शांततेचा प्रसार करण्यासाठी सात पुणेकर करणार जम्मू ते पुणे असा २२०० किमी चा प्रवास.
सध्या वाढत चाललेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे व शांतता नांदावी अशा सदिच्छा घेऊन दहा पुणेकर सायकलपटू २६ जानेवारीपासून जम्मू ते पुणे अशी सायकल मोहीम करणार आहेत.
अनुभवी सायकलपटू आनंद घाटपांडे यांच्या नेतृत्वाखाली दहा सायकलपटू हे तब्बल २,२०० किमी चे अंतर १७ दिवसांमध्ये पार करणार आहेत. राईड फॉर पीस - अशा बॅनरखाली आयोजित करण्यात आलेली ही सलग दुसरी मोहीम आहे. गेल्या वर्षी याच सायकलपटूंनी पुणे ते कन्याकुमारी असा १५६५ किमी अंतराची यशस्वी मोहीम पार पाडली होती.
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून सायकलपट्टुनी जम्मू येथून प्रस्थान केले आहे व पंजाब, राजस्थान, गुजरात अशा राज्यांतून प्रवास करत ११ फेब्रुवारी रोजी पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग गणपती मंदिरापाशी मोहीमेची सांगता करण्यात येईल.
जम्मू, पठाणकोट, अमृतसर, श्री मुक्तसर साहीब, हनुमानगड, सरदारसहर, डिडवाना, अजमेर, भिलवारा, नाथद्वारा, खेरवारा, मोडासा, वडोदरा, अंकलेश्वर, वलसाड, वसई आणि खोपोली असा मोहीमेचा मार्ग आहे.
या प्रवासादरम्यान, सायकलपटू भारतीय जवानांशी संवाद साधणार असून पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या शूरवीरांना आदरांजली वाहणार आहेत.
आपले जवान डोळ्यात तेल घालून सीमारेषेचे संरक्षण करत आहेत, म्हणूनच आपण शांततेचा प्रसार करू शकत आहोत, ही भावना त्यांच्यापर्यंत पोचावी आणि तमाम भारतीयांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देण्यासाठी ही मोहीम प्रयत्नशील राहणार आहेत, असे मोहीमेचे नेते शेवडे यांनी सांगितले.
अद्वेैत जोशी, ओंकार ब्रह्मे, सुह्द घाटपांडे, हेमंत पोखरणकर आणि आशिष फडणीस हे मोहीमेचे इतर सदस्य आहेत.
तर अतुल अतितकर, उमेश पवार आणि नंदू आपटे हे अहमदाबादपासून मोहीमेत सहभागी होतील.
कालच्या दिवसाचा आलेख
कालच्या दिवसाचा आलेख (२६-०१-२०१५)
पहाटे लवकर उठुन निघायचे ठरले होते त्याप्रमाणे सहाच्या सुमारास सगळे खाली उतरले, पहिलाच दिवस असल्याने सगळ्यांच्या सायकली नटायला जरा वेळ लागला, पण जमले. रघुनाथ मंदिरपाशी काकांनी तिथल्या कमांडिंग ऑफिसर ला फ्लॅग ऑफ ला बोलावल्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाले. सगळे जवान आणि पोलीसांना सायकल बद्दल कुतूहल होते. आणि त्या थंडीत फक्त मेरिडा जर्सी घातल्याचे बघूंन त्यांनाच कसेतरी होत होते. एकजण म्हणला बडी सेवा करते हो देश कि. मी म्हणालो किधर, वो तो आप करते है करके हम आपको शुक्रिया बोलने आये है।
तर म्हणे 'वो भी उतनाही जरुरी है होसला बढाना' खूपच भारावून गेलो होतो. नंतर मग मस्त फूड ट्रिप झाली. पनिर पराठे, राजमा, चहा मस्त धमाल वातावरण पण झकास ऊन असले तरी गार हवा त्यामुळे श्रम जाणवले नाहीत. सायकल नि त्रास दिला नसता तर अजून लवकर पोचलो असतो. सगळ्यांचा स्पीड सुसाट, विशेषतः घाटपांडे काका, त्यांना गाठता गाठता दमछाक झाली सर्वांची पंजाब मध्ये शिरल्या शिरल्या खराब रस्ते आणि बेगुमान वाहतूक यांनी जेरीला आलो
- इती चँप.
च्याय्ला ही सगळी भन्नाट लोकं आहेत. रात्रीच्या वेळी फोन केलेला तर बोलण्यात जराही थकवा जाणवत नव्हता. काय खातात कुणास ठाउक(हेम चं डायट भाषण!). हेम ने फोन वर बोलायला नकार दिला बहुदा डायट हुकलं असेल.
आल्यावर विचारायला हवंच...
आजचा प्रवास आता पर्यंत तरी सुखरुप आणि सुखकर चालुय, तो असाच पुढे चालु राहुदे.
अरे वा !! मस्तच सकाळी
अरे वा !! मस्तच
सकाळी स्ट्राव्हा वर आशिष चे अपडेट्स पाहिले होते
काल जम्मू ते पठाणकोट १०५ किमी चे अंतर पुर्ण केले आहे
व्व्वा! मस्तच! सर्वांना
व्व्वा! मस्तच! सर्वांना मनापासुन शुभेच्छा!!! त्यांची मोहिम यशस्वी आणि उत्तम होईलच!
अरे वा! मस्त उपक्रम. भरपूर
अरे वा! मस्त उपक्रम. भरपूर शुभेच्छा.
सर्वांना शुभेच्छा !
सर्वांना शुभेच्छा !
अभिनंदन यशस्वी व्हा
अभिनंदन
यशस्वी व्हा
आज ११५ किमी चा पल्ला आहे.
आज ११५ किमी चा पल्ला आहे.
मस्त उपक्रम. सर्वांना
मस्त उपक्रम.
सर्वांना शुभेच्छा !
मल्ल्या, फिडबॅक देत असल्या
मल्ल्या, फिडबॅक देत असल्या बद्दल आधी तुला धन्यवाद.
स्ट्रावा अन फेसबुक वरही आशिषचे अपडेट्स दिसताहेत.
त्या सर्वांना सुरक्षित व सुखकर सायकल प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा....
अभिनंदन ! आणि शुभेच्छा !
अभिनंदन ! आणि शुभेच्छा !
सर्व टीम ला खूप शुभेच्छा.!
सर्व टीम ला खूप शुभेच्छा.!
मस्त. टीमला अनेकानेक
मस्त. टीमला अनेकानेक शुभेच्छा.
चॅम्पचा वृत्तांत आता कधी वाचायला मिळेल याची उत्सुकता आहे
मस्त. टीमला अनेकानेक
मस्त. टीमला अनेकानेक शुभेच्छा.
चॅम्पचा वृत्तांत आता कधी वाचायला मिळेल याची उत्सुकता आहे >> + १
अरे वा जबरीच ! आशुचॅम्प आहे
अरे वा जबरीच !
आशुचॅम्प आहे म्हणजे आल्यावर मस्त सिरीज वाचायला मिळणार.. !
सगळ्यांना खूप खूप
सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!
मोहिम निर्विघ्नपणे यशस्वी होवो!
खूप छान मोहिम आणी त्यापाठची
खूप छान मोहिम आणी त्यापाठची भावना , नितांत सुंदर !!! अनेकानेक शुभेच्छा!!!
@ मल्लीनाथ - अपडेट्स बद्दल धन्यवाद!!
मस्त दररोज माहिती सान्गा...
मस्त दररोज माहिती सान्गा...
कन्याकुमारीसारखीच ही पण मोहीम
कन्याकुमारीसारखीच ही पण मोहीम भन्नाट आहे. लय भारी
सर्वांना शुभेच्छा
'वो भी उतनाही जरुरी है होसला बढाना" वाह असेच सर्व प्रसंग टिपत जा मित्रांनो , मल्ली अपडेट्सबाबत तुझे आभार .. पुढेही देत रहाच.
सर्वांना शुभेच्छा !
सर्वांना शुभेच्छा !
सर्वांना खूप खूप
सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!....आई तुळजाभवानी तुम्हाला यशस्वी करो!
मस्त. टीमला अनेकानेक
मस्त. टीमला अनेकानेक शुभेच्छा.
चॅम्पचा वृत्तांत आता कधी वाचायला मिळेल याची उत्सुकता आहे >> +१
मस्त उपक्रम........ सर्वांना
मस्त उपक्रम........
सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!..
कालचे १५४.७ किमी दिसत आहेत
कालचे १५४.७ किमी दिसत आहेत अमृतसर ते मुक्तसार सहिब
अधिक डिटेल्स मल्ली कडुन अपेक्षीत
--------/\----------
--------/\---------- दंडवत....
सर्वांना शुभेच्छा सुखरुप प्रवासासाठी....
२८ जानेवारी २०१६ चा दिवस थोडा
२८ जानेवारी २०१६ चा दिवस थोडा त्रासदायक गेला. त्या दिवशी त्यांनी एकंदरीत १६५ किमीचा पल्ला गाठलेला.
पुढचे दोन दिवस तर त्याहुन त्रासदायक गेलेत. शनिवारी राजस्थान मध्ये पोचले तसे पाऊस, खराब रस्ते आणि समोरुन येणारा वारा, त्यामुळे भयानक त्रास झाला असं कळालं. खरं तर पठाणकोठ ते अमृतसर चे ११९ किमी चे अंतर पार करायचे होते त्यामुळे जरा निवांत गेले आणि तेच त्यांना भोवले असं चँप सांगत होता. नंतर गुरुदासपुर बटाला मार्गे गेलेत. तिकडे त्यांची चंगळ झालीय एकदम. झकास रस्ता, पंजाबी जेवण, पनीर पराठे, लस्सी रोट्या वगैरे वगैरे... (च्याय्ला, मला भुक लागली अता ) फोटो आणि अपडेट पाहुन वाटत होते कि हे लोक सायकलींग ला गेलेत की पार्टीला.
हे खाल्लेलं पचावं म्हणुन की काय लोकांनि त्यांचे प्रश्न त्यांना तोंडी लावायला दिलेले. प्रश्न वाचुन मलाही हसु आवरले नाहीत. काही प्रश्न इथे देतोय, बाकी चँप आल्यावर..
१. रॅली आहे का?
२. ड्युटी लावलीय का कोणी ?
३. आर्मी वाले आहात का?
४. कॉग्रेस वाले आहात का?
या प्रश्नांतुन आणि भयानक ट्रॅफिक मधुन वाट काढत रात्री सुवर्णंमंदीर पोचले. तिथेच दर्शन घेउन प्रसाद घेतला.
आज दिनांक २ फेब २०१६, सध्य स्थितीला अजमेर वरुन निरवाना कडे निघालेत. आजचा १३६ किमी चा बेत आहे. यांचा रोजचा पल्ला दिवसेन दिवस वाढतच चाल्लाय. ११० वरुन १२०, १३०, १३५ किमी. काय स्टॅमीना आहे. त्यात मायबोलीकर हेम तर एवढ्या दिवसात आपला डाएट प्लॅन अजुन मैन्टैन करुन आहे..
चँपने काही फोटो पाठवलेत, त्यातले मोजकेच इथे टाकतोय. बाकी धमाल त्याच्या वृतांतात दिसेलच.
आज एवढंच.
ग्रेट.....
ग्रेट.....
फोटो मस्तच आगदी तोंडाला पाणि
फोटो मस्तच
आगदी तोंडाला पाणि सुटले,
खुप जबरदस्त स्टॅमिना आहे या लोकांचा
_/\_
खूपच छान तुमचे प्रवास वर्णन
खूपच छान तुमचे प्रवास वर्णन ऐकून एकदम मस्त वाटले... लवकर पुढचे पण कळवा... बेस्ट ऑफ luck
या विषयाला धरुन नसेल, पण
या विषयाला धरुन नसेल, पण लग्गेच कुठे ही लिन्क टाकावी न उमजल्याने इथे देत आहे.
http://indiahikes.in/age-is-not-a-barrier-for-trekking/
या स्टोरीतले श्री गोपाळ लेले वय वर्षे ८३ हे गेली कित्येक वर्षे आमचे आदर्श राहिलेले आहेत.
वरील सायकलिंगचे पराक्रम बघता यांचीही आठवण होणे साहजिक, अन सहजगत्या सापडलेही, सबब लिन्क इथे देऊन ठेवली आहे, नंतर योग्य जागि हलविता येईल.
अभिनंदन पुढील वाटचाली साठी
अभिनंदन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!!
Pages