परवा 'टीम लंच' साठी ऑफिस पासून जवळच असलेल्या हॉटेल मध्ये गेलो. शुक्रवार असल्याने आधीच सर्वजण वीकेंड मूड मध्ये आणि त्यात टीम लंच म्हणजे पर्वणीच..! पंधरा जणांची आमची टीम. म्हटले तर छोटी म्हटले तर मोठी. या टीम मध्ये मी नवीनच असल्याने ठराविक जणांशीच ओळख. टीमसोबत चांगल्या हॉटेलमध्ये कंपनीच्याच खर्चाने जेवायला जाणे, मौज-मजा करत वेगवेगळे मेन्यु टेस्ट करणे म्हणजे एक एंजॉयमेंट असते.
१५ जणांच्या टीम मध्ये एक जण दिसायला वेगळा. साधारण सहा फुट उंची, वीतभर वाढवलेली दाढी, सुरमा लावल्याने काळ्या झालेल्या डोळ्यांच्या कडा आणि डोक्यावर सफेद रंगाची गोल टोपी. साधारण बावीस-तेवीस वर्षांचा हा तरुण इतर टीम मेंबर्सपेक्षा दिसायला निश्चितच वेगळा. टीममधे नविनच जॉइन झालेला. थोडसा अबोल, प्रसन्नचित्त, सात्विक आणि हसरा चेहरा असलेला हा तरुण म्हणजे असिफ..!
सर्वजण टेबलावर येणाऱ्या मेन्यूजचा आस्वाद घेत होते. त्या लज्जतदार मेन्युजमुळे खाण्यात एक वेगळीच मजा येत होती आणि प्रत्येकजण हास्य-विनोदात रमला होता. अचानक वीकेंडला कोण-कोण कुठे-कुठे जाणार आणि काय-काय करणार याची चौकशी सुरु झाली. सगळ्यांचे प्लान्स सांगून झाल्यावर असिफने सुद्धा तो आज संध्याकाळच्या एस.टी. ने त्याच्या घरी म्हणजे औरंगाबादला जाणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद हे नाव ऐकताच एक टीममेट क्षणाचा देखील वेळ न दवडता असिफकडे पाहून म्हणाला, "औरंगाबाद नाही... संभाजीनगर..!"
त्याचे हे बोलणे ऐकून लंच टेबलवर क्षणभर शांतता पसरली. प्लेट्मधील अन्न प्लेट्मधे, चमच्यातले अन्न चमच्यात आणि तोंडातले अन्न तोंडातच ठेऊन सर्वजण एकमेकांकडे आणि नंतर असिफकडे पाहू लागले. मात्र चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि हास्य जराही विचलित न करता असिफ अंदाज घेत सावरून म्हणाला, "संभाजीनगर तो संभाजीनगर... अपनेको क्या फरक पडता है..!!"
मी मात्र असिफ च्या उत्तराने व्यथित झालो. मुळात चार-चौघात असे लंच टेबलवर त्याला अथवा कुणालाही 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न विचारणे मला गैर वाटले. औरंगाबाद हा केवळ ५ अक्षरी शब्द नसून त्यामागे जोडलेल्या मानवी भावना असू शकतात याचा आपणाला विसर का पडावा..?
तसा माझा आणि औरंगाबादचा दुरान्वयेही संबंध नाही. माझे गाव पश्चिम महाराष्ट्रात. सगळे पै-पाहुणे देखील पश्चिम महाराष्ट्रात. औरंगाबादला कामानिमित्तही कधी येणे-जाणे नाही. आत्तापर्यंत १-२ वेळा औरंगाबादला जाणे झाले तेही केवळ पर्यटनासाठी. मग असिफला विचारल्या गेलेला 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न अप्रस्तुत का वाटवा..?
