महिनाभरापूर्वी, म्हणजे डिसेंबर २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात, आफ्रीका खंडातला सगळ्यात उंच डोंगर, जगातला सगळ्यात उंच 'फ्री स्टँडींग माऊंटन' म्हणजेच टांझानियातला माऊंट किलीमांजारो, यशस्वीरीत्या सर करण्याची मोहीम फत्ते करुन आलो.
गोठवणार्या थंडीवार्यात पहाटे सूर्योदयाच्या सुमारास जेव्हा १९, ३४१ फूट उंचीवरचं 'उहूरु शिखर' सर केलं, तेव्हा खरंच 'टॉप ऑफ द आफ्रिका' पोचल्याचं फीलींग आलं. हा ७ दिवसांचा हायकींग प्रवास, त्याची तयारी, समिट नाईट्चा अनुभव, आणि त्यानंतरचे आफटएफेक्टस हा एक स्वतंत्र लिखाणाचा विषय. आफ्रीकेच्या ह्या ट्रीप मधले ५-६ दिवस सेरेंगीटी, गोरोंगोरो, तरांगीरे ह्या टांझानियातल्या नॅशनल पार्क आणि रीझर्व्हवेशन भागात भटकण्यात घालवले. आफ्रीकन सफारी आणि प्राण्यांचं जग अनुभवलं.
ह्या भटकंती दरम्यान लाभलेला, आयुष्यात कधीही न विसरता येणारा एक अनुभव म्हणजे टांझानियातल्या 'मसाई' ह्या ट्रायबल लोकांना, आदिवासींना जवळून पहायला मिळालं. किलीमांजारोच्या लहानशा एअर्पोर्टवरून बाहेर पडून मोशी गावाकडे, किंवा आरुशा गावात, किंवा टांझानियातल्या नॅशनल पार्क्समधे फिरताना, किंवा गाडीतून हमरस्त्यावरून जाताना, कुठेही पटकन नजरेत भरतात ती भडक रंगाची, चौकटीचं डिझाईन असलेली लाल, निळी, हिरवी, काळी कापडं. अगदी ४-५ वर्षाच्या गुरं राखणार्या लहान पोरांपासून, जख्ख म्हातार्या माणासापर्यंत प्रत्येक माणूस लढवय्या वाटणारा. काटक शरीरयष्टी, अंगावर कणाभरही जास्तीचं मांस नाही. एकाच वयाची जवळपास सारखी दिसणारी लहान मुलं. कोळशासारखा काळा रंग, अंगावर भडक रंगाचं कापड , आणि हातात सिन्गेचर काठी किंवा भाला. ह्या भाल्यासारखीच टोकदार, तीक्ष्ण, पेनीट्रेटींग नजर. हे असे 'मसाई वॉरीयर्स'. पहाताक्षणी नजरेत भरणारे. उत्सुकता जागृत करणारे, त्यांच्या राहणीमानाबद्दल, दिसण्याबद्दल आणि वागण्याबद्दल. काळ्याकभिन्न शरीरावर काळे कपडे, रंगवलेले भेदक चेहरे असलेले 'वॉरीयर होण्याच्या मार्गावरचे मसाई तरूण' काही वेळा जंगलात दिसले. त्यांचे फोटो जरी काढता आले नाहीत, तरी त्यांची इंप्रेशन्स दृष्टीवर, मनावर कायमची कोरली गेली आहेत. योगायोगानं या भटकंतीमधे एका लहानशा मसाई गावाला भेट देण्याची संधी मिळाली. त्या लोकांचं खर्या अर्थानं मिनीमलीस्टीक, गरजेपुरतंच गोष्टी असणारं आयुष्य पाहिल्यावर 'भारंभार कार्बन फूटप्रींट वाढवणार्या' आपल्या आयुष्याबद्दल मनात प्रश्न उभे राहिले. त्यांची गाणी ऐकताना, ध्वनी ऐकताना, गातानाची जेश्चर्स पाहताना मनात दुर्गाबाईंच्या लिखाणातले आदिवासी तरळले. तिथल्या छोट्याश्या खोपटातल्या एकशिक्षकी शाळेत ' हिसाबु' (स्वाहीली मधे गणितासाठी असलेला शब्द) शिकणारी ७-८ वर्षाची मुलं पाहून मला महाराष्ट्रातल्या आदिवासींमधे केलेल्या माझ्या कामाची, अनुभवांची प्रकर्षानं आठवण झाली. मसाई लोकांमधे 'बहुपत्नी पद्धती ' (पॉलीगॅमी) आहे. शिवाय वयात आलेली मुलं 'वॉरीयर' म्हणून आणि मुली 'प्रजननासाठी योग्य' म्हणून कॉलीफाय होण्याआधी, त्यांचा स्वीकार होण्यासाठी 'सरकम्साईझ्ड' केले जातात. या सगळ्या व्यवहार पद्धतींबद्दल जाणून घेताना आपसूकच माझ्यातल्या मेडीकल सायंटीस्ट ह्या लोकांमधे असलेल्या जेनेटीक (अनुवांशिक) आजारांबाबत, किंवा सेक्शुअली ट्रान्स्मीटेड आजारांबाबत सतर्कपणे विचार करू लागला. अश्या विविध पातळीवर माझ्या विचारांना, उत्सुकतेला अक्षरशः ढवळून काढणार्या ह्या मसाई लोकांना आज टांझानियातून परत आल्यानंतर महिन्याभरानेसुद्धा मी कणभरही विसरू शकले नाहीये. माझ्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणार्या ह्या 'सेरेंगीटीच्या मसाई लढवय्यांची ' ही काही छायाचित्रे …
प्रचि १
मसाईंच्या 'मा' ह्या भाषेमधे 'सेरेंगीट' ह्या शब्दाचा अर्थ आहे विस्तीर्ण लांबच लांब पठार (endless plains). सेरेंगीटी नॅशनल पार्कमधे हिंडताना हे नाव किती सार्थ आहे याचा सतत प्रत्यय येत राहतो.
वेगळ्याच जगात गेल्यासारखे
वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटले. फोटो मस्त तर आहेतच.
सोनुली यांची प्रतिक्रिया पण विचारात पाडणारी.
रार मस्त फोटो व वर्णनही.
रार मस्त फोटो व वर्णनही.
त्या लोकांच्या पायात विमाण टायर चप्पल आहेत का? 
आता हळु हळु तिथल्या वाईल्डलाईफचे पण फुटु येऊदेत.
जब्रीये ! आवडेश.. अजून लिहून
जब्रीये ! आवडेश..
अजून लिहून काढा ना.. आणि त्या शिखरावरून काढलेले प्रची डकवा प्लीज..
मस्त फोटो आणि लेखन. भाल्या
मस्त फोटो आणि लेखन. भाल्या सारखे उंच युयुत्सु वृत्तीचे मसाई त्यांच्या जगण्याच्या सहज शैलीत खूपच खूष असल्यासारखे दिसतायत .
रार च्या परवानगी ने पुढचे
रार च्या परवानगी ने पुढचे लिखाण चालू....
“गायी पाळणे हा त्यांचा व्यवसाय. गायींना ते संपत्ती मानतात. लग्नात मूलीच्या वडीलांना काही गायी मूलाकडून मिळतात. गायीसाठी ते सिंहांशी पंगा घ्यायलाही ते मागेपुढे बघत नाहीत. सिंहाच्या शिकारीतला वाटा पळवण्याइतके जिगरबाज असतात ते ( याचे चित्रण झालेले आहे. )”
दिनेश धन्यवाद. हा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा घेतलेला आहे.
सफारी वर गाइड अगदी सकाळी आम्हाला प्राणी दर्शन करायला घेऊन जात असत. कल्पना अशी की प्राणी सकाळचे पाण्याला, शिकारीला बाहेत पडतात आणि उन्हे वर आली की झाडाच्या आडोशयाला विश्रांती घेतात. सकाळचे प्राणी बघायला आम्ही अगदी उत्सुक होतो पण मसाई च्या कृपे मुळे प्राण्यांचे आणि मनुष्याच्या वेगळ्या रूपाचे दर्शन झाले.
