Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
mi_anu, या लिंकमधली शेवटची
mi_anu, या लिंकमधली शेवटची चर्चा पण एकदा वाचून घे.
http://www.maayboli.com/node/55268?page=1
शुगोल, वूड क्लिनरने जात
शुगोल, वूड क्लिनरने जात नाहीये. सॅन्डपेपरने घासता नाही येणार, रंग जाइल. DIY दुकानात जाउन बघते.
दलिया मोकळा कसा शिजवायचा?
दलिया मोकळा कसा शिजवायचा? सलाड मध्ये वापरण्यासाठी.
फिल्टर कॉफी रेग्युलर घेत
फिल्टर कॉफी रेग्युलर घेत असाल तर तो फिल्टर घेउनच या. न पेक्षा कॉटन ओढणीचा स्वच्छ तुकडा/ पुरुषांचे मोठे सुती हातरुमाल ह्यातून नीट फिल्टर होईल. एक तुकडा ह्याच कामाला नियुक्त करावा.
हो हँड बीटन कॉफी ची लिंक
हो हँड बीटन कॉफी ची लिंक वाचल्यापासून नेसकॅफे प्यायली तर तशीच करते.चांगली होते.
दिनेशदा: गार पाण्याचा हबका मारल्यावर कॉफी गार नाही का होणार?
तशी मी चहा वाली आहे. पण प्रसंगी कॉफी,बोर्नव्हिटा,आइस टी असे काहीही पिते.खूप रेग्युलर नाही त्यामुळे फिल्टर विकत घेऊन पडून राहील. आमच्या इथे ऑसम साउथ नावाचे डोसा दुकान आहे तिथे चांगली मिळायची फिल्टर कॉफी. पण त्यांनी पण सोपेपणा म्हणून फक्त नेसकॅफे द्यायला चालू केली. हॉटेलांत फिल्टर कॉफी च्या नावाखाली काहीहीही मिळते, काहीजण फिल्टर कॉफी म्हणून दूध पाण्यात उकळलेली नेसकॅफे पण देतात.कँटीन वाला तर दूध न गाळता नेसकॅफे देतो एक रुपयाचा पाऊच टाकून.त्याला दोन पाऊच टाकायला एक रु जादा द्यावा लागतो.
तो स्टीलचा छोटा फिल्टर शंभरेक
तो स्टीलचा छोटा फिल्टर शंभरेक रूपयांत मिळतो. महिन्यातून एकदा फिल्टर कॉफी करत असाल तरी पैसा वसूल चीज आहे.
एकावर एक डबे असलेला अन मधे
एकावर एक डबे असलेला अन मधे एक दांडा तळाला जाळी असलेला का? आमच्याकडे तसा एक आहे त्यात कॉफी चांगली फिल्टर होते पण अत्यंत स्लो आहे, चांगली १०-१५ मि. लागत असावीत.
तो स्टीलचा छोटा फिल्टर शंभरेक
तो स्टीलचा छोटा फिल्टर शंभरेक रूपयांत मिळतो. महिन्यातून एकदा फिल्टर कॉफी करत असाल तरी पैसा वसूल चीज आहे.
>> हो अनुमोदन. आणि डिकाशन एकदा बनवले की दिवसात कधी ही कापी पिता येइल. चांगली घरची फिल्टर कापी प्यायली की आपसूकच कांजीवरम सिल्क साडी, हिर्याच्या कुड्या व मल्लेपू गजरा घातला आहे असे वाटायला लागते. मनात शंकरा नैतर हंसध्वनी वाजू लागतो. कापी पिऊण हिजवडीत गाडी चालवा. नै रजनीकांत पाठीशी उभा राहिला तर नाव बदलीन. ( त्याचं)
कांजीवरम सिल्क साडी,
कांजीवरम सिल्क साडी, हिर्याच्या कुड्या व मल्लेपू गजरा घातला आहे असे वाटायला लागते. मनात शंकरा नैतर हंसध्वनी वाजू लागतो. कापी पिऊण हिजवडीत गाडी चालवा. नै रजनीकांत पाठीशी उभा राहिला तर नाव बदलीन. ( त्याचं)
>> किती गोड
अमा
अमा
ओक्के शंभर चा असेल तर घेतला
ओक्के शंभर चा असेल तर घेतला पाहिजे..चांगला ऑनलाईन मिळेल का? कोणी घेतलाय का?
हिर्याच्या कुड्या आणि सिल्क साडी..वॉव..आधी दोन्ही आणले पाहिजे मग फिल्टर कॉफी ची जास्त मजा यायला :):)
अमा
अमा
त कॉफी चांगली फिल्टर होते पण
त कॉफी चांगली फिल्टर होते पण अत्यंत स्लो आहे, चांगली १०-१५ मि. लागत असावीत >>> मुळात फिल्टर कॉफी तशीच हळू बनते म्हणून तर ती फिल्टर कॉफी आहे ना?
होई शके.. मने खबर नही.
होई शके.. मने खबर नही. घरात १-२ जणे पीत होते, २० वर्षांपूर्वी. अजून आहे ते भांडे, पिऊन बघावी मह्ण्ते.
मला वाट्ते तमीळ घरांमध्ये आपण
मला वाट्ते तमीळ घरांमध्ये आपण कसे सकाळी उ ठल्यावर फोन चार्जिंगला लावोन चहाचे आधण ठेवतो तसे ते डिकाशन बनवायला ठेवतात. मग जस जसे मेंबर उठतात तसतसे कप बनवून देत असतील. मला एकदा सेलम मध्ये पर्फेक्ट अर्धा किलो कॉफी मिळाली होती. ऐश केली.
आमची सेल्वी कामाला आली की हात
आमची सेल्वी कामाला आली की हात धुवून आधी "कापी" करायला ठेवायची. मी केलेली कापी तिला चालायची नाही. "नॉर्थ डोन्ट नो कापी" असं तिनं मला आधीच सांगितलं होतं. मला आयती कापी मिळत असल्याने मीही नॉर्थवाल्यांना कापी जमणारच नाही हे कबूल केलं होतं (मरायला आपण कुठं युपीबिहारचे आहोत)
कॉफीचा स्टील फिल्टर कुठल्याही स्टीलच्या भांड्यांच्या दुकानात मिळेल. किंवा मॉर्फी रिचर्ड्स ब्रॉन वगैरे कंपन्यांचा एलेक्ट्रिक कॉफी मेकर ( मला त्यांचा अनुभव नाही, पण शेजारणीनं कचकून असल्या कॉफी मेकर्सना शिव्या घातल्या होत्या)
कॉफीचा स्टील फिल्टर कुठल्याही
कॉफीचा स्टील फिल्टर कुठल्याही स्टीलच्या भांड्यांच्या दुकानात मिळेल >> पुण्यातही ????
माझ्या घरचा फिल्टर मेड्रास मधलाच आहे..
मी_अनु : रास्ता पेठेत चेक करा एकदा.. त्या भागात मिळेल
मी_अनु : कॉफी फिल्टर घ्यायचा
मी_अनु : कॉफी फिल्टर घ्यायचा असेल तर रास्ता पेठेत केईएम समोर जी गल्ली आहे तिथे एक सौथिंडिअन पदार्थांचं दुकान आहे, त्याच्याकडे स्टीलचे फिल्टर आहेत रु. १०० आणि १५० अश्या दोन साइझ मधे..
मी छोटा घेतलाय जो दोन माणसांना पुरतो.. त्याच दुकानात ऑथेंटिक मद्रासी कॉफी पावडरही मिळते..
कांजीवरम सिल्क साडी, हिर्याच्या कुड्या व मल्लेपू गजरा घातला आहे असे वाटायला लागते. मनात शंकरा नैतर हंसध्वनी वाजू लागतो. कापी पिऊण हिजवडीत गाडी चालवा. नै रजनीकांत पाठीशी उभा राहिला तर नाव बदलीन. ( त्याचं)
>>हे भारी होतं
@ mi_anu >>>> मी पुण्याहुन
@ mi_anu >>>> मी पुण्याहुन आणलेला कॉफ़ी फ़िल्टर आहे, खुप कमी वेळा वापरते. तो मी १५० रु. ला एफ सी रोडला एका दुकानात घेतला. त्या दुकानात आपल्या समोर आपल्याला हव्या त्या कॉफ़ी बीन्स दळून देतात.
साबा चहा घेत नाहीतच, फ़क्त कॉफ़ी. पण त्यांना रोज तो फ़िल्टर वापरणे कटकटीच वाटत. त्या आपल्या साध्या पद्धतीने उकळवून कॉफ़ी करतात. कधीतरी मलाच वाटलं तर तो फ़िल्टर मी वापरते ते पण सुट्टीच्या दिवशी कारण हेच की वेळ लागतो पण त्या कॉफ़ीची चव केवळ अप्रतीम असते. मग सुट्टीच्या दिवशी सावकाश कॉफी घेता येते. त्यामुळे तुम्ही जी चांगली फ़िल्टर कॉफ़ी आणाली आहे, ती तशीच वापरुन वाया घालवू नका. त्यासाठी फ़िल्टर विकत घ्या आणि अप्रतीम कॉफ़ीचा आस्वाद घ्या.
उत्तम चवीसाठी फिल्टरला पर्याय
उत्तम चवीसाठी फिल्टरला पर्याय नाही.
रास्ता पेठेत केईएम समोर जी
रास्ता पेठेत केईएम समोर जी गल्ली>>>>> उंटाडे मारुती पासुन ची समोरची भाजी मंडई ची गल्ली का ?????
गुड एकदा जायलाच हवं रास्ता
गुड
एकदा जायलाच हवं रास्ता पेठेत
अंकु: ते नाही माहिती, पण
अंकु: ते नाही माहिती, पण केईएमच्या गेट्समोर एकच गल्ली आहे. तिथे डोसा, आप्पे वगैरेच्या हातगाडया आहेत.. त्या गाडीच्या मागेच हे दुकान आहे, बहुतेक 'बालाजी' नाव आहे दुकानाचं..
ओक्केस..मग मी जे समजतेय तेच
ओक्केस..मग मी जे समजतेय तेच बरोबर आहे.कारण दुसरे गेट सोमवार पेठेच्या बाजुला आहे.एस.व्ही.युनियन शाळेसमोर.
थोडे अवांतर ....
तिथे डोसा, आप्पे वगैरेच्या हातगाडया आहेत\>>>> हीच ती सकाळच्या वेळेतली खाऊगल्ली.
आनि अपोलो च्या इथे ज्या गाड्या लागतात ती संध्याकाळची खाऊगल्ली.
तो स्टीलचा छोटा फिल्टर शंभरेक
तो स्टीलचा छोटा फिल्टर शंभरेक रूपयांत मिळतो. महिन्यातून एकदा फिल्टर कॉफी करत असाल तरी पैसा वसूल चीज आहे.>>+१
मी ठाण्याला डीमार्ट मधून घेतला. तो आणल्यापासून एक्स्प्रेसो मशीन वर्षभरात एकदोनदाच वापरले जाते.
फिल्टरच्या माहितीबद्दल
फिल्टरच्या माहितीबद्दल धन्यवाद. "छोटा" वाचून पुढल्या वारीत आणायचा विचार आहे.
रच्याकने, बिहार उत्तरेकडील राज्य नाही.
सिंडरेला, मी इंग्रोत मिळणारी
सिंडरेला,
मी इंग्रोत मिळणारी Cothas Coffee Powder वापरते.
ह्या लिंकमध्ये दाखवला तसा
ह्या लिंकमध्ये दाखवला तसा फिल्टर आहे माझ्याकडे.
http://www.nandyala.org/mahanandi/archives/2005/11/27/indian-coffee-filter/
स्वाती२, धन्यवाद. आधी फिल्टर
स्वाती२, धन्यवाद. आधी फिल्टर घेते
अमा
अमा
Pages