Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Please masti nako. Ekhada
Please masti nako. Ekhada anubhav yeude.
परदेशातली भुते संस्कृत
परदेशातली भुते संस्कृत रामरक्षा म्हणल्यास पळून जातील का?

रामरक्षा एका विशीष्ठ भाषेत
रामरक्षा एका विशीष्ठ भाषेत प्रोसेस न होता त्याच्या बायनरी बनून मग भूतापाशी जात असतील तर भाषेचा प्रश्न येणार नाही.
अय्या पण १९२० सिणेमात तो हीरो
अय्या पण १९२० सिणेमात तो हीरो रामरक्षा का शनिमहात्म्य कायसं म्हणतो तर ती इंग्रज भुतणी पळुन जाते त्याच्या बायडीच्या शरीरातुन
अय्या पण १९२० सिणेमात तो हीरो
अय्या पण १९२० सिणेमात तो हीरो रामरक्षा का शनिमहात्म्य कायसं म्हणतो तर ती इंग्रज भुतणी पळुन जाते त्याच्या बायडीच्या शरीरातुन >>> १९२० च्या पहिल्या भागात हिरो हनुमान चालीसा बोलतो आणि त्याच्या बायडीच्या अंगात इंग्रज भुतणी नसुन इंग्रजांना फितुर झालेला देशी मानवच असतो.

कंपाईल वन्स, रन एव्हरी
कंपाईल वन्स, रन एव्हरी व्हेअर!!
आमच्या कडे सर्व भाषातील भूतांना कळतील अशी स्तोत्रे/प्रार्थना बायनरी बनवण्याचा प्रोसेसर आहे.
आता वेगवेगळ्या भाषिक भूतांसाठी वेगवेगळी स्तोत्रे शोधणे? नो हॅझल!!
फ्रॉम एनी घोस्ट, नो मोअर फियर!!
युज युनीफाईड्भूत.कॉम माय डियर!!
"पहले मुझे अलग अलग लँग्वेज वाले भूतो से डिल करना पडता था | बहुत तकलीफ होती थी | फिर दोस्त ने युनीफाईडभूत के बारे मे बताया, मै तुरंत रजिस्टर कर आया | मेरी तो अब जिंदगी ही बदल गयी है|"
युनीफाईडभूत
युनीफाईडभूत
युज युनीफाईड्भूत.कॉम माय
युज युनीफाईड्भूत.कॉम माय डियर!!
"पहले मुझे अलग अलग लँग्वेज वाले भूतो से डिल करना पडता था | बहुत तकलीफ होती थी | फिर दोस्त ने युनीफाईडभूत के बारे मे बताया, मै तुरंत रजिस्टर कर आया | मेरी तो अब जिंदगी ही बदल गयी है|" >>>
अर्र सॉरी. विषय भरकटवतेय
अर्र सॉरी. विषय भरकटवतेय मी.आता एकच अवांतर नंतर गप्प बसते.
आमच्या लंच ग्रुप ने 'बगावत बू माऊथ फ्रेशनर' ची जाहीरात पण बनवली होती.
'स्स्सलीम...तुम्हारे बातो से बगावत ही बू आ रही है' वाल्या सलीम साठी.
आणि आम्ही 'आत्मा की मालिश करनेवाला उत्पादन' पण बनवले होते (हम दिल दे चुके सनम मध्ये ती ऐश्वर्या तेच वापरते ना...उसने मेरी आत्मा को छुवा है मां..)
अनु मस्तच बगावत ही बू आणि
अनु मस्तच

बगावत ही बू आणि आत्मा की मालिश>>>>
Please masti nako. Ekhada
Please masti nako. Ekhada anubhav yeude. >>>
अहो इथे अनुभव कोणत्या लेका/लेकीकडे आहे? सगळे त्या ह्याने किंवा हिने असे असे सांगितले. किंवा मला अस्वस्थ वाटू लागले असल्याच भाकडकथा आहेत.
