मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
तो येतो आणि अण्णा वाड्यातच
तो येतो आणि अण्णा वाड्यातच आहेत म्हणतो, तो प्रोमो बघितला होता, च ह ये द्या बघतांना. तेवढंच होतं का इंटरेस्टिंग.
हो, आधीचं मला फार आठवत
हो, आधीचं मला फार आठवत नाहीये, वर वर पाहिलं !! पण लक्षात नाही म्हणजे नसावं फार काही इंटरेस्टिंग
(No subject)
लगेच काय घडलं हे
लगेच काय घडलं हे सांगितल्याबद्दल thanx ऋचा.
अरे तो अर्चिस पांडूला वय
अरे तो अर्चिस पांडूला वय विचारतो तर तो ३५० वर्ष सांगतो. पांडूच काहीतरी गडबड दिसतोय.
काल त्या झाडाचा शाॅट दाखवताना अख्खं झाड शांत आणि फक्त एकच फांदी हलत होती... प्रत्येक वेळेस. फार भारी वाटलं ते.
आजचा भाग कदाचित अत्यंत घाबरवणारा असणार आहे, असं किमान कालच्या शेवटावरुन तरी वाटलं.
ठोकळा - ठोकळीच्या यादीत काल ठोकळ्याने बरा अभिनय केला. अर्चिसला ठोकळं म्हणणं पटत नाही तो चांगला अभिनय करतोय. अभि कायम फक्त वैतागलेलाच अभिनय करतो.. काल अर्चिसला चिडवताना पण मला तो वैतागलेलाच वाटला.
अभिनयाच्या बाबतीत पूर्वा आणि दत्ता छान काम करतायत.
हो, दत्ता, माधव आणी पूर्वा,
हो, दत्ता, माधव आणी पूर्वा, अर्चिस यानी काल चान्गला अभिनय केलाव. माका पान्डु बरा वाटतलो. खुळ्याचो काम करना सोपा नाय.:फिदी:
आजच्या भागात माधव झोपलेला असताना त्याला आवाज ऐकु येतात ते घुसमटल्यासाराखे. बहुतेक ठोकळीचे गालगुच्चे घेतले असतील शेवन्ताने.
ठोकळीचे गालगुच्चे घेतले असतील
ठोकळीचे गालगुच्चे घेतले असतील शेवन्ताने. >>
अन् पाहुणे ठीकायत पण घरातली
अन् पाहुणे ठीकायत पण घरातली बाई असं मस्तपैकी अंगणात बसून नवर्याशी गप्पा मारतेय. उंडारायला जातेय आणि आपण एकट्याच राबतोय..
>> gharaatala mulaga (hya baicha navara) gappa maratay - nobody seem to have any objection on that. Pargharatali mulagi (Shaba) kaam karat nahi hyavar matra chidchid. majja na!
bai gharatali tar navare (tya gharatalya bayanna zalele mulage) matra baherache kaay basun tp karayala?
Bayakannahi hya prakarat kahi odd ahe ani apal exploitation apalya itakya angavalanee padalay he lakshat yet nasava, hyach manasvee vaait vatat!
दत्ता-दत्ती, पुर्वा, माई,
दत्ता-दत्ती, पुर्वा, माई, अर्चिस, पांडु, अभिराम ह्यांनी चांगल अभिनय केलाय.
काल ती ठोकळी ठोकळ्यावर रागावुन खिडकी बंद करते. ती वळल्याबरोबर खाडकन खिडकी उघडते तेव्हा ती ठो़कळी कशी विचित्र हसलेय. घाबरलेच मी तिला हसताना बघुन.
ठोकळीचं नंतर भूत होणार बघा..
ठोकळीचं नंतर भूत होणार बघा.. तिच्या मुद्राभिनयात सॉलीड भूत्पोटेन्शीयल हा !
हाय लोक्स…. ४ दिवसांच्या
हाय लोक्स…. ४ दिवसांच्या सुट्टीनंतर आले इकडे… आल्या आल्या अपडेटसाठी ह्या धाग्यावर आले तर इकडे प्रतिसादांचा पाऊसच पडलेला दिसतोय.
कोनी कायय म्हणा, पन नांवजलेला
कोनी कायय म्हणा, पन नांवजलेला नटसंच न घेतां या सिरीयलमधे अभिनयाची पातळी खूपच वरची आहे, हें जाणवतंच.
सॉलीड भूत्पोटेन्शीयल हा>>>>
सॉलीड भूत्पोटेन्शीयल हा>>>>
धागो लई भराभरा धावतो हाsssss!
धागो लई भराभरा धावतो हाsssss!
ती वळल्याबरोबर खाडकन खिडकी उघडते तेव्हा ती ठो़कळी कशी विचित्र हसलेय. घाबरलेच मी तिला हसताना बघुन >>> +11111
खुळ्याचो काम करना सोपा नाय.फिदीफिदी.>>>> +11111
ठोकळीचे गालगुच्चे घेतले असतील शेवन्ताने.>>>
ठोकळीचं नंतर भूत होणार बघा..
ठोकळीचं नंतर भूत होणार बघा.. तिच्या मुद्राभिनयात सॉलीड भूत्पोटेन्शीयल हा !>>>>
बाकी वर्षानुवर्षे ठरलेल्या
बाकी वर्षानुवर्षे ठरलेल्या त्या फ़्लॅट आणि पॉश बंगल्यातील मालिका पाहून पाहून वैतागलेल्या डोळ्यांना कोकणातील तो वाडा, ती गावातील छोटी छोटी घरे, ओबडधोबड रस्ते, सायकली, विहिरी, झाडे, अंगण झाडणारी पोरगी (सुषमा), स्वयंपाकघर, लाकडे वापरून केलेला जाळ, त्यावर भाजत असलेली भाकरी, गरमपाणी, ताटातून आलेले चहाचे कप....आणि अगदी पक्के घरगुती बोलणे सर्व पात्रांचे.
....आणि या सर्वाहून अतिशय पसंत पडलेली ती हिरवी राने....सारे काही सर्वत्र पोपट नाचल्यागत हिरवे हिरवे. मन अगदी प्रसन्न होऊन गेले आहे. अशामुळे त्या झाडावर अगदी एक डझन भुते असली तरी त्यांची भीती नाही वाटणार.
होऊ देत चुकीचे मालवणी कोकणी उच्चार काही पात्रांचे... काही बिघडत नाही....घेऊ या सारे सांभाळून.
मामा आता तुम्ही हि शिरेल
मामा आता तुम्ही हि शिरेल बघायला सुरुवात केली की काय होसुमियाघ नंतर?
अशोक मामा, आम्ही तयारच आहोत
अशोक मामा, आम्ही तयारच आहोत सांभाळून घ्यायला.. पण या सगळ्याला उगाचच वेगळेच रंग चढण्याची चिन्ह दिसत आहेत आणि नेहमीप्रमाणे राजकारणी लोक गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त वाटतेय.
निधी, हे काय म्हणे आता?
निधी, हे काय म्हणे आता?
मुग्धटले.... ~ जान्हवी बाळाला
मुग्धटले....
~ जान्हवी बाळाला घेऊन संसारात रमल्याचे पाहून टीव्ही बंद करून टाकला होता. या मालिकेसंदर्भात नवीन धाग्यावर मालवण परिसरात कथानक घडते असा उल्लेख आल्यामुळे मनाला बरे वाटले...चला या निमित्ताने कोकणातील हिरवाईने डोळे शांत शांत होऊन जातील असे वाटल्यामुळे पहिला एपिसोड पाहिला....त्यावेळी दाखविलेली ती पिकांनी फ़ुललेली बहारदार दृश्ये पाहून मनस्वी आनंदही झाला....वाडा आणि परिसरही छान वाटला. कथानक म्हटल्यावर काहीतरे चढउतार असणार हे तर मान्य करायलाच हवे ना ? शिवाय झाडून सारी पात्रे नवीनच असल्याने त्यांच्या भूमिकांकडेही त्याच नजरेने पाहात आलो आहे.
पाहू या पुढे काय घडते ते.....बेरीज वजाबाक्या लक्षात घेऊनही मी असेच म्हणेन की भुताखेतावर विश्वास असला नसला तरी मालिका पाहायला हरकत नाही.
मुग्धा, हे वाच. गिरिश सावंत
मुग्धा, हे वाच.
गिरिश सावंत | 29 February, 2016 - 11:36
पडसाद उमटलेच
व्हॉट्स अप मॅसेज,,,
कोकणात भुतखेतं असतात अशा आशयाची टीव्ही मालीका प्रसारीत करून अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या आणि कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या मुळावर उठलेल्या महाभागांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे
त्याचबरोबर सागरी पर्यटन धोक्याचे आहे अशी चुकीची आणि कोकणातील काही सागरी किनाऱ्याबाबत निखालास खोटी माहिती देणाऱ्यांविरोधात कोकणवासियांचे एल्गार उभारणेकरिता आज सायं ६ वा चिपळूण रेस्ट हाऊसला मिटींग आयोजित करण्यात आली आहे.
ओह्ह्ह.. सो सॅड
ओह्ह्ह.. सो सॅड
हम्म!
हम्म!
माहितीसाठी ## रात्रीस खेळ
माहितीसाठी ##
रात्रीस खेळ चाले मालीकेत 'कोकण'ची भुताखेताच्या नावाखाली बदनामी होत असून त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होऊ शकतो,
समुद्र, झाड, रान अशा ठिकाणी भुतं आहेत, अंगावरून काढणे, आदी गोष्टीमुळे अंधश्रद्धेला खतापाणी मिळत आहे
म्हणून या मालिकेवर
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन नागरिकांकडून चिपळूण- रत्नागिरी पोलीस स्थानकात देण्यात आलेले आहे,
माहितीसाठी ## रात्रीस खेळ
माहितीसाठी ##
रात्रीस खेळ चाले मालीकेत 'कोकण'ची भुताखेताच्या नावाखाली बदनामी होत असून त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होऊ शकतो,
समुद्र, झाड, रान अशा ठिकाणी भुतं आहेत, अंगावरून काढणे, आदी गोष्टीमुळे अंधश्रद्धेला खतापाणी मिळत आहे
म्हणून या मालिकेवर
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन नागरिकांकडून चिपळूण- रत्नागिरी पोलीस स्थानकात देण्यात आलेले आहे,
अगदी खर सांगायच तर कोकण आणि
अगदी खर सांगायच तर कोकण आणि भुत यांचा संबंध याआधी अनेकदा जोडला गेला आहे.. ज्यांचा भुताखेतांवर विश्वास आहे त्यांना कुठेही भिती वाटेल. ज्यांचा नाही त्यांना कुठेही नाही.
टिव्हीवरील मालिका, चित्रपट यातुन समाजाला संदेशच मिळतच असते तर आत्ता ज्या प्रकारच्या सिरियल्स किंवा चित्रपट (काही चांगले अपवाद वगळता) येत आहेत ते आलेच नसते.
बाकी मी अधिक काही बोलत नाही..
या विषयावरची माझी ही पहिली आणि शेवटची पोस्ट, यापुढे मालिकेवर बोलेन.
मुग्धा +११११
मुग्धा +११११
मालिका बंद नका करू म्हणावे,
मालिका बंद नका करू म्हणावे, हे तर मालिकेच्या गाभ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थीत करताय लोकं.
भारिच! आता काय अंधश्रद्धावाले
भारिच! आता काय अंधश्रद्धावाले सुखाने भुताचे सिरिअल पिक्चरप्ण पाहु देणार नाहि का?
(No subject)
Pages