बरेच दिवसांन पासुन पक्षांचे फोटो काढायचा प्रयत्न करत होते.. हळुहळु सरावाने जमु लागले.
पहिला वहिला प्रयत्न आहे, दबकतच प्र.ची टाकते आहे.. गोड मानुन घ्या..:)
गोकर्णाचा वेल खुप आवडीचा, त्यावर या नन्ह्या दोस्ताच्या हालचाली ईतक्या मोहक होत्या,
मुख्य म्हणजे त्या बर्या पैकी त्याने टिपु दिल्यात..:)
हा दोस्त रोजच आमच्याकडे येतो, आणि मला पण आपल्या सोबत खेळवतो..
लपा छपी याचा नी माझा आवडीचा खेळ... तु कुठे......... मी ईथे!!! हे तर रोजचं ठरलेल..
तो मागच्या बालकनतुन साद घालतो, मी कीचन च्या बालकनीत शोधते, सापडला की, भुर्र गच्चीत उडुन जातो..
मी त्याचा पाठलाग करत, गच्चीत जाते.. गच्चीत मी बर्याच कुंड्या ठेवल्या आहेत. अबोली, शेवंती, शेद्री, झेंडु, गोकर्ण, गुलबाक्षी, गुलाब जास्वंद,.. त्याची नी माझी आवडीची जागा, खुप खेळतो, बागडतो आणि मला निखळ आनंद देऊन जातो...:)
बघा कसा साद घालतोय...
गोकर्णाचा वेल, आमच्या आवडीची जागा..:)
>
थोड मध आहे वाटत आजुन..:)
अरेच्या.. खरच आहे की..:)
हा मौत्रीणीच्या बागेतुन..
दमले बाबा हुश्श!! पण मज्जा आली ना!
ए चल आंधार पडलाय, आई घरट्यात वाट बघत असेल ...टाटा उद्या भेटु...!!:)
(हा इंडियन रोलर..)
माधव, हेमा तई, अन्जु ताई,
माधव, हेमा तई, अन्जु ताई, मानुषी ताई, अंजली, देवकी, जयु, जाई,मंजु ताई, आत्मबंध, प्रियास, ईन्द्रधनु, सृष्टी, कांदे पोहे सगळ्यांचे खुप खुप आभार...
आणि स्पॉक तुमचे पण..:)
पहिला प्रयत्न सुपर्ब आहे.
पहिला प्रयत्न सुपर्ब आहे.
व्वा अतिसूंदर!!!
व्वा अतिसूंदर!!!
फोटो फारच सुंदर आलेत. खास
फोटो फारच सुंदर आलेत. खास करून फोकसिंग जबरदस्त.
एकदम अर्जुनाचीच आठवण आली. त्याने नेम धरून फक्त पोपटाचा डोळा भेदला
तसं तु फक्त पक्षी टार्गेट करून चित्रण केलंयस. मस्त जमलंय.
हे बघायच सुटूनच
हे बघायच सुटूनच गेलं..
माझ्याकडे पन न चुकता येणार्यामधे याचा नंबर आहे.. त्यातही त्याच्या तावडीतुन आय्क्झोरा कधीच सुटत नै..
आत्तापर्यंत मोजुन ६ वेगवेगळ्या रंगाचे बघीतलेय मी..मज्जा येते त्यांना न्याहाळायला..दुनियाभराचा चपळ..कधी इकडं कधी तिकडं .. मज्जा येते.
प्रचि मस्तच जमलेत सायली.. कर्माच फळ
वॉव सायु.. तेरी फोटोग्राफी को
वॉव सायु.. तेरी फोटोग्राफी को १००% मार्कं, बर्का!! सनबर्ड ला कॅमेर्यात पकडणं महा कठीण काम, तू चोख केलंयस.. आणी बरोबरच लिखाण.. क्यूट!!!!
सायु, प्रचि आणि कॅप्शन दोन्ही
सायु, प्रचि आणि कॅप्शन दोन्ही आवडले.
काय क्युटू आहे
काय क्युटू आहे
अरेच्या ईतके छान छान
अरेच्या ईतके छान छान प्रतिसाद वाचायचेच राहुन गेलेत..
अंकु, कंसराज, दक्षिणा, टीना,वर्षु दी, शुगो, केदार सगळ्यांचे मनापासुन आभार..
Pages