मी_अनु
मी_अनु
माझ्या एका मित्राने
माझ्या एका मित्राने सांगितलेला किस्सा:
तो त्याच्या पत्नीसोबत सुट्टीसाठी पुण्याहून तिच्या माहेरी चाललेला होता. गांव सातारा जिल्ह्यातील अगदी दुर्गम ठिकाणी. यापूर्वी पण ते तिथे गेलेले होते. दुपारी उशीराच निघालेले होते. आई-वडील, पत्नी व लहान मुले सोबत होती. निघतानाच जावईबापूंना मटण चोपायची इच्छा झाली. पण इतक्या दुर्गम भागात शक्यतो असे अचानक मटण मिळणे शक्य नसते. म्हणून त्याने सातार्यात पोहोचल्यावर चांगले 3-4 किलो मटण घेतले. सोबत दोन-तीन बाटल्या.
मित्राच्या आईवडीलांनी खूप विरोध केला. कारण शक्यतो प्रवासात असे मटण घेऊन फिरु नये ही एक प्रचलित समजूत आहे. पण त्याने काही ऐकले नाही. सातार्यातून निघायला अगदी अंधार पडत आला. पुढे अगदी दुर्गम भाग सुरु झाला. त्या रस्त्यावर ट्रॅफिक देखील नव्हते. क्वचित एखादी चुकार गाडी. काही वेळ गेल्यानंतर त्यांना जाणवू लागले की आपण एकाच भागात सतत चक्कर काटतोय. चांगल्यापैकी परिचित रस्ता असून देखील त्यांना कळेना हा काय गोलमाल चालू आहे? अशा बर्याच गोल-गोल फेर्या झाल्या.
शेवटी त्याच्या आईने त्याला सांगितले की " इथे काहीतरी गडबड आहे. मटणातली थोडी कलेजी कागदाच्या तुकड्यावर घे. त्याच्यावर थोडी दारू ओत. आणि जी काय पीडा असेल तिला म्हणावे तुझा भाग इथे खाली ठेवतोय. घेऊन जा आणि आमची सुटका कर."
गंमत म्हणजे असे केल्यावर थोड्याच वेळात एक मोटरसायकलवाला तिथे आला. त्याने त्यांची कहाणी ऐकून स्वतः त्यांना त्या गावाच्या वेशीपर्यंत सोडले.
अजून एक खतरा किस्सा
अजून एक खतरा किस्सा मित्राकडून ऐकलेला..
हा माझा मित्र एकदा रात्री चिपळूण घाटातून कराडला येत होता. साधारण ११.०० चा सुमार असेल. घाट अजून सुरु व्हायचा असेल तेवढ्यात दूर रस्त्यावर एक मस्तपैकी साडी नेसलेली अगदी देखणी महिला उभी. त्याला लिफ्टसाठी हात दाखवत होती. त्याला थोडेसे आश्चर्य वाटले. इतक्या रात्रीची, इतकी देखणी दिसणारी बाई इथे एकटी काय करतेय? पण शेवटी तिला लिफ्ट देऊच अशा विचाराने त्याने ब्रेक दाबला. तिच्यापासून गाडी बरीच लांब थांबली. त्याने मागे वळून पाहिले. ती बाई त्याला "तूच मागे ये" अशी खूण करत होती. त्याला काहीतरी शंका येऊ लागली.
क्षणार्धात त्याला आठवले: भुते गाडी व बंदुका अशा लोखंडी वस्तूंपासून दूर राहतात.
लगेच त्याने गाडीला किक मारली आणि पुढे निघाला. मागे आरशात वळून बघतो, तर दूरपर्यंत कुणीच नाही....
आजपण "ती" काहीजणाना दिसते म्हणतात...
बाई भूतनी असेल किंवा
बाई भूतनी असेल किंवा ब्लॅकमेलर पण असू शकेल
आज सोनी मॅक्स वर रात्रि ९ .००
आज सोनी मॅक्स वर रात्रि ९ .०० वाजाता इंदुमती होरर मूवी आहे बघा रात्री झोप येणार नाही
पुरोहित भारीच विनोदी बुवा
पुरोहित भारीच विनोदी बुवा तुम्ही.तुम्हालाही असले हुकमी भूतकथा सांगणारे मित्र आहेत म्हनायचे .
पादुकानन्द साहेब... मला
पादुकानन्द साहेब...
मला मुळातच पॅरानाॅर्मल, सुपरनॅचरल घटनांविषयी आकर्षण असल्याने मी अशा घटनांविषयी मित्र, परिचित यांच्याकडून सतत माहिती घेत आलेलो आहे.
आणि हो, पटत नसेल तरी हरकत नाही... एक टैमपास कथा म्हणून ऐकून सोडून द्यायचे. बाकी भूतकथा आवडत असतील तर अजून भरपूर स्टाॅक आहे...
भूत नाही पण काही अमानवीय
भूत नाही पण काही अमानवीय शक्ती या जगात नक्की आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.. म्हणजे ज्यांना अनुभव आलाय ते सगळेच सांगू शकतील असे नाही, पण तिसरी मिती आहे आणि आहेच एवढे मात्र नक्की. अंधविश्वास ठेवू नये, पण भलत्याच ठिकाणी अपरात्री इ.इ. जाऊ नये.
बाकी भूतकथा आवडत असतील तर
बाकी भूतकथा आवडत असतील तर अजून भरपूर स्टाॅक आहे...
>>> मग वाट कुणाची बघताय?
@ अनघाताई... अगदी अनुमोदन @
@ अनघाताई... अगदी अनुमोदन
@ पियूताई... नक्कीच जमेल तसे अॅड करत जाईन...
अनघा सहमत. अशा जागी जाऊन
अनघा सहमत.
अशा जागी जाऊन पिढ्यापिढ्यांच्या मेंटल कंडिशनिंग मुळे माणसाला भास होणे,हृदय बंद पडणे,मनाचा तोल ढळणे हेही होऊ शकते.
ठेउ कसा शकतात न बगितल्या
ठेउ कसा शकतात न बगितल्या गोस्टिवर इस्वास
अडाणि.
बिनडोका, असे कसे ?त्यांच्या
बिनडोका, असे कसे ?त्यांच्या मित्रानी , नातेवाईकांनी नाही का बघितलेल्या? शिवास काहीना स्वतःलाच नाही का अस्वस्थ वाटू लागलेले? ते खोटे कशाला सांगतील?
अस्वस्थ तसही होतय हो अपचन झाल
अस्वस्थ तसही होतय हो अपचन झाल की . फुसके बारही निघतात. मानवीच की ते , कस काय अमानवी?
@bindok : मजेशीर कथा म्हणून
@bindok : मजेशीर कथा म्हणून घ्या की.... प्रत्येक गोष्ट सिरियसली कावून घेवून रायले राव?
माझ्याकडेे पन बरेच अन्नुभव
माझ्याकडेे पन बरेच अन्नुभव आहेत स्वताचे नाहि पन एकिवात
पन type कराय्ला जमत नाहि
>>बाकी भूतकथा आवडत असतील तर
>>बाकी भूतकथा आवडत असतील तर अजून भरपूर स्टाॅक आहे...
स्टॉक संपवा बघू लवकर लवकर
माझा विश्वास नाही अशा
माझा विश्वास नाही अशा गोष्टींवर पण माझ्या आयडी वरून जर इथे कुणाला रिप्लाय दिसला तर ज्यांना विश्वास आहे त्यांनी समजून जावे. बाकीच्यांना हा रिप्लाय दिसणार नाही.
Bagha aaj amavasya ahe ani
Bagha aaj amavasya ahe ani dhaga var ala
Pages