ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

[A] Dakshina: साडेसाती
(१) मी ह्या विशयावर एक भले-मोठे लेखन केले आहे मझ्या blog ला: http://AstroMNC.Blogspot.com तुम्ही ते please बघा. साडेसती चे almost सगळे कोन त्यातुन विशद करायचा प्रयत्न केला आहे.

(२) लिम्बु ह्यान्नी अतिशय सुरेख असे लिहिले आहे वरती. especially त्यान्चा शेवटचा para फारच उत्तम!! (<<एक नक्की की साडेसातीत तावुनसुलाखून निघालेली व्यक्ति>>

[B] Kedar_Japan
उलटपक्शी मूळ कुन्डली मध्ये शनि जेवढा चान्गला तेवढा साडेसाती चा त्रास जास्त !! कारण सोपे आहे : जया अन्गी मोठेपण तया यातना कठिण. पत्रिका जेवढी चान्गली तेवढा साडेदेसातिचा त्रासही जास्तच की! Happy

[C] शनि चे भ्रमण नुसते चन्द्राला नाही तर रवी ला जास्त त्रास्दायक जाते. माणसाचा ego/self esteem खुपच दुखावला जावु शकतो. ह्यावेळी एकच लक्शात ठेवायचे (श्रद्धा अणि सबुरी) फक्त चन्न्द्राला ते ७.५ वर्शे असते रवी ल फक्त २.५ वर्शे अनुभव येतो. खर तर कुथल्याही ग्रहावरुन शनि साहेब जात असले की त्याला ते इणिवा दाखवतात.

समजा चन्द्र रास मीन आहे अणि रवि रास मेश आहे, पण पत्रिके मध्ये kirk/cancer राशी मध्ये ५ ग्रह आहेत!! ---> ह्य case मध्ये सादेसति पेक्शा शनि जेन्व्हा कर्क राशीत येइल तेनव्हा जास्त स्थित्यन्तरे होतिल सादेसति पेक्शा :: कारण असे की शनि ५ ग्रहान्वरुन जावुन त्यन्च्या related उणिवा दाखवेल अणि त्याच बरोबर रवी वर सुद्धा द्रुश्ति टाकेल!!

[A] साडेसाती:
१. एक महत्वाचा मुद्द लक्शात घ्या: साडेसती हि मणसाला ह्या जन्माची क्रुत्ये ह्याच जन्मात भोगायला लावणारी सन्धि आहे. (क्रियामणि कर्म)

[B] शनि महादशा किन्व्हा अन्तर्दशा
२. हे माणसाला प्रारब्द्ध कर्म भोगायला देतात (good/bad).
अ. बच्चन चा बच्चन शनि महदशेत मध्ये झाला (६७ ते ८६).
ब. बाळासाहेब ७९ तो ९८.
क. इम्रान खान ७६ ते ९५.
ड. O. P. नय्यर ५४ ते ७३
इ. Michael Jackson ७३ ते ९२

ह्या लोकान्ना शनि महादशेत मध्य अगणित पाठिम्ब मिळाला masses चा. ह्यानी मागच्या जन्मात बहुतेक खुप लोकान्चे भले केले असणार, गरिबन्नन नौकर्य देणे, त्याना खायला प्यायला देणे. त्यान्ना मार्गी लावणे. त्याचीच परतफेड masses ने केली. ना कुच्छ खोया ना कुछ पाया, जो किया वही वापस मिला.

म्हण्जे बघा, ह्या लोकन्ची शनि महादशा ही जनतेला दिलेली सन्धी होति त्यन्च्या कर्जामधुन मुक्त होण्याची !!!!!

मनक्या:
९ बद्दल मि एक मोठा blog लिहिला आहे. अणि वरतीही लिहिले आहे.

७ म्हण्जे अध्यात्मः Understanding beyond words -- what can't be desribed in words but can only be "felt". Spirituality, Understanding of body language.

७ च्या लोकना sixth sense असतो असे म्हणता येइल. ह्यान्चे सहावे इन्द्रिय फारच बळकट असते इतरान्पेक्शा.

