मॅरॅथॉन रनिंग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00

मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका

http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार!
काल मी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मधे ५ किमी रन पूर्ण केली.साधारण १.५ किमी पळणे आणि उर्वरित चालणे. एकूण ५० मिनिटांमध्ये पूर्ण केली. आधी एक महिना तयारी त्यात १-२ आजारपणे असं करत, ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण केले.

इथे मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार. पुढच्या वर्षी १० किमी आणि त्यात जास्तीत जास्त पळणे हे उद्दिष्ट आहे.

@मनस्विता - डिट्टो

मी पण काल पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मधला ५ किमी रन पूर्ण केला. कुठल्याही मॅरेथॉन मधला माझा पहिलाच रन. धावणे-चालणे-धावणे-चालणे असं करत ३८ मिनीटांत पार केला. थोडीफार प्रॅक्टीस केली होती.

गडबड एकच झाली. नेहेमीचा सकाळी ५ चाअलार्म झालाच नाही ('रविवार' डिसेबल्ड होता !). मग घाई गडबडीत जेमतेम १५ मिनीटे उरली असताना पोचलो पण पिण्याचे पाणी नेण्याचे विसरलो. कसाबसा वॉर्म अप केला आणि लगेच रेस सुरु. १ किमी झाला तशी घशाला कोरड पडली. रेस संपेपर्यंत पाण्याची काहीच सोय नव्हती. मग तसाच गपगुमान फिनीश पर्यंत पळालो.

पण एकूण मजा आली. आता पुढचे लक्ष्य १० किमी आणि चांगली तयारी.

धनी, अभिनंदन!

मनस्विता आणि ऋष्या, अभिनंदन, अभिनंदन! सुरुवात होणेच फार कठीण असते आणि तुम्ही ती केलीत!

@ मनस्विता & ऋष्या - सेम पिंच
मी पण ५ किमी पूर्ण केली...गेल्या वर्षी ३.५ चॅरीटी रन केली होती....
मला ४६ मिनिटे लागली......गेले २ आठवडे तब्बेत खराब असल्याने काहीही तयारी केली नव्हती...
पण पुढच्या वर्षी तयारी करुन १० किमी करायचच असं (आत्तातरी) ठरवलय...
पाण्याची बाटली न विसरता कॅरी केली...त्यामुळे बराच फायदा झाला...पण आयत्या वेळी छोटी बाटली विकत न मिळाल्याने ७५० मिली ची मोठी बाटली घ्यावी लागली...ती कॅरी करणे जरा त्रासदायक गेले..
पण ओव्हरऑल मला मज्जा आली Happy

( माझ्यासोबत एक बर्याच वयस्कर आज्जीना अतिशय उत्साहात चालताना पाहिले...काय मस्त होत्या त्या आज्जी..नंतर त्याना भेटुन त्यांचे अभिनंदन केले..आणि वय विचारले..फक्त ७४ वर्षे.......) Happy

@स्मिता: हो, मी पण भेटले त्या आज्जींना. काल त्यांचा वाढदिवस होता. फोटो काढणार होते त्यांच्या बरोबर पण राहून गेला.

स्मिता श्रीपाद तुमचेही अभिनंदन
सुरुवात होणेच जरा कठीण असते आणि तुम्ही ती केलीत! ह्याला अनुमोदन Happy

@स्मिता: स्टार्ट लाईनला आम्ही त्या आज्जींच्या बाजुलाच होतो. त्या गेले ५ वर्ष पुणे मॅरेथॉन मध्ये भाग घेत आहेत म्हणाल्या. फारच स्फुर्तीदायक! सलाम त्याना!

मी काल पुणे इंटरनॅशनल १० किमी मॅरेथॉन पूर्ण केली. माझी पहिली १० किमी मॅरेथॉन.
१ तास १४ मिनीटांमध्ये पुर्ण केली.
@ स्मिता, मी सुद्धा पाण्याची बाटली सोबत घेउन धावत होतो...थोडा त्रास झाला पळताना पण मजा आली.

रविकांत आपलेही अभिनंदन!

पुण्यात पळणार्‍या मायबोलीकरांची टीमच तयार झाली की !

अरेव्वा !! बरीच नविन मेंब्र आली की पळापळी कंपूत Happy

मनस्विता, ऋष्या, स्मिता श्रिपाद आणि रविकांत तुमचे अभिनंदन !!!!

अभिनंदन सायली. Happy

(एक छोटीशी सुचवणी.. ५ , १०, १५ किमी वगैरेच्या शर्यती ह्या 'रन' असतात. २१ हाफ मॅराथॉन आणि ४२ फुल मॅराथॉन. '१० किमी मॅराथॉन' ही फारशी बरोबर टर्मिनॉलॉजी नाहीये... )

आता मात्र मी अजून कोणी पळलं असेल त्याचा प्रतिसाद आला की मग एकदमच अभिनंदन करणार Wink

जोक्स अपार्ट

अभिनंदन सायली Happy

रच्याकने - मॅरेथॉन अंतर म्हणजे ४२.१९५ किमी.

आता एक पळापळ गट्ग करूया काही निदान पाणी पाजायला तरी येतीलच Wink

वा वा, जोरात पळतायेत की सगळे...

पण वाटेत पाणी वाटप करणारे कोणीच नव्हते हे फारच वाईट...

गेली २ वर्षे १० कि मी रन मध्ये भाग घेतीये. हाफ करायची आहे पुढल्या. वर्षी.

ईथे मुंबई मध्ये नोव्हेंबर ते जास्तीत जास्त फेब पर्यंतच सहज धावणे जमते ( अस मला वाटत ) . मार्च च्या पुढे कठिण होत जात. पावसळा पण जातोच.

मुंबई मध्ये राहणारे काय करता मार्च ते नोव्हेंबर, प्लीज शेअर करा.

पुणे विद्यापीठ येथे दर शनिवारी व रविवारी "पुणे रनिंग" ग्रुपतर्फे छान प्रशिक्षण दिले जाते. धावून झाल्यानंतर केले जाणारे "stretches" बद्दलही छान माहिती दिली जाते.
या व्यतिरिक्त योगा वर्ग ही भरवला जातो आणी या व्यतिरिक्त अजून बरेच काही उपक्रम असतात.
एकंदरीत शनिवार आणी रविवार धमाल असते.

कोणाला इच्छा असेल तर येऊ शकता.

@रविकांत - सही. पुणे विद्यापीठमध्ये होणारे प्रशिक्षण किती वाजता सुरु होते ?

शनिवारी सकाळी ६ वाजता मुख्य इमारतीजवळ सर्वजन जमा होतात आणी ट्रेनर सुधी किंवा विकास हे नवीन लोकांना सोबत घेउन साधारनपने ३ किमी धावतात आनी त्या नंतर बाकी stretches.
रविवारी साधारनत: फक्त धावन्याचा सराव केला जातो.

मागच्या शनीवारी व त्या आधीच्या शनीवारी योगा प्रशिक्षणाचे वर्ग घेन्यात आले होते.
त्या आधी एका रविवारी family रनचे आयोजन करन्यात आले होते.

असे विविध उपक्रम चालु असतात.
खरेच खूप धमाल असते.

तर मुंबई मॅरॅथॉन एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे... (१७ जानेवारी २०१६ रोजी आहे)

https://www.youtube.com/watch?v=qyos_r-HdxA

ह्या व्हिडियोमधे संपुर्ण मार्ग प्रत्य्क्ष चित्रित केलेला आहे.

माझे ह्या मॅरॅथॉन मधे भाग घेण्याचे सलग तिसरे वर्ष पण धाकधुक ही वाटतेच. नेहेमीप्रमाणे शुभेच्छा सदिच्छा प्रोत्साहन आशिर्वाद असतीलच याची खात्री आहे Happy

हर्पेन, तुला ऑल द बेस्ट. मी आजच बघितला तो व्हिडिओ, केवढं अफाट अंतर वाटतं बघताना.

मी हाफ मध्ये भाग घेतलाय. माझी पहिली वहिली हाफ व ती ही मुंबईत.

अजून कोणी नाही का इथलं? गजानन?

Pages