या प्रश्नाचे कारण शोधता शोधता मन थेट भूतकाळात गेले. हायस्कूलला असताना शैक्षणिक सहलीनिमित्त औरंगाबाद शहर आणि जिल्हा पाहण्याचा योग आला होता. त्याआधी औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातील एक जिल्हा आणि ते आपल्या गावाहून फार-फार लांब आहे एवढीच काय ते माहिती. औरंगाबाद म्हणजे काहीतरी हिरवे आणि आपले गाव म्हणजे भगवे असले काही शाळेत शिकवलेले नसल्याने औरंगाबाद हे नाव तेव्हा सुद्धा छानच वाटायचे आणि अजुनही वाटते.
औरंगाबाद हे नाव कुठून आले आणि का आले असले प्रश्न न पडता आम्ही विद्यार्थ्यांनी तेव्हा औरंगाबाद, पैठण, वेरूळ,खुलताबाद, अजिंठा, दौलताबाद यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना दिलेली भेट अजुनहि आठवते. दौलताबादचा देवगिरी किल्ला पाहताना विस्फारलेले डोळे, विस्मयचकित होउन पाहिलेल्या वेरुळच्या लेण्या व घृष्णेश्वर मंदिर. अजिंठ्याचे जगप्रसिद्ध लेणे आणि त्यातील चित्रांची मोहमय दुनिया पहताना मिळालेली मन:शांती. लेण्यांशेजारून वाहणारी निर्मळ नदी आणि तीवर असलेला पांढराशुभ्र धबधबा पाहताना झालेला अवर्णनीय आनंद. पैठणचे नाथमंदिर, गोदावरी नदीवर बांधलेले धरण आणि त्याच्या पुढे पसरलेला अवाढव्य नाथसागर जलाशय पाहून प्रसन्न झालेले मन. धरणाच्या पायथ्याशी असलेले उद्यान आणि त्यात असलेले म्युझिक फाउंटन पाहून डोळ्याचे फिटलेले पारणे. औरंगाबाद शहरातील बीबी-का-मकबरा आणि पाण्यावर चालवली जाणारी आटे कि चक्की पाहताना इतिहासात डोकावण्याची मिळालेली संधी. औरंगाबादच्या रस्त्यांवर मिळणारे चविष्ट रोट खाऊन भागवलेली भूक. कधीही न पाहिलेले परदेशी लोक आम्ही औरंगाबादच्या सहलीत मात्र मोठ्या प्रमाणात पाहिले. काहीतरी प्रेक्षणीय असल्याशिवाय जगभरातील पर्यटक नक्कीच औरंगाबादला येत नसणार. हे सगळे अनुभव आठवल्यावर 'औरंगाबाद' या नावामुळे तिथल्या प्रेक्षणीय स्थळात काही बदल होणे दुरापास्त वाटते.
असे असताना एखद्याच्या जात-धर्म-पंथावरुन त्याची टिंगल-टवाळी करणे किंवा टोचुन बोलणे मला बरोबर वाटले नाही. आपण जिथे जन्मलो त्या गावाशी आपली नाळ आपोआप जोडली जाते. त्या गावाचे-शहराचे नाव बदलले जाणे हे कुणालाही क्लेशकारकच वाटत असणार. मग तो कोणत्याही धर्माचा-जातीचा किंवा पंथाचा असो. आपण ज्या शहरात राहतो अथवा ज्या पेठेत राहतो त्या पेठेचे नाव बदलण्याचा विचार मनात आणून पहिला तरी या विषयाची दाहकता मनाला स्पर्शून जाते आणि मग असिफला असा प्रश्न विचारणे हे सहिष्णु कि असहिष्णु याचे उत्तरही आपोआप मिळते...!!
प्रसाद. चूक लक्षात आणुन
प्रसाद. चूक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. दुरुस्ती केली आहे, बरोबर आहे का बघा.
अन काये ना, हल्ली "कुलकर्णी तो छा गये है माबोपे"... त्यामुले झाल बर्का...
बापरे कित्ती चर्चा. आमच्या
बापरे कित्ती चर्चा. आमच्या ग्रूपात जर नवीन कुणी चुकूनमाकून आलाच तर त्याला असले दहा लेख लिहायला स्फूर्ती येईल!!!