९ अणि ७: जलद गोशटीनची आवड! Happy charity begins at home हे वाक्य जगणे. एखदी गोश्ट पतली की त्याचासठी काहीही कयायला तयार.

nandini2911 अणि लिम्बु:
आहो तुमचे अनुभव फारच सुसाट आहेत !! मला बर्याच्वेळा जागेपणीच कळायला लागते बरेच्से. स्वप्ने कमी पण आहेत तसे अनुभव (पण कमी आहेत).

माझे :
१. पहिल्य घरात :चन्द्र, नेपच्युन आनि राहु आहेत !! व्रुश्चिक राशि मध्ये! Happy -- नेपच्युन वर्गोत्तम
२. ४थ्या घरात गुरु शुक्र आहेत. (कुम्भ राशीत) -- गुरु वर्गोत्तम
३. ५व्य घरात रवी अणि बुध लाम्ब लाम्ब मीन राशी मध्ये -- रवी वर्गोत्तम
४. केतु ७ व्य घरात व्रुशभ मध्ये
५. मन्गळ अणि शनि ८ व्य घरात !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
६. हर्शल १२ व्य घरात तुळ मध्ये - वर्गोत्तम आहे.

एकन्दर पत्रिके मध्ये १४ नव-पन्चम योग आहेत! Happy Happy विचित्रच प्रकार आहे.

Almost सगळे ग्रहयोग हे ज्योतिश / forecasting / mantra-tantra कडे अन्गुली निर्देशन करतात. Happy

परवा नशिक मध्ये एका ७०+ वर्शे वयच्या ज्योतिश शिरोमणिन्शी बोलणे झाले. (नाव टाळत आहे). त्यान्नी १.५ तसच्या गप्प झाल्यावेर मला कौतुकाने म्हन्तले कि "आहो तुमचे सगळे गत-जन्माचे आहे! एक जन्मात अणि एवढ्या लवकर इतके येणे फारच अवघड आहे".

त्याचा गेले साधरण ४० वर्शे अभ्यास आहे अणि लवकरच ते एक पुस्तक प्रकाशित करणार आहेत. त्यानि बरेचसे topics माझ्ह्यबरोबर discuss केले. मध्ये त्यन्च्या पत्नि आल्या तर मला एकदम स्वाति नक्शत्र वाट्ले (तुळ रास). आणि केतु चाही प्रभाव जणवला चेहेर्यावेर थोडा (उग्र). तर ते हसले : म्हणाले हो बरोबर आहे तुळ रास आहे अणि धनु लग्न आहे (मूळ नक्शत्र लग्न).

एकदा अमच्या company मध्ये ज्योतिशी आले होते (seminar साठी). त्यान्च्या बोलायच्य पद्धति मुळे ते मला धनु रवी वाट्ले अनि चन्द्र नक्शत्र मन्गळाचे वाट्ले. He was 13th jan and also Makar raashi with mangal's nakshatra (भरणी)! Happy

हा आत्मस्तुती चा प्रयत्न समजु नये क्रुपया करुन Happy topic निघला आहे म्हणुन लिहिले

मिलिंद,
८ व्या घरात माझ्याहि कुंडलीत मंगळ, शनि युती आहे. त्याबद्दल एका ज्योतिष गुरूजींनी मला असे सांगितले की ही युती असली म्हणजे लडाख च्या बॉर्डर वर असलेल्या भारतीय सैनिकासारखी अवस्था होते त्या जातकाची. ही युती आणि ती ही आठव्या घरात खरच एवढी वाईट असते का?

Again,
Past life regression साठी एक सेमिनार होता तेन्व्हा मी त्य बाइनाच वोचरले की त्यान्चे कुम्भ रास अणि शततारका नक्शत्रा आहे का. बाइ चाट पडल्या. मला वाट्ले की त्या त्यन्च्याच आजीन्च्या reincarnation (पुर्नर्जन्म) असाव्या. (पत्रिक बघीतली नवति -- just she was talking to someome I guess).

