युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी घरी मुग, उडीद, मसूर ह्या डाळी एका वेळेस ३-४ कि.आणते व बोरिक पावडर लावून वर्षभर वापरते. तूर डाळही अशीच टिकवते परंतू हरबरा डाळ मात्र हे सर्व करूनही बाहेर डब्यात टिकत नाही. ती फ्रिजमधे तरी ठेवावी लागते किंवा पिठ करून ठेवावी लागते. तसेच मटकी पण बाहेर टिकत नाही. कोणाकडे हरबरा बाहेर डब्यात टिकवण्यासाठी काही युक्ती आहे का?

.

पूनम, आमच्या इथल्या डी-मार्टात कॉफी बीन्स ग्राईंड करून देतात. कॉफी प्रत्यक्ष दळली जात असताना मी पाहिलेली आहे. तिथेही डीमार्टात विचारून बघ.

अमच्याकडे उन्हात वाळवून डब्यात भरुन ठेवायचे. बोरीक पावडर लावत नसत. कोकणातील पावसाळ्यातही डाळी व्यवस्थित रहायच्या.

हो, भिजते.
मी ह.डाळ माय्क्रोवेव्हला जरासा चटका देऊन गार करून ठेवते. ३-४ महिने तरी व्यवस्थित टिकतेच. त्याहून अधिक काळ कधी डाळ उरलेली नाही त्यामुळे माहिती नाही.

मी सूप किंवा सँडविच मध्ये घालायला बोनलेस चिकन आणलय.

जवळ जवळ अर्धा किलोचा एक पॅक आहे. दोन माणसांच्या सूप किम्वा सँडविच करता एका वेळी जेवढं चिकन लागेल तेवढच एका वेळी वापरात येणार. तर मी ते कसं वापरायला काढू?
सगळा पॅक आधी शिजवून मग फ्रीजर मध्ये ठेवू आणि मग लागेल तेवढच काढून घेऊ की
सगळं फ्रीजर मध्ये ठेवून लागेल तेवढच काढून शिजवू. एवढ्या कमी प्रमाणात कसं शिजवायचं. किती वेळ लागतो. (म्हणजे तहान लागायच्या किती वेळ आधी विहिर खणायची ते कळेल)
शिजवलेलं अथवा न शिजवलेलं सगळं एकत्रच ठेवू. (पण मग ते वापरायला कसं काढून घेणार. फ्रीझ झालेली वस्तु पटकन कापता येत नाही ना म्हणून हा प्रश्न) की मग छोट्या छोट्या पिशव्यात भरुन ठेवू का?

मी पण ह. डाळ उन्हात वाळवून ठेवते. चांगली टिकते. ते नाही जमेल तर मात्र फ्रीजमध्येच ठेवते. बाहेर नाही टिकत ह. डाळ.

डाळी टिकत नाहीत यात मायक्रोवेव्हची काही चूक नाही, त्याला का शिक्षा? Proud

वेल,
एकावेळी लागेल तेवढे पोर्शन साध्या सॅन्डविच बॅगमधे काढून सील कर. आता या सगळ्या सॅडविच बॅग्ज फ्रीजर बॅगमधे घालून फ्रीजरला टाक. म्हणजे लागेल तशी एकेक बॅग काढता येइल. शिजवून ठेवणार असलीस तरी हिच पद्धत वापरायची.

सिंडी Biggrin

चिकन एवढ्या कमी प्रमाणात कसं शिजवायचं. किती वेळ लागतो. (म्हणजे तहान लागायच्या किती वेळ आधी विहिर खणायची ते कळेल) >>>> चिकन फार पटकन शिजतं. बोनलेस तर खुपच कमी वेळ. ८-१० मिनिट्स फक्त.

अपघाताने लागलेला शोध इथे युक्ती म्हणुन शेअर करते आहे. व्यक्तीप्रमाणे रिझल्ट्स वेगळे असु शकतात. Wink

आधी Caipirinha, मग चिली वोडका, नंतर डिनर आणि शेवटी आयरिश क्रिम संपवा........... झालं? चला आता चांगले तिखट्ट ओले कांदे घ्या. अगदी फाइन चॉप करा. बाकी तुमच्या बाजुला असणार्‍या लोकांचे डोळे घळाघळा वहात असतील. लोक दुर जावुन बसतील, पण तुमच्या डोळ्यात टिपुस सोडा, पण डोळे किंचितही झोंबणार सुद्धा नाहीत. याचं कारण अल्कोहोल इफेक्ट हे नक्कीच, पण का ते माहित नाही. कदाचित साती किंवा दिमा सांगु शकतील. आणि हो, एकदम टुन्न वगैरे नव्हते, त्यामुळे कळालंच नसेल, आठवतच नसेल अशी परिस्थिती नक्कीच नव्हती.

मग चला तर कांदे चिरायच्या आधी दोन शॉट्स मारा आणि काम चालु करा. Wink

दिमा,
'साध्या' असे लिहिले कारण इथे सॅन्डविच साठी म्हणून ज्या प्लॅस्टिकच्या बॅग्ज मिळतात त्यात स्टोअर ब्रॅन्ड ते नॅशनल ब्रॅन्ड अशी विविधता आहे, किमतीतही फरक असतो. मी प्रवासात , लंचसाठी उगाच सांडलवंड नको म्हणून नॅशनल ब्रॅन्ड वापरते आणि फ्रीजरसाठी लहान पोर्शन करायचे असतात तेव्हा साधा स्टोअर ब्रॅन्ड वापरते कारण सील केल्यावर हे सगळे खास फ्रिजरसाठी असलेल्या वेगळ्या बॅगमधे जाणार असते.

आमचे पण नाकाने कांदे : घरातल्या बाकी लोकांनी व्होडका, डिनर, आयरिश क्रीम हा सिक्वेन्स फॉलो नाही केला का?

जे लोक मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारतात त्यांना जेवायला उशीर होणार होता. नंतर जेवणारर्‍या लोकांना बिर्याणी बरोबर काकडी, कांदा, टोमॅटोचं सलाड हवं होतं . एवढ्या प्रमाणात असतील तर कांदे चॉपर वर केले जातात, पण इलेक्ट्रीसीटी नव्हती.

Pages