महिनाभरापूर्वी, म्हणजे डिसेंबर २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात, आफ्रीका खंडातला सगळ्यात उंच डोंगर, जगातला सगळ्यात उंच 'फ्री स्टँडींग माऊंटन' म्हणजेच टांझानियातला माऊंट किलीमांजारो, यशस्वीरीत्या सर करण्याची मोहीम फत्ते करुन आलो.
गोठवणार्या थंडीवार्यात पहाटे सूर्योदयाच्या सुमारास जेव्हा १९, ३४१ फूट उंचीवरचं 'उहूरु शिखर' सर केलं, तेव्हा खरंच 'टॉप ऑफ द आफ्रिका' पोचल्याचं फीलींग आलं. हा ७ दिवसांचा हायकींग प्रवास, त्याची तयारी, समिट नाईट्चा अनुभव, आणि त्यानंतरचे आफटएफेक्टस हा एक स्वतंत्र लिखाणाचा विषय. आफ्रीकेच्या ह्या ट्रीप मधले ५-६ दिवस सेरेंगीटी, गोरोंगोरो, तरांगीरे ह्या टांझानियातल्या नॅशनल पार्क आणि रीझर्व्हवेशन भागात भटकण्यात घालवले. आफ्रीकन सफारी आणि प्राण्यांचं जग अनुभवलं.
ह्या भटकंती दरम्यान लाभलेला, आयुष्यात कधीही न विसरता येणारा एक अनुभव म्हणजे टांझानियातल्या 'मसाई' ह्या ट्रायबल लोकांना, आदिवासींना जवळून पहायला मिळालं. किलीमांजारोच्या लहानशा एअर्पोर्टवरून बाहेर पडून मोशी गावाकडे, किंवा आरुशा गावात, किंवा टांझानियातल्या नॅशनल पार्क्समधे फिरताना, किंवा गाडीतून हमरस्त्यावरून जाताना, कुठेही पटकन नजरेत भरतात ती भडक रंगाची, चौकटीचं डिझाईन असलेली लाल, निळी, हिरवी, काळी कापडं. अगदी ४-५ वर्षाच्या गुरं राखणार्या लहान पोरांपासून, जख्ख म्हातार्या माणासापर्यंत प्रत्येक माणूस लढवय्या वाटणारा. काटक शरीरयष्टी, अंगावर कणाभरही जास्तीचं मांस नाही. एकाच वयाची जवळपास सारखी दिसणारी लहान मुलं. कोळशासारखा काळा रंग, अंगावर भडक रंगाचं कापड , आणि हातात सिन्गेचर काठी किंवा भाला. ह्या भाल्यासारखीच टोकदार, तीक्ष्ण, पेनीट्रेटींग नजर. हे असे 'मसाई वॉरीयर्स'. पहाताक्षणी नजरेत भरणारे. उत्सुकता जागृत करणारे, त्यांच्या राहणीमानाबद्दल, दिसण्याबद्दल आणि वागण्याबद्दल. काळ्याकभिन्न शरीरावर काळे कपडे, रंगवलेले भेदक चेहरे असलेले 'वॉरीयर होण्याच्या मार्गावरचे मसाई तरूण' काही वेळा जंगलात दिसले. त्यांचे फोटो जरी काढता आले नाहीत, तरी त्यांची इंप्रेशन्स दृष्टीवर, मनावर कायमची कोरली गेली आहेत. योगायोगानं या भटकंतीमधे एका लहानशा मसाई गावाला भेट देण्याची संधी मिळाली. त्या लोकांचं खर्या अर्थानं मिनीमलीस्टीक, गरजेपुरतंच गोष्टी असणारं आयुष्य पाहिल्यावर 'भारंभार कार्बन फूटप्रींट वाढवणार्या' आपल्या आयुष्याबद्दल मनात प्रश्न उभे राहिले. त्यांची गाणी ऐकताना, ध्वनी ऐकताना, गातानाची जेश्चर्स पाहताना मनात दुर्गाबाईंच्या लिखाणातले आदिवासी तरळले. तिथल्या छोट्याश्या खोपटातल्या एकशिक्षकी शाळेत ' हिसाबु' (स्वाहीली मधे गणितासाठी असलेला शब्द) शिकणारी ७-८ वर्षाची मुलं पाहून मला महाराष्ट्रातल्या आदिवासींमधे केलेल्या माझ्या कामाची, अनुभवांची प्रकर्षानं आठवण झाली. मसाई लोकांमधे 'बहुपत्नी पद्धती ' (पॉलीगॅमी) आहे. शिवाय वयात आलेली मुलं 'वॉरीयर' म्हणून आणि मुली 'प्रजननासाठी योग्य' म्हणून कॉलीफाय होण्याआधी, त्यांचा स्वीकार होण्यासाठी 'सरकम्साईझ्ड' केले जातात. या सगळ्या व्यवहार पद्धतींबद्दल जाणून घेताना आपसूकच माझ्यातल्या मेडीकल सायंटीस्ट ह्या लोकांमधे असलेल्या जेनेटीक (अनुवांशिक) आजारांबाबत, किंवा सेक्शुअली ट्रान्स्मीटेड आजारांबाबत सतर्कपणे विचार करू लागला. अश्या विविध पातळीवर माझ्या विचारांना, उत्सुकतेला अक्षरशः ढवळून काढणार्या ह्या मसाई लोकांना आज टांझानियातून परत आल्यानंतर महिन्याभरानेसुद्धा मी कणभरही विसरू शकले नाहीये. माझ्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणार्या ह्या 'सेरेंगीटीच्या मसाई लढवय्यांची ' ही काही छायाचित्रे …
प्रचि १
मसाईंच्या 'मा' ह्या भाषेमधे 'सेरेंगीट' ह्या शब्दाचा अर्थ आहे विस्तीर्ण लांबच लांब पठार (endless plains). सेरेंगीटी नॅशनल पार्कमधे हिंडताना हे नाव किती सार्थ आहे याचा सतत प्रत्यय येत राहतो.