आम्ही सर्वधर्मीय ग्रूपमध्ये एकत्र असताना एकमेकांची जातपातधर्मआवडनिवडलफडीभानगडीप्रेमन्ब्भंग्नोकरीकामाचीगावे यावरून प्रचंड टेर खेचतो. त्यात आम्हाला कुणालाच काही वावगं वाटत नाही. धार्मिक वगैरे भावना दुखावल्या तर आम्ही अशा लोकांचे ग्रूपमधून विसर्जन करतो.
(ग्रूप म्हणजे मित्रमंडळींचा ग्रूप. व्हॉट्सअॅप ग्रूप नव्हे)
@limbutimbu : तुम्ही दिलेल्या
@limbutimbu : तुम्ही दिलेल्या उदाहरणात अजुन काही अॅड करतो. संत तुकाराम महाराजांच्या पोथ्या नदीत बुडविणारे आणि नंतर खुन करणारे, महात्मा गांधींना सर्वांसमक्ष जीवे मारणारे, महात्मा फुलेंवर खुनी हल्ला करणारे, सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकणारे, संत गाडगे बाबांना वेडा ठरविणारे असे कितीतरी उदाहरणे देता येतील.. समाज सुधारणा करणार्या सुधारकांना समाजातील ज्या-ज्या मुठभर लोकांनी त्रास दिला, मारुन टाकले ते-ते सर्वजण 'स्वदेशी' असहिष्णुच होते... एकंदर काय तर असहिष्णुता ही पुर्वापारंपार चालत आलेली आहे... आता तिला पुन्हा नव्याने धुमारे फुटत आहेत हे आजु-बाजुला घडणार्या घटनांतुन सहज लक्षात येते....!
पण तुम्ही फक्त एकाच विरोधी
पण तुम्ही फक्त एकाच विरोधी रंगाच्या प्रतिसादकर्त्यांना चांगले म्हणालात. असे का ?
दोन्ही बाजुच्या मतांना समसमान दाद द्यायला हवी होती. असो, मर्जी आपली. पु.ले.शु.
<<
हो हो.
आपले संतुलित महेश नेहेमीच संघिष्टांना चांगले म्हणतात व स्वतः संतुलित आहोत असे सांगतात, तसेच.
संत तुकाराम महारजांच्या
संत तुकाराम महारजांच्या पोथ्या नदीत बुडविणारे आणि नंतर खुन करणारे, महात्मा गांधींना सर्वांसमक्ष जीवे मारणारे, महात्मा फुलेंवर खुनी हल्ला करणारे, सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकणारे, संत गाडगे बाबांना वेडा ठरविणारे असे कितीतरी उदाहरणे देता येतील.
<<
आता कसा धागा अगदि योग्य वळणावर आला.
धागा वळणावर आणण्याचे काम
धागा वळणावर आणण्याचे काम लिंबूभाऊंनी अत्यंत मेहनतीने केले आहे जे पहिल्या पानापासून सातत्याने दिसत आहे अश्यावेळी कृपया इतरांना त्यांच्या मेहनतीचे फळ खायला देउ नये. ही नम्र विनंती हे त्यांच्यासोबत "असहिष्णुता" दाखवल्यासारखे होईल.
धनंजय भोसले,+१
धनंजय भोसले,+१
आम्ही सर्वधर्मीय ग्रूपमध्ये
आम्ही सर्वधर्मीय ग्रूपमध्ये एकत्र असताना एकमेकांची
जातपातधर्मआवडनिवडलफडीभानगडीप्रेमन्ब्भंग्नोकरीकामाचीगावे यावरून प्रचंड टेर खेचतो. त्यात आम्हाला कुणालाच काही वावगं वाटत नाही. धार्मिक वगैरे भावना दुखावल्या तर आम्ही अशा लोकांचे ग्रूपमधून विसर्जन करतो.
>>
+१
असेच व्हायला हवे
एक पोस्ट वाचनात आली
एक पोस्ट वाचनात आली होती..
८०० वर्षे मोगलांचं राज्य होतं पण त्यांनी कधी पोर्कबंदी केली नाही. यांचं राज्य आल्यानंतर एकाच महीन्यात बीफबंदीचा फतवा निघाला आणि खून पडले. यावरून सहीष्णू कोण ते ठरवावं.
१००
१००
@ सकुरा : टपुनच बसला होतात की
@ सकुरा : टपुनच बसला होतात की काय सेंच्युरी मारायला..?
@ kapoche : पॉइंट टु बी नोटेड..!
पकाऊ मुद्दे आणि लेख....
पकाऊ मुद्दे आणि लेख....
गझनीच्या महंमदाने सोमनाथ
गझनीच्या महंमदाने सोमनाथ लुटले, अफजलखानाने तुळजापुर अपवित्र केले, अश्या अनेक घटना भारतीय इतिहासात नोंदल्या आहेत. त्या सुध्दा अधीकृत रित्या. इतकच काय अनेक वर्षे हायकोर्टात प्रलंबीत असलेल्या आणि ज्याच्या निकालाला उशीर झाल्यामुळे उध्वस्थ झालेल्या वास्तुचे नाव स्वातंत्र्य पुर्व काळात " जन्मभुमी मशीद " असल्याचा पुरावा हायकोर्टात होता. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे पारतंत्र्याच्या खुणा पुसल्या गेल्या का ? आजही त्या बहुजनांच्या छाताडावर व्रण करुन आहेत.
पैगंबर साहेबांच्या मिरवणुकीत काय घोषणा दिल्या जातात ते ऐका. इतकच कशाला म्यानमार मधे झालेल्या घटनांच्या निषेधासाठी मुंबईत निघालेला मोर्चा आणि त्याने संयुक्त महाराष्ट्राच्या स्मारकाची केलेली मोडतोड कोणत्या सहिष्णुतेत बसत होत ? तेव्हा कुणाला देष सोडुन सोडुन जावेसे वाटले नाही.
स्वातंत्र्य पुर्व काळातल्या ह्या घटना सहिष्णुतेच्या द्योतक नक्कीच नव्हत्या. इतकच काय स्वातंत्र्य मिळाल्यावर आजही काश्मिर मधील पंडीत हाकलले गेले, त्यांना लुटले गेले, त्यांच्या हत्या झाल्या आणि स्त्रीयांवर बलात्कार झाले हे सुध्दा सहिष्णूता समजायचे का ?
काही वादग्रस्त नगरांची नावे बदललेल्यामुळे पुढच्या पिढीला इतके समजेल की औरंगजेब काही आदर्श नव्हता. जी सहिष्णुता संताजी - धनाजी यांनी दाखवली. ( तो नमाज पडत होता म्हणुन जीवनदान दिले ) ती सहिष्णुता त्याने संभाजी महारांजांना दाखवली असती तर हे कडवेपण दिसले नसते.
@ malhara : त्याचं काय आहे कि
@ malhara : त्याचं काय आहे कि कणभर मीठाशिवाय गोड पदार्थांना सुद्धा चव येत नाही... म्हणुन आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे...
@ नितीनचंद्र : मी ऑफिसच्या टिमलंच निमित्ताने हॉटेलमधे जेवायला गेलो असताना घडलेला प्रसंग लिहिला आहे... सार्वजनीक जीवनात वावरताना तुम्ही सांगितलेले हिंदु-मुस्लिम द्वेषाचे धडे डोक्यात ठेउन आपण वागु लागलो तर नंदनवनात वावरत आहोत असे वाटेल..! अर्थात ते नंदनवन नक्की 'कुणा'चे हे ज्याचे त्याने ठरवावे..!!
तो नमाज पडत होता म्हणुन
तो नमाज पडत होता म्हणुन जीवनदान दिले
>>
घोरी गायींच्या कड्यातून लढला म्हणून जिंकला असलं काहीस झालं हे
८०० वर्षे मोगलांचं राज्य होतं पण त्यांनी कधी पोर्कबंदी केली नाही.
>>
लोल! भारतात पोर्क किती खायचे?
@ धनंजय भोसले, मी संभाजीनगर
@ धनंजय भोसले,
मी संभाजीनगर ऑफिसमधे म्हणण्याचे समर्थन केले नाही. कडवेपणा का येतो या बाबत लिहीले. डबल स्टॅडर्ड्स फक्त राजकारणी लोक ठेऊ शकतात. सामान्य माणुस नाही.
बर्याच ऑफीसमधे गणपती बसवण्याची परंपरा असते. अश्या वेळी हा कार्येक्रम धार्मीक नसुन सांस्कृतीक असतो. या कार्येक्रमात मुस्लीम सहकारी अपवादाने गंध लाऊन सामील होतात. जास्त मुस्लीम सहकारी लांब रहातात किंवा आलेच तरी संपुर्ण सहभागी होत नाहीत. या उलट हज ला जाऊन आलेले मुस्लीम सहकारी मुस्लीम नसलेल्या सहकार्यांकडुन तिथले पवित्र जल पिताना पश्चिमेला तोंड करावे आणि डोक्यावर हात ठेऊन ते पाणी प्यावे अशी अपेक्षा धरुन असतात.
थोडक्यात हिंदुंनी ऑफीसमधे आपली कडवी मते बाजुला ठेऊन काम करावे अशी अपेक्षा असते तर मुस्लीमांना त्यांच्या धर्माप्रमाणे ऑफीसमधे दाढी ठेवावी, मुली/स्त्रीयांनी बुरखा धारण करावा यावर कोणाचा आक्षेप असु नये असे वागतो.
घोरी गायींच्या कड्यातून लढला
घोरी गायींच्या कड्यातून लढला म्हणून जिंकला असलं काहीस झालं हे
अब हिंदु मार नही खाएंगे म्हणणार्या अटलबिहारी वाजपेयींनी सुध्दा पंतप्रधान पदावरुन रोजे असतात त्या महिन्यात काश्मिरमधे अतिरेक्यांविरुध्द एकतर्फी शत्रसंधी ( आम्ही युध्द करणार नाही / गोळीबार करणार नाही ) असे जाहीर केले होते.
हिंदु सहिष्णु असतात याच आजच्या काळातल आणखी एक उदाहरण घेता येईल.
हिंदुंनी ऑफीसमधे आपली कडवी
हिंदुंनी ऑफीसमधे आपली कडवी मते बाजुला ठेऊन काम करावे अशी अपेक्षा असते तर मुस्लीमांना त्यांच्या धर्माप्रमाणे ऑफीसमधे दाढी ठेवावी, मुली/स्त्रीयांनी बुरखा धारण करावा यावर कोणाचा आक्षेप असु नये असे वागतो.
>>
आणि तरीपण हिंदूच असहिष्णू ठरतात म्हणे
त्या महिन्यात काश्मिरमधे
त्या महिन्यात काश्मिरमधे अतिरेक्यांविरुध्द एकतर्फी शत्रसंधी ( आम्ही युध्द करणार नाही / गोळीबार करणार नाही ) असे जाहीर केले होते.
>>
तेव्हाच आजून घुसले होते म्हणे अतिरेकी? (बघा बघा अजूनही आम्ही अतिरेकीच म्हणतो … नाहीतर हे हिंदू तालिबानी नाहीतर वहाबी हिंदू म्हणायला लागतात )
@ नितीनचंद्र : उगिच विषय
@ नितीनचंद्र : उगिच विषय भरकटवु नका... मी लिहिलेय काय आणि तुम्ही सांगताय काय...! 'औरंगाबाद' आणि 'असिफ' च्या ऐवजी 'सचिन' नाहीतर 'माधुरी' यांची नