चित्रपट शक्ती. अभिनयातील एक शहनशाह आणि एक बादशाह आमनेसामने. कोणी म्हणते अमिताभने दिलीपकुमार खाऊन टाकला, तर कोणी म्हणत दिलीपसाबनी बच्चनला खाऊन टाकला. एक ट्रॅजेडी किंग तर एक अॅंग्री यंग मॅन. दोघांना साजेसा रोल. कोणी कोणाला खाऊन टाकला हे ठरवणे थोडे अवघडच. पण इथेच खरी तुलनेची मजा असते.
हल्लीच्या काळातील एक चित्रपट.. मोहोब्बते! इथे पुन्हा तोच अॅंग्री यंग मॅन, जो बिग बी म्हणून ओळखू जाऊ लागलाय. तर आता त्याच्या समोर आहे किंग ऑफ रोमान्स शाहरूख खान. दोन सुपर्रस्टार आमनेसामने. ईतरही कित्येक चित्रपटांत या दोघांनी एकत्र काम केले आहे. पण जुगलबंदी म्हणावी अशी या एकाच चित्रपटात. शाहरूख त्याच्या होमपीच वर बॅटींग करतोय, तर अमिताभ समोरून डायलॉग डिलीव्हरी. दोघांचेही चाहते पुन्हा कोणी कोणाला खाऊन टाकला या चर्चेत.
नायकप्रधान चित्रपटांच्या संस्कृतीत दोन नायिका आमने सामने क्वचितच येतात. पण येतात तेव्हा चर्चा होतेच. त्यातही नृत्य असेल तर हमखास होते.
चित्रपट दिल तो पागल है. माधुरी दिक्षित आणि करिष्मा कपूर.
चित्रपट देवदास - पुन्हा एकदा माधुरी दिक्षित आणि ऐश्वर्या राय.
या दोन्ही चित्रपटांत माधुरी दिक्षितला अनुक्रमे करिष्मा आणि ऐश्वर्या राय यांनी मात दिली अश्या वावड्या उठलेल्या. माझा या दोन्हींवर विश्वास नाही.
नुकत्याच आलेल्या पिंगा गाण्यात दिपिका-प्रियांका चर्चेऐवजी वेगळाच वाद रंगला ती गोष्ट वेगळी. पण हाती आलेल्या परीक्षणांनुसार दिसण्यात दिपिका प्रियांकापेक्षा तर अभिनयात प्रियांका दिपिकापेक्षा सरस ठरलीय. खरे खोटे चित्रपट बघूनच ठरवावे लागेल.
कधीकधी असे अभिनयाचे सामने जुगलबंदी न राहता सरळसरळ खाऊन टाकला प्रकारात मोडतात. एक चटकन आठवणारे उदाहरण दामिनी.
खरे तर हा स्त्रीप्रधान चित्रपट. ऋषी कपूरचा रोल असाही चिरकूटच होता. दामिनी झालेली मीनाक्षी क्षेषाद्री डोळे झाकून त्याला सरस ठरत होती. पण अचानक मध्यंतरानंतर सनी देओल कुठून उगवला आणि त्याने दामिनीसकट चित्रपट खाऊन टाकला.
पण या पापाची फळे त्याला डर चित्रपटात भोगावी लागली. ज्यात तो हिरो होता. हे आता म्हणायलाही कसेतरीच वाटतेय. पण खरेच तो हिरो होता. आणि तेव्हा नवोदितच असलेल्या शाहरूखने निगेटीव्ह भुमिका अशी काही साकारली की सनी देओल, जुही चावला आणि ईतर छोट्या मोठ्या कलाकारांसह तो अखंड पिक्चरच खाऊन टाकला.
सलमान खान आणि अभिनय हे एका वाक्यात लिहायचे दोन शब्द नाहीत. अगदी `हम आपके है कौन' मध्ये तो कितीही गोड गोजिरवाणा वाटला असला तरी माधुरीने तो चित्रपट सहजपणे आपल्या पदरात घेतला होता. पण अश्याच काही अपेक्षा ठेवून मी `प्यार किया तो डरना क्या?' बघायला गेलेलो तर तिथे उलटेच झाले. काजोलने आपल्यातर्फे काहीही कसर ठेवली नव्हती, आणि तिची भुमिकाही तोडीस तोड होती. तरी तो चित्रपट मला सलमानचाच `वन मॅन शो' वाटला होता. पण त्यानंतर त्यातला तो तसा सलमान फार क्वचितच दिसला.
