Submitted by नलिनी on 7 January, 2016 - 04:21
हल्ली बर्याचदा ह्या डायट प्रकाराबद्दल वाचनात येते आहे.
३१ तारखेला एका मित्राकडून कळाले की त्याला ८ वर्ष डायबेटीस- प्रकार २ होता. काही कालावधीच्या ह्या डायट नंतर आता त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कोणत्याही औषधांशिवाय नॉर्मल रेंज मधे असते.
आणखी माहिती शोधायला सुरवात केल्यावर वाचनात आले की intensive dietary management ( https://youtu.be/mAwgdX5VxGc ) पद्धतीने Dr. Jason Fung's बर्याच डायबेटीक (प्रकार २), ओबेस रुग्णांना , बरे करत आहेत. ह्याचा फायदा फॅटी लिवर, पी सी ओ सी, कोलेस्ट्रोल नियंत्रण, रक्तदाब नियंत्रण, थायरॉईड तसेच इतर आजार प्रकार होतो असे म्हणतात.
हा धागा काढण्याचे कारण असे की मायबोलीवर जर कोणाला ह्याबद्दल अधिक माहीती असल्यास, ह्याचा कोणाला फायदा झाला असल्यास ह्यावर चर्चा करता यावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नलिनी, चांगला धागा काढलात !
नलिनी,
चांगला धागा काढलात !
डायबेटिस मॅनेजमेंट खाली किती वेगवेग़ळी औषधे दिली जातात व पेशंट त्यात कसा गुंतला जातो हे ह्या युट्युब मध्ये पहायला मिळाले.
जर डायेट करुन मधुमेह आटोक्यात येत असेल तर हा मधुमेहाच्या प्रचलीत संकल्पनेलाच धक्काच आहे.
डायबेटिस हा असाध्य रोग आहे अस ईथल्या डॉक्टरांच म्हणण आहे, ते त्यांनी वेळोवेळी प्रतिपादीत केलेल आहे.
तरी सुद्धा अश्या डॉक्टर्सना ईथे अधिक प्रकाश टाकायला बोलवण हे चुकीच आहे , आणी ते ईथे न येऊन माझ म्हणण सत्य असल्याच सप्रमाण सिद्ध करत आहेत .
वाचनखुणात डायबेटिस आहे.. पण
वाचनखुणात डायबेटिस आहे.. पण हे डाएट करण्यसाठी डायबेटिस किंवा इतर कोणताही आजार असण्याची जरूरी नाही.
मी तर ह्याला डाएट देखील म्हणत नाही. ही लाइफस्टाईल आहे. असली पहिजे. जसं मी रेड मीट खात नाही तसंच मी एम्प्टी कॅलरीज, सिंपल कार्ब्स खात नाही.
Bhakri should be ok instead
Bhakri should be ok instead of poli, not sure though.>>>>
राजसी, भाकरी पोळीऐवजी चालणार नाही कारण ज्वारी, बाजरी म्हणजे सुद्धा कार्बच आहेत.
रवा, मैदा, गव्हाचे पीठ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका चालणार नाही.
ह्यात कार्ब, स्टार्च शक्यतो वापरायचे नाही.
>>>>
मी या पानावर काय लिहीले आहे हे कृपया वाचा. पोळीला भाकरी पर्याय नाही . सर्वच धान्यातून सारखेच कार्ब मिळतात.
http://www.maayboli.com/node/50148?page=51
जयश्रीरामजी उर्फ ...... तुमची
जयश्रीरामजी उर्फ ...... तुमची खाजगी भांडणे या बीबीवर सुरू करण्याचे काहीच कारण नाही. जिथे तिथे जाऊन याचा गारुड्याचा खेळ सुरू होतो.
बस्के, मी दिलेल्या व्हिडीओ
बस्के, मी दिलेल्या व्हिडीओ लिंकमध्ये डायबेटीसचा उल्लेख आहे तसेच ह्या डाएट प्रकाराचा एका मित्राला डायबेटीस नियंत्रणाखाली आणण्यासाठी उपयोग झाला म्हणून मी वाचनखुणात डायबेटीस लिहीले आहे. तुझ्याशी सहमत. आवश्यक तेवढ्याच कार्ब्स आहारात घेणे ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला हवे आहे.
