Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन आडो आणि हर्पेन!!
अभिनंदन आडो आणि हर्पेन!!
सहीच. अभिनंदन दोघांचे
सहीच. अभिनंदन दोघांचे !
नायके रनिंग वापरणार्यांची मदत हवी आहे. मी ऑटो पॉज ऑफ केलय . पाणी पितांना किंवा काही कारणांनी थांबल्यावर चा वेळ अॅव्हरेज स्पीड मध्ये धरला जातो ना ?
जर नसेल, तर तस होण्यासाठी ( थांबल्यावर किंवा चालतानाचा वेळ धरला जावा यासाठी ) काय करायच ?
अजून एक, स्ट्रायडर किवा तत्सम ग्रुप ची मदत होते का परफॉर्मन्स सुधारायला की ते आपल्यावरच असत ?
मी नायके रनिंग आत्ता
मी नायके रनिंग आत्ता आत्तापर्यंत वापरत होते पण गार्मिन व नायकेचं अंतर मॅच होत नाही. नायके नेहमी जास्त दाखवतं त्यामुळे आता ते वापरणं बंदच केलंय.
स्ट्रायडर किंवा तत्सम ग्रूप म्हणजे नेमकं काय? माझ्या लक्षात नाही आलं.
धन्यवाद सगळ्यांना.
श्री, जबरदस्त धावले असते तर यापेक्षा चांगली वेळ नसती का दिली
स्ट्रायडर हा ग्रुप (?) धावण ई
स्ट्रायडर हा ग्रुप (?) धावण ई साठी मार्गदर्शन करतात., ( गुगल करुन पहा ). तर असे ग्रुप ़जॉईन करुन उपयोग होतो का ?
गार्मिन पण अॅप आहे का ?
गार्मिनचं जीपीएस असलेलं
गार्मिनचं जीपीएस असलेलं घड्याळ वापरते मी. आता ते घड्याळ सिंक केलं की सगळा डेटा गार्मिन कनेक्ट ह्या अॅपवर जातो. नायके रनिंग आणि गार्मिन कनेक्ट आता कनेक्टेड आहेत एकमेकांशी त्यामुळे तोच डेटा मला नायके रनिंगवर पण मिळतो.
मला पर्सनली अंतर वाढवण्यासाठी ग्रूपचा खूप उपयोग झाला.
http://forum.slowtwitch.com/f
http://forum.slowtwitch.com/forum/Slowtwitch_Forums_C1/Triathlon_Forum_F1/
इथे माहितीसाठी शोधा. बरेच स्पोर्ट्स सायंटिस्ट आणि रिसर्च करणारे लोकं इथे कॉन्ट्रीब्युट करतात. ( तसेच अनेक नविनपण) त्यामुळे माहिती घेताना थोडे मिठ लागेल.
गार्मिन पण अॅप आहे का ? >>> हो. गार्मिन कनेक्ट. पण ते गार्मिन सोबत वापरले जाते.
स्टरावा चांगले अॅप आहे. फ्रि आणि ऑलमोस्ट १०० टक्के करेक्ट. पॉज वगैरे करू शकतो.
अभिनंदन आडो आणि हर्पेन
अभिनंदन आडो आणि हर्पेन
धनि, श्री, आदित्य सिंग,
धनि, श्री, आदित्य सिंग, तात्या, चनस, धनश्री, केदार, सिंडरेला धन्यवाद मंडळी
धनि सविस्तर लिहायचा प्रयत्न करतो 'काशीस जावे नित्य वदावे' च्या चालीवर
हर्पेन, आडो, कशी झाली
हर्पेन, आडो, कशी झाली मॅरेथॉन? आडोचे फेबुवरचे फोटो बघितले! अभिनंदन.
मला यावेळी मध्येच ऑन्साईट उपटली आणि सरावाचे तीन-तेरा वाजले. परत आल्यावर कमी दिवस होते आणि आल्या आल्या सर्दी आणि घसा धरला. गिळताही येईना इतके झाले. यावेळी पवई रन जमले नाही.
अभिनंदन सगळ्या
अभिनंदन सगळ्या पळाणार्यांचे.
मोठ्या गॅप नंतर ३१ ला १० के पळणार आहे. कोणी आहे का पुण्यातल.
मुंबै मॅरॅथॉन ला पळायच स्वप्न पहाव का :विचारात्पडलेलीआळशीइन्ना:
मुंबै मॅरॅथॉन ला पळायच स्वप्न
मुंबै मॅरॅथॉन ला पळायच स्वप्न पहाव का <<<< नक्की पहा., मी पहायला सुरुवात केलीये.
आडो आणि हर्पेन , मनापासून
आडो आणि हर्पेन , मनापासून अभिनंदन. भारीच
अभिनंदन. हर्पेन, आडो.
अभिनंदन. हर्पेन, आडो.:)
केदार, हर्पेन आणि सगळ्यांचे
केदार, हर्पेन आणि सगळ्यांचे धन्यवाद,
तुमच्या सल्ल्यांनी व्यवस्थित झाली आज १० के ची ट्रायल रन.
खूप दिवसांपासून करायच प्लांनिंग करत होतो, शेवटी आज धावायाचेच ठरवून ट्रायल घेतली. ७९ मिनिटांमध्ये जमली. गेल्यावर्षी ९० मिनिटे लागली होती. बरीच सुधारणा झालीय आता दर महिन्यात एकतरी करणार.
बऱ्याच दिवसांनी रोडवर धावत असल्याने मजा आली. गुडघा किंवा पावले बिलकुल दुखली नाहीत; पण शेवटी शेवटी पोटरी दुखायला लागलेली. चिंता होती की १० किमी झाल्यावर परत घरी चालत पोचतो की नाही. पण जमल.
सोबत पाणी ठेवल्याने बराच फायदा झाला. डीहायड्रेशन झाले नाही आणि त्यामुळे थकवा शेवटपर्यंत जाणवला नाही.
काही चुका:
१. वार्म अप अजून करायला हवा होता. पुन्हा थंडीत सवय नसल्याने पाय चांगलेच गारठले आणि त्यामुळे दुखायला लागले.
२. थोडे कार्बवाले काहीतरी खायला हवे होते. आता एखाद केळ सोबत ठेवेन किंवा ग्लुकोज पाण्यात घालून नेईल.
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/trending/trending-globally/dog-on-toile...
आज सकाळी इएसपियन वर ह्या भू
आज सकाळी इएसपियन वर ह्या भू भू चे चित्र टॉप १० मध्ये होते.
अभिनंदन _तात्या_ हो टण्या
अभिनंदन _तात्या_
हो टण्या वाचलं होतं ह्या भू भू बद्दल
३१ जानेवारी रोजी 'रनॅथॉन फॉर
३१ जानेवारी रोजी 'रनॅथॉन फॉर होप' नावाने एक रन निगडी येथील भक्तीशक्ती चौकातून चालू होणार आहे.
https://www.townscript.com/e/runathon-hope-2016
मग त्यात विशेष ते काय त्याच दिवशी अजून दोन रन पुण्यात देखिल आहेत.
तर ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी मेळघाटमधील ६ मुलं आणि ४ मुली त्या स्पर्धेत पळणार आहेत आणि महत्वाचं असं की ज्या वर्षी मेळघाटमध्ये कुपोषण आणि बालमृत्यूंचा कहर झाला होता त्याच सुमारास जन्माला आलेली ही सगळी मुलं आहेत..
पुण्यतील मैत्री नावाच्या संस्थेमुळे ही मुले पुण्यात येऊन अशा स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. २१ तारखेलाच ही मुलं चिंचवड येथे आली आहेत. त्यांचा सरावही सुरू झाला आहे…
मैत्री करता हा क्षण अगदी समाधानाचा
३१ जानेवारी २०१६ या दिवशी, सकाळी ६.१५ वाजता भक्तीशक्ती चौक, निगडी येथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. तर मंडळी या मुलांना प्रोत्साहित करायला अवश्य या…
आज मी ईथे मरिना रन २०१६ हाफ
आज मी ईथे मरिना रन २०१६ हाफ मॅरेथोन पूर्ण केली २ तास २५ मिन मधे (२१ किमी)
मला माहित आहे कि इथल्या दिग्गजांपुढे ही काही उल्लेखनीय कामगिरी वगैरे नाही, पण ह्या धाग्यावरुन आणी हर्पेन च्या काही धाग्यांवरुन प्रेरणा घेउनच मी धावपळ चालु केली, म्हनुण मी त्याबद्दल थोडे लिहिणार आहे, कंटाळा आल्यास सोडुन द्या
माझ सध्याच वय ४०शी कडे झुकणार आहे, लहानपणी पाप्याच पितर असलेला मी लग्नानंतर कसा फुगत गेलो ते कळलच नाही. उंची ५ फूट २ इंच असुन माझ वजन ८२ च्या पल्याड पोचल !!
मुंबईत रहाताना ऑफिस मधे माझ्याहुन लहान वयाच्या लोकांना स्लिप डिस्क वगैरे सुरु झाले होते, पण तेव्हा सतत मला वाटत रहायचे की ह्या असल्या गोष्टी ईतरांना होतात, आपल्याला काही होत नाही. स्लिप डिस्क झालेले लोकही सतत नवीन उपचार घेत असत. आपल वजन अति वाढल आहे हे सत्य कोणीच स्वीकरत नव्हत.
पण साधारण दोन अडीच वर्षांपुर्वी माझ्याही कंबरेत दुखायला चालु झाल. नुकताच परदेशी आलो होतो, आणी मग मात्र वाढत्या वजनाच्या समस्येची गंभीरता लक्षात आली. माझ्या (जुन्या) घराखालीच मस्त जॉगिंग ट्रॅक होता. तिथे पहिल्या दिवशी पळायला गेलो आणि साधारण अर्ध्या किमी मधेच अशक्य अशक्य भाता चालु झाला. शाळा कॉलेजमधे सतत काही ना खेळत असायचो मी, आणी नंतर सलग ५ ६ वर्ष टिळक तलावावर अत्यंत सातत्याने पोहतहि असे, पण माझी अधोगती प्रचंड होती. (याला कारण चैतन्यकांडी वगैरे अनेक वाईट सवयिहि होत्या हे नमुद करतो)
तेव्हा हा धागा वाचनात आला, आणी ठरवल की आपण पळण गंभीरपणे घेतलच पाहिजे. पहिल्या २ ३ महिन्यात हळु हळू झेपेल तेवढ पळण सातत्याने करत होतो. थोडा आत्मविश्वास वाढल्यावर रोज २ ते ३ किमी करायला लागलो.
ह्या धाग्यावरच्या सर्व अपडेट्स अत्यंत मन लावुन वाचत असे, तसच हर्पेनचे धागेही माझ्यासाठी मार्गदर्शक होते.त्यातल्या बर्याच टिपा अंमलात आणत सुधारणा करत गेलो. गेले वर्षभर आता मी रोज ५ ते ६ किमी साधारण २७ ते ३२ मिन मधे (आठवड्यात ५ दिवस) पळतो, आणी जमले तर सूर्यनमस्कार. तसेच लाँग वीकांत वगैरे आला तर १५ १६ कि मी हि करतो. ही माझी पहिलिच हाफ मॅरेथोन होती, होप सो अजुन बर्याच पूर्ण करु शकीन.
पळायला लागल्यानंतरचे काही फायदे - कंबरदुखी वगैरे पूर्ण बंद झाली, जीवनशैलीत लाक्षणीक सुधारणा झाली आहे, आधी मला ऑफिसमधे जेवल्यावर खूप झोप यायची आणी दिवसभर जरा कंटाळल्याची भावना यायची पण आता खूपच फ्रेश वाटत दिवसभर. माझ वजन गेल्या २ - २.५ वर्षात १२.५ किलोने कमी होउन आता ६९.५ वर स्थिरावल आहे, माझ टारगेट ६५ च आहे, बघु कधी जमत.
खूप पाल्हाळ झाल आहे पण खरच मला ईथल्या सर्व प्रतिसादकर्त्यांचे, वैद्यबुवा आणी हर्पेन चे आभार मानयचे आहेत, म्हणुन लिहिले.
आभारी आहे.
अभिनंदन !
अभिनंदन !
आदित्य, मनःपूर्वक अभिनंदन.
आदित्य, मनःपूर्वक अभिनंदन. तुमचा अनुभव वाचून मला माझाच अनुभव वाचतोय असे वाटले. दिवसाला पाकीट पेक्षा जास्त सिगारेटी ते मॅरेथॉन पळणे हे स्वतःलाच इतके समाधान वाटते. असेच पळत राहा. पुढल्या पळापळीसाठी शुभेच्छा.
आदित्य, खूप अभिनंदन.
आदित्य, खूप अभिनंदन. अचिव्हमेंट आहे ही. आता घेतला वसा टाकून नका देऊ अजिबात.
मनापासुन धन्यवाद शब्दाली,
मनापासुन धन्यवाद शब्दाली, टण्या आणि आडो
टण्या खरच खूप मस्त वाटत ; आता हेच व्यसन लागल्यासारखे आहे
आडो नक्की नाही सोडणार हा वसा
अर्रे आदित्य ! हार्दीक
अर्रे आदित्य ! हार्दीक अभिनंदन !
सॉरी मी उशीरा पाहिला तुझा प्रतिसाद
कसलं झकास वाटतंय मला, तू केलेल्या माझ्या लेखाच्या उल्लेखामुळे
पण मित्रा शेवटी, धावणे हे तुझे तूच तर केलंस त्यामुळे आणि मला खात्री आहे यापुढेही करत राहशील.
जीवनशैलीत सुधारणा झाली हे मस्त लिहिलेस... रनिंग इन्डीड इस लाईफ चेंजर!
निव्वळ भारी आहेस रे तू!
अजून एक सुचना म्हणजे आठवड्यत ५ वेळा पळण्यापेक्षा ३-४ वेळा पळून अधे-मधे पोहलास तर दमसासही वाढेल आणि पायांवर जास्त ताणही येणार नाही. रेस्ट आणि रेकव्हरी ही पण महत्वाची !
पळत रहा इथे सांगत रहा !
आदित्य , अभिनंदन . हर्पेन ,
आदित्य , अभिनंदन .
हर्पेन , तुझा रन द रण चा अनुभव सांगणारा धागा येउदे आता.
तुझे धागे वाचून मोटिव्हेट होणार्या ंकडे पाहून तुला लेख टंकायचे मोटिव्हेशन मिळाले असेलच
हार्दीक अभिन.न्दन आदीत्य.
हार्दीक अभिन.न्दन आदीत्य. तुमचा प्रवास मुख्य म्हणजे सेल्फ मोटिव्हेटेड अटिट्युड खुप इन्स्पायरिन्ग आहे. तुमच हे पळण्याच व्यसन असच उत्तरोत्तर वाढत राहो ही शुभेछ्छा!
मलाही हे सांगायला आनंद होत
मलाही हे सांगायला आनंद होत आहे की मी २० फेब्रुवारीला ढोलावीरा इथल्या 'रन द रण' ट्रेलमॅरॅथॉन मधे (http://www.runtherann.com/races/marathon-distance-trail-run-42-kms ) भाग घेऊन जवळ्पास ९ तासात ती पुर्ण केली.
जबरदस्त अनुभव होता.
तिथे १०१ आणि १६१ किमी अंतराच्या अल्ट्रारनही आयोजित केलेल्या असल्याने आम्ही फार किरकोळ अंतर पळून आल्यासारखेच वाटते आहे.
पुर्ण मार्ग जी पी एस द्वारा मार्क केलेला होता. सतत जीपीएस डिव्हाईस बघत पळावे लागत होते. अचूक नॅव्हिगेशन हा कळीचा मुद्दा ठरत होता. व्हाईटरण मधल्या तलावा पासून सुरुवात मस्तच झाली. हजारोंच्या संख्येने असलेले फ्लेमिंगोज बघत पहिले ४-५ किमी कधी संपले तेच कळले नाहीत. नंतर मात्र आपला कस बघणारा काटे-कुटे असलेला मार्ग, जो बरेचदा रस्ता असा नव्हताच म्हणजे अगदी पायवाटा पण नव्हत्या. माणसाच्या उंचीहून उंच अस्लेले निवडुंग, बाभळी, ईतर अनेक काटेरी खुरटी झाडं, धुळ भरल्या वाटा, मधेमधे काही वेळा ओढ्याचा पात्रातून वाळूचा रस्ता असतो त्यातून जायचे होते, चढ उतार वेगळेच.... खरेतर ट्रेल पेक्षा ट्रेक आणि ट्रेल म्हणायला हवे या स्पर्धेला असे आणि इतके चढ उतार होते वाटेत.
एकदम मज्जानु लाईफ.
माझ्या बाबत अजून एक मज्जा झाली. माझे जीपीएस स्क्रीन गं डले आणि ते नीट करेतोवर बराच वेळ लागला. तोवर म्हटले बाकीच्यांना फॉलो करावे. ते करत असताना २-३ किमी झाल्यावर जीपीएस स्क्रीन रेस्तोअर करण्यात यश मिळाले पण लक्षात आले आपला रस्ता दिसतच नाहीये मग मागून येणारे रनर्स जवळ आल्यावर त्यांना बघितल्यावर कळले की तो १०१ चा रूट होता. मग काय मी अखेरीस ९ तासंनी फिनीश लाईन वर पोचलो तेव्हा माझ्या जीपीएस वर मी ४९.९३ किमी अंतर पार केल्याचे दिसत होते. जवळ जवळ ५० म्हणजे मी पण अल्ट्रारनर झालो म्हणायचे
पण सर्व व्यवस्था मस्त होती. मजा आली.
आभारी आहे हर्पेन, इन्ना आणि
आभारी आहे हर्पेन, इन्ना आणि रमा
हर्पेन - हार्दिक अभिनंदन!! ५० कि मी पळलास !!! महान आहेस !!!
पोहायला जायच मनावर घेतल पाहिजे खर! मधे काही दिवस सायकल चालवायला लागलो होतो पण कंटाळा आला; पळणच बरं वाटल मला त्यापेक्षा.
इन्ना - मभादि च्या संयोजकांना
इन्ना - मभादि च्या संयोजकांना चालणार असेल तर हेच अजून विस्तारून तिकडे पदभ्रमणात लिहितो न काय
फोटो पण टाकतो
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन
Pages