By the way: मी सुद्धा माझ्ह्य पणजोबान्चा rebirth आहे! Happy वडिलन्चे आजोबा !! अता बोला! Happy Happy

एकदा मी hotel मध्ये एका विवाहीत जोडप्यची पत्रिके वरुन analysis karun मुक्ताफळे उधळली. (तो १ चा अणि ति २५ ची)

तर सगळे झाल्यवेर त्याने bill मागविले अणि पैसे द्यायला पाकीट काढ्ले. ती तेवध्यात म्हनालि कि "आरे, मिलिन्द ची coffee झाली का?" मि दचकलो....मि नेहेमी चहा अणि चहाच पितो हे सगळ्यान्न माहित आहे. तरीहि तिला वाटले कि माझी coffee राहिली. Happy ३ seconda पुर्वी मझ्ह्या मनात जे आले ते तिला झत्कन कळले....!! २५ चा (७) effect !! (रास मकर असल्यामुळे तिथुन फारशी मदत नवती!)

त्यामुळे ७, १६, २५ पासुन जपा, त्याना body language अणि मनातले विचार ओळखणे सोपे जाते! Happy

मन्क्या:

१. 8th मध्ये शनि मन्गळ किन्वा शनि मन्गळ युति कुठेही म्हणजे tough luck !! व्यायाम is a must! Happy
२. पण ही प्रतियोगपेक्शा बरी. अन्शत्मक नसेल तर फारसा issue नाहि. अन्शात्मक असेल तर त्याचे काय परिणान होतिल ह्यासाठि ज्योतिशाची गरज पदत नाही. आपोआप already माहित असते.
३. आइ ला तुमच्या नन्तेर miss-carriage व्हयाचि शक्याता. also, तुमचा पुढचे भवन्द कदाचित अल्पजीवि किन्वा काहीतरी चिन्ता असलेले.
४. भावन्दान्ची जबाब्दारि पाड पाडावी लागते, कारण मागच्या जन्मात तुम्ही त्यान्ना त्रास दिलेला असतो! Happy
५. ८ मध्ये असतान्ना : दात, डोळे, Internal reproductive organs, ह्यान्चे issues अथवा operations होवु शकतात उत्तर्-आयुश्यात.
६. जमीन (or वदिलोपार्जित estate) असेल तर शनि महदशेत त्याचे खुप problems होतात/
७. Mass mentality ची जाणीव नसते. ति develop करवी लागते.

-------अणि बरेच काही. पत्रिका बघायल हवी. सन्ध्याकळी बघतोच.

मिलिन्दराव, आत्मस्तूतीचा काहीही सम्बन्ध नाही\
हा ज्योतिष बीबी आहे, स्वानुभव सान्गितला तर लगेचच्या लगेच "सहानुभूती मिळवतो" आत्मस्तुती करतो, शायनिन्ग मारतो वगैरे आक्षेप इथल्या ज्योतिषप्रेमीन्कडून येण्याची शक्यता नाही! Happy
(मिलिन्दरावान्साठी.....
एक क्षणात मला चमकुन गेले की प्रथम/सप्तमातल्या राहूकेतू मुळे तर शनीमन्गळाला जाब बसला नाहीये ना? शन्का हे!
दुसरे चमकले ते असे की, एक ना एक दिवस, उत्तरायुष्यात, तुम्ही, तुम्हीच स्थापन केलेल्या आश्रमात वगैरे राहु लागाल Happy दुसर्‍या शब्दात, आश्रम्/मठ हेच तुमचे निवासस्थान/घर होईल, जर हे झाले तरच शनी-मन्गळाचे दु:ष्परीणाम नाहीसे झालेले अस्तील
कृपया, हे "चमकण", पटले तर घ्या, अन्यथा सोडून द्या! कारणमिमान्सा सान्गता येणार नाही! पण कुठे तरी नोन्दवून ठेवा!)

मिलिंदभौ छान अनुभव आहेत..
शनि जेवढा चान्गला तेवढा साडेसाती चा त्रास जास्त >> हे असे का ? म्हणजे जर पत्रिकेत स्वराशीचा किंवा उच्चीचा शनी असेल तर त्याला अधिक त्रास होइल ? हे अजुन स्पष्ट कराल काय ?

