मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
मला वाटतं मालिकेत कोकण
मला वाटतं मालिकेत कोकण background असलं तरी प्रोमोज मध्ये कोकणात भुते अशी भुते तशी असं hammer केलं, ते चुकीचं आहे बहुतेक त्याला आक्षेप असेल. अर्थात मालिकेमुळे पर्यटनावर नाही परिणाम होणार, कोकण हे उत्तम आहे आणि लोक ते बघायला जाणारच. कोकणात आता कोणी अशा गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. आम्ही तर लहानपणापासून भुताच्या गजाली एन्जॉय करतो आणि रात्री वगैरे असं आहे कोकणात असं वाटलंही नाही कधी. बाकी पण करणी etc आहे कोकणात असा संदेश जातोय पण आता ते माणसाच्या मनाचे खेळ आणि कोकणात चांगलं आहे सर्व, हे कोणीतरी मुद्दाम घडवतय असंच दाखवतील. सकारात्मक दाखवू म्हणालेत ना.
ह्या समजुती, अंधश्रद्धा जगभरात आहेत. त्यामुळे एकेक आठवड्याला एकेक स्टोरी ठेऊन, वेगवेगळ्या प्रदेशातल्या स्टोरीज दाखवायला हव्या होत्या. असो.
हे राजकीय पक्ष डोक्यावर
हे राजकीय पक्ष डोक्यावर पडलेत. इतके दिवस याना तू तिथे मी, दिल्या घरी तू सुखी रहा सारख्या भम्पक मालीका चालत होत्या आणी आता कोकणचा विषय आला की लागले फायदा उठवायला. लोक काय मुर्ख आहेत का की भूत आहे समजून कोकणात जाणार नाही ? आता मग शनीवार वाडा आणी पर्वतीवर पेशव्यान्ची अख्खी फॅमिली हिन्डते असे सान्गीतले तर पुणेकर तिथे जाणार नाहीत? कमाले! आधी त्या हिन्दी घाणेरड्या सिरीयली बन्द करा म्हणावे.
आणी आता कोकणचा विषय आला की
आणी आता कोकणचा विषय आला की लागले फायदा उठवायला>> रश्मी, एकदम मुद्द्यावरच बोट ठेवलयंस. हेच चालू आहे सद्ध्या. कोकणचे ठेकेदार समजतात स्वतःला.
मालिकेत काय हवं ते दाखवा, पण
मालिकेत काय हवं ते दाखवा, पण 'कोकण' या शब्दावर सर्वांचा आक्षेप आहे,
कोकणातली भुतं...... या वाक्यामुळे कोकणवासीय चिडला आहे,
आपल्या घराबाबत कोणीही कशाही रीतीने वाईट बोलले तरी वाईट वाटणारच. मालिकेत जळी स्थळी भूतंच राहतात असे दाखविले आहे, आज आपण कितीही बोललो आम्ही घाबरत नाही तरी भीती तर वाटतेच,
समजा इथल्या एका समुद्रावर आपण संध्याकाळी एकटेच फिरत असू आणि अवचित आवाज आला तर काय विचार मनात येतील, इतर वेळी आपण लक्षही देणार नाही, पण 'कोकणातली भूत' हे वाक्य आठवलं तर तेव्हा मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे,
कोकणातली भूत अशी टॅग लाईन ना वापरता केवळ एक ठिकाण म्हणून सिरियल झाली असती तर एवढा गजहब झाला नसता, राजकारणाचे रंगही लागले नसते.
(कलाकारांकडून वापरली जाणारी मालवणी भाषा हा वेगळा विषय आहे)
बाकी कोकणातली माणसां ....एकदा पाठ धरल्यानी तर
सोडूची ना ssssssssssय☺
हे राजकीय पक्ष डोक्यावर
हे राजकीय पक्ष डोक्यावर पडलेत. इतके दिवस याना तू तिथे मी, दिल्या घरी तू सुखी रहा सारख्या भम्पक मालीका चालत होत्या आणी आता कोकणचा विषय आला की लागले फायदा उठवायला>> + ११
एक ठोकळा ठोकळी सोडले तर सगळे
एक ठोकळा ठोकळी सोडले तर सगळे चांगला अभिनय करायला लागले आहेत अगदी ठोकळा सुद्धा आता बरा वाटतोय पण ती ठोकळी चेहऱ्यावरची एक रेष ही हलणार नाही याची पुरेपूर काळजी घेते
ठोकळी काय इतक्यात सुधारत नायSSSSS कारण ह्यांच्या घरात कोंबड्या नायSSS
ठोकळी माबोकरानी दिलेल्या
ठोकळी माबोकरानी दिलेल्या नावाला जागणार बहुतेक शेवटपर्यंत, सर्व शोधून काढलं तिने तरी चेहेरा तोच असेल.
