मी, गोकर्णाचा वेल आणि एक नन्हा दोस्त (सुर्य पक्षी).... नि़खळ आनंद!!!!!

Submitted by सायु on 17 December, 2015 - 05:59

बरेच दिवसांन पासुन पक्षांचे फोटो काढायचा प्रयत्न करत होते.. हळुहळु सरावाने जमु लागले.
पहिला वहिला प्रयत्न आहे, दबकतच प्र.ची टाकते आहे.. गोड मानुन घ्या..:)

गोकर्णाचा वेल खुप आवडीचा, त्यावर या नन्ह्या दोस्ताच्या हालचाली ईतक्या मोहक होत्या,
मुख्य म्हणजे त्या बर्‍या पैकी त्याने टिपु दिल्यात..:)

हा दोस्त रोजच आमच्याकडे येतो, आणि मला पण आपल्या सोबत खेळवतो..
लपा छपी याचा नी माझा आवडीचा खेळ... तु कुठे......... मी ईथे!!! Happy हे तर रोजचं ठरलेल..
तो मागच्या बालकनतुन साद घालतो, मी कीचन च्या बालकनीत शोधते, सापडला की, भुर्र गच्चीत उडुन जातो..
मी त्याचा पाठलाग करत, गच्चीत जाते.. गच्चीत मी बर्‍याच कुंड्या ठेवल्या आहेत. अबोली, शेवंती, शेद्री, झेंडु, गोकर्ण, गुलबाक्षी, गुलाब जास्वंद,.. त्याची नी माझी आवडीची जागा, खुप खेळतो, बागडतो आणि मला निखळ आनंद देऊन जातो...:)

बघा कसा साद घालतोय...

गोकर्णाचा वेल, आमच्या आवडीची जागा..:)

>
थोड मध आहे वाटत आजुन..:)

अरेच्या.. खरच आहे की..:)

हा मौत्रीणीच्या बागेतुन..

दमले बाबा हुश्श!! पण मज्जा आली ना!

ए चल आंधार पडलाय, आई घरट्यात वाट बघत असेल ...टाटा उद्या भेटु...!!:)

(हा इंडियन रोलर..)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली - सुरेखच लिहिलंस की ....

फोटोही सुंदरच.... Happy

मात्र शेवटच्या प्रचितील पक्षी वेगळा आहे हां - इंडियन रोलर .....

कित्ती गोड. खुप छान ग.

हा खरच खुप त्रास देतो फोटो काढताना. क्लिक करे पर्यंत दुसरीकडे पोहोचतो.

स्पॉक, शशांकजी, हिम्सकुल, जागु, तात्या, रश्मी, निरु खुप खुप आभार...
शशांजी, चुक दुरुस्त केलीये.. आभार. तुमची मात्र कमाल आहे, लगेच ओळखले आणि नाव देखिल सांगीतले..:)
हिम्स्कुल तुम्हाला ही चटकन फरक लक्षात आला..:)
जागु, खरच खुपच चपळ असतो हा..

माझ्या बाल्कनीत येत असत गोकर्णीवर.नंतर मोठी निळ्या फुलाची वेल आणली तर त्या फुलांत मधच नव्हता.अगोदरचा वेल उगाचच काढला.आता घेवड्याच्या फुलांवर येते एक जोडी.

फोटो आणि मथळे कचकून आवडले.

mast

सायो

खुप छान प्रचि. पण या नन्ह्या दोस्ताचे नाव काय?

इंडियन रोलर हा शेवटच्या प्रचितील पक्षी आहे ना?

सही!

छान Happy

Pages