रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कस्काय साभार .....
लोकांना कामधंदे नाहीत. उठसुठ वाद ......

कोणी तरी सांगा त्या वेड्याला... कोंकणात मुली साखरपुड्याला जात नाहीत...... तर मुलगा जातो नवरीकडे...
किती हे अज्ञान .......
आणि म्हणे रात्रीस खेळ चाले......
आवशीचो घो यांच्या.....मुळात हे सर्व मुर्ख कोकणाची आेळख भुताखातांची भुमी अशी करूनच का देताहेत ???? त्यापेक्षा कोकणातल्या उज्वल परंपरा व निसर्ग ह्या बद्दल दाखवू शकला नसता का ????अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार नाही का ???? उद्या दुसऱ्या भागातील सोडा आपली तरी कोकणी मुले आपल्या बरोबर आपल्या गावी येतील का ????? निर्मात्यास अक्कल येण्यासाठी हा मॅसेज त्याच्यापर्यंत पोहचलाच पाहीजे कोकणाचा अभिमान असेल तर हा मॅसेज पुढे पाठवां

अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रकार नाही का ????<<<
अंधश्रद्धा सापेक्ष असते टिव्ही रिमोट्सारखी.मनात असेल तर चॅनेल बदला नैतर तसच ठेवा.
बाकी तुमचे म्हणणे पटले.

मै बताती. Wink

दत्ताने नार्वेकरांना "तुमची मुलगी घरात आली म्हणून आमचो बापुस गेलो, आता ही सोयरिक मोडली. " असं सांगितलं. त्यावर नार्वेकर लग्न मोडलं तर तुमच्या घराला तळतळाट लागतील असं माधवला सांगतात.
अभि नार्वेकरांना सोडायला जातो. ते चालत असताना १० मि. ते दाखवण्यात घालवली. देविका अभिला त्याचा निर्णय त्याला घ्यायला सांगते. मध्येच वकिल येतात. मग अभिला बोलवायला पांडुला पाठवतात पण पांडु ते विसरुन अंगणातच बसुन राहतो.
मग पुर्वाला अभिला फोन करायला सांगतात.. हे आधी का करत नाहीत कळलं नाही. Uhoh शेवटी बेरि आजोबांना बीडीचा वास येतो. दत्ताला पण येतो पण तिथे कोणीच नसतं आणि झोपाळा आपणच हलत असतो. (बाकी मल्हार फाॅर्मुला मकोंनी इथे पण वापरलाय किती तरी क्लोजअप्स आणि चालताना प्रत्येक पाऊल दाखवून वेळ काढुपणा. Angry )

शेवटी बेरि आजोबांना बीडीचा वास येतो. दत्ताला पण येतो पण तिथे कोणीच नसतं आणि झोपाळा आपणच हलत असतो. (बाकी मल्हार फाॅर्मुला मकोंनी इथे पण वापरलाय किती तरी क्लोजअप्स आणि चालताना प्रत्येक पाऊल दाखवून वेळ काढुपणा.>>>>> आधी मला बेरी कळल नाही.:फिदी: म्हणल आजोबानी या वयात बेरी जास्त खाल्ली म्हणून त्याना बेरी नाव ठेवल वाटत.:फिदी: मग ट्युब पेटली.

मकोनी? ही सिरीयल कोठारेन्ची आहे?:अओ:

दत्ताला पण येतो पण तिथे कोणीच नसतं आणि झोपाळा आपणच हलत असतो.>>>>>>>>>>>> परत दत्ताने चुकी केलीच.............. "विडी चा वास येतो हा" असे म्ह्णुन Proud ते विडी चो वास येता असे पाहिजे होते

Biggrin Biggrin Biggrin

कायच्या काय डायरेक्शन. प्रत्येकाकडे मोबाईल असताना बोलावण्यासाठी एखाद्याला पाठवायची काय गरज? आधीच का नाही फोन लावत? वकिल म्हणतात चूल पेटवली का ? यावर ती बाई म्हणते पहिल्या दिवशी शेजार्यांनी जेवण दिले मग जास्त माणसे आहेत घरात मग चूल पेटवली, म्ह्णजे वकिल अण्णा गेले त्याच दिवशी येत नाहीत. मग तरीही मुलगी आणि तिचे आई वडील साखर पुड्याच्याच ड्रेस मधे असतात. ते तर राहू शकत नाहीत तिथे. आणि जर परत आले असतील तरिही त्याच कपड्यात.
वकिल म्हणतात अण्णांनी इस्टेटीचे पाच वाटे केले आणि अजून एक सहावा वाटा केला आहे. हे मराठी चुकिचे नाही का? आधीच सांगा ना एकूण सहा वाटे केले.
आणि ती बाहेर बसलेली मुलगी कोण असते? भूत आहे का? कारण तिच्याशी कुणीच बोलत नाही.

