शांततेचा प्रसार करण्यासाठी सात पुणेकर करणार जम्मू ते पुणे असा २२०० किमी चा प्रवास.
सध्या वाढत चाललेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे व शांतता नांदावी अशा सदिच्छा घेऊन दहा पुणेकर सायकलपटू २६ जानेवारीपासून जम्मू ते पुणे अशी सायकल मोहीम करणार आहेत.
अनुभवी सायकलपटू आनंद घाटपांडे यांच्या नेतृत्वाखाली दहा सायकलपटू हे तब्बल २,२०० किमी चे अंतर १७ दिवसांमध्ये पार करणार आहेत. राईड फॉर पीस - अशा बॅनरखाली आयोजित करण्यात आलेली ही सलग दुसरी मोहीम आहे. गेल्या वर्षी याच सायकलपटूंनी पुणे ते कन्याकुमारी असा १५६५ किमी अंतराची यशस्वी मोहीम पार पाडली होती.
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून सायकलपट्टुनी जम्मू येथून प्रस्थान केले आहे व पंजाब, राजस्थान, गुजरात अशा राज्यांतून प्रवास करत ११ फेब्रुवारी रोजी पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग गणपती मंदिरापाशी मोहीमेची सांगता करण्यात येईल.
जम्मू, पठाणकोट, अमृतसर, श्री मुक्तसर साहीब, हनुमानगड, सरदारसहर, डिडवाना, अजमेर, भिलवारा, नाथद्वारा, खेरवारा, मोडासा, वडोदरा, अंकलेश्वर, वलसाड, वसई आणि खोपोली असा मोहीमेचा मार्ग आहे.
या प्रवासादरम्यान, सायकलपटू भारतीय जवानांशी संवाद साधणार असून पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीरांना आदरांजली वाहणार आहेत.
आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमारेषेचे संरक्षण करत आहेत, म्हणूनच आपण शांततेचा प्रसार करू शकत आहोत, ही भावना त्यांच्यापर्यंत पोचावी आणि तमाम भारतीयांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही मोहीम प्रयत्नशील राहणार आहेत, असे मोहीमेचे नेते शेवडे यांनी सांगितले.
अद्वेैत जोशी, ओंकार ब्रह्मे, सुह्द घाटपांडे, हेमंत पोखरणकर आणि आशिष फडणीस हे मोहीमेचे इतर सदस्य आहेत.
तर अतुल अतितकर, उमेश पवार आणि नंदू आपटे हे अहमदाबादपासून मोहीमेत सहभागी होतील.
फोटो टाकावेत पण चमचमीत
फोटो टाकावेत पण चमचमीत जेवणाचे फोटो टाकणे निषिद्ध आहे.
सुपर्ब, खुप सार्या शुभेच्छा.
Day#8 अजमेर नसिराबाद
Day#8
अजमेर नसिराबाद गुलाबपुरा रायला भिलवाडा
१३७ किमी.
अजमेर सोडल्यावर १० किमीच्या आतच छोटा घाट लागल्याने सगळे चार्ज झाले. नसिराबादला ४ लेन हायवे लागला. NH79. आज १००० किमी पूर्ण झाले. दुसरं म्हणजे मोहीमेचा पुर्वार्ध आटोपलाय. १०९५ किमी झालेत.
भिलवाडा .. The Textile city.
लोकांशी संवाद मस्त होतोय. पहिल्या दिवसापासून खरी मजा येतेय ती कुतुहलाने पहाणाऱ्या मुलांना टाटा करुन जातांना! प्रचंड आनंद दिसतो त्यांच्या चेहऱ्यावर..उत्साहाने उड्या मारत, ओरडत चिअरअप करतात. कदाचित त्या प्रत्येकाच्या मी कायम लक्षात राहीन.
- इति मायबोलीकर हेम...
Day#9 भिलवाडा गंगापूर
Day#9
भिलवाडा गंगापूर राजमासंद नाथद्वारा
अाज ११० किमी (एकूण १२०५ किमी)
आज नेहमीपेक्षा कमी अंतर कापायचं होतं. सुरुवातीला छोट्या गांवातून खड्डू रस्ते पण जवळपास ८०% फोरलेन रस्त्याने प्रवास. वाटेत एका छोट्या शाळेत मधल्या सुट्टीत टाटा करणाऱ्या मुलांना भेटलो. नकाशात कुठून आलो कुठे चाललोय ते सांगितलं. सायकली जवळून पहायला दिल्या. फार कुतुहल असतं त्यांना.. ऊन चांगलंच जाणवायला लागलंय.
नाथद्वारात शिरतांना १० किमी अलिकडेच मार्बल वर्क्सची दुकाने सुरु होतात. आरवली पर्वतरांगेच्या कुशीतील नाथद्वारा हे श्रीनाथजी मंदीरासाठी प्रसिद्ध असून गुजराथी लोक बरेच दिसतात.
आमची सगळी टिम उत्तम. कुणालाही त्रास नाही. उद्या पुन्हा १४०+ राईड..
- इति मायबोलीकर हेम...
Day#10 नाथद्वारा उदयपूर टिडी
Day#10
नाथद्वारा उदयपूर टिडी ऋषभदेव खैरवाडा
अंतर १३० किमी (आजवर एकूण अंतर १३३५ किमी.)
पहाटे लवकर उठून श्रीनाथजी दर्शन घेतले. दर्शन पहाटे फक्त १५ मि. खुले असते. नंतर पुन्हा २ तासांनी उघडते.
नाथद्वारा ते उदयपूर मार्ग आरवली पर्वतरांगेत येत असल्याने खूप चढउतार होते. ही रांग ओलांडणे सध्या सुरु आहे.
उदयपूर..The Lake City.
किल्ल्याच्या पायथ्याकडून जातांना आशाळभूत नजर फिरवून पुढे झालो. चढउतार आणि उलटा वारा (headwind) आज दिवसभर फॉर्मात होते. आज राजस्थानातला शेवटचा मुक्काम. उद्या गुजराथमधे प्रवेश होईल. ऑल इज वेल.
- इति मायबोलीकर हेम...
सर्व ठिक म्हणत आहे खरे पण
सर्व ठिक म्हणत आहे खरे पण मायबोलीकर चँपच्या पायाच्या दुखण्याने दोन दिवस वाट लागलेली त्याची. मध्येच कुठेतरी ढाब्यावर एका आजोबांनी मालीश करुन पाय मोकळा करुन दिल्याने तो पुर्वरत सायकलींग ला लागला. मायबोलीकर चँप आणि मायबोलीकर हेम च्या बोलण्यातुन शाळकरी मुलांना भेटल्या नंतरचा आनंद ओसांडुन वाहत होता.
काल फोन केलेले तेव्हा चँप कपडे धुत होता, म्हणे कपडे दोन वेळा धुतले जात आहेत. दिवसा घामाने आणि संध्याकाळी पाण्याने. म्हंटले एवढं पाणी मिळतंय तिकडे
इकडे पुण्यात दिवसा एवढं उन आणि रात्री एवढी थंडी आहे तर तिकडे राजस्थान सारख्या विषम हवामानात काय हाल झाले अस्तील.
पुढील अपडेट्स...?
पुढील अपडेट्स...?
Day#११ आजचा आलेख - दिवस ११
Day#११
आजचा आलेख - दिवस ११ वा
खैरवाडा- बिछिवाडा - रतनपूर - मोडासा
अंतर - ८० किमी
आजवरचे एकूण अंतर १४३० किमी
आजचा दिवस हा या मोहिमेतील सर्वात कमी(फक्त ८० किमि ) अंतराचा होता त्यामुळे दुपारी १ वाजताच मुक्कामी पोहोचलो. मग काय दुपारी चक्क मस्त झोप काढली. काल टीडी नंतर थोडी हिरवळ दिसु लागली होती आज बिछिवाड्यानंतर तर सगळीकडे हिरवंगार दिसत होतं. रतनपूर ला राजस्थान ची हद्द पार करून गुजरात मध्ये प्रवेश केला आणि रस्त्या मध्ये फरक लगेच जाणवायला लागला. एकदम सुसाट रस्ता . आता उद्या पासून परत १२५+ किमी
- इति मायबोलीकर हेम...
मस्तच !
मस्तच !
J2P Day#12 मोडासा बरोल
J2P Day#12
मोडासा बरोल बालासिनोर टिम्बा नर्मदा कालवा रस्ता हलोल बास्का (वडोदरा)
आजचे अंतर १३८ किमी.
मोहिमेचे आजवर एकूण अंतर १५६५ किमी.
आज स्थानिकांनी रस्ता दाखवला म्हणून हायवेने न जाता मधल्या छोट्या रस्त्याने आम्ही गेलो. रस्ता मस्त होता. बडीशेप, कापूस, गहू, राजगीरा शेतीने सगळा परिसर हिरवागार होता. आज नर्मदा ओलांडली. पुढे नर्मदा मुख्य कालव्याच्या कडेने २५ किमी ची राईड झाल्यावर मुख्य हायवेला लागलो खरे पण तोवर ४ पंक्चर्सना तोंड द्यावं लागलं होतं. १५ किमी वाचवले पण वेळ दुप्पट गेला. आज पुण्यातून आणखी ४ रायडर्स बस्क्याला आलेत व आमच्या सातपैकी एक कमी होणार. म्हणजे आता आम्ही १० जण उद्यापासून सोबत असू.
-इति मायबोलीकर हेम
डे १३ १३व्या दिवशी बास्का ते
डे १३
१३व्या दिवशी बास्का ते वडोदर-भरुच-अंकलेश्वर असं १२६ किमी अंतर पार केले. आज उरलेले लोक येउन मिसळल्याने ग्रूप काउंट १० ला पोचला. हवमानातील बदलामुळे थोडा त्रास झालेला दिसतोय. दमट हवामान आणि ऊन होतंच सोबतीला, त्यात भरुचीच्या ट्रॅफिकने हैरान केलंय. पण जेवणात मिळनार्या वरायटीमुळे चंगळ चालुय असं दिस्तंय.
त्याहुन विषेश म्हणजे यांना अंकलेष्वरला इतक्या दिवसात पहिल्यांदाच मराठी चॅनेल्स दिसल्याने जाम खुश झालेले होते. काही छोट्या मोठ्या दुखापती सोडल्या तर आल इज वेल..
कालच्या अपडेट्स मधे मंडळी
कालच्या अपडेट्स मधे मंडळी वलसाड पर्यंत पोहोचल्याचे दिसते आहे
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचेअभिनंदन!
सर्वांचेअभिनंदन!
Pages