw मल्टीग्रेन म्हणजे काय काय घालतेस तू ?
ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयबीन
ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयबीन / बेसन, बक्व्हीट फ्लार आणि कणीक पुढच्या वेळेस ओट्स च पीठ घालाव का विचारात आहे.
पुदीना टिकवायच्या सुचनांबद्दल
पुदीना टिकवायच्या सुचनांबद्दल धन्यवाद!! सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात करुन ठेवायचे ठरवले आहे..
हे सगळ एकत्र दळून आणणे शक्य
हे सगळ एकत्र दळून आणणे शक्य आहे का ?
Pages