>>>> जर पत्रिकेत स्वराशीचा किंवा उच्चीचा शनी असेल तर त्याला अधिक त्रास होइल ?
केदार, मिलिन्दराव उत्तर देतीलच, पण आधीच माझी पाने जाळतो
अस बघ, एखादा चकाचक्क फ्लॅटमधे रहाणार्‍या माणसास आयुष्यात प्रथमच शेणामातीने सारवलेल्या घरात सपाता न घालता नेलेस, तर त्याचे पायास ते खुपणार नाही का? शेणाने सारविलेल्याची घाण वाटणार नाही का?
अर्थात, जे मूळातच चान्गल्या ग्रहस्थितीमुळे सद्गुणी, व शनी कृपेमुळे आधीच गर्वहीन कष्टाळू वगैरे आहेत, त्यान्च्यात कणभरही मालिन्य जर अस्तित्वात असेल, तर ते शोधून ते साफ करण्यास अधिक मेहनत घ्यावी लागणार ना?
काही गिर्‍हाईके टपरीवर जाऊन ऑर्डरी सोडतात... ए पोर्‍या साफ कर की रे हे टेबल, कळत नाय का की देऊ एक झापडीत?
टपरी हॉटेलवाला पोर्‍या, माशा घोन्गावणारे टेबल, त्याच त्या मळक्या ओल्या फडक्याने पुसुन घेतो नि गिर्‍हाईक टेबल "साफः" झाले नि हुकुमाचि तामिली झाली या आनन्दात मश्गुल होते.....
हे एक चित्र
दुसरे चित्र पन्चतारान्किन्त हॉटेल मधिल डोळ्यासमोर आणा.....
यात जो फरक असेल, तो कशाचा? तर तो वाईट कुन्डली अन चान्गली कुन्डली याचा!
हा फरक लक्षात आला, तर वरील वाक्याची भिती वाटणार नाही वा आश्चर्य ही वाटणार नाही... शनी जे आहे त्यात काय खोट आहे ते बघणार, ती दुरुस्त करु पहाणार, टपरि काय की पन्चतारान्कित काय , खोटि दोन्ही ठिकाणी असणारच, फक्त जीवनपद्धतीत फरक असल्याने, तेच ते मळके ओले फडके.... अनुभव, विरुद्ध, दरवेळी लॉन्ड्रिचे बदललेले शुभ्र कपडे! यात कोणास कष्ट/विरुद्ध परिस्थिती यान्चा मानसिकदृष्ट्या जास्त सामना करावा लागेल?
मला शब्दात माण्डणे कठीण जातय, पुन्हा प्रयत्न करेन

मिलींद, तुझी ईमेल मिळाली. धन्यवाद. सविस्तर रिप्लाय पाठवते.

>>१. 8th मध्ये शनि मन्गळ किन्वा शनि मन्गळ युति कुठेही म्हणजे tough luck !! व्यायाम is a must!
२. पण ही प्रतियोगपेक्शा बरी.

मग केंद्रयोगाचे काय? तो प्रतियोगापेक्षा वाईट फळे देईल काय? विशेषत: पराक्रम आणि व्ययस्थानातून होणारा?

माझ्या मुली ला काळसर्प योग आहे. तीची जन्म वेळ: पहाटे २.३० मि. तारिख: २२/११/२००८
त्यासाठी कुठला उपाय करावा लागेल? पुढच आयुष्य कस असेल? प्लीज, मला उत्तर द्याल का?

mnc,
९ ,१० व २२ ह्या जन्म तारेखेबद्दल कुठे लिहिले आहे? मी सर्व पाने शोधली पण काही माहीती नीट मिळाली नाही? तुमचा कुठला स्वताचा ब्लॉग आहे का?

१)*
जन्मतारीख २७ व जन्मतारीखेची पुर्णबेरीज १?
जन्मतारीख १० व जन्मतारीखेची पुर्णबेरीज ४?
जन्मतारीख २८ व जन्मतारीखेची पुर्णबेरीज ३?
ह्याबद्दल सांगाल का प्लीज?

२)**
दुसरी तुमचे ११ व २२ बद्दल वाचले,तेव्हा दोन व्यक्ती मला माहीतीत आहेत त्यांची तारीख देते आहे त्यांचे सांगाल का?
पुर्णतारीख :२२-९-१९७५
पुर्णतारीखः २८-१०-१९७१

३)***
एका खास तारीखेचे जरा पुर्ण भविष्य द्याल का? स्वभाव, शिक्षण योग वगैरे?
१२-८-१९९५ वेळः २:०५ दुपारी,मुंबई.

भरपूर प्रश्ण विचारलेत पण प्लीज मदत कराल का?
धन्यवाद.

कुंभ राशीला शनी अष्टमात येतोय असे काही ठिकाणी वाचले. अडीच वर्षे जपून राहा वगैरे वगैरे.

म्हणजे नेमके काय? कुंभेचा राशीस्वामी शनी असूनही त्रास देतो का?

माझे फक्त दोन-तीनच आहेत प्रश्न.... तर सविस्तर उत्तर मिळेल का?:)

>>>कुंभेचा राशीस्वामी शनी असूनही त्रास देतो का?
सुपरमॉम, मूळात आधीची माझी साडेसातीवरिल पोस्ट वाचाल का? तेच इथेही लागू होईल
दुसरे असे की राशीस्वामी/उच्चीचा वगैरे गोष्टी ठीक आहेत, पण आपला तो बाब्या अन लोकाचा तो कार्ट्या अस करेल तर तो "शनी" कसा काय? त्याच नाव मामू ठेवल नस्त लोकान्नी? असो
मिलिन्दराव उत्तर देतिलच, थोडी वाट बघावी लागेल. तोवर दोन्-तिन प्रश्न विचारायला हरकत नाही.......! Happy

(आयला, हे म्हणजे कस? पूर्वी डॉक्टरच्या दवाखान्यात, बाहेर कम्पाऊन्डर असायचा, तस बसल्यागत वाटतय...... त्यातल्यात्यात सोबर उदाहरण दिल हो! Wink )

धन्यवाद लिंबूटिंबू.
पण मुळात अष्टमेचा शनी करतो काय.. म्हणजे त्याचे काय इफेक्ट्स असतात ते जरा सांगाल का विस्ताराने? आहे काय की नवर्‍याची कुंभ रास...त्यामुळे अडीच वर्षे जपा म्हणतात. नि माझी वृश्चिक रास... तेव्हा मला अडीच वर्षांनी साडेसाती सुरू होईल. त्यामुळे पुढची दहा वर्षे कशी जाणार या कल्पनेनेच धडकी भरते. पण गमतीची गोष्ट ही की नवर्‍याला शनी महादशा उत्तम गेली.
(पोस्ट मोठे झाले खरे... पण औषध द्यायला कंपौंडर आला तर त्यालाच प्रश्न विचारून पिडणार ना? :))

वरील गम्मत राहुदे बाजुला, पण शनीच काय, कोणत्याही ग्रहाचे षष्ठ, द्वादश व अष्टमातील भ्रमण तितकेसे चान्गले मानले जात नाही
आता लक्षात घ्या. ज्योतिष अभ्यासक या नात्याने याचे अत्यन्त स्पष्ट उत्तर दिले, तर इथे "लोकान्मधे अन्धश्रद्धेमार्फत भिती पसरवतो" असा (कायदेशीर) आक्षेप येण्याची शक्यता असते, तेव्हा शब्दयोजना अत्यन्त साम्भाळून करावी लागते, अन म्हणूनच, असे ओपन फोरम्/पुस्तके यात ज्योतिष म्हणजे काय ते ढोबळमानाने माहित होऊ शकेल, शिकायला मिळणे अशक्य! याबाबतीत आपण मध्ययुगिन युरोपिय कालखण्डातच अजुनही वावरतो आहोत असे माझे मत! असो, (लोक इथे प्रश्न विचारतात लिम्ब्या, शिकायला/लेक्चरला नाही येत Proud )
तर माझ्या अनुभव व माहिती नुसार, कुम्भेला (वा अन्य कोणत्याही राशीला) अष्टमात शनी येत असता जे साम्भाळून रहायला सान्गतात त्या मागे विविध कारणे असू शकतात जसे की...
१) अष्टमस्थान हे वाडवडिलोपार्जित इस्टेटिचे स्थान मानले गेले आहे, एकतर त्यासम्बन्धीचे प्रश्न टोकाचे रुप धारण करू शकतात, चिघळू शकतात वा नव्याने निर्माण होऊ शकतात. या बाबत काही अन्यायरित्या "झाकलेले" असल्यास ते उघड होते. जातकाचे अन्य वर्तन सुयोग्य असल्यास मात्र, निर्माण झालेले प्रश्न, शनी जाताजाता सहजासहजी कल्पनाही येणार नाही इतक्या सहजपणे सोडवुन देतो.
२) षष्ठ स्थान हे निरनिराळ्या "रोगान्चे" कारण मानले गेले आहे, तर अष्टम स्थान हे निरनिराळ्या "व्याधि-विकारान्चे" मूळ मानले गेले आहे. या कालखन्डात असलेले विकार बळावू शकतात, काही विकार नव्याने उत्पन्न होऊ शकतात. मात्र एक नक्की की सहसा ह्या व्याधी व विकार हे जीवघेणे नसतात, ते भोग या स्वरुपातच भोगावे लागतात. जातकाच्या कुन्डलीप्रमाणे व श्रद्धा/भक्तीद्वारे अन्तिमतः त्यातुन रिलीफ मिळतो. हे भोगुन सम्पवायचे असतात. जर कुन्डली मधे चान्गले अन्य योग असतील अन अर्थातच जातक सत्शिल असेल, तर या विकारान्ची तीव्रता कमी होते, योग्य उपाययोजना कमी खर्चात उपलब्ध होऊ शकते.
३) अष्टमातील शनी द्वितिय स्थानावर नजर ठेवत असतो. अनुभव असा आहे की कितीही उधळ्या, खर्चिक माणुस असेल, तरीही, या कालखन्डात अशी काही परिस्थिती निर्माण होते की त्या माणसास प्रत्येक पै अन पै खर्च करताना दहादा विचार करावा लागतो. अन्य वेळेस, मॉल मधे जाऊन टीपी म्हणुन शॉपिन्ग करु शकणार्‍यास ही एक प्रकारे शिक्षाच, नव्हे का? ज्यान्ची मूळातच आर्थिक परिस्थिती ओढाताणिची असते त्यास तर काय भासावे? बरेचदा असेही दिसते की असलेली वित्त/सम्पत्ती या ना त्या कारणाने गमाविण्याची/ विकण्याची/ गहाण टाकण्याची वेळ येऊ शकते. उसने दिलेले वेळेत परत न मिळणे, वेळेवर पैशान्ची उभारणी न होणे, कर्ज प्रकरणे रिजेक्ट होणे असे अनेक साईड इफेक्ट दिसतात.
४) मात्र मी आधीही सान्गत आलोय, शनी केवळ अन केवळ वाईट परिणामच देतो असे नाही, त्याची तिसरि नजर दशमस्थानावर असते, दशमस्थान हे उपजिविकेचे कर्मस्थान, नोकरी/व्यवसायात कष्ट करावेच लागतात, पण त्याद्वारे नवनव्या आव्हान्नान्ना तोन्डही द्यावे लागून अनुभवात भर पडते जी भावी कालात उपयोगी पडते. शिवाय मुद्दा क्रमान्क एक मधे म्हणल्याप्रमाणे वडिलोपार्जित इस्टेटिचा सम्बन्ध या नजरेमुळे देखिल येऊ शकतो कारण दशम स्थानावरुनच पितृसम्बन्धी बाबी नजरेस येतात. तरीही शनीची तिसरी नजर तुलनेत फारच कमी त्रासदायक असल्याने, बरेच वेळेस, (सहसा पहिल्या वेळेसच्या भ्रमणात) पित्याचा उत्कर्ष देखिल बघावयास मिळू शकतो.
५) या व्यतिरिक्त, जातकाचे कुन्डलीप्रमाणे, शनि ज्या स्थानाचा भावेश आहे त्या स्थानास न्युनत्व येते. कुम्भ राशीसन्दर्भात व्यय स्थान (मकर रास) व प्रथमस्थान यान्चा विचार करावा लागेल. प्रथमस्थानाप्रमाणे, चन्द्र राशीच्या मूळ व्यक्तिमत्वास पडणारा आवर/करावी लागणारि तडजोड जी एरवी कधीच करावी लागलेली नसते/नसेल, क्लेषदायी ठरू शकते. महत्वाकान्क्षान्ना आवर घालावाच लागतो. कुम्भ राशीच्या व्यक्तिस बरेचदा उपदेशात्मक बोलायची सवय असते, तसे बोलणेही शक्य होत नाही, वेळ येत नाही, परिस्थिती नसते इत्यादी... याचा परिणाम मानसिकदृष्ट्या होऊ शकतो.
व्ययस्थानाचा विचार करता, कुम्भ राशीची व्यक्ती मूळातच बरीचशी निवृत्ती मार्गाकडे असते, पण गोचरीच्या या योगात, त्यान्ची निवृत्ती खरोखरीची आहे की तत्कालीक स्मशानवैराग्य आहे हे तावुनसुलाखुन घेतले जाते.

लोक साम्भाळून रहा असे सान्गतात, याचे कारण येवढेच की नेहेमीचे अत्यन्त नीटस, सुरक्षित आयुष्य जगताना, असे काही एक प्रश्न असू शकतात हे आपल्या गावीही नसते, तशी कल्पनाही नसते, कथा कादम्बर्‍यात काही एक वाचले असेल तरी त्या जुगवलेल्या केवळ गोष्टि म्हणुन अन्गी लागलेले नसते, तर प्रत्यक्ष काही एक अनपेक्षित परिस्थिती उद्भवली तर माणुस साहजिकच गोन्धळून जाणार ना? हबकणार ना? म्हणुन साम्भाळून रहा हा सल्ला, या मागे मानसिक पूर्वतयारी करुन घेणे हा उद्देश! बाकी विशेष काही नाही
हिन्दू धर्मशास्त्रानुसारील ज्योतिषविद्येत विशिष्ट ग्रह विशिष्ट स्थानी आल्यास जे काय घडू शकते ते "स्वैर" भाषेत वर वर्णन केले असे. यात माझे मनीचे काही एक नाही!

धन्यवाद लिंबूटिंबू...बरेच सविस्तर सांगितलेत तुम्ही. पण कुंडलीतल्या इतर ग्रहांचीही स्थिती लक्षात घ्यायची असते का? की काहीही झाले तरी अष्टमातला शनी वाईटच फळे देतो?

>>>>> की काहीही झाले तरी अष्टमातला शनी वाईटच फळे देतो?
नाही, मी तसे कुठेही म्हणत नाही! तुम्ही माझी वरील पोस्ट पुन्हा सन्थ व शान्तपणे वाचा!
सर्वप्रथम, तुम्हास, अन्य काही एक न सान्गता केवळ "आठवा शनि का? मग साम्भाळून राहा हो" असे सल्ले देणार्‍या व्यक्तिन्च्यापासूनच तुम्ही साम्भाळून रहावे असे वाटते! Proud
मी त्यान्च्या हेतू बद्दल शन्का घेत नाही, पण........!
या आधीही, साडेसातीबद्दलचे विवेचन असेल वा इतरत्र कुठे, एक पुन्हा पुन्हा सान्गू इच्छितो की शनी बद्दलचि भिती निराधार नाही, पण ती भिती त्यास अस्ते, जे नैतिकता पाळत नाहीत वा नैतिक/अनैतिकतेवर वृथा बुप्रावादाने वाद घालत बसतात अन मनास येईल तेच करतात.
हिन्दू धर्मशास्त्राप्रमाणे शनीस रविपुत्र मानले गेले आहे. बापाने निर्माण केलेल्या/बाप कारण असलेल्या व तो पोषण करित असलेल्या सृष्टिच्या र्‍हासास कारण होईल असे काही एक शनी करीत नाही, मात्र त्यास त्याच्या पद्धतीने शिस्त जरुर लावू पहातो! शिस्तीच्या या बाबतीत, शनीची विचारधारा गुरुच्या बरीच जवळची आहे. भ्रमणकक्षेतील अन्तरानुसार, प्रत्यक्षातही बरेचदा तो गुरुच्या सानिध्यच अस्तो! Happy त्यामुळे तो ही "आदर्शवादाकडे" झुकलेला ग्रहच मानावा लागतो.
"माणुसकीस" जे पायदळी तुडवतात, त्यास तो जरुर त्रासदायक ठरतो. अहन्कारि गर्विष्ठास तो त्याची "जागा" दाखवुन देतो, तरीही, शनी काही एक वस्तुतः "नष्ट" करतो असे म्हणता येत नाही.

