रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंमळ जरा जास्तच झाली आहे पांडूला पावडर !>> पावडर नाही फेसपॅक आहे तो.
बिचार्‍याचं तोंड पण हलत नाहीये. नाईकांकडच्या विहिरीवर जा रे तोंड धुऊन ये. मग सांग काय सांगायचय ते. Happy

प्रेक्षकांपेक्षा कलाकारच चेहऱ्यावर जास्त गूढ भाव घेऊन वावरतात ... जाम पकाऊ.... ती शास्त्रज्ञ बाई तर खरच वीट आणते राव...:अओ:
बाकी दुनियादारीचा गनिमी कावा भारीच...:G Biggrin Biggrin

नवी जाहिरात पाहिली का?
ठोकळी आली परत घरी, रस्ता चुकली म्हणून उशीर झाला, तिला म्हणे कोणा हिरवा चुडा, मळवट भरलेल्या बाईने रस्ता दाखवला आणि हे बाईचं वर्णन ऐकून माईंची टरकली !!

नाही विसरू शकत 3 D. एवरग्रीन, माझ्या मनावर राज्य केलेली.

ही मालिका बघण्यापेक्षा इथे वाचायला मजा येतेय, Lol .

त्या पान्डुची अ‍ॅक्टीन्ग मला लय आवडली.:फिदी: Dancing Cat

कशी पन असो अन काय पन असो, म्या ही मालीका काम करताना पहानार मन्जी पाहनारच.
Washing Dishes

साधं एका बाईने रस्ता दाखवला म्हणाव..
खेड्यात हा ड्रेस कोड सर्रास वापरला जातो.. मुर्ख लेकाचे..
मला कधीच घरच्यांनी कोण होत, कस होत, ड्रेस कसा अन कोणत्या रंगाचा होता, मेकअप कसा केला होता हे कध्धीच नै विचारल.. सगळे पागल आहे..

बाकी कालचा भाग बरा होता , या लोकांच्या अभिनयाची(?) सवय झाल्यामुळे किंवा त्यांचा सूक्ष्माभिनय टिपता आल्यामुळे किंवा त्यांनाच थोडा-थोडा अभिनय जमू लागल्यामुळे ,काहीही असो पण पहिल्या भागांपेक्षा बरा होता .

मालिकेपेक्षा हा धागा जास्त रंगला आहे.

या एकसे एक स्मायली कुठून आणता तुम्ही? असं काही अ‍ॅप असेल तर सांगा.

अग रश्मी इतका वेळ भांडी धुत्येस पण प्लेटांचा ढिगारा काही कमी होईना. किचनमध्ये भुताटकी हाय का काय तुझ्या?

नुसते क्लोज अप्स, लाऊड म्युजिक यातूनच हॉरर फिल येतो अशी काहीशी या लोकांची समजूत झाल्यासारखी वाटते. काल त्या सायंटिस्ट काकूला समुद्र किनार्‍यावर कोणीतरी 'शुक्शुक' करतं, हे त्या लाउड बॅकग्राउंड म्युजिक मुळे नीटसं समजलंच नाही. शांततेतून, सतत भेदरलेले चेहरे दाखवून, भडक मेक अप न करताही हॉरर निर्मिती करता येते हे यांच्या गावीच नाही. खरंतर त्याचा परिणाम जास्त चांगला येतो. संदर्भासाठी रामूचे 'रात', 'भूत', 'डरना मना है', 'कौन' असे निवडक सिनेमे पहायची गरज आहे असं वाटतंय.
काल दिवसभर या मालिकेच्या जाहिरातीत, मळवट वाली हिरवा चूडा वाली बाई हे वर्णन करणारी ती सायंटिस्ट काकूच दाखवत होते. त्यामुळे त्यातल्या त्यात असलेल्या भितीदायक सीनची इतक्या रिपीटेशनने हवाच गेली !

मित +१
त्यात ती माई, "ती बया हायच हाय" म्हणत होती. ते "हयच हाय" असं हवं. किमान अर्थ तरी बरोबर लागेल असं बोलावं ना.

एकूणच अण्णा लयच भानगडबाज होते हे काल सिद्ध झालं. अगदी त्यांनी गावातच कोणीतरी बाई ठेवेपर्यंत. म्हणजे सहावा वाटा त्या बाईचा नाहीतर तीच्या मुलांचा असू शकतो.

ती सरीता मस्त आहे. अभिनय मस्त वाटला तिचा काल. खरी गावतली बाई वाटते. दत्ता पण बरा आहे.
पण ते भाषेचं काय ते नीट बघा म्हणावं एकदा.

मला काय वाटत ,
भानगडबाज अण्णान्ची भानगड विहिरीत गडप झाली. नाथाला ते माहित आहे ( आठवा: रामूच्या 'भूत' मधला वॉचमन) . सुश्मा नाथाची नाही तर अण्णांची मुलगी ( तसही तिच्याकडे आणि नाथाकडे बघून वाटत ही नाही की ती त्याची मुलगी असेल) . या सगळ्या प्रकारात पांडूला वेड लागलं. पण नाईकांका पानी बाधता म्हणजे का ते कळलं नाही . मे बी भानगडीचा काही संबन्ध समुद्राशीही असेल.

Pages