निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नो लेपर्ड, रेड पांडासारखे प्राणी >>> वाह! एक नंबर... स्नो लेपर्ड दुर्मिळ प्राणी आहे... दा फोटो घेतले का?

स्नो लेपर्ड, मोनाल फेझंट.........वॉव!!!!!!!!!!!!! लक्की!!!!!!!!!
मोनाल , नेपाळ चा नॅशनल बर्ड ना??
फोटो पाहायची उत्सुकता लागलीये.. दार्जिलिंग पण माझ्या लिस्ट वर आहे..

सायु, फारच सुंदर आहे तुझी बाग..

जागु.. ,'त्या' तृप्त आत्म्यांपैकी खर्रच कुणीही फिरकलं नाहीये इकडे!!! Lol

जागुले.. आय (डोंट) वाँट टू नो द मेन्यू Wink

वर्षूई, फेबुवर जाऊन बघ ग..... तुझी खुप उणिव भासली हे मात्र खरे. तुझ्यापासुन खे.ग. च्या गप्पा सुरू झाल्या. तेव्हा हेमा लंडनला होती आणि ती चुकचुकत होती की तिचे मिसणार. गटग झाले तेव्हा ती परत आलेली आणि तू मात्र परदेशी गेलेली. गटग गटग पे लिखा होता है अटेंड करनेवालेका नाम हेच खरे. Sad Happy

वर्षू, रोना नै.. आपण समदु:खी गो..

दिनेशदा लेख येऊ द्या लवकर..

सायली, ये हाथ मुझे दे दे.. आईने जांभळ्या कृष्णकमळाचा वेल आणला आप्पांकडून आणि घरी लावला..तीन फुट वाढला तो आणि बाजुला एक पिल्लु पण उगवल एखाद फुट उंचीच.. पण आता ते वाढेना.. तेवढाच्या तेवढाच आहे तो वेल आणि पिल्लु पन.. बर भारंभार पाणी सुद्धा देत नै घरी कुणी.. दिवसाआड टाकतो पाणी.. काय झाल असेल बर ?

टीना, अलगद उकरुन खत घाल थोड.. अधुन मधुन भाज्यांची साले,देठ पण घाल.. वाढीत फरक दिसेल बघ..
आणि वेलाला आधार देऊन वर चढव...

हे निलमणी लता, परपल व्रीथ.. (नाव शांकली आणि साधना कडुन कळले)

त्या वरच्या फुलाचं नांव म्हाईत आहे का कुणाला??? ^

कोस्तारिका च्या सुपर मधे ही गमती दार , दुधीसदृष्य भाजी दिसली.. नावाचा पत्ताच नव्ह्ता

ही म्हणे पिमियेंतो दूल्से ( गोड मिरच्या)

वर्षू, ती भोपळ्यासारखी भाजी म्हणजे बटरनट. भोपळ्यासारखीच लागते चवीला, पण कमी गोड. सूप वगैरे चांगले होते. बेक / ग्रील करूनही खातात..... पण तूला आवडणार नाही Happy

दार्जीलिंगच्या टायगर हील वरुन झालेले हे कांचनजुंगाचे दर्शन... त्यासाठी तिथे पहाटे ४ वाजल्यापासूनच ठिय्या देऊन होतो..

DSCN1163.JPG

वर्षू, हि शॉर्ट ट्रीप. दहा दिवसांची. मोठी ट्रीप ऑगस्ट मधे.

तरी किमान ८ मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटलो !!!!

जबरदस्त..
दोन्ही प्रचिंमधे वरळी निळाई आणि खालच्या मधली निळसर जांभळी झाक अप्रतिम..लक्की यु दा...

वर्षू,
काय नविन नविन दाखवत राहतेस गं Wink
मला या सर्व भाज्यांची नावे पाठ करायला क्लासेस लावायला लागेल..

ओह.. कांचनजुंगा... ब्यूटिफुल!!!!!!!, फूल पण कस्लं सुंदर आहे..

त्या फुलबाजी चं नांव???????

मस्त मस्त फोटो सर्वच.

वर्षुताई गोड मिरच्या भारी, मी नाही खाऊ शकणार. Lol

हाय लोक्स
कसे आहात?
वाचतीये हळूहळू.
वर्षू आणि दिनेश ...कालच हे बटरनट सूप मिळालं. ओक्के होतं चवीला. याची भोपळ्यासारखी भाजीही खाल्ली होती.

अन्जू...बरोब्बर! अगं जायचं म्हणून आधी तयारीत बीझी.
पोटोमॅक नदी आणि वॉशिन्गट्न डीसी.चं विहंगम दृश्य. मधे पांढरी रांगोळी दिसते ती २/३ दिवस आधी पडून गेलेल्य बर्फाची.

Pages