क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चौथ्या दिवसाच्या शेवटी अमला नि अ‍ॅबे ने थोडादा हलता धावफलक ठेवायला हवा होता असे वाटते. नुसते ब्लॉक करून संपूर्ण दिवस काढणे शेवटच्या दिवसाच्या पिचवर, जिथे एखाद दुसरा बॉल घात करू शकतो, भरपूर रिस्की वाटले. Abe and Amala are class act and have better techniques and concentration than others to survive such longer blocking sessions (not to mention low level of confidence other batsmen were carrying in) . But it always felt that it was just a matter of time before one good ball will open the flood gate. Pure blocking strategy allowed Kohli to be aggressive throughout the day and allowed bowlers to dictate the terms. Other than maintaining equal amount of concentration, Indian bowlers did not had to deviate from their set plans on the fly at all. Nevertheless, kudos to Indian bowlers for maintaining intensity throughout the days.

जाता जाता, ह्या सामन्यासारखे पिच पहिल्या सामन्यापासून असते तर खरच सगळे सामने निकाली लागले असते का ?

असामी, ब्लाॅकींग च्या मुद्दयाला अनुमोदन. They allowed bowlers to set in a rhythm and keep attacking. All they (bowlers) had to do was keep up their concentration and with the high confidence level and series victory backing them, it was relatively easier.

असामी, ब्लाॅकींग च्या मुद्दयाला अनुमोदन. They allowed bowlers to set in a rhythm and keep attacking. All they (bowlers) had to do was keep up their concentration and with the high confidence level and series victory backing them, it was relatively easier.

आफ्रिकेच्या एकंदर संघ निवडीच्या गणितामागे आरक्षणाचा एव्हढा विचार करावा लागतो हे बघितल्यावर कप्तान नि कोचची दया येतेय राव.

उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे आणी टी-२० सिरीज सुरू होतीये. दोन्ही संघातून काही नवीन आणी काही 'नेहेमीचेच यशस्वी' चेहेरे दिसणार आहेत. म्हणूनच हा धागा वर काढतोय.

इथेही काही नवीन आणी काही 'नेहेमीचेच यशस्वी' चेहेरे दिसतील Wink ब्रान चांगला वाटतोय. over user, injury,, action remodeling वगैरे च्या आधी वापरून घ्या Sad

मला ब्रान, गुरुकीरत (की गुरूक्रीत), पांडे कडून अपेक्षा आहेत.
धवन सासुरवाडीला थोडं रेप्युटेशन जपेल.

३०९-३ !रोहित १५०+ नाबाद. शाब्बास.
२०० धांवा होईपर्यंत एकच बाद असताना धांवसंख्या किमान ३२५- ३५० होणं अपेक्षित व पहिल्याच सामना म्हणून गरजेचंही होतं.

माझ्या मते ३२५+ धावा हव्या होत्या!

रोहित ने एक बाजू सील केली असता समोरुन थोडा रन रेट वाढायल हवा होता.. असो ३१० सुद्धा चांगले लक्ष्य आहे!

वर्षाचा कोटा पुर्ण करुन घेतला पहिल्याच सामन्यात. >>>> अगदी आता फक्त इन्जुरीच बाजुला काढु शकते! वर्षभरात.. Wink

वर्षाचा कोटा पुर्ण करुन घेतला पहिल्याच सामन्यात>> Lol आता वर्षभर आराम. पण जोक्स अपार्ट. क्लास इनिंग्स आणी डीझर्व्हड अ‍ॅप्रिसिएशन. Happy

भाऊ ,

माझ्या मते यात बदललेले नियम हा ही एक फॅक्टर आहे .

शेवटच्या १० ओव्हरमधे ५ खेळाडू बाहेर असल्यामुळेही हा फरक पडत असेल

वर्षाचा कोटा पुर्ण करुन घेतला पहिल्याच सामन्यात>> हाहा आता वर्षभर आराम. पण जोक्स अपार्ट. क्लास इनिंग्स आणी डीझर्व्हड अ‍ॅप्रिसिएशन. स्मित + या संपूर्ण प्रतिक्रियेला +१ Happy

आता वर्षभर आराम. पण जोक्स अपार्ट. क्लास इनिंग्स आणी डीझर्व्हड अ‍ॅप्रिसिएशन. स्मित>>>

इनिंग खुपच चांगली विशेष म्हणजे चान्स लेस आणि योग्य वेळी इम्प्रुव्हायझेशन पण त्या मुळे स्कोर ३०० पार गेला!! Happy

माझ्या मते यात बदललेले नियम हा ही एक फॅक्टर आहे .>>>> तो आहेच पण तो फॅक्टर आपल्या फिल्डिंगच्या वेळी तेवढाच प्रभावकारी असो ही अपेक्षा! Happy

२ विकेटस बारिंदर ला.. लगे रहो

इंटरेस्टिंग माहिती:-

Barinder Sran is a left-arm fast bowler, but he could just as easily have been a boxer. The days of training at Bhiwani Boxing Club, whose founder had trained India's Olympic medallist Vijender Singh, are in the past now. Sran was picked for the Indian ODI team to play Australia in Australia, with only eight List A matches under his belt. Sran is not outright quick but he is accurate, and his skills prompted his state mate Yuvraj Singh to tweet, "Reminds me of a young @ImZaheer"..

Source: cricinfo

मॅच संपलेत जमा! दोघानी १०० केले अजुन सहज करतात बोलर प्रभाव हीन जडजा आनि अश्विनला तर एकदम आरामात टोलविले...

माझ्या मते यात बदललेले नियम हा ही एक फॅक्टर आहे >>>> बदललेले नियम काय आहेत नक्की ? गुगल करू शकतो, पण इथे कोणाला लिहिता आले तर लिहा प्लीज. Happy

रोहितची दमदार खेळी ! सहिये.

शेवटी २० धावा कमी पडल्या हे सत्य!
>>
अहो तुम्ही २० आणखी काढल्या असत्या तरी त्यांनी गेम प्लान बदलून त्या हाणल्याच असत्या. चेसिंग वाल्याना तेवढा फायदा असतो. मात्र घोडे खात्रीचे पाहिजेत. ऑसीजची ब्याटिंग ७ व्या नम्बर परेन्त हय....

<< बोलर प्रभाव हीन जडजा आनि अश्विनला तर एकदम आरामात टोलविले...>.> जागतिक दर्जाच्या फलंदाजाना जसं कोणत्याही प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळतां आलं पाहिजे, तसंच गोलंदाज खरंच जागतिक दर्जाचा आहे का यासाठीही तो सर्व प्रकारच्या खेळपट्त्यांवर प्रभावी ठरतो हा निकष लागू होतो; ऑस्ट्रेलियाचा हा दौरा या दृष्टीने आपल्या गोलंदाजांसाठी, विशेषतः फिरकी गोलंदाजांसाठी, महत्वाचा ठरणार आहे. [ कृपया हें उपरोधिक आहे असं समजूं नये; माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा नेहमीच आपल्या फिरकीसाठी असतातच.]

Pages