नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
रश्मी तसे ताडगोळे फ्रिजमध्ये
रश्मी तसे ताडगोळे फ्रिजमध्ये १-२ दिवसच ठेवून खाल्लेले बरे. ताडगोळ्याचा पारदर्शीपणा कमी होऊन तो जास्त पांढरट आणि पिठूळ दिसायला लागला की खराब झाला हे समजते. रश्मी जर त्याचे कव्हर अजुन फ्रेश दिसत असेल तर ठिक आहे. पण जर एकदमच चॉकलेटी झाले असेल तर टाकूनच दे.
जागु तुला पण धन्यवाद. अग
जागु तुला पण धन्यवाद. अग त्याचे कव्हर चॉकलेटीच झालेय. पूर्वीसारखे ( जसे बीचवर खाल्ले होते तसे) पारदर्शी दिसत नाहीयेत त्यामुळे टाकुन देते.
हो टाकूनच दे. उगाच विषाची
हो टाकूनच दे. उगाच विषाची परिक्षा नको.
हा पक्षी रोज दिसतो. कोकिळांच्या सोबत असतो आणि कोकिळ सारखाच आहे. पण बघा ना ह्याच्यावर थोडी पांढर्या ठिपक्यांची डिझाईनपण आहे.

जागू, वय वाढतय त्याच म्हणून
जागू,
जस्ट किडींग .. कोकिळ नसावा शायद.. कोकिळाचे डोळे लाल असतात ना ? आणि डिझायनर फेदर्स आर नॉट देअर टेस्ट ..
वय वाढतय त्याच म्हणून पांढरे ठिपके असावेत
बाकी वर्षू ने टाकलेले फुल, फुलांचा गुच्छ मस्तच..
ताडगोळे कशे असतात ? --- एक 'ढ'
टिने तू ना मला शोधायच काम
टिने तू ना मला शोधायच काम लावलस. एकतर ताडगोळे हे प्रकरण माझ जिव्हाळ्याच आहे.
हे घे ताडगोळे.
मलाच तोपासु झाल.

ह्याला ताडगोळ्याची पेंड म्हणतात. ह्यात ताडगोळे असतात व ते कलाकुसरीने काढावे लाग्तात जपून.

हे ताडगोळ्याचे झाड.
ह्यावर लेख लिहायचा कधीचा राहून जातोय.
आयला.. तू तर संदर्भासहित
आयला..
तू तर संदर्भासहित स्पष्टिकरण दिलसं... ठांकु..
जागु मस्त! वेळ मिळेल तेव्हा
जागु मस्त! वेळ मिळेल तेव्हा जरुर लिही ताडगोळ्यावर. फोटो छान आलेत. टीना मी नन्तर लिहीते दुपारी.
जागू वेगळाच पक्षी आहे
जागू वेगळाच पक्षी आहे हा.
सिंगापूरला सुकवलेले ताडगोळे मिळाले होते. चव अस्सल होती अगदी, पण कृत्रिमच असणार ते.
वा सगळीच माहिती आणि फोटो
वा सगळीच माहिती आणि फोटो मस्त.
The bird is a male Asian
The bird is a male Asian Koel..... Just coming out of its Immature plumage...
सौजन्य : युवराज गुर्जर....
मलाच तोपासु झाल. >>>>>>>>..मी
मलाच तोपासु झाल. >>>>>>>>..मी अजून खाल्लेच नाही बहुतेक कधी.
काय म्हणतेस शोभा? बर आता
काय म्हणतेस शोभा? बर आता मिळाले तर खा.
काश्मिर http://www.maayboli.com/node/56974
आहाहा.. ताडगोळे.. किती
आहाहा.. ताडगोळे.. किती फ्रेश्श!!!! मुंबई ला विकत मिळतात कायमच चॉकलेटी रंगाचे कवर झालेले असते त्यांचे
शशांक थांकु रे माहिती करता.. फ्रीज मधे सर्वच काही हॅपी हॅपी फ्रेश फ्रेश नस्तं तर!!!
कोवळा कोकिळ
Happy New Year.
Happy New Year.
I would just like to express
I would just like to express how much joy you all have given me, dear friends, and wish for your joy and happiness in return. Happy New Year !!!
वर्षु किती छान मेसेज. सगळ्या
वर्षु किती छान मेसेज.
सगळ्या नि ग प्रेमी ना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
Happy and prosperous new
Happy and prosperous new years to Nisarg
वर्षुताई वॉव.
वर्षुताई वॉव.
नि.ग. च्या सर्व निसर्गप्रेमी
नि.ग. च्या सर्व निसर्गप्रेमी सभासदांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा......
निरु.....
सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप
सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप सार्या शुभेच्छा

सर्वांना नवीन वर्षाच्या खूप
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !
गुड मॉर्निंग!!!
गुड मॉर्निंग!!!
फ्रीज मधे सर्वच काही हॅपी
फ्रीज मधे सर्वच काही हॅपी हॅपी फ्रेश फ्रेश नस्तं तर!!!
>>>
नाहीच वर्शाजी. फ्रीजचे मॅन्युअल बघितले तरी ते पेरिशेबल माल तयार फूड एक दोन दिवसापेक्षा जास्त रेकमेंड करत नाहीत कारण तापमान कमी असले तरी त्या तापमानातही वाढणारे जीवजंतु, बुरश्या असतातच आणि त्या इतर फूडमध्येही पसरतात. आमच्याकडे जुना एक दाराचा कोल्ड गोल्ड छोटा पडतो म्हणून दोन डोअरचा ४५० लि चा फ्र्रेज घ्यायचे नक्की झाले तेव्हा कशाला एवढा मोठा? किती लोक आहोत आपण? कुठे ठेवणार तो वगैरे सगळे डायलॉग झाले. आज त्यात एक सफरचंद ठवायला जागा नसते. तरी आमच्याकडे बार संस्कृती नाही त्यामुळे बाटल्या सोडा वगैरे काही नसते.हजारदा सांगून झाले फूड प्रॉडक्ट जास्त दिवस ठेवू नका तरी १५-१५ दिवसाचे ब्रेड, सडलेले टोमॅटोज डोळा चुकवून मला फेकून द्यावे लागतात. वरण आमट्या याना आमचेकडे एक्षपायरी डेट नाही.
बरे फ्रीज असला म्हणून काय झाले त्यात भाज्यांचे डिहायड्रेशन एवॅपोरेशन ने चालूच असते.त्यामुळे एका मर्यादेपलिकडे त्याचा काही उपयोग नाही. शिवाय फ्रीजमधल्या कच्च्या भाज्यांची चवही विचित्रच लागते. फ्रीजवाले काहीही दावा करीत असले तरी भाज्यांचे विल्टिंग होतेच त्यात.
फ्रीजमध्ये ठेवण्यात येणार्या काही बाबी तर इतक्या लज्जास्पद आहेत की बस...
संत्र्याची साले, लिंबाची वाळलेली साले, मसाल्याची उघडलेली छोटी बॉक्सेस्,चिण्चेचे गोळे,लोणची,खायचे इसेन्स व रंग.ड्रायफ्रूट्स, सेदेलोण, ऑल परपज पीठ, आता या गोष्टी का फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. यावरून नेहमी चिडचिड चालते. दुधाच्या मिठाया तर अत्यंत बेचव लागतात फ्रीजमधल्या. आता तर जागा पुरत नाहीत म्हणून ह्या ड्राय वस्तू डीप फ्रीझरमध्येही घुसल्यात.
अरे पंचों, आपही बताओ ह्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आहेत का? (कन्हैय्यालाल मोड)
रोज वाद तरी किती घालायचा ? घरातली सगळी मेंब्रं शास्त्र/तंत्र शाखेची पदवीधर आहेत.
आमच्याकडे फूड पॉइझनिन्गची केस नक्कीच होणार आहे एखादे दिवशी...
वर्षू , कसलं गं फुल ? खुपच
वर्षू , कसलं गं फुल ? खुपच गोड आहे..
पादुकानन्द >> सौ टके कि बात.. माझा पन झगडा चालतो याबाबत घरच्यांशी.. फक्त कुणी ऐकल नै माझ कि मी चॅलेंज करते त्यांना कि तुम्ही बरोबर हे प्रुव्ह करा मग पाहू नै तर सरळ डाफरते मी त्यांच्यावर म्हणजे रागवते त्यांना मोकळ्या गळ्याने

सर्व नि.ग करांना नविन
सर्व नि.ग करांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्षही सगळ्यांना निसर्गमय जावो, निसर्गासाठी काहीतरी आपल्याकडूनही खारीच्या वाट्याच देण होवो ही सदिच्छा.
पादुकानन्द तुमची पोस्ट वाचून खुप हसू आले. बरे ते फुड पॉइझनिंग वगैरे दूर राहो तुमच्या व कुटुंबापासून.
जागुताई तुम्ही खरेच
जागुताई तुम्ही खरेच निसर्गकन्या आहात. तुमचे बी बी वाचताना एखाध्या डेरेदार वृक्षाच्या थंडगार छायेत बसल्यासारखे वाटते. तुमचे बालपण शेतावरच गेल्याने तुमच्या लिखाणाला एक मिट्टी की खुशबू आहे . तुमच्या लिखाणातून ही तुमच्या व्यक्तिमत्वातील मार्दव प्रतीत होते.
फ्रीजचे म्हनाल तर बहुतेक घरात हा प्रॉब्लेम असावा.::फिदी:
जागुताई तुम्ही खरेच
जागुताई तुम्ही खरेच निसर्गकन्या आहात. तुमचे बी बी वाचताना एखाध्या डेरेदार वृक्षाच्या थंडगार छायेत बसल्यासारखे वाटते. तुमचे बालपण शेतावरच गेल्याने तुमच्या लिखाणाला एक मिट्टी की खुशबू आहे . तुमच्या लिखाणातून ही तुमच्या व्यक्तिमत्वातील मार्दव प्रतीत होते. >>>>>> +१११११११११११११११...........
धन्यवाद पादुकानन्द,
धन्यवाद पादुकानन्द, शशांकजी.
आपण ह्या वर्षी काहीतरी आपल्याकडून निसर्ग संवर्धनासाठी हातभार लावूयाच का. आपण सगळे एकत्र भेटणे तर शक्य नाही. पण ग्रुप ग्रुप ने कामे केली तरी होतील. जसे पुणेकरांनी पुण्यात करा, मुंबईकरांनी मुंबईत. सध्या डोळ्यासमोर फक्त वृक्षरोपणच येत. निदान तिथून तरी सुरुवात करूया. अजुन कोणाला काही आयडीया असतील तर त्याही शेअर करून ती अंमलात आणण्यासाठीही प्रयत्नशील राहूया.
आपल्यातीलच पर्यावरण दक्षता मंच चा भरत गोडांबे हा नियमीत अशी कामे करतो. त्याचीही मदत घेऊन आपण काही उपक्रम करू शकतो.
बापरे ४९ पोस्टी वाचुन
बापरे ४९ पोस्टी वाचुन काढल्यात...
सगळ्यांचे फोटो, गप्पा, माहिती खुप मस्त...
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
सगळ्यांना इसवी सन २०१६ च्या
सगळ्यांना इसवी सन २०१६ च्या शुभेच्छा !
Pages