कुन्डलितले इतर ग्रह, मूळ स्वरुपात वा गोचरीने, सहाय्यकारी वा विरोधी अस्तील त्याप्रमाणे ते त्यान्ची बरीवाईट फळे देतच रहातात, पण कोणताच ग्रह कोणत्याच ग्रहाचे कारकत्व, सहसा समुळ झाकोळून टाकत नाही. अपवाद केवळ रविचा! अस्ति ग्रह रविच्या कलानेच फळे देतो.

तुमचा मूळ प्रश्न, कुम्भ राशीकरता अष्टमातील शनीबद्दल होता. त्यास वर जमेल तेवढे/ व तसे उत्तर दिले आहे.
तथ्य येवढेच, की कसलीच भिति न बाळगता, सन्मार्गाने जीवन व्यतित करीत रहा, तर शनीची/कुन्डलीतील कोणत्याच ग्रहाचि भिती बाळगण्याचि तुम्हांस गरज नाही, व हे सगळे एक्स्प्लेन करताना येऊ शकण्यार्‍या कायदेशीर अडचणीन्ची भिति मजला बाळगण्याचि गरज नाही. कसे? Proud

>>>> हेच्या हातावर काहीतरी सोडा म्हंजी आत सोडल.
नशिब आमच, "ह्येच्या नरड्यात काहीतरी सोडा" अस नाही सुचवलत Wink Proud

माझ्या मते अष्टमातील अशुभ ग्रहांपेक्षा अष्टमातील शुभ ग्रहांचे भ्रमण जास्त वाईट फलदायी होते. अपवाद अनपेक्षित धनलाभ, वारसाहक्काने मिळणारी संपत्ती इ. इ.
मूळ कुंडलीत जर अष्टम स्थान बलवान असेल तर अष्टमातील शुभ ग्रहांच्या भ्रमणात त्याची फळे निश्चितच दिसून येतात. पण माझा अनुभव असा आहे की गुरू इ. शुभ ग्रह अष्टमावरून जात असतील तर फार तीव्र वाईट फळे देतात. मिलींद, तुझे काय मत आहे?

>>२) षष्ठ स्थान हे निरनिराळ्या "रोगान्चे" कारण मानले गेले आहे, तर अष्टम स्थान हे निरनिराळ्या "व्याधि-विकारान्चे" मूळ मानले गेले आहे.
मला हे नीट कळले नाही. व्याधि-विकार आणि रोग यात काय फरक आहे?
माझ्या मते षष्ठ स्थान हे व्याधींचे(म्हणजेच रोगांचे, म्हणजेच विकारांचे) आणि अष्टम मृत्युस्थान.

लिम्बु
supermom's questions:
१. अहो तुम्ही एवढे मस्त विवेचन केले आहे की मि त्या मध्ये जास्त काही भर टाकायचा प्रपन्च करणे चुक होइल. तुम्ही स्वताहाला compunder ची उपमा देणे हा फारच मोठा विनय झाला.

२. अश्तम शनि चे छान लिहिले आहेत तुम्ही. ते प्रय्तेकाला आप्-आपल्य पत्रिकेप्रमाणे लागु होइल.

३. Ashwini:
शनि मन्गळा पासुन ४था असेल तर दोघान्ची एक्मेकान्वर द्रुश्टि येते. हे युति एवधे किन्व थोडे जास्तच वाइट म्हणावे लागेल. युति महणजे कोम्बट पाणि. प्रतोयोह म्हाण्जे कधि गरम तर कधि गार. केन्द्र म्हण्जे गरम अणि गार ह्यान्चे घर्शण, tension, एखद्य गोश्त्ति साठी जास्त श्रम वगैरे.

प्रतियोग सगळ्यात जास्त वाइट. केन्द्र हा अन्शात्मक नसेल तर युति पेक्शा कमी वाइट, द्रुश्टि अधिश्टित केन्द्र हा युति एवधाच वाइट.

४. limbu
गुरु अणि शनि मध्ये एक मुल्भुत फरक असा आहे कि
गुरु म्हणतो : "बघ मित्रा पडला असतास, वाचलास ना?"
शनि म्हणतो: "अरे येड्या नीट बघुन चाल, कसा विचित्र पड्लास?"
Happy

शनि विरक्ति आणतो. गुरु हा optimism आणतो.

Pages

Back to top