Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एव्ह्ढा विचार करायला वेळ आहे
एव्ह्ढा विचार करायला वेळ आहे कोणाकडे? . मला तरी नाही खाववत बुवा, ना ते तळणीचं तेल, ना ते जळकं तूप! कोणी म्हणालं की फुकट घालवते तर म्हणू देत , खुदके साथ नो समझौता!
निरांजनासाठीच वापरणे योग्य
निरांजनासाठीच वापरणे योग्य वाटले>>>>+१
तळलेल तेल समईत >> समई संजय
तळलेल तेल समईत >> समई संजय लीलाच्या सिनेमातील होती काय?
बाकी करपलेलं तूप रैनाने लिहील्याप्रमाण पाय/टाचा इ त्वचेवर लावायला चालेल. खाण्यात बरे नाही लागणार.
करपलेलं भांडं आतून साफ करायचे
करपलेलं भांडं आतून साफ करायचे बरेच उपाय वाचले पण मला कोणी तेलाचे ओघळ येऊन ते हीट होऊन पक्के झालेले चिकट स्टेन्स् घालवायचे उपाय साम्गेल काय कोणी? धन्यवाद ..
थँक्यु गर्ल्स ! भरपुर चर्चा
थँक्यु गर्ल्स ! भरपुर चर्चा झाली आहे.
लाडु किंवा इतर काही स्पे. पदार्थ करणं माझ्या कुवतीत नाही. मी आपलं ते तुप, एका छोट्या डबीत स्वतःच्या खाण्यापुरता काढुन ठेवलं आहे. नाक तीक्ष्ण असुनही मला चालतं आहे, म्हणजे बरं असावं. उरलेल देवाच्या निरंजनासाठी ठेवणार होते, पण आता त्यातला तिसरा पोर्शन टाचा आणि पावलांच्या मसाजसाठी काढुन ठेवते. मस्त सजेशन आहे हे. थंडी पण आहे.
बाय द वे, तळुन उरलेलं तेल किंवा करपलेलं तुप निरांजनात का चालणार नाही? मग काय करतात अशा उरलेल्या तेलाचं?
(देवासाठी) काय चालतं आणि काय
(देवासाठी) काय चालतं आणि काय नाही हे स्वतःच्या मनाला विचारून ठरवावं .. दोन्हीं बाजूंनीं व्हॅलिड आर्ग्युमेन्ट्स करता येतील .. फक्त करपलेलं तेल/तूप घालून समई/निरांजन लावून करपट वास येणार नाही ना हे बघा .. नाहीतर सगळं वातावरणच करपट व्हायचं ..
सशल, मी तळायला वापरलेली आणि
सशल, मी तळायला वापरलेली आणि काळे ऑइलचे जळलेले डाग असलेली कढई Cif लावुन ठेवली. साधारण १०-१५ मिनिटं आणि नंतर स्टीलवुल आणि स्कॉच ब्राइटने घासायला लावली बाईंना. चकाचक झाली एकदम. आता हाच उपाय वापरते कायम. याने गॅसस्टोव पण मस्त साफ होतो. त्यावर दुध किंवा तेल जळतं ते पण निघुन येतं कितीही करपलं असलं तरी. फक्त सरफेस ओला करायचा नाही आणि Cif डायल्युट करायचं नाही.
नोट - Cif अती स्ट्राँग केमिकल असल्यामुळे कढई खुप खुप वेळा स्वच्छ धुवुन घ्यायची आणि त्याचं स्कॉच ब्राइट पॅड इतर भांड्यांना वापरायचं नाही. ते वेगळंच ठेवुन द्यायचं. फक्त या वापरासाठी.
सशल , मी वरती लिहिलेलाच उपाय.
सशल , मी वरती लिहिलेलाच उपाय. मोठ्या भांड्यात बेकिंग सोडा पाणि उकळत ठेवायच आणि त्यात तुझ तेलाच भांड बुडव आणि उकळव पाणि.
नंतर बार किपर्सने घासून घे.
यावरुन मी कित्ती भांडी करपवली असतील असे हिशोब करत बसू नये.
माझ्या डोक्यात हे आलं की सीमा
माझ्या डोक्यात हे आलं की सीमा दरवेळेला ग्रोसरी शॉपिंग करताना किती पाऊंड्/किलो सोडा घेत असेल.
कॉस्कोमध्ये गोणी मिळते योकु
कॉस्कोमध्ये गोणी मिळते योकु
धन्यवास सीमा .. आता एक शेवटचा
धन्यवास सीमा ..
आता एक शेवटचा प्रश्न .. हे मोठ्या भांड्यात सोडा + वॉटर मध्ये कढई उकळताना बाहेरच्या मोठ्या भांड्याला काही त्रास नाही ना होणार?
कस्ला डोंबलाचा त्रास होणार
कस्ला डोंबलाचा त्रास होणार आहे? करं गपं घरी जावून.
सिंडी सेज करेक्ट. कॉस्टकोतून पोत आणते मी.
सब दर्द की दवा सारखं दिसतेय
सब दर्द की दवा सारखं दिसतेय हे सोडा प्रकरण. सोडू नका त्याला (आय मीन सोड्याला)
सशल, एक वैधानिक इशारा - सगळ्यात मोठ्या भांड्याला ते चिकट ओघळाचे डाग लागू देऊ नकोस
सब दर्द की दवा सारखं दिसतेय
सब दर्द की दवा सारखं दिसतेय हे सोडा प्रकरण.
हो न . कपडे धुण्यासाठी , भांडी घासणे , डाग काढणे.
माझी लेक केस धुवायलाही वापरते
जास्त कढवलं गेलेलं तुप
जास्त कढवलं गेलेलं तुप निरांजनात आणि फ़क्त दिवाळीच्याच तळणीचं तेल पणत्यांमध्ये माझ्या साबा कित्येक वर्ष वापरतात. आमची दोघींचीही नाकं चांगलीच तिक्ष्ण आहेत. आजपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही.
किचनजवळ एक कठडा आहे आणि
किचनजवळ एक कठडा आहे आणि त्यावर लाकडाचा टॉप आहे पांढर्या रंगाचा. त्यावर काही शोपिसेस ठेवलेत तर त्याचे डाग पडलेत, चहाच्या कपांच्या डागांसारखे. कशाने घालवता येतील?
खुप पिकलेली ४ ५ केळी आहेत..
खुप पिकलेली ४ ५ केळी आहेत.. काही तिखट पदार्थ करता येईल का..? गोडाचा पदार्थ नको..
पांढरे आख्खे उडीद आहेत.. का आणलेत देव जाणे.. काय करता येईल..?
सायली, माझी आजी केळ्यांची
सायली, माझी आजी केळ्यांची धिरडी करायची, पण त्यात १-२ केळीच संपतील.
बारीक रवा छान खमंग भाजून गार करायचा, त्यात पाणी घालून सरसरीत (घावन/ धिरडं कन्सिस्टन्सी)भिजवायचा. बाईंडिंगसाठी एखाद-दोन चमचे तकन्सिस्टन्सी)त्यात पिकलेलं केळं कुस्करून घालायचं. मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिर्याची पावडर इत्यादी चवीचा मालमसाला आपल्या आवडीप्रमाणे घालून धिरडी घालायची.
पांढरे आख्खे उडीद मी
पांढरे आख्खे उडीद मी इडलीच्याच पिठासाठी वापरले होते.
या दिवाळीला आणलेले १ कीलो
या दिवाळीला आणलेले १ कीलो पातळ्/पत्री पोहे उरले आहेत. त्याचा चिवडा सोडुन काय करता येइल?
Dadpe pohe, pattice or use in
Dadpe pohe, pattice or use in dosa. Usual kandepohe.
फॅब इंडिया मधून चांगली फिल्टर
फॅब इंडिया मधून चांगली फिल्टर कॉफी आणली पण घरी फिल्टर वगैरे नाही, मी आधी कपात गरम दूध साखर घालून गाळण्यात एक चमचा कॉफी ठेवून त्यावर उकळते पाणी ओतायचे चमचा दाबून, पण कोणत्याही उपायाने केली तरी कपात बारीक कण उतरतात, घरात फिल्टर किंवा कॉफी मशिन नसताना एम आर किंवा साउथ हून आणलेली कोनतीही फिल्टर कॉफी चांगली बनवण्याची युक्ती काय?
मला नेसकॅफे नसलेली कोणतीही कॉफी खूप आवडते, नेसकॅफे पण मुंबई पुणे प्रवासात बाकी काही चांगलं मिळत नाही म्हणून पिते कधीकधी.
अश्विनी दीक्षित, नानबाची
अश्विनी दीक्षित, नानबाची पोह्यांची उकड करा.
अश्विनी पोह्यांचे वडे पण
अश्विनी पोह्यांचे वडे पण करतात कांदा, बेसन घालून बाकी नेहेमीचे ठेचा, कोथिंबीर, हिंग, जिरे, ओवा, हळद, तिखट मीठ. पोहे थोडे भिजवायला लागतात. तेल मात्र खूप पितात हे वडे.
mi_anu, उकळवून करण्याची कॉफी
mi_anu, उकळवून करण्याची कॉफी करण्याची माझी पद्धत- साधारणपणे अर्धा कप पाणी उकळवायला ठेवायचं, त्यात साखर घालायची आवडीप्रमाणे. खळखळून उकळी फुटली की कॉफी पावडर घालायची. जरा मिनिटभर उकळू द्यायचं. आता भरपूर दूध घालायचं. पुन्हा चांगलं गरम होऊन उकळलं की बारीक गाळणीतून गाळून घ्यायचं.
यामध्ये पाणी उकळतांना, आलं/वेलची/वेलचीची सालं/ जायफळ असं घातलं की छान स्वाद येतो.
पातळ पोहे - जाड्या
पातळ पोहे - जाड्या पोह्यांऐवजी पातळ पोहे वापरूनही नेहमीचे अनेक पदार्थ करता येतील.
तेलतिखटमीठ पोहे - वरून मेतकूट - कच्चा बारीक चिरलेला कांदा - कोथिंबीर - भाजून चुरडलेला उडदाचा पापड ऑप्शनल.
ताकपोहे - दाण्याचे कूट, मीठ, साखर, किंचित तिखट किंवा मिरची ठेचा, ताक, कोथिंबीर घालून पोहे.
दूधगूळपोहे - गरम दूध, पावडर गूळ, भिजवलेले पोहे. (जाडे पोहे वापरूनही करता येते), आवडीनुसार वेलचीपूड.
दहीपोहे - घुसळलेले दही, मीठ, साखर, मिरची ठेचा (आवडीनुसार) किंवा तळलेली सांडगी मिरची चुरडून, भिजवलेले पोहे.
पातळ पोह्याचे दडपे पोहे करा.
पातळ पोह्याचे दडपे पोहे करा.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/46458
या पोह्याच्या बीबीवरही बरेच पर्याय मिळतील
पेरु, लाकडावरचे डाग
पेरु, लाकडावरचे डाग घालवायसाठी वूड क्लीनर मिळते, ते वापरुन बघ. त्यानी गेले नाहीत तर सँडपेपरनी घासून मग वरुन वॉर्नीश वगैरे ब्रश्नी लावावे लागेल. तुमच्याकडे "होम डेपो" सारखी "डु इट युवरसेल्फ" टाइपची दुकाने असतील तर तिथे चौकशी कर. बरोबर फोटो घेऊन जा.अशा दुकानांचा माझा अनुभव खूप चांगला आहे. गुडलक!
साधी कॉफी उकळयावर मग वरुन
साधी कॉफी उकळयावर मग वरुन थंड पाण्याचा हबका मारायचा. थोडा वेळ तशीच ठेवायची. मग पूड खाली बसते. मग ती गाळून घ्यायची.
Pages