Submitted by नलिनी on 7 January, 2016 - 04:21
हल्ली बर्याचदा ह्या डायट प्रकाराबद्दल वाचनात येते आहे.
३१ तारखेला एका मित्राकडून कळाले की त्याला ८ वर्ष डायबेटीस- प्रकार २ होता. काही कालावधीच्या ह्या डायट नंतर आता त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कोणत्याही औषधांशिवाय नॉर्मल रेंज मधे असते.
आणखी माहिती शोधायला सुरवात केल्यावर वाचनात आले की intensive dietary management ( https://youtu.be/mAwgdX5VxGc ) पद्धतीने Dr. Jason Fung's बर्याच डायबेटीक (प्रकार २), ओबेस रुग्णांना , बरे करत आहेत. ह्याचा फायदा फॅटी लिवर, पी सी ओ सी, कोलेस्ट्रोल नियंत्रण, रक्तदाब नियंत्रण, थायरॉईड तसेच इतर आजार प्रकार होतो असे म्हणतात.
हा धागा काढण्याचे कारण असे की मायबोलीवर जर कोणाला ह्याबद्दल अधिक माहीती असल्यास, ह्याचा कोणाला फायदा झाला असल्यास ह्यावर चर्चा करता यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला धागा मायबोली वरील तज्ञ
चांगला धागा
मायबोली वरील तज्ञ लोकांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतिल.
डॉ.साती खुप चांहली माहिती देऊ शकतिल.
" चांगला धागा मायबोली वरील
" चांगला धागा
मायबोली वरील तज्ञ लोकांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतिल." सहमत आहे.
मी वजन कमी करण्यासाठी लो फॅट, हाय प्रोटीन soth beach diet एकदा ट्राय केलं होतं. त्याने वजन खूप कमी झालं होतं, तेही मसल मास कमी न होता, अशक्त पणा न येता. पण हे तुम्ही म्हणताय ते वेगळं दिसतंय. वजनापेक्षा डायबेटीस् साठी उपयोगी आहे बहुदा ( वीडीयो अजुन नाही बघितला) . धागा वाचत राहाणार आहे.
मधे समीर
मधे समीर http://www.maayboli.com/node/40558 हा धागा काढला होता. इथे सविस्तर माहिती मिळेल.
I think the claim for
I think the claim for diabetic control (even type 2) without proper medication is not correct especially for Indians as main reason for diabetics is hereditary and not obesity. Docs please throw more light on this.
उत्तम धागा मी स्वतः डायबेटीक
उत्तम धागा
मी स्वतः डायबेटीक (प्रकार २) आहे आणि सध्या लो कार्ब हाय फॅट (LCHF) डायट सुरू केलेय. कोणताही अशक्त पणा न येता शुगर बर्यापैकी नियंत्रणात येतेय. अजून HBA1C टेस्ट करायची बाकीय पण दररोज ६ वेळा साख रेची प्रमाण चेक कर तोय (BBF, ABF, BL, AL, BD, AD).
लो कार्ब हाय फॅट (LCHF) डायट सुरू केल्यापासून साखर नेहेमी नॉर्मल रेंज मध्ये असते.
चपाती / भाकरी बंद केलीय, पांढरा भाग बंद करून ब्राउन चालू केलाय तोही फक्त मूदभर. जेवणातील ५०% पेक्षा जास्त भाग हा हिरव्या पालेभाज्यांचे सॅलॅड (न शिजवता) थोडे मसालेदार बनवून खातो. भाकरी / चपाती रक्तात लगेच विरघळते आणि साखर तयार करते.
शरीराला अतिरिक्त साखरेचा पुरवठा न होउ देता अन्नातून जी साखर मिळेल त्याची च सवय लावता आली की अतिरिक्त इन्शुलीन ची गरज पडत नाही
ईथे (यु.के.) मध्ये एक छान प्रोग्रॅम आला होता "Doctor in your House" Dr. Rangan Chatterjee Shakes Up Type 2 Diabetes Treatment
मी हे एपिसोड्स रेकार्ड करून ठेवले आहेत पण जर आंतरजालावर कुठे लिंक्स मिळाल्या तर नक्कीच पोस्ट करीन
बाकीय पण दररोज ६ वेळा साख
बाकीय पण दररोज ६ वेळा साख रेची प्रमाण चेक कर तोय (BBF, ABF, BL, AL, BD, AD).>>
प्रफुल्ल तुम्ही रोज घरच्या घरी साखरचे प्रमाण तपासायला कुठले उपकरण वापरता त्याचे नाव आणि ब्रान्ड सांगाला का कपया? धन्यवाद.
especially for Indians as
especially for Indians as main reason for diabetics is hereditary and not obesity
>> किं चित असहमत. हे आपण मनामध्ये बिंबवले आहे किंवा बिंबवले गेलेले आहे. hereditary नक्कीच का रण आहे पण त्यापेक्शा कितीतरी कारणीभूत आपली जीवनशैली आहे. आपली जीवनशैली जर नीट कंट्रोल केली तर भरपूर गोष्टी नियंत्रणामध्ये येतील.
इथे आहे रंगन चटर्जींची एक
इथे आहे रंगन चटर्जींची एक क्लिप मधुमेहावरती: https://www.youtube.com/watch?v=qKZIUvc3bAA
आपली जीवनशैली जर नीट कंट्रोल
आपली जीवनशैली जर नीट कंट्रोल केली तर भरपूर गोष्टी नियंत्रणामध्ये येतील.>> अगदी बरोबर. पण असेही होते की एकाच घरात राहणार्या लोकांची जीवनशैली जवळपास सारखीच असते.
माहितीसाठी चांगला धागा ,
माहितीसाठी चांगला धागा , नक्कीच उपयोग होईल ह्या धाग्याचा.
डॉ.साती खुप चांहली माहिती देऊ शकतिल. >>> सकुराजी , डॉ. साती बिझी असतील , तुम्हीच त्यांना काँटॅक्ट करुन इथे सविस्तर माहीती लिहा
मी सध्या Nexus Gluco Rx
मी सध्या Nexus Gluco Rx वापरतोय. तुम्ही को णतेही मान्यताप्राप्त ग्लुकोमीटर वापरू शकतात. शक्यतोवर डायबेटॉलॉजिस्ट च्या सल्ल्याने घेतले तर उत्तम.
आंतरजालावर वेगवेगळे तक्ते सु द्धा उपलब्ध आहेत ते तुम्ही नोंदी करण्यासाठी वापरू शकतात.
महत्त्वाचे म्हणजे निर्धार पक्का हवाय आणि सर्वात महत्त्वाचे शिस्त हवीय. थोडा वेळ लागेल पण रिझल्ट नक्कीच मिळेल.
सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण हे सर्व १० तासांमध्ये आटोपले तर खुप उत्तम पण १२ तासांपेक्षा जास्त नको.
साधारणतः मधुमेह कोणत्या वयात
साधारणतः मधुमेह कोणत्या वयात होतो?
आणि लठ्ठ असलो तर मधुमेह होतोच होतो का?
प्रफुल्ल धन्यवाद. छान माहिती मिळाली आणि प्रेरणा सुद्धा मिळाली.
साधारणतः मधुमेह कोणत्या वयात
साधारणतः मधुमेह कोणत्या वयात होतो? >> ह्या विकाराला वयोमर्यादा नाही, कोणत्याही वयात होउ शकतो आणि
मधुमेहचे विवीध प्रकारही आहेत.
आणि लठ्ठ असलो तर मधुमेह होतोच होतो का?
>> होईलच असे नाही असे कितीतरी उदाहरणे आहेत की अतिलठ्ठ असूनही मधुमेह नाहीये आणि किरकोळ तब्बेत असतांनाही मधुमेह आहे.
पण लठ्ठपणा हा मधुमेह होण्यासाठी नक्कीच मोठा हातभार लावतो
तुमचे डाएट लिहु शकाल का? पोळी
तुमचे डाएट लिहु शकाल का?
पोळी च्या ऐवजि काय खाता
हो.. नक्की च लिहा.. भारतात
हो.. नक्की च लिहा.. भारतात आहात काय?
प्रफुल्ल धन्यवाद. तुमचा
प्रफुल्ल धन्यवाद. तुमचा रिचर्स आवडला.
आपल्याला मधुमेह होऊ शकतो ह्याचे काही घरगुती संकेत आहे का?
डायेट लिहीण्या पुर्वी - मा
डायेट लिहीण्या पुर्वी - मा झ्या सगळ्या डायेट चे श्रेय माझ्या सौ चे.
मी यु,के. मध्ये आहे.
डायेट
नाश्ता - उकडेलेले अंडे (३-४ ) फक्त पांढरा भाग. / तिखट सांजा / ऑम्लेट (२ अंडे) मिक्स्ड विथ शिमला मिर्ची+ ब्रोकोली् + मटार+कांदा+बीन्स. नंतर एखादे फळ
लंच - ६०% सॅलॅड + ब्राउन राईस मूदभर + सूप (हिरव्या पालेभाज्या) / ग्रील्ड Salmon / एक फळ
डिनर - ६०% सॅलॅड + कोणती ही भाजी आणि खुप सारा रस्स / ग्रील्ड किंवा स्टीम्ड Salmon किंवा सोया बीन वडी / १,२ फळ
दिवस भरात कमीत कमी ५ ते ३ रंगाची वेगवेगळी फळे / भाज्या यांचा समावेश आहारात असलाच पाहीजे. कमीत कमी कर्बोदके असलेले पदार्थ वापरा.
सॅलॅड कितीही खाल्ले तरी जडत्व येत नाही.
आणि जोडीला ३०-४५ मिनीटे चालणे (कमीत कमी १०००० स्टेप्स) . वाचायला जास्त वाटतात पण एकदा चालायला लागले की काही वाटत नाही.
मी वर माझे डायेट दिले आहे,
मी वर माझे डायेट दिले आहे, तुम्ही हवे तसे बदल करू शकतात, फक्त कर्बोदके कमीत कमी वापरा. आणि महत्त्वाचे
हेवी ब्रेकफास्ट, मॉडरेट लंच आणि लाईट डिनर हे तत्व पाळा
Bhakri should be ok instead
Bhakri should be ok instead of poli, not sure though.
आपल्याला मधुमेह होऊ शकतो
आपल्याला मधुमेह होऊ शकतो ह्याचे काही घरगुती संकेत आहे का?
>> बरेच,
१. जर आपल्या वाडवडीलांना असेल तर शक्यता जास्त असते
२. लठ्ठ पणा
३. स्ट्रेस
४. थकवा
५. खुप तहान लागत असेल तर
६. रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीला जावे लागत असेल तर
७. डिप्रेस्ड (नैराश्य) जाणवणे
ही काही मला माहीत असलेली कारणे दिली आहेत पण माझ्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रामधले मंडळी ह्यावर अधिकारवाणीने भाष्य करू शकतात.
प्रफुल्ल, तुम्ही धान्यांतून
प्रफुल्ल, तुम्ही धान्यांतून मिळणारी कर्बोदके कमी केली आहेत ( त्याऐवजी फळे-भाज्यांतून मिळणारी कर्बोदके खाऊन लो कार्ब डाएट साध्य करत आहात ) पण तुमचा आहार हाय फॅट अजिबात वाटला नाही.
राजसी, भाकरी पोळीऐवजी चालणार
राजसी, भाकरी पोळीऐवजी चालणार नाही कारण ज्वारी, बाजरी म्हणजे सुद्धा कार्बच आहेत.
रवा, मैदा, गव्हाचे पीठ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका चालणार नाही.
ह्यात कार्ब, स्टार्च शक्यतो वापरायचे नाही.
मस्त पळतोय हा धागा बहुतेक
मस्त पळतोय हा धागा
बहुतेक बरेच जण प्री-डायबेटीक स्टेज ला आहेत असं वाटतंय.. असो
पण तुमचा आहार हाय फॅट अजिबात
पण तुमचा आहार हाय फॅट अजिबात वाटला नाही. >> अगो +१
हाय फॅट (Saturated Fat ) आहारात समाविष्ट केल्यामुळे कोलेस्ट्रोल मध्ये वाढ होणार नाही का ? मग कोलेस्ट्रोल नियंत्रण, रक्तदाब नियंत्रण कसं होईल ?
बहुतेक बरेच जण प्री-डायबेटीक
बहुतेक बरेच जण प्री-डायबेटीक स्टेज ला आहेत असं वाटतंय.. असो>> मायबोलीवर बरेच जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच इतर बर्याच आजारांसाठी हा डायट उपयोगी ठरू शकतो.
बाजिंदा, आहारात पनीर, दूध, दही, चीज, ऑलिव्ह ऑईल, कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑईल, तीळ तेल, घाण्यावरचे तेल वापरणे अपेक्षीत आहे.
रिफाईंड ऑईल, तळणीचे पदार्थ वापरायचे नाहीत.
यातल्या कुठल्याही गोष्टीशी
यातल्या कुठल्याही गोष्टीशी अजून कसलाच संबंध नाहीये पण 'हाय फॅट' या शब्दांनी उत्सुकता चाळवली म्हणून डोकावले..
हाय फॅट म्हणजे नक्की काय खाणं अपेक्षित आहे? मुळात मधुमेहासाठी साखर नको तसंच एकदम तळकट-तेलकट, हाय कॅलरीवालं अन्न नको असं अपेक्षित असतं ना? (प्रश्न अडाणी असतील तर सोडून द्या आणि तुमची चर्चा चालूद्यात. मी वाचनमात्र आहेच)
ओह सॉरी, नलिनीचा शेवटचा
ओह सॉरी, नलिनीचा शेवटचा प्रतिसाद बघायचा राहिला होता.... पण पनीर, चीज, घाण्यावरची तेलं यासंदर्भात प्रश्न कायमच आहे
मलाही तीच शंका आली. 'ऐतेन'
मलाही तीच शंका आली. 'ऐतेन' झाले. हा मंत्र नेमका उलटा वाटला. पण धागा इन्टरेस्टिंग. नलिनी, धाग्यासाठी आभार! प्रफुल्ल, मस्त पोस्ट्स.
वडिलांना डायबेटिस आहे पण तसा खूप कमी प्रमाणात आहे.
पद्मावती , तुमचा ही डाएट
पद्मावती , तुमचा ही डाएट लिहाल का?
अवनी, बाळन्त पणा मुळे जो
अवनी,
बाळन्त पणा मुळे जो अतिरिक्त लठ्ठपणा आला होता तो कमी करण्यासाठी एखाद्या फास्ट आक्टिंग डायट ची मला गरज होती. पण अनहेल्दी डाएट प्लान मला नको होते उदाहरणार्थ..नुसतेच सूप, किंवा उकडलेल्या भाज्या खाणे इत्यादी.
मला south beach आवडलं कारण त्यामधले बेसिक फंडे हे अगदी पटण्यासारखे होते. म्हणजे कार्ब्स आणि फॅॅट टाळा पण प्रोटीन भरपूर खा. म्हणजे उपासमार न करता सुध्धा वजन कमी होतं. या डाएट मधे दोन आठवडे कडक पथ्य. साखर नाही, ब्रेड, पोळी, भात अजिबात नाही. तेल आणि मीठ सुध्धा अत्यल्प प्रमाणात. अगदी दूध आणि फळे सुध्डा नाही. जूस वगैरे तर नाहीच नाही. भरपूर पाणी पिणे.
south beach चे बरेच सॅम्पल मेनुज इंटरनेट वर मिळतीलच पण मी साधारणपणे खालीलप्रमाणे माझा प्लान ठेवला होता.
भरपूर सॅलड्ज़, भाज्या, अंडी, फिश्, चिकन, तोफु, डाळी, उसळी, सूप आणि भरपुर पाणी.
ब्रेकफास्ट ला उकडलेलं अंडं, ग्रीन टी, चहा ( दूध - साखर अजिबात नाही).
लंच ला सलाड, उसळ, वरण, तोफु, ग्रिल्ड भाज्या. दुपारी भाज्यांचं सूप आणि पुन्हा डिनर मधे ग्रिल्ड भाज्या, तोफु, अंडी इत्यादी प्रकार.
तुम्ही मासाहारी असाल तर उत्तम आहे कारण मग ग्रिल्ड चिकन, फिश् असा छान भरपेट मेनु होऊ शकतो.
हा प्लान खूप दिवस आपण अर्थातच पाळू शकत नाही कारण पोळी, भाताशिवाय आपण नाही राहू शकत. पण दहा पंधरा दिवस जरी हे डाएट कडक पणे पाळलं तर आपल्या वेट लॉस ला प्रचंड जंप स्टार्ट मिळतो. अजिबात अशक्त पणा वाटत नाही. प्रोटीन भरपुर प्रमाणात खात असल्यामुळे भूकही फार लागत नाही. अगदी निरोगी रित्या वजन कमी होतं. कार्ब्स टाळणं फार कठीण वाटतं पण नेटाने केलं तर अतिशय छान परिणाम शरीरावर दिसतात. इट्स वर्थ इट!
Pages