ज्वेलरी, फोटो मस्त. गॉड्स
ज्वेलरी, फोटो मस्त. गॉड्स मस्ट बी क्रेझी ची आठवण झाली.
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
पूर्ण डायरी वाचायला उत्सुक
पूर्ण डायरी वाचायला उत्सुक >>>> + १००
वाह, क्या बात है! मस्तं लेख.
वाह, क्या बात है! मस्तं लेख. खूप आवडला. अजुन लिहा.
पहिले दोन फोटो आवडले.
पहिले दोन फोटो आवडले.
छान माहिती.. सविस्तर
छान माहिती.. सविस्तर वृत्तांत लिहा.
प्रचि २६ मस्तच.. पुर्ण झोपडी कव्हर केली असती तर एक उत्तम फ्रेम झाली असती.
ज ब र द स्त प्रचि!!! काही
ज ब र द स्त प्रचि!!!
काही काही फोटोंचे कम्पोझिशन केवळ अप्रतिम!!!
जबरदस्त!!! अक्षरशः सार्थक झालं आज मायबोलीवर आल्याचं. अजून लिही.>>>>>>>+१००००
रार, अभिनंदन! सुरेख फोटो!
रार, अभिनंदन!
सुरेख फोटो!
रार, अभिनंदन! मस्त फोटो!
रार, अभिनंदन!
मस्त फोटो! सविस्तर वर्णन नि फोटो येवु देत लवकर
अहाहा ! पहिले दोन फोटो सही
अहाहा ! पहिले दोन फोटो सही आहेत!
किलिमांजारो अन मसाई दोन्हीबदल अजून लिहा प्लिज.
वॉव...........हे अफलातून आहे.
वॉव...........हे अफलातून आहे. फोटो तर अप्रतीमच! अजून जाणून घ्यायला आवडेल,
मस्त फोटो !
मस्त फोटो !
पहिले दोन फोटो मस्त आहेत.
पहिले दोन फोटो मस्त आहेत.
अहा! पहिला फोटो जबरी.
अहा! पहिला फोटो जबरी.
फोटो मस्त !
फोटो मस्त !
सुंदर सुरूवात अप्रतिम
सुंदर सुरूवात अप्रतिम चित्रांकरता ! आता हळू हळू किलीमांजारो च्या आठवणी आणि फोटो पण येऊ दे!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
जबरी! पहिला फोटो तर विंडोजचा
जबरी! पहिला फोटो तर विंडोजचा स्क्रीनसेव्हर म्हणून लावता येईल इतका सुरेख आला आहे. मसाई लोकांचे फोटो बघताना देखील इतकं raw, earthy feeling येतंय की प्रत्यक्ष त्या हवेत, त्या वातावरणात काय जादू असेल! फोटोंबरोबर तुझ्या शब्दातले तुझे अनुभव देखील वाचायला आवडतील! लवकर लिही आणि भरपूर लिही
पुभाप्र!
मस्त फोटो. किलिमांजारो सर
मस्त फोटो.
किलिमांजारो सर केल्यबद्दल अभिनंदन. त्यावरही वेगळा लेख येऊदे.
मस्त फोटोज!!!
मस्त फोटोज!!!
शिखर सर आणि मोहिम फत्ते
शिखर सर आणि मोहिम फत्ते केल्याबद्दल अभिनंदन!
फोटोज एकदम खास आहेत. पहिले २ तर फार आवडले.
७ दिवसांचा हायकींग प्रवास, त्याची तयारी, समिट नाईट्चा अनुभव, आणि त्यानंतरचे आफटएफेक्टस हा एक स्वतंत्र लिखाणाचा विषय>>>>
>> ह्यावर नक्की लिही.
मस्त फोटोज आणि परिचय.
मस्त फोटोज आणि परिचय. किलीमांजारो तुझ्या शब्दांत अजून वाचायला आवडेल. अजून लिही.
मस्त.
मस्त.
सुं द र फोटोज अजून लिहीणार
सुं द र फोटोज
अजून लिहीणार का डायरीची पाने ?
मस्त फोटो! किलीमंजारो सर
मस्त फोटो!
किलीमंजारो सर केल्याबद्दल अभिनंदन ..
अजून लिहीणार का डायरीची पाने
अजून लिहीणार का डायरीची पाने ? >> असा प्रश्न विचारायचा नसतो नंद्याभाउ.
मसाईंनी एकदम झपाटून टाकलेले दिसतेय रार ला. ते स्केचेस पण टाक ग.
रार - सर्वप्रथम तुझे आणि म चे
रार - सर्वप्रथम तुझे आणि म चे किलीमंजारो 'पादा क्रांत' केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. त्या अविस्मरणीय अनुभवा बद्दल तू नक्की येथे लिही. तुझा अनुभव जाणून घेण्याबद्दल उत्त्सुख.
छाया चित्रण हे उद्देश असेल तर मसाई गावात जाउन त्याना आर्थिक मदत दिली तर उत्तम.
येथे अजुन एक अनुभव सांगते. मागल्या वर्षी मला मसाई मारा - केनया येथे जायचा योग आला. मला वाटते की सगळ्या सफारी ला जाताना यात्रा योजक एक मसाई गावाची तूर्तता नक्कीच करतात. आम्ही तिघी जणी ह्या सफारी मधे होतो, आणि तिघीनि एकमताने ह्या गावाला भेट द्यायला नकार दिला. कदाचित आमचे विचार पूर्व ग्रह दोशित असु शकतात. http://blog.ted.com/meet-kakenya-ntaiya-who-worked-with-her-elders-to-fo...
1 - मसाई अजूनही लहान मूलीना शिक्षणपासून वंचित ठेवतात. अगदी ९ वर्षा पासून जनुकिय विटंबना सुरू होते, ही तर खरी एक निरजंतुक क्रिया आहे. परंतु गंजलेली हत्यारे वापरुन बर्याच मुलींचा ह्यात मृत्यू होतो (अजूनही!). सरकार ह्यात काही करत नाहीत कारण मसाई हे प्रोटेक्टेड जमात आहेत. एकदा . . झाले की मुलीचे लग्न लावले जाते, तिचे शिक्षण खंडित केले जाते.
ओबामा हे खरे तर केनया वंशवळीचे. त्यानी मसाई च्या मुलांसाठी शाळा उभारली आहे. खूपच कौतुकास्पद गोष्ट.
२ - मसाई गावात रोज अंदाजे १०० पर्यटक भेट देतात, ही लोक प्रत्येका कडुन १० डॉलर जमा करतात. पर्यटक काही वस्तू खरेदी करतात त्याचे पैसे अजुन वेगळे. ही मुददल घर खर्च किंवा कुटुंब विकास ह्यावर कधीच खर्च होत नाही तर नशा पाणी ह्यावर उडवला जाते.
कदाचित हे मत चुकीचे असु शकते. अशी आशा करते की अजुन कधी १०-१२ वर्षा त परत जायचा अनुभव आला तर हे चित्र बदललेले असेल.
रार - प्रथम तुला धन्यवाद कारण
रार - प्रथम तुला धन्यवाद कारण जुन्या स्मृति जाग्या झाल्या. तुझी परवानगी असेल तर एक अजुन मसाई आठवण लिहु येथे?
जबरदस्त प्रचि अजून येऊद्यात
जबरदस्त प्रचि

अजून येऊद्यात
सगळ्यांना प्रतिक्रीयांबद्दल
सगळ्यांना प्रतिक्रीयांबद्दल मनापासून धन्यवाद.
मसांईंबद्दल डीटेल लिहायला घेतलंय. इथे लिहिलं नाही, कारण मला मुख्यतः हे फोटोफीचर करायचं मनात होतं.
किलीमांजारो हायकींग बद्दल लवकरच.... 'अशक्य जोक्स आणि हसणं' ह्या पलिकडचं हायकींग आठवून लिहायचा प्रयत्न करतीये सध्या
सोनुली, जरुर जरुर लिही.
तुझ्या पोस्टला डीटेल उत्तर लिहिते...
Pages