अगदी पहाटे सफारी साठी बाहेत पडलो तर वाहन चालक याला निरोप आला की काही सिंह गरोदर गाईंचा फडशा पाडत आहे. आम्ही घटना स्थळी पोचलो तेव्हा सिंह गायीला मारुन त्याचे रक्षण करत होता. शिकारीचा वास घेत गिधाडे सुद्धा उपस्तिथ होती. आमचा वाहन चालक आणि इतर लोक आश्चर्यात होते की मसाई लोकांच्या गायी राष्ट्रीय उद्यानात शिरल्याच कशा. नंतर असे समजले की राष्ट्रीय उद्यानात हिरवे गवत मुबलक असते. बाहेर जिथे मसाई वास्तव करतात तेथे overgrazing मुळे गाईिना पुरेसा चारा मिळत नाही म्हणून रात्रीच्या अंधारात मसाई गाईिना 'Masai Mara National Reserve' च्या boundry च्या आत सोडतात. अशाच एका रात्री मधे सिंहाच्या टोळीने ९ गाईंची कत्तल केली होती. सिंहाचा तरी काय दोष, शिकार करणे हा तर त्यांचा अधिकार.
पुढे असे घडले - ही बातमी मसाई गावात पण पोचली. एक मॉडर्न मसाई आपल्या जीप मधून खरे खोटे बघायला आला. त्याचे जीवभान हरपले होते आणि सूडाचा अंगार होता. ह्या सिंहाच्या टोळीचा नायनाट करायचा निर्धार करून तो गावातल्या warrior masai तरुणाना घायला गेला. येथे सफारी चालक एकत्र करून त्यानी National Park and Wildlife Protection च्या पोलिसाना फोन लावला. आणि काय नवल, जसे वॉरईयर मसइ विषारी बाण घेऊन सिंहाची शिकार करायला तयार झाले, तसे पोलीस येऊन त्याना पकडून घेऊन गेले. एकदम थरारक अनुभव.
सिंह आणि शिकार
शिकारीचे रक्षण करताना सिंह
थोड्या दूरवर सिन्हिणिने केलेली गायीची शिकार
मसाई चे जीप मधून आगमन
संतप्त मसाई
पोलीस ड्रामा
वेगळाच अनुभव .. फोटोही आवडले
वेगळाच अनुभव ..
फोटोही आवडले ..
sonuli>>> खतरनाक अनुभव तुमचा
sonuli>>> खतरनाक अनुभव तुमचा पण.
हे सगळं डिस्कव्हरीवर पाहतानाच इतकं भारी वाटतं, तुम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळालं... हेवा वाटतोय
अनुभव भारी... आता वारंवार या
अनुभव भारी...
आता वारंवार या धाग्याला भेट देणे आले.. लिहित राहा..
अप्रतिम आहेत फोटो ! लिहित
अप्रतिम आहेत फोटो !
लिहित राहा..किलीमांजारो चढाईबद्द्ल वाचायला आवडेल
प्रचि २५ मस्तच. मला वाटल
प्रचि २५ मस्तच. मला वाटल ब्रॅड पिट ला मेकप केला आहे.
सोनुली बापरे!!
सोनुली बापरे!!
थरारक अनुभव सोनुली.. एका लहान
थरारक अनुभव सोनुली..
एका लहान मसाई मूलाने, रात्री गायींवर हल्ला करणार्या सिंहाना पळवून लावण्यासाठी एक उपकरण तयार केले होते. गाड्यांचे हेडलाइट्स वापरून त्याने हे साधले होते, त्याच्या या उपकरणाबाबत सरकारने त्याचे कौतूकही केले होते.. ( ही माहिती मी केनया एअरवेजच्या फ्लाईट मॅगझिनमधे वाचली होती. )
मी तिथे आणखी एक बघितले कि आपल्यासारखे चारा कापून, बांधलेल्या गायींना ते देत नाहीत. चरण्यासाठी गायी मोकळ्याच सोडलेल्या असतात. केनयात दूध एकतर गायीचे किंवा उंटाचे. म्हशीचे दूध त्यांना माहित नाही. म्हैस हा प्राणीही तिथे नाही ( असतात त्या रानटी म्हशी, आपल्या त्या, वॉटर बफेलोज ) त्यामूळे आपण म्हशीचे दूध पितो, असे त्यांना सांगितले तर त्यांना आश्चर्य वाटते.
सोनुली तुमचा अनुभव थरारक आहे.
सोनुली तुमचा अनुभव थरारक आहे. शेवटच्या फोटोत खालच्या कोपर्यात सिंह आहे का ?
Pages