काल नार्वेकर बाईचे " देवा बघितलस ना काय झाला ते " बघितल्यावर आणि ऐकल्यावर खात्री पटली की ही लोक शाळेच्या गॅदरिन्गम्ध्ये काम केल्यासारखी वागतात.
तो अभिराम रस्त्यावर गाडीची वाट बघत असतो तेन्व्हा ओसाड रस्त्यावर असल्यासरखे वाटतो नंतर देविका त्याच्याशी बोलायला येते तेन्व्हा चांगली झाडी असते आजूबाजूला.
आणि ती बाहेर बसलेली मुलगी कोण असते? भूत आहे का? कारण तिच्याशी कुणीच बोलत नाही.>> मलाही तसच वाटलं . आणि ती फक्त देविका ला दिसते.

कालचा भाग खुपच बोअअअर होता. किती ते रेंगाळणे, गोगलगायीला पण लाज वाटली असेल एव्हढ्या हळुहळु सगळा कारभार चाललेला.

मग पुर्वाला अभिला फोन करायला सांगतात.. हे आधी का करत नाहीत कळलं नाही. >> हो ना. माझी ५ १/२ वर्षाची लेक पण बोलली की आधीच का नाही फोन केला त्यांनी. एव्हढ्या लहान मुलांना जे कळतय ते या सिरीयलवाल्यांना कळु नये :रागः

आणि ती बाहेर बसलेली मुलगी कोण असते? भूत आहे का? कारण तिच्याशी कुणीच बोलत नाही. >> सामी, ती भुत नसावी पण तिची हिस्ट्री असणार आहे काहीतरी ती समजेल हळुहळु. सहवा वाटा तिचाच असावा असा अंदाज.

विडी ओढायची सवय आण्णांना असते आणि सध्या ते ढगात गेलेत. फिदीफिदी फिदीफिदी फिदीफिदी>>>>> अण्णा सुपरफास्ट आहेत एकदम... सापु च्या आधिच ढगात गेले.. लगेच आत्मा बनु न झोपाळयावर बसुन बिडी ओढायला आलेसुद्धा ! Biggrin Biggrin

अभि नार्वेकरांना सोडायला जातो. ते चालत असताना १० मि. ते दाखवण्यात घालवली>>>>
मला वाटले त्यान्ना चकवा लागणार आता! Proud Proud

बाय द वे, अण्णा गेले कसे? सुरवातीचे ५ मी. हुकले. कालच्या भागात वकील एक् वाक्य ५-५ वेळा म्हणत होता . अभि आणी देविकाच्य घ्र्रच्याचे पायाचे क्लोजप पाहुन जाम बोअर झाले.मालिका पहिले काही भाग तरि रजक होतिल असे पाहावे.

बाय द वे, अण्णा गेले कसे? >>> फोन वरुन !!!... म्ह्णजे माधव ला फोन आला असे दाखवले, अण्णा गेले असा !

कोणाला म्हणजे कोणालाच अभिनय येत नाही आहे. काय ते हावभाव, आवाज मधले चढ उतार... शी...
यापेक्षा पथनाट्य सदर करणारी लोक चांगली असतात.
आर्चिस चा बाबा( कला..गप्पा बैस) या चालीवर दत्ता..गप्पा बैस.. इतकंच बोलतो.. दत्ता उगीचच गुरगुरतो. दत्ता ची बायको काहीही कळत नाही तरी नवर्याची बाजू घेते आणि ती शास्त्रज्ञ काही स्व:तचा ताठा सोडत नाही.
रात्रीचा खेळ कधी होईल तो होईल...मालिकेचा मात्र खेळखंडोबा झालाय हे नक्की...

Pages