शाहरूख खान आणि आमीर खान या दोघांची जुगलबंदी बघायची फार्रफार इच्छा आहे. एक आतली खबर लागली आहे की २०१७ ला ती पुर्ण होण्याची शक्यता आहे. अभिनय तसेच स्टारडमच्या जुगलबंदीबरोबर काही बॉक्स ऑफिस रेकॉर्डही तुटलेले बघायला मिळतील.. पण भविष्याचे बाजूला राहू द्या, तुर्तास भूत-वर्तमानातच राहूया..
धागा सुरू करायला ईतके पुरेसे आहे, नंतर भर टाकतो ...
जुन्या चित्रपटांमध्येही अभिनयाची जुगलबंदी वगैरे रंगत असतील तर येऊ द्या ..
मी जुन्यातील काही आठवायला गेलो तर सौदागर मधील जय वीरू, आणि तिरंग्यातील नाना पाटेकर आणि राजकुमार यांच्या आधीचे काही आठवत नाही.
जंजीरमधला प्राण आणि अमिताभचा
जंजीरमधला प्राण आणि अमिताभचा पोलिस स्टेशनमधला सीन आणि नंतर जेव्हा तो यारी है इमान गाण्याच्या शेवटी खुदकन हसतो तो सीन. तो बच्चन कायम मनात राहणार.
आनंद नमक हराम बच्चन - राजेश
आनंद
नमक हराम
बच्चन - राजेश खन्ना
तेहजीब - उर्मिला-शबाना
तेहजीब - उर्मिला-शबाना
शोले आणि सौदागरमध्ये मी नेहमी
शोले आणि सौदागरमध्ये मी नेहमी कन्फ्यूज होतो. >>>>>>>>>
वा रुंमेश. तू खरे तर शोले आणि डोरेमॉन मधे कन्फुज होयला पाहीजेस. आमचे भाग्यच थोर की शोले आणि सौदागरमध्ये कंफ्युज झालास, नशिबानी दोन्ही हिंदी सिनेमा तरी आहेत.
कारण तू शोले आणि एखाद्या चायनिज सिनेमा मधे पण कंफ्युज होऊ शकतोस.
गुलझारचा नमकीन. यामधे शर्मिला
गुलझारचा नमकीन. यामधे शर्मिला टागोर आणि शबाना आझमी दोघीही जबरदस्त. एकही शब्दाचा डाइलॉग नसलेली, फक्त डोळे आणि देहबोलीवर अप्रतिम अभिनय करून जाणारी शबाना की शर्मिला टागोर चा शांत, समजूतदार अभिनय. कोणी बाजी मारली हे ठरवणे कठीण.
दुसरी जुगलबंदी म्हणजे फिलहाल मधे तबु आणि सुश्मिता सेन ची. तबुला टक्कर देणारा अभिनय सुश्मिता करू शकते हे मला पहिल्यांदाच जाणवलं. तरीही तबु अर्थात जास्तच भाव खाऊन जाते. पुरूष अभिनेते फारसे लक्षातही राहात नाही.
वा रुंमेश. तू खरे तर शोले आणि
वा रुंमेश. तू खरे तर शोले आणि डोरेमॉन मधे कन्फुज होयला पाहीजेस. >>

शोले आणि डोरेमॉन>>>>>>>>>>>
शोले आणि डोरेमॉन>>>>>>>>>>>
टोचा
टोचा
प्राणायामा चा जुगलबंदी होती.
प्राणायामा चा जुगलबंदी होती. झालं दू:ख की दीर्घ श्वास घ्या >>>
यार तुम्ही मी लिहिलेले न
यार तुम्ही मी लिहिलेले न वाचता थेट प्रतिसादात उतरता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले>>>
)
त्यात शिद्धा काय करायचे, माबोकर कचर्यातुन हिरे शोधण्यात वाकब्गार आहेत. (अंगाला कचरा लागु न देता
त्रिशुल बद्दल हजार अनुमोदन
त्रिशुल बद्दल हजार अनुमोदन .
मस्त मस्त मस्तच आहे .
त्रिशूल दीवार कालापत्थर एक
त्रिशूल दीवार कालापत्थर एक सारखे वाटतात खरे, ते अमिताभच्या अत्युच्च बेदरकारी अभिनयामुळे. अर्थात त्यात दिवारला तोड नाही. फक्त दिवारमध्ये जुगलबंदी नव्हती. आता शशी कपूरच्या मेरे पास मा है ला कोणी जुगलबंदी बोलत असेल तर कल्पना नाही. काला पत्थर मध्ये अमिताभ विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा मजा आलेली.
ऑल टाईम फेव्हरेट अंदाज अपना
ऑल टाईम फेव्हरेट अंदाज अपना अपना मध्येही आमीर आणि सलमान जोडीने मजा उडवलेली. पण तिला विनोदाची जुगलबंदी नाही म्हणू शकत. कारण त्यात एक बॉलर एक बॅटसमन असे चित्र नव्हते. भले चित्रपटातील भुमिका एकमेकांवर कुरघोडी मिळवायची असली तरी प्रत्यक्षात एकमेकांना मस्त पूरक कॉमेडी होती.. आईला.. ऊईमा .. स्वतंत्र धाग्याचा विषय आहे हा चित्रपट
स्वतंत्र धाग्याचा विषय आहे हा
स्वतंत्र धाग्याचा विषय आहे हा >>> नाही हां, अजिबात नाही.
असं बगा गोईंदा आनी चेंकी
असं बगा गोईंदा आनी चेंकी पान्डे च्या ऑखे पिच्चरात लै भारी जुगल्बंदी व्हती.
पन कोनी कोनावर कुरघोडी केली जल्ला शेवट्परेंत कल्ला नाय......चेंकीनी की त्या माकरानी ?
गिर्या तु एकदम भेदरून
गिर्या तु एकदम भेदरून भिंतिआड लपलेला वगैरे दिसलास मला

जुगलबंदीसाठी म्हणाल तर
जुगलबंदीसाठी म्हणाल तर आत्ताचे सिनेमे.. रेस .. ढुम वगेरे वगेरे ... रेस मधली जुगलबंडी तर भारीच...
sorry marathi keyboard
sorry marathi keyboard typing error..
वर प्रसन्न ह्यांनी लिहिलेलेच
वर प्रसन्न ह्यांनी लिहिलेलेच आहे. तरी मोह होत आहे म्हणूनः
त्रिशुलमध्ये अमिताभ आणि संजीवकुमारची जुगलबंदी अफाटच आहे.
काही इतर जुगलबंद्या :
१. धाग्यात लिहिलेली शक्तीमधील दिलीप - अमिताभ
२. शराबीमधील अमिताभ - प्राण
३. जंजीरमधील अमिताभ - प्राण
४. बॉबीमधील प्राण-प्रेमनाथ
५. घातकमध्ये सनी देओल - डॅनी
६. धाग्यात लिहिलेली डर मधील शाखा - सनी देओल
७. वर नोंदवलेली आनंदमधील - अमिताभ - राजेश खन्ना
८. अंगुरमधील संजीवकुमार - देवेन वर्मा कॉमेडी
९. वर नोंदवलेली सागर मधील कमल हसन - ऋषी कपूर
१०. वेनस्डेमधील नसिर उद्दिन शहा - अनुपम खेर
११. दीवारबद्दल बोलायलाच नको
१२. आखरी रास्ता मधील वरिष्ठ व कनिष्ठ अमिताभ
१३. कानूनमधील अशोक कुमार विरुद्ध जो वकील होता तो
१४. मालामाल वीकली मधील परेश रावल - ओम पुरी - राजपाल यादव
१५. हंगामामधील परेश रावल - राजपाल यादव - शक्ती कपूर व इतर
१६. संगममधील राज कपूर - राजेंद्र कुमार
१७. दिवानामधील शाखा - ऋशी कपूर
१८. जलवामधील नसिर उद्दिन - पंकज कपूर
१९. शम्मी कपूर - राजेश खन्ना (बहुधा सफर)
२०. अग्निपथमधील अमिताभ - डॅनी
२१. अभिमानमधील अमिताभ - जया भादुरी
२२. शोलेमधील अमिताभ - जया भादुरी
अजून आठवल्या काही तर लिहीनच
२१. अभिमानमधील अमिताभ - जया
२१. अभिमानमधील अमिताभ - जया भादुरी
>>
वाह ही मस्त, मजा आणते.
मिली मध्येही हिची झलक दिसते.
६. धाग्यात लिहिलेली डर मधील शाखा - सनी देओल
>>
हे मी धाग्यात नोंदवले असले तरी यात सनी देओल झाकोळला जातो. ते देखील त्याची भुमिका तशी दुय्यम नसूनही. त्यातील शाहरूखचे कॅरेक्टर जे दाखवलेय आणि त्याने जसे साकारलेय ते एका वेगळ्याच उंचीला गेल्याने असावे. ( हे मी शाहरूखचा फॅन म्हणून बोलत नाहीये, किंबहुना त्या चित्रपटाच्या वेळी नव्हतो)
दिवानामधील शाखा - ऋशी
दिवानामधील शाखा - ऋशी कपूर>>>> अभिनयाची जुगलबंदी असा धागा आहे हा.
इथले वाचून सिनेम्याचे नाव
इथले वाचून सिनेम्याचे नाव दीवारऐवजी 'जुगलबंदीवॉर' किंवा 'दी वॉर' ठेवायला हवे होते असे वाटते.
सस्मित, ऋषी कपूरने केलाय
सस्मित, ऋषी कपूरने केलाय त्यात थोडा अभिनय
ओ बेफी, अहो-जाहो का करता
ओ बेफी,
अहो-जाहो का करता तुम्ही कळत नाही राव
बाकी लिस्ट अफलातुन !!
दामिनी मधील अमरीष पुरी चा चढ्ढा आणि सनी प्राजी चा अॅड. गोविंद... लाउड असली तरी मस्त जुगलबंदी होती ती, रादर कुरघोडी म्हणता येइल त्याला...
गुलजार साहेबांचा
गुलजार साहेबांचा कोशिश...
वन्स अगेन दी हरीभाई आणि जया भादुरी...दोघांना ही एक ही शब्द नसताना केवळ आणि केवळ अभिनयाच्या जोरावर कमाल करणे म्हणजे काय हे बघायचे असेल तर हा चित्रपट अजिबात मिस करु नये. त्यात ही हरीभाई काय रसायन होते हे त्यातील काही काही एपिक सीन पाहिल्यावर कळते...स्वतः चा अव्यंग पोरगा, मुक्-बधीर मुलीशी लग्न करायला नकार देतो, त्या नंतर जो काही सीन संजीव कुमार नी केलाय त्याला तोड नाही
हो की! पण मग ते चित्रपट
हो की!
आत्ता ते चित्रपट-शक्ती असं वाचलं जातंय, म्हणजे चित्रपटाची शक्ती 
)
पण मग ते चित्रपट 'शक्ती' करा पाहू
(याला म्हणतात गिरे तो भी...
१३. कानूनमधील अशोक कुमार
१३. कानूनमधील अशोक कुमार विरुद्ध जो वकील होता तो
>>> यू मिन राजेंद्रकुमार? (जुना कृष्ण-धवल कानून ना?)
'सिलसिला'मधल्या जया-रेखा (हे
'सिलसिला'मधल्या जया-रेखा (हे नाहीये ना धाग्याच्या हेडरमधे?
)
मदर इंडिया(१९५७) - सुनील दत्त
मदर इंडिया(१९५७) - सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार.
मधुमती (१९५८) - दिलीप कुमार आणि प्राण.
मुघल-ए-आझम (१९६०)-> पृथ्वीराज कपूर आणि दिलीप कुमार.
संगम (१९६४) - राज कपूर आणि राजेंद्र कुमार.
राम और श्याम (१९६७) - दिलीप कुमार(डू आयडी) आणि प्राण.
सागर - ॠषी कपूर आणि कमला
सागर - ॠषी कपूर आणि कमला हसन
(आधी येऊन गेलंय का हे माहीत नाही, सगळे प्रतिसाद नाही वाचले).
Pages