रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

असो...कालच्या भागात काय दाख्वलं ? >>
सगळी पोरं घरी येतात आणि पाण्यात गेले म्हणून सगळ्यांचा ओरडा खातात. पूर्वाची आई तिला काठीने मारते. या दरम्यान "नाईकांच्या घरातल्या माणसांक पाणी बाधता, कळंत नाय सांगून" हा डायलाॅग ३० वेळा तरी दत्ता आणि दत्तीने म्हटला. शेवटी सर्व पोरांना पाण्यात गेलीत म्हणून पाण्यानेच आंघोळ करुन घरात घेतात.
मध्येच गावातला एक माणूस येतो आणि अण्णांशी जमिनीचा व्यवहार सहीसकट झालाय, आता तुम्ही कागदपत्र बघुन पैसे द्या म्हणून सांगायला येतो. दत्ताशी त्याचा वाद होतो आणि तो "तुमचा कायतरी पाण्यात जायत" म्हणून शाप देऊन जातो. माधव दत्ताला त्याला पैसे द्यायला सांगतो पण दत्ता सांगतो, अण्णांच्या भानगडी तुला म्हायत नायत आज ह्याका पैसे दिलय तर उद्या दारासमोर लाईन लागेल.
बेरी नाना परत जाणार जाणार चा घोष करत असतात. (काल बेरी नाना बरेच टकटकीत दिसले.)
दत्ती पोरांची सगळी स्टोरी परत माईंका सांगता. माई "पोराक पाणी लागलाहा" ह्यो डायलाॅग सारखो सारखो म्हणून नाथाला त्याच्यावरुन ओवाळून टाकायला सांगते.
तेवढ्यात ठोकळी समुद्रावर गेलेली कळतं आणि सगळी घाबरतात. ठोकळी येताना दिसते तशी दत्ती "तुझ्यासोबत कोण आलीय ती हयसरच र्‍हावंदे " म्हणून तिच्यावरना गरागरा
कायतरी ओवाळून टाकते. मग ठोकळी "रस्ता चुकले आणि एका बाईने इथपर्यंत आणून सोडले" सांगते मग माई "कोण बाई" चौकशी करतात.. तशी ठोकळी वर्णन करते, "मोठ्या घरची बाई, हिरवा शालू, हिरवा चुडा, भरपूर दागिने, मोठं मंगळसूत्र, कपाळावर मळवट" हे ऐकतानाच माईंची तंतरते, आणि "ती बया हायच हाय " करत त्या खाली कोसळतात. आणि भाग संपला. Happy

ठोकळी येताना दिसते तशी दत्ती "तुझ्यासोबत कोण आलीय ती हयसरच र्‍हावंदे " म्हणून तिच्यावरना गरागरा कायतरी ओवाळून टाकते >>> >>> अगदि ते तसच केल तिने ... मला खुप हसायला आल तेव्हा Lol Lol Lol Lol

मस्त अपडेट Happy

(काल बेरी नाना बरेच टकटकीत दिसले.) >> हो जरा बरे दिसले .
दरम्यान "नाईकांच्या घरातल्या माणसांक पाणी बाधता, कळंत नाय सांगून" हा डायलाॅग ३० वेळा तरी दत्ता आणि दत्तीने म्हटला. >>> दत्ता , दत्ती आणि माई . सारखे एकच म्हणत होते

लोका पाचारुक ( माणूस गेल्यावर कुटुंबियांचे केले जाणारे सांत्वन ) येतत तेव्हा त्यांचे झील खळ्यात लहानपणीचे गप्पा रंगवतत, विधवा आईला लोक भेटतानाहि हे दोघाव खळ्यातच ! आणि सून फिराकच इली असल्यासारखी मोबारावर !
चालीरितांचो साफ बट्याबोळ,

आणि गावातली सगळी भूतां काय नायकांच्या घरातच दिलेली हत काय

झक मारली आणि पुन्हा शिरीयल पाहिली

सगळेच प्रतिसाद Proud

मालिकेचे शिर्षक "रात्रीस खेळ चाले" आणि आतापर्यंतचे सगळे भाग मात्र दिवसाचेच Happy

अण्णा टपकले - दिवसा
पारावर बसलेल्या शास्त्रज्ञ बायको उठुन गेल्यावर फांदी पडते - दिवसा
आर्चिसला समुद्रात कोणीतरी बोलावत - दिवसा
शास्त्रज्ञ बायको घरची वाट चुकते आणी तिला रस्ता दाखवण्यास हिरवा शालुवाली मदत करते - संध्याकाळी

रच्याकने कोकणात राहुनही समुद्रात जाता येत नाही म्हणजे खरंच हे नाईक शापितच आहे, Proud

सहावा वाटा बहुतेक नाथाचा/सुषमाचा Happy Happy

Cinematography (आणि त्यात कोकण) मस्त असल्याने मालिका बघतो.

आतापर्यंत हॉरर मालिकेत फक्त एकच मालिका "किले का रहस्य" जबरदस्त आवडली होती (शाळेत/कॉलेजात असताना दूरदर्शनवर रात्री लागायची).

रच्याकने कोकणात राहुनही समुद्रात जाता येत नाही म्हणजे खरंच हे नाईक शापितच आहे, >> + १२३४५६७८९...... Happy

सॉलिड प्रतिसाद एकेक Lol .

गिरीश सावंत, एकदम सही.

जिप्सी निरीक्षण ग्रेट, दिवसाच खेळ चाललाय.

रच्याकने कोकणात राहुनही समुद्रात जाता येत नाही म्हणजे खरंच हे नाईक शापितच आहे, भारीच.

सगळ्या comments छानच पण पेट names जास्त छान---
बेरी नाना
ठोकळा-ठोकळी-ठोकळं
दत्ता-दत्ती. Lol Lol

अण्णा असे भानगडबाज होते म्हणून पहिल्या भागात माईंच expression असं दाखवलं होतं. अण्णांचे थोडे जास्त episode दाखवले असते तर माईची भूमिका अजून खुलली असती.

इकडे घरातील सगळे सारखंच नायकांना पाणी बाधतं म्हणत असतात, तरी माठ ठोकळा माठोबा समुद्रावर गेली आहे हे विचारल्या शिवाय सांगत नाही. Angry

अण्णाना आधीच गचकवल, पहिल्या भागात. ते सेटवरही रन्गेलपणा करत नव्हते ना?:इश्श:
Shy Whistler

अन्जू अग हॉलशेजारीच किचन आहे, त्यामुळे जाहीराती लागल्या की काम आवरत बसते.:फिदी:

ओके रश्मी. पण मुगु म्हणते तसं तू घासतेयस तरी भांड्यांचा ढिगारा कमी होत नाहीय Wink (एवढया डीशेस घासून बाजूला केल्यास तरी, काय गांवजेवण घालतेस काय) .

काल दत्तीने चुल पेटवली पाणी तापवायला, आणि अजुन आधण टाकताना काही तरी लाथाडलं गेल. ती तशीच खाली बसुन ऊचलत होती तेव्हा चुलीला जवळजवळ टेकुनच बसली. माझ्या काळजात इतक धस्स झालं, तिला चटका बसेल म्हणुन. Uhoh

Pages

Back to top