कालच्या भागाचे रिपिट
कालच्या भागाचे रिपिट टेलिकास्ट नाही झालं . आजचा भाग तरी होणार का ? मालिका जरा सूर पकडत होती तोपर्यंत ....
न्यूज अपडेट :: मुंबई: झी
न्यूज अपडेट ::
मुंबई: झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’विरोधात शिवसेनेनं आज मुंबईत जोरदार आंदोलन छेडलं आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांनी झी मराठीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं. तसेच ही मालिका बंद करण्यासाठी झी मराठीच्या संचालकांना निवेदनही दिलं.
अल्पवधीतच या मालिकेबाबत बरीच चर्चा सुरु झाली. मात्र या मालिकेतून भूत-प्रेत, आत्मा यासारख्या अंधश्रद्धांना खतपाणी अशीही टीका होऊ लागली आहे. आता या मालिकेच्या विरोधात काँग्रेसनंतर सेनेनंही उडी घेतली आहे. त्यामुळे चर्चेत असणाऱ्या या मालिकेचं नेमकं काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
22 मार्चपासून सुरु झालेल्या या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. कोकणामध्ये भूतांच्या गोष्टी अनेकदा ऐकवल्या जातात. पूर्वापारपासून चालत आलेल्या या दंतकथांना कोणताही आधार नाही. अशाच काल्पनिक कथांवर आधारित ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं प्रक्षेपण सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता होतं.
मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण कोकणातील आकेरी गावात होत आहे. मालिकेची कथा-पटकथा संतोष अयाचित आणि आशुतोष पराडकर यांची असून संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे आहेत. ‘साजरी क्रिएटिव्हज’ची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन कोकणातील राजू सावंत यांनी केलं आहे.
http://zeenews.india.com/mara
http://zeenews.india.com/marathi/news/kallabaji/zee-marathi-stand-on-mar...
@ गिरीश सावंत-... अगदी-अगदी
@ गिरीश सावंत-... अगदी-अगदी हेच सांगायला आलो होतो.
ही मराठी मालिका अंधश्रद्धा पसरवते म्हणे- काहीही?
असं असेल तर- नागिन आणि ससुराल सिमर का यांसारख्या अजुन अनेक हिंदी सिरिअल्स काय जनसुधारणा करत आहेत का?
सर्व शोधून काढलं तिने तरी
सर्व शोधून काढलं तिने तरी चेहेरा तोच असेल >>>> आणि सांगताना कै विशेष नै हो अशा थाटात सांगेल.
असं असेल तर- नागिन आणि ससुराल
असं असेल तर- नागिन आणि ससुराल सिमर का यांसारख्या अजुन अनेक हिंदी सिरिअल्स काय जनसुधारणा करत आहेत का? >>>>> अगदी अगदी
बाकी काहीही म्हणा पण सगळ्यात
बाकी काहीही म्हणा पण सगळ्यात बेस्ट अक्टिंग जर कोणी करत असेल तर तो 'पांडू'…. मला फार आवडलं त्याचं काम.
बाकी काहीही म्हणा पण सगळ्यात
बाकी काहीही म्हणा पण सगळ्यात बेस्ट अक्टिंग जर कोणी करत असेल तर तो 'पांडू'…. मला फार आवडलं त्याचं काम.
>.>> अनुमोदन!
काल तो नाथा चुलीसाठी खोदत होत
काल तो नाथा चुलीसाठी खोदत होत ते पाहून मला तर वाटले, कि आता काही सापडेल कि काय जमिनीत पुरलेले!
ए अस काय ग क्लिओपात्रा?
ए अस काय ग क्लिओपात्रा? थ्रिलर की सस्पेन्स की हॉरर अशी कायशीशी मालिका आहे म्हणुन प्रत्येक ठिकाणी कसा ग संशय?
काल तो नाथा चुलीसाठी खोदत होत
काल तो नाथा चुलीसाठी खोदत होत ते पाहून मला तर वाटले, कि आता काही सापडेल कि काय जमिनीत पुरलेले! >>> मलापण
पांडू भारीच काम करतो.
मुग्धटली , ख्ररच अहो ! ते एक
मुग्धटली , ख्ररच अहो ! ते एक एक शॉट प्रत्येक अॅन्गल ने ईतकावेळ दाखवतात न , कि आता काही घडणार असे वाटत राह्ते..!
मुग्धटली , ख्ररच अहो ! >>>>
मुग्धटली , ख्ररच अहो ! >>>> ये अहो कौन है?
ते एक एक शॉट प्रत्येक अॅन्गल ने ईतकावेळ दाखवतात न , कि आता काही घडणार असे वाटत राह्ते..! >>> अरे देवा!
ये अहो कौन है>>>> मुग्धटली
ये अहो कौन है>>>>
मुग्धटली ख्ररडपट्टी काढ्ल्यासारखे वाटते ना!! म्हणुन अहो जोडले!
ए श्या काहीही तुला तस वाटत
ए श्या काहीही
तुला तस वाटत असेल तर मुग्धा म्हण किंवा तुला काय हव ते म्हण. पण एकेरी हाक मार.
>>>> कोकणातली भुतं...... या
>>>> कोकणातली भुतं...... या वाक्यामुळे कोकणवासीय चिडला आहे, <<<<<<
कोण म्हणते असे? मिडियावाले? की पेडन्यूजवाले?
मी आख्खाच्या आख्खा अस्सल कोक्या आहे व कोकणाशी संबंध राखुन कोकणवासीयही आहे..... मी नाय चिडलो.....
हो, अस्तातच आमच्या कोकणांक भुतांऽऽऽखेतांऽऽ... त्यात नविनं तांऽऽ काऽऽयऽऽ आसांऽऽ ?
शिन्च्यांनी भुतांवर पण सेरियला काढून पैका मिलवल्यानी..... तर तुमका पोटांत का दुखुक होय?
इलेक्शनो जवळ आल्यो काय गो बयोऽऽ? तर्रीच...
इलेक्शनां जिंकुक होय तां भुताखेतांचो आधार घेऊक लागली.... !
ओक्के!
ओक्के!
पण तो नाथा इतकं का खोदत होता
पण तो नाथा इतकं का खोदत होता चुलीसाठी? जणू काही खजानाच शोधतोय.
पण तो नाथा इतकं का खोदत होता
पण तो नाथा इतकं का खोदत होता चुलीसाठी? जणू काही खजानाच शोधतोय. >> पण मुळात चुल बनवण्यासाठी खोदावं का लागतं? जागा सारखी / समतल करून त्यावर मांडतात चुल.
पण मुळात चुल बनवण्यासाठी
पण मुळात चुल बनवण्यासाठी खोदावं का लागतं? जागा सारखी / समतल करून त्यावर मांडतात चुल.<<< तेच तर, मलाही हाच प्रश्न पडला होता.
इतकं खोदल्यावर खाली आयतीच चुल
इतकं खोदल्यावर खाली आयतीच चुल मिळणार असेल.
नाथा को हे सब पता!!!!
नाथा को हे सब पता!!!!
>>>> पण मुळात चुल बनवण्यासाठी
>>>> पण मुळात चुल बनवण्यासाठी खोदावं का लागतं? <<<
मोठ्या भांड्यात स्वैंपाक करायचा तर चर खोदतात, कडेने दगड लावुन त्यावर हंडी/तपेले मांडतात. (माझ्यकडे काढलेत पण नेमके आत्ता इथे दाखव॑अयला फोटो नाअहीत... )
चर अशाकरता की लाकडाचे मोठे फाटे/ओंडके लावता येतात.
Pages