पादुकानन्द, मी पण हेच लिहीले आहे की भाकरी चालणार नाही.
हा किटोन डाएट का? ज्याने
हा किटोन डाएट का? ज्याने किटोसीस ट्रिगर होऊन fat बर्न होतं?
http://www.ketogenic-diet-resource.com/ketogenic-diet-plan.html
किटोसीस ट्रिगर झालय का बघायला मुत्र तपासायला स्ट्रिप्स मिळतात.
एक मित्र करायचा, तर ही जीवनशैली नाही. तर १-२ महिने करून सगळं नियंत्रणात आलं की रेग्युलर हेल्दी खायला स्वीच करणे असा करतात. कायम करण्याचे दुष्परिणाम वाचा आणि मग कायम करा.
वरची लिंक प्लीज आधी वाचा, कोणी करू नये, दुष्परिणाम, कसा करावा आणि मग नीट करा कृपया.
अमितव, वरील लिंकसाठी
अमितव, वरील लिंकसाठी धन्यवाद.
ह्यामुळे हे कळाले आहे किटोसीस नावाला न घाबरता किटोसीस आणि किटोअॅसिडॉसीस ह्यातला फरक अभ्यासायला हवा आहे.
पोळी आणि भाकरी ...सारखेच
पोळी आणि भाकरी ...सारखेच कार्ब्स ....
अरे काय चाललय ?
प्रत्येक पदार्थाची GI वॅल्यू तपासा ना. गव्हापेक्षा बाजरीची वॅल्यू कमी आहे ...
diabetes पेशंट नी कमी जीआय चे अन्न खावे हे सांगणारे डॉक्टर बिनडोक आहेत का?
भातापेक्षा पोळीची GI वॅल्यू कमी अन पोळीपेक्षा बाजरीच्या भाकरीची GI वॅल्यू कमी आहे
इथे कोणी डॉक्टर्स आहेत का? जरा बोला की तुम्ही
उडन खटोला, गव्हात आणि बाजरीत
उडन खटोला, गव्हात आणि बाजरीत कार्ब्ज जवळपास सारखेच आहेत. आपण त्यांच्या जीआय ची माहिती देणार का?
ह्या माहितीचा नक्कीच फायदा होईल.
प्रफुल्ल शिंपी यांच्या
प्रफुल्ल शिंपी यांच्या पोस्टमधून डाएट बद्दल अंदाज आला. आणखी काही पोस्ट्स चांगल्या वाटल्या.
मात्र हा जो प्रोग्राम आहे तो काय आहे, डाएट कसा असतो ( प्रशिं यांनी त्यांचं उदाहरण दिलेलं आहे, पण पर्याय नाही समजले) , काय काळजी घ्यावी हे कळालेले नाही. हा प्रोग्राम फक्त डायबेटिक -२ च्या रुग्णांनीच घ्यायचा आहे काय इतरांनी घेतल्यास त्यांच्यावर चांगले वाईट परिणाम काय होतील हे कुणीतरी सोप्या शब्दांत देईल काय ?
kapoche, अमितव ह्यांनी लिंक
kapoche, अमितव ह्यांनी लिंक दिलेल्या साईटवर कोणी करावे, कोणी करू नये, चांगले वाईट परिणाम ह्याची सविस्तर माहिती आहे.
बीपी, डायबेटीस-२, वजनाची समस्या,पी सी ओ सी, फॅटी लिवर, मेटाबोलीक सिंड्रम अश्या विविध समस्यांसाठी हा डायट उपयुक्त ठरू शकतो असे वाचनात आले आहे.
थोडेसे अवांतर पण या धग्यावर
थोडेसे अवांतर पण या धग्यावर लिहावे वाट्ले-
इथे ज्वारी,बाजरी,कार्ब्ज हे सगळे वाचुन मला एक प्रश्न पडलाय हे सगळे पदार्थ भारतात पिकतात पिकवले जातात व आपल्या रोजच्या दैनंदिन जिवनात हे आहारात घेतले जातात पण माझ्या काही काळाच्या जपानच्या वास्तव्यात मी त्यांचा आहार जवळुन बघितला आहे त्यांच्या जेवनात असे काहिच नसते.
थोडासा तो त्यांचा स्टीकी राईस खुप सारे सॅलड्,सुप्, फिश,चिकन्,बिफ पोर्क्, या पैकी काहिही ग्रिल्ड केलेल.
दुसरे ते पाण्या ऐवजी ग्रिन टी काहिही न घालता किंवा मुगिचा म्हणजे बार्लि वॉटर हेच पितात.
आपल्या इतके गोड तिथे बनवत नाही खुप थोडे गोड खातात तिथे.
टोफुचा मुक्त हस्ते वापर असतो.
तिथली लोक निरोगी दिर्घआयुष्यी असतात बिपी डायबेटिज चे प्रमाण खुप कमी आहे.
हा तिथल्या थाळिचा एक फोटो![509ea690a33986f3fa8efbbccf8fe83a.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u59742/509ea690a33986f3fa8efbbccf8fe83a.jpg)
मी वाचतोय सगळे प्लान. भारतात
मी वाचतोय सगळे प्लान.
भारतात गहू आणि मका फार नंतर आला. त्यापूर्वी आपण ज्वारी, ज्वारी, राळे, वरी, नाचणी अशीच धान्ये खात होतो. आता आहे त्या रुपात नाही पण सलाद म्हणून कच्चा कांदा, मूळा वगैरे होतेच.
त्या काळातली आपली कष्टाची जीवनशैली, ( भरपूर काम, चालणे ) आणि तसेही कमी उपलब्धतेमूळे कमी खाणे ( गोडधोड सणासुदीलाच असे ) त्यामूळे हा आहार आपल्या अंगीही लागत होता. आता जीवनशैली जास्त आरामाची झालीय आणि अवांतर खाणे वाढलेय. म्ह्णून आहार नियंत्रण आवश्यक झालेय.
अजुन एक तिथली आवडलेली गोष्ट
अजुन एक तिथली आवडलेली गोष्ट कुठलाही पदार्थ-बिस्किट्स,मिठाई, वैगेरे एक किंवा दोन पिसेस मधे पॅक असते
म्हणजे बिस्किट्च्या पॅकेट्च्या आत परत दोन-दोन बिस्किट पॅक असतात त्यामुळे जास्त खाल्ले जात नाही.
आपण फोडले पॅकेट की संपवायच्या मागे असतो.
मिठाई म्हणजे शिजवलेला राजमा त्यात थोडी फार साखर (ब्राऊन) याचेच पुरणा सारखे सारण बनवुन वेगवेगळ्या मिठाया.
मिठाई म्हणजे शिजवलेला राजमा
मिठाई म्हणजे शिजवलेला राजमा त्यात थोडी फार साखर (ब्राऊन) याचेच पुरणा सारखे सारण बनवुन वेगवेगळ्या मिठाया.>>>>>>>>ऑ? गुजा, जिलबी, अंगुर रबडी, रसमलाइ काहीच नाही म्हणता?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजिबात नाही.
अजिबात नाही.:अओ:
त्या काळातली आपली कष्टाची
त्या काळातली आपली कष्टाची जीवनशैली, ( भरपूर काम, चालणे ) आणि तसेही कमी उपलब्धतेमूळे कमी खाणे ( गोडधोड सणासुदीलाच असे ) त्यामूळे हा आहार आपल्या अंगीही लागत होता. >>> +१
इथे सुकामेवाबद्दल कुणीच काही
इथे सुकामेवाबद्दल कुणीच काही बोलले नाही. आपल्याकडे आपण हिवाळ्यात डिंकाचे / मेथीचे लाडू खातो ते खायला पाहिजेत का? की नुसते लाडू वगैरे न करता खाल्लेले जास्त बरे? धन्यवाद.
येस बी. मूठ भरून मेथ्या
येस बी. मूठ भरून मेथ्या न्हायतर गोळाभर डिंक ऑन द रॉक्स तस्साच हाणायचा. वरून साखरेची चिमूट तोंडात टाकायची . हाकानाका.
मूठ भरून मेथ्या न्हायतर
मूठ भरून मेथ्या न्हायतर गोळाभर डिंक ऑन द रॉक्स तस्साच हाणायचा.>>>>>>>>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
इथे सुकामेवाबद्दल कुणीच काही
इथे सुकामेवाबद्दल कुणीच काही बोलले नाही>> सुकामेवा खायचा आहे. सुर्यफुल, लाल भोपळा यांच्या बीया, बदाम, अक्रोड, चेस्ट नट पण साखरेशिवाय असल्याने त्याचे लाडू हा पर्याय बाद.
धन्यवाद नलिनी.
धन्यवाद नलिनी.
>>मिठाई म्हणजे शिजवलेला राजमा
>>मिठाई म्हणजे शिजवलेला राजमा त्यात थोडी फार साखर (ब्राऊन) याचेच पुरणा सारखे सारण बनवुन वेगवेगळ्या मिठाया.>> मला फार आवडतात . जपानहून मिठाई येते त्यात असतात हे प्रकार. मात्र जोडीला स्वीट बन्स, स्पॉन्ज केक्स आणि कुकीज आणि पॅस्ट्रीजही असतात.
जपानहून मिठाई येते त्यात
जपानहून मिठाई येते त्यात असतात हे प्रकार. मात्र जोडीला स्वीट बन्स, स्पॉन्ज केक्स आणि कुकीज आणि पॅस्ट्रीजही असतात.<<<,हो अगदी अगदी आणि हे दुसरे प्रकार पण गोड मिट्ट नसतात.
चांगला धागा नलिनी हाय फॅट
चांगला धागा नलिनी
हाय फॅट बद्दल माहित नाही. नक्की किती फॅट आपल्याला गरजेचे असते? आणि नैसर्गिकपणे ते कसे मिळवता येइल? अॅव्होकॅडो मध्ये चांगले फॅटअसते ...पण भारतात हे फळ सहजपणे उपलब्ध नाहि मग काय?
भाज्यांमध्ये फॅट्स असतात का?
लो कार्ब बद्दल सध्या जे वाचतेय. त्यावरुन विविध भाज्या, पालेभाज्या, कडधान्ये व फळे यांच्यामधले कार्ब शरीराची गरज सहजपणे पुर्ण करु शकतात असे लक्शात आलेय.
लेखकाने असे सांगितलेय की भाज्यांमध्ये शरीराला लागणारी सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने, कार्ब असतात. आपण जे कार्ब खातोय पोळी, भात, ब्रेड खातो ते फक्त आपल्या आवडीसाठी.
मुळात फार पुर्वी धान्ये नव्हतीच. पण वाढती लोकसंख्या व आपत्कालीन परिस्थितीत माणसाला जगता यावे म्हणुन धान्यांच्या शेतीची सुरवात झाली.
ह्यात कार्ब, स्टार्च शक्यतो वापरायचे नाही.>>>
स्टार्च तर गाजर ,बीट, बटाटे मध्ये पण असते ना? बटाटे खाऊन फक्त कार्बच मिळतात हे मान्य.
पण सलाड मध्ये तर गाजर, बीट वापरतोच.
ही चर्चा पुढे वाढवता येईल काय
ही चर्चा पुढे वाढवता येईल काय?
वर्ष भराने काय परिस्थिती आहे इथे चर्चेत भाग घेतलेल्या मंडळींची?
नानाकळा, नक्कीच!
नानाकळा, नक्कीच!
मी जानेवारी २०१६ पासून हे लाईफस्टाईल म्हणून स्विकारले आहे. मलातरी त्याचा फायदा होतो आहे. माझ्या अनिभवावर मी इथे एक लेखमालिका लिहिलेली आहे.
इतरांचा अनुभव वाचायला मलापण नक्कीच आवडेल.
<<ही चर्चा पुढे वाढवता येईल
<<ही चर्चा पुढे वाढवता येईल काय?
वर्ष भराने काय परिस्थिती आहे इथे चर्चेत भाग घेतलेल्या मंडळींची?>> +१
Pages