दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याआधी तो गंध फुलांचा मध्ये व्हिलन होता, ती पण नाही बघितली मी.>>> अग बाय गो बाय, त्या सिरीयलमध्ये ( गफुगेसा) तो व्हिलन नाही, हिर्विणीचा भाऊ कदम होता.:फिदी: त्यात उलट छान दिसला. मलाही मेघना आवडत नाही. असेल चान्गली, पण नाय आवडली. उलट त्या ( जुयेरेगा) पेक्षा मला तो आता आवडलाय.

कबीर मीनल एपिसोड मस्त रंगतायत. कबीरचा रोल मस्त करतोय ललित.
पण ते नाटकातले बाकीचे पंटर म्हणजे चहाच्या टपरीवरून उचलून आणल्यासारखे दिसतायत तरी कबीरला ते मीनलपेक्षा सरस वाटतात ये बात कुछ जमी नही. ती माधवी सुध्दा किती बोर आहे. तिच्या जागी रेश्माची सवत भारी वाटली असती.

रश्मी अग तो व्हीलनच होता असं मला वाटलं गंध मध्ये, मी एक दोनदा बघितली, झेपली नाय ब्वा. रिमोट माझ्या हातात असल्याने मग मी ताप नाही घेत अशा शिरेलीचा.

हो रेशीमगाठीपेक्षा इथे अजून छान वाटतोय आणि मीनल पण आवडते असे दोघेही एकत्र मला आवडतात असं क्वचित होतं.

अन्जु, तो ( ललित) आधी बहिणीच्या लग्नाला विरोध करतो असे होते वाटत, पण नन्तर तो तिच्या पाठिशी रहातो. ते अदिवासी टाईप दाखवल्याने त्यान्च्या वस्तीत हाणामार्‍या पण दाखवल्यात. त्यामुळे तो व्हिलन वाटला असेल.

पण मीनल घरात येऊन जो हैदोस घालते, आशु नन्तर तिला समजावतो तो प्रसन्ग आणी कैवल्य म्हणतो की अपमान करण्यासाठीच माझा जन्म झालाय, हे बघुन तुफान हसले मी.:फिदी:

पण मीनल घरात येऊन जो हैदोस घालते, आशु नन्तर तिला समजावतो तो प्रसन्ग आणी कैवल्य म्हणतो की अपमान करण्यासाठीच माझा जन्म झालाय, हे बघुन तुफान हसले मी.>>मी पण. Lol

इतक्या वेळा शिकवून पण मिनलला काहीच येत नाहीये. हे अजिबातच पटत नाहीये.

शनिवारचा आवडला. शेवटी १० मिनिट्स सेंटी होता. मला शुक्रवारचा बोअर झाला पण, मीनल आणि ललित दोघंही आवडत असूनही.

कालचा एपिसोड मस्त. पण तरीही मीनल इतका मठ्ठपणा का करते आहे आणि ती करते आहे तर कबीर तिला रिप्लेस का नाही करत आहे असे प्रश्न पडतातच. मीनल स्वतःला सुधारताना दिसतच नाहीये. लेखन अजून चांगलं व्हायला हवं होतं.
असो. कबीर दिसतोय तोवर सगळं माफ आहे सध्या Proud

यू सेड इट, पूनम! Happy
मीनल आजच्या भागात म्हणली त्याप्रमाणे कदाचित तिला खरंच काही येत नसावं आणि त्याकडे कधी कोणी फारसं लक्षही देत नसावं. म्हणून आत्तापर्यंत तगली आहे ती. हां, आता कबीर तिला रिप्लेस का करत नाहीये ये बात तो है!

ए तो म्हणाला की परवा, तुझ्यात तो स्पार्क दिसला म्हणूनच तुला कास्ट केलं आणि माझं कास्टिंग चुकत नाही. ती जशी नॉर्मली वागते अगदी तसंच तिने नाटकात वागावं हे त्याला हवंय आणि नेमकी ती नाटकी वागतेय!

ती जशी नॉर्मली वागते अगदी तसंच तिने नाटकात वागावं हे त्याला हवंय आणि नेमकी ती नाटकी वागतेय!>> ए नाही गं... त्यांच्या पहिल्या भेटीत त्याने विचारलं होतं की तू जशी नाहीयेस तशी भूमिका तुला करायला आवडेल का, तर ती म्हणाली होती तेच तर चॅलेन्ज असेल. ती चॅलेन्ज घेताना दिसत नाहीये आणि तोही फ्रस्ट्रेट होताना दिसतोय.

ते दोघं असताना मागे वाजणारे गिटार पीस मस्त आहेत पण Happy

पण मला बोअर होतायेत कबीर्-मीनल सीन्स. गंमत म्हणजे मला दोघंही खुप आवडतात. पण तोचतोचपणा वाटतोय मला त्यांच्या सीन्समधे. मला ती माजघरातल्या लोकांबरोबरच आवडते.

मला आवडला कालचा भाग. पिया तू...गाण्यावरुन सगळे चिडवतात . धम्माल येते.
मिनल चं स्पष्टीकरण पण पटलं. तिला एवढ्या कॉंन्संट्रेशन ची सवय च नव्हती याअगोदर कधी. काम कसं केलं वगैरे कुणी दखल घेत नव्हतं आता तिला एकदम सर्व फोकस तिच्या वरच असल्याने गोंधळल्यासारखं झालयं.
आय होप ती आता करेल नीट कारण माजघरातल्यांचा सपोर्ट आणि ते आत्मविश्वास ही वाढवतील तिचा.

ती घरी आली तेव्हा आवडलं मला. कबीरबरोबर होती तेव्हा बोअर झालं. रिपीटेटीव्ह वाटतात मला तरी कबीर-मिनल सर्वच सीन.

दोन दिवस आवडले एपिसोडस. कालचा टची होता, आशु मामा होणार तो.

आज मीनल- कबीर सिन्स आवडले, जरा वेगळेपणा होता.

कबीरच्या एंट्रीचा आणि आजचा असे दोनही भाग एकदम झक्कास होते. खास ललित प्रभाकर स्पेशल जादू होती त्यामध्ये (ति बदाम वाली स्माईली )
आजच्या भागातला कबीरचा मोनोलॉग पण सुंदर होता!

माजघरातल्या मुलीच काय तो कैवल्य पण फिदा झाला होता कबीर वर Wink

गेस्ट अ‍ॅपिअरन्स म्हणून स्वजो आणि चिनु दोघांनी साफ भ्रमनिरास केला होता. जुयेरेगा मधे ललित प्रभाकर लईच बोर झाला होता. इथे मस्त विरघळलाय मात्र. कदाचित सगळेच समवयस्क आणि मुळात त्याच्या पर्सनॅलिटी ला साजेसं कॅरॅक्टर असल्याने असेल. मजा येत आहे पण. काल आशुचं टिंग-टिंग-टीडीं ग भारी होतं. डोक्यावर पांघरूण घेऊन , झोपमोड झालेला , चिडचिड करणारा , आंबट चेहर्‍याचा घरमालक सुजय पण आवडला.

+१

कालचा छान होता. दोन दिवस चहयेद्या मधे पण मजा आली ही टीम आली तर, काही स्किटस बोअर होते पण ओवरऑल चांगले एपिसोडस.

हो हो, रमड, पूनम +१. चेरी अॉन द केक वॉज - कबीर जातो तेव्हा सगळ्यांनी नेत्रपल्लवी करून 'ओरडलेलं' पिया तू अब तो आजा आणि त्यावर मीनलचा चेहरा!

कालचा भाग काय मस्त होता! Happy आशूचं टायमिंग अफाट आहे _/\_ '''नाजूकसा" आणि मीनल?' Lol शिवाय, कबीर येणार आहे कळल्याबरोब्बर केसांवरून फिरवलेला हात, सुजयला थांबवतानाची अ‍ॅक्टिंग, मीनल-कबीरचे संवाद ऐकताना फ्लॅट होणं -सगळंच सही! सुजयचा 'अतिशहाणपणा' मस्त.
कबीर आणि मीनलचा शॉटही एकदम गोड. 'विल मिस यु' म्हटल्याबरोबर त्याने हात पुढे केले तेव्हा...

मैत्री, टीपी आणि रोमान्स मस्त जुळून आला होता कालच्या भागात.

२१ डिसेंबर पासुन मालिका बघताच येत नाहीये Uhoh ...आम्ही झी च्या साईटवर बघतो मालिका... dittotv वर login करुन subscribe करा असं येत आहे... मी खूप miss करतेय Sad
सध्या तुमचे प्रतिसाद वाचूनच समाधान मानतेय
एखादी दुसरी website सांगू शकाल का???

Pages