मी अगदी लहान असल्यापासून घरात एक शब्द नेहमी ऐकू यायचा. मी शिकलेल्या पहिल्या काही शब्दांमधील तो एक होता. तो शब्द म्हणजे डायबेटीस.
माझ्या बाबांना त्यांच्या लग्नाआधीच पाच वर्षं मधुमेहाचे निदान झाले. तेव्हा ते फक्त वीस वर्षांचे होते. यावर्षी त्यांची एकसष्ठी आहे. बाबा मधुमेहाला त्यांचा मित्र म्हणतात. या वर्षी त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर तब्बल ४१ वर्ष साजरी केली. इतक्या वर्षांचा सहवास माझ्या आईला सुद्धा मिळाला नाहीये असा विनोद आम्ही नेहमी करतो. पण बाबांची गोष्ट अगदी लिहून ठेवण्यासारखी आहे.
मागच्या काही लेखांमध्ये मी कार्ब्स, त्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि इंटरमिटंट फास्टिंग बद्दल लिहिलं होतं. ते लेख वाचून आलेल्या कॉमेंट्स आणि इमेल वाचून मला हा पुढचा फॉलोअप लेख लिहावासा वाटला. वजन कमी करताना काही प्रॅक्टिकल गोष्टी खूप उपयोगी पडतात. कारण हा खूप दूरचा प्रवास असतो आणि कधी कधी मानसिक बळ खचून जातं. काही सध्या गोष्टी पाळल्या तर हा प्रवास तितका बोचरा वाटत नाही.
१. तुम्हाला वजन कमी करायचे आहे का?
हे डाएट तीन भागात केले जाते असे म्हणता येईल.
डाएटच्या पहिल्या भागात पूर्वी सांगितलेल्या आहारातून कर्बोदके कमी करून स्निग्ध पदार्थ वाढवायचे आहेत; पण ते चवदार लागते म्हणून दिवसभराच्या एकूण कॅलरीजचे भान ठेवायचे. सुरुवातीच्या काळात भूक लागली की हाताशी सुकामेवा ठेवायचा. सुरुवातीच्या काळात प्रमाणात पाणी पिण्यावर लक्ष द्यायचे. प्रमाणात अशासाठी की अगदी मिनिटा मिनिटाला, तहान लागलेली नसताना दिवसाचे टार्गेट पूर्ण करायचे म्हणून, गरज नसताना ४-५ लिटर पाणी पिणे योग्य नाही.
मला भात बंद करणे सहज जमले, परंतु चपाती एक तरी खायला हवी असे वाटायचे. पहिला दिवस एका चपातीवर निभावला. करून करायचे तर व्यवस्थितच करायला हवे (करून करायचे तर कच्चे का? अन माळ्यावर बसून अडचण क?) म्हणून मग चपाती ऐवजी भाकरी खावी असे ठरवले. एका जेवणात अर्धी ते पाऊण भाकरी.
गव्हातले आणि ज्वारी, बाजरीतले कर्बोदकांचे प्रमाण पाहिल्यास जवळपास ते सारखेच आहे हे तपासल्यावर चौथ्या दिवसापासून मी भाकरीपण पूर्णपणे बंद केली.
सुरुवातीचे तीन महिने पूर्णपणे वर्ज्य केलेल्या गोष्टी :
चपाती
भात
मैदा
गोड पदार्थ (कोशिंबीरसुद्धा
बिन साखरेची)
भाकरी
कडधान्ये
डाळी
बीन्स
मटार
मका (दाणे, पीठ)
ऑगस्ट २०१५ च्या एका दुपारी जरा एका ऑफीसमध्ये काम होते म्हणून जेवण उरकून लेकाला घरीच ठेवून सायकलने निघाले होते. वाटेवर एका झाडाच्या ४-५ चेरी तोंडात टाकून जरा पुढे गेले आणि काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडले. नशिबाने सायकल रस्त्याच्या कडेला गवतावर घेतली होती. विजेच्या पोलाच्या एक फूट पुढे जाऊन आणि मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वीच पडले होते.
सर्वात आधी एका गोष्टीचे बरे वाटले की, पिल्लू माझ्या सायकलवर मागे नव्हता. पण दुसरी काळजी अशी वाटली की, मला काही झालं असतं तर? नवरा भारतात गेलेला आणि लेकरू घरी एकटंच.
हल्ली बर्याचदा ह्या डायट प्रकाराबद्दल वाचनात येते आहे.
३१ तारखेला एका मित्राकडून कळाले की त्याला ८ वर्ष डायबेटीस- प्रकार २ होता. काही कालावधीच्या ह्या डायट नंतर आता त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कोणत्याही औषधांशिवाय नॉर्मल रेंज मधे असते.
आणखी माहिती शोधायला सुरवात केल्यावर वाचनात आले की intensive dietary management ( https://youtu.be/mAwgdX5VxGc ) पद्धतीने Dr. Jason Fung's बर्याच डायबेटीक (प्रकार २), ओबेस रुग्णांना , बरे करत आहेत. ह्याचा फायदा फॅटी लिवर, पी सी ओ सी, कोलेस्ट्रोल नियंत्रण, रक्तदाब नियंत्रण, थायरॉईड तसेच इतर आजार प्रकार होतो असे म्हणतात.