जगातलं आठवं आश्चर्य --- लंडनची ट्युब अर्थात भुयारी रेल्वे

Submitted by मनीमोहोर on 28 February, 2016 - 12:35

कठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.

साधारण सन १८३० च्या सुमारास रेल्वेचा शोध लागला आणि वेगवान प्रवासाची मुहुर्तमेढच इंग्लंड मध्ये रोवली गेली. लंडन इंग्लंडमधल्या इतर शहरांशी रेल्वेने जोडले गेले. अनेक खाजगी रेल्वे कंपन्या उदयास आल्या. या सर्व कंपन्यांनी लंडनला आपल आपल एकेक टर्मिनस उभारलं होतं. लोक एका टर्मिनस हून दुसर्‍या टर्मिनसला रस्त्यानेच जात असत. तसेच रेल्वे मुळे खुप लोक कामासाठी ही लंडनला येऊ लागले. परंतु एवढ्या लोकांना सामावुन घेण्याची क्षमता लंडनच्या बोळकंडीसारख्या रस्त्यांची नव्हती. घोडागाडीने चार पाच मैल जायला दोन दोन तास लागत असत. ह्याचा लंडनच्या विकासावर विपरीत परिणाम होत होता म्हणून यावर तोडगा काढण्यासाठी पर्यायी वहातुक व्यवस्थेची निकड भासत होती. या सगळयाचा परिणाम म्हणून रेल्वेच्या मुख्य मुख्य टर्मिनसना जोडणारा भुयारी रेल्वेचा प्रस्ताव नगरपालिकेने मंजूर केला. या कामी जाॅन फाऊलर या हुशार अभियंत्याची नियुक्ति केली गेली. खुप परिश्रमाने प्रकल्प यशस्वी रीत्या पूर्ण झाला आणि सन १८६३ साली म्हणजे आपल्या कडे रेल्वे आल्यानंतर दहाच वर्षांनंतर पॅडि्गंटन ते फेरिंग्टन अशी अंदाजे साडेचार मैलाच्या अंतरासाठी ही भुयारी रेल्वे सुरु झाली. ही जगातली पहिलीच भुयारी रेल्वे. वाफेच इंजिन आणि उघडे डबे असलेल्या हीच लंडनकरांनी जोरदार स्वागत केले . पहिल्याच दिवशी विक्रमी ३८००० हजार प्रवाशांनी टयुबने प्रवास केल्याची नोंद आहे. पहिल्यांदा वाफेच्या इंजिनामुळे या भुयारी मार्गात धूर होत असे आणि या धूरापासून थोडेसे संरक्षण मिळवे म्हणून मोटरमनना म्हणे दाढी राखण्याचा सल्ला दिला जाई. दाढी थोडा धूर शोषुन घेईल म्हणून ( स्मित)

अगदी पहिली ट्युब

From Drop Box

आणि ही आजची आधुनिक

table style="widFrom mayboli

ही ट्युब म्हणजे अक्षरशः एक नळीच असते. सुरवातीच्या काळात ट्यूबच्या उभारणीसाठी कट अॅंड कव्हर तंत्र वापरले जाई. म्हणजे पहिल्यांदा जमीन खोदुन त्यात ट्युब आणि त्या ट्युब मध्ये रेल्वे लाईन आणि असल्यास स्टेशन असं सगळ बांधायच आणि सगळ काम झाल की वर जमीन पहिल्यासारखी करायची. परंतु काही वर्षांनंतर इमारतीला धक्का न लावता ट्यूबची उभारणी करण्याचे तंत्र विकसीत झाले. आणि ट्युब बांधणे जास्त सोपे झाले. आम्ही लंडनला ज्या इमारतीत रहात होतो त्या इमारतीच्या खालीच एक ट्युब स्टेशन होते. रात्रीच्या शांत वेळी गाडीची कंपने घरातही जाणवत असत

ट्युबमुळे लंडन अक्षरशः चारी बाजुनी फोफावु लागल. शहरातल्या गर्दीत, लहान जागेत रहाण्याची गरज आता उरली नाही.दुरवरच्या शांत उपनगरात राहुन लोक सिटीत ट्युबने कामाला येऊ लागले. त्यामुळे ट्यूब ची मागणी आणखीनच वाढली. या क्षेत्रात वेगवेगळ्या रुटवर सेवा देण्यार्या अनेक खाजगी कंपन्या उदयास आल्या. या प्रत्येक रुटच्या केंद्रस्थानी सेंट्रल लंडन होतच. लंडनभर अक्षरश: ट्युबच जाळ विणल गेलं. भुयारी म्हटलं तरी जिथे अगदीच शक्य नसेल तिथेच ही जमीनी खालुन जाते आणि जागा असेल तिथे मात्र आपल डोक वर काढते. विशेषतः मध्य लंडन मध्ये ही जमीनीखालुनच जाते. काही ठिकाणी ही अतिशय खोल ही जाते. . आज ट्युबचे जवळ जवळ दहा बारा रुट्स आहेत.सोईसाठी त्यांना हिरवा, काळा, डार्क निळा, लाईट निळा लाल, गुलाबी करडा वेगवेगळे रंग दिले गेले आहेत. आता नवीन रुटला द्यायला कोणता रंगच शिल्लक नाहीये. ( स्मित) मुळात खाजगी असलेल्या ह्या रेल्वे कंपन्यांच आज सरकारीकरण झालं आहे टीएफएल म्हणजे ट्रांसपोर्ट फाॅर लंडन ह्या नावाने. काळानुसार यात अनेक बदल झाले. आहेत. पहिल्यांदा वाफेवर चालणार्‍या इंजिनांची जागा वीजेने चालणार्‍या इंजिनाने घेतली. उघडे डबे जाऊन त्या जागी बंदिस्त डबे आले. डब्यात दिव्यांची सोय करण्यात आली, आपोआप उघड - बंद होणारे दरवाजे आले. मोठ्या मोठ्या स्टेशनांवर सरकते जिने बसवले गेले. अत्याधुनिक तिकीट प्रणाली आली पण त्याचबरोबर ट्युब खूप महाग ही झाली. लंडनच्या गरीब माणसांना आज ट्युबने प्रवास करताना विचारच करावा लागतो

हे आजचे ट्युब स्टेशन . ट्युबला फास्ट ट्रॅक नसतो. सगळ्या गाड्या स्लोच असतात.

From mayboli

आधुनिक सरकता जिना

From mayboli

ट्युबच्या प्रवासाच आकर्षण फक्त सामान्य माणसांनाच होत अस नाही तर ते राजघराण्यातल्या व्यक्तीना सुद्धा होत. सध्या राज्ञीपदावर असलेल्या राणीने ती साधारण बारा तेरा वर्षांची असताना आपल्या बहिणीबरोबर आणि गवर्नेस बरोबर अगदी रोमन हॉलिडे मधल्या ऑड्री हेपबर्न सारखा वेष पालटुन ट्यबचा प्रवास केला आहे. ती ज्या लाईनने प्रवास करणार होती तिचा रंग हिरवा असल्याने राणीने ही हिरवाच ड्रेस परिधान केला होता. गाडी जेव्हा जमीनीखाली गेली तेव्हा राणीचे डोळे आश्चर्याने चमकले होते. सरकत्या जिन्यावरुन जाताना त्यांची ही त्रेधातिरपीट उडाली होती आणि गाडी बदलताना तर त्या चक्क चुकल्या होत्या आणि कळस म्हणजे शेवटी बाहेर पडताना त्या चेकर कडे तिकीट द्यायचचं विसरल्या. चेकरने अक्षरशः हाक मारुन त्यांचे तिकीट घेतले. तसेच ह्या राणीच्या राज्यकारभाराच्या रौप्यमहोत्सवी वर्षात नवी ज्युबिली लाईन सुरु केली गेली. तिच उदघाटन ही राणीने एक स्टेशन गाडी चालवून केलं होत. सगळं केलेलच होत, राणीला फक्त एक बटन दाबायच होत. ( स्मित)

लंडनच्या जीव घेण्या थंडीपासून बोचर्‍या वार्‍यापासून आणि कधी ही येणार्या अवसानघातकी पावसापासून टयुबच लंडनकरांचं रक्षण करते. पाऊस वैगेरे आला की माणसं पुटकन जवळच्या स्टेशन मध्ये शिरतात. . पण ट्युबने खरा आधार दिला तो दुसर्‍या महायुद्धाच्या काळात. जर्मनीची विमान रोज लंडनवर बाँब वर्षाव करत होती. त्यामुळे संध्याकाळ झाली की लोक आपल्याकडच किडुक मिडुक घेउन जवळच्या ट्युब स्टेशन मध्ये जात असत झोपायला . स्टेशन रात्री अशा लोकांनी भरुन जाई. सकाळी उठून लोकं येत आपपल्या घरी. एवढच नाहीतर लंडनच्या इतिहास प्रेमीनी युद्धकाळात लंडन म्युझियम मधला ऐतिहासिक मौल्यवान ठेवा जवळची दोन ट्युब स्टेशन प्रवाशांकरता बंद करुन तिथे ठेऊन दिला होता.

महायुध्दाच्या काळात लोकं अशी ट्युबच्या आश्रयाला येत असत.

From Drop Box

ट्युबच्या ह्या अभूतपूर्व यशानंतर हीच अनुकरण मग जगातल्या खूप देशांनी केल. कुठे हिला सबवे म्हणतात तर कुठे मेट्रो. आणि हो.... हीच ही ऑफिशिअल नाव आहे " लंडन अंडरग्राऊंड ". आणि हिचा लोगो म्हणजे एक वर्तुळ जे चाकाच प्रतीक आहे आणि दोन समांतर रेषा ज्या रुळांच प्रतीक आहेत. हा लोगो दिसला की बिनधास आत शिरायच आणि इच्छित स्थळी पोचायच. काही अडचण आलीच तर मदतीला ट्युबचा नकाशा असतोच.

हा ट्युबचा लोगो

From mayboli

लंडनकरांना ट्युब बद्दल खूप अभिमान आहे, पण कसा , तर तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचुन करमेना असा. गर्दीच्या वेळेत रश अवरचा पार क्रश अवर होऊन जातो. गाड्या, सरकते जिने माणसांनी ओसंडून जात असतात. प्लॅटफॉर्म आणि गाडी यात असणार्‍या गॅपमुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. या गॅप बद्दल ही कोण अभिमान लंडनकरांना " प्लीज माईंड द गॅप" असं प्रिंट केलेले टी शर्ट घालुन मिरवत असतात मंडळी. गाडीत चढता येत नाही म्हणून लोकांना गाड्या सोडाव्या लागतात, अती गर्दीमुळे माणसं गुदमरुन जातील म्हणून कधी कधी विशिष्ट स्टेशनांवर मानवी हस्तक्षेपाने गर्दी कंट्रोल करावी लागते, गाड्या लेट होतात. प्रवास महाग आहे , ट्युबचे संप होतात ...... तरी ही लंडनची ट्युब ही लंड्नची जीवन वाहिनीच आहे त्यामुळे ट्युब शिवाय लंडनकरांच पान ही हलत नाही हे ही तितकच खर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(Y)

आई गं!!! किती छान लिहिलेस. सगळे स्मित गोड वाटलेत वाचायला Happy

सिंगापुरमधे सुद्धा इतके अ. ग्रा. होत आहेत ना हल्ली. झपाट्याने मेट्रोचे जाळे वाढत चालले आहे.

खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. मी तर इतकी भारावुन गेले होते ट्युबने की मला मोटारीने प्रवास करण्यापेक्षा ही ट्युबनेच प्रवास करावासा वाटे. (स्मित)

बँक आणि मॉन्युमेंट ही दोन स्टेशन खरं तर खूप लांब आहेत पण तरी ही जमीनीखालुन ती जोडलेली आहेत. आणि हे सगळं कधी तर जवळ जवळ दीड शे वर्षांपूर्वी . म्हणून जास्त नवल आणि कौतुक ही .
मस्त लेख; मी असं स्वप्न येत्या २० वर्षात भारतात पाहते.>> आपल्याकडे या आधीच ट्युब आली असती तर शहर सुंदर राहु शकत होती.

सस्मित, आत्ताच्या ट्युबचा फोटो आहे . टाकते.

कापोचे, ( Y ) म्हणजे काय हो ?

अरे हो वाहता नाही.
माझा प्रतीसाद मला दिसला नव्हता पण ती ओव्हरसाईट होती (खरं म्हणजे हा शब्द अंडर साईट पाहिजे :))

छान लेख माहिती व फोटो. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
(हे वाचता वाचता लक्षात येते की आपण किमान दिडशे वर्षे तरी "मागास" मागे आहोत अन खाबू व्यवस्थेमुळे अजुनही पुण्याच्या बीआरटी सारखेच घोळ घालतो आहोत )

लिंबूजी खरय पुण्यात तीस चाळीस वर्षांपूर्वी आली असती भूयारी रेल्वे तर खर्च ही कमी झाला असता आणि प्रवासाची सोय ही झाली असती. पण आपलं ध्येयच वेगळं असत ना ( स्मित)

मस्त माहिती, लेख पण आवडला.

पण लंडन्च्या ट्युब मध्ये आधुनिकरण न झाल्याने १०० वर्षापुर्वीची शान राहिलेली नाही. त्यापेक्षा तोक्यो (२०-२२ लाईन्स), हॉगकॉग, तैवान आणि सिंगापुर्च्या मेट्रो मध्ये प्रवास करायला जास्त मजा येते.

मनीमोहोर खूप छान माहिती दिलीत.

लंडनच्या ट्युबच्या आधी पॅरिसच्या मेट्रोचा अनुभव घेतला. दोन्हीही एकदम मस्त आणि खूप सोयीच्या आहेत.

साहिल म्हणतात तेही खरं आहे. ब्रिटीशांच्या जुन्याला जपण्याच्या प्रवृत्तीमुळे आधुनिकीकरण खूप धीम्या गतीनी होत असावं.

पुण्यात मेट्रो कधी होणार? Happy

दोन वर्शपूर्वी जपानला गेलो असता तिथल्या भुयारि रेल्वे पाहून मी पण असाच चकित झालो. तेथील एक भुयारी रेल्वे तर जमिनीच्या साठ मीटर खोल आहे. शिवाय सर्व भुयारी रेल्वे स्टेशन व प्लाटफार्म एकदम स्वच्छ. स्टेशनमास्टर पण मदत करायला तत्पर. आम्हा दोघाना जपानी भाशा येत नसून सुद्धा काहीहि त्रास झाला नाही. सर्वानी शक्य असेल तर जरूर जाउन अनुभव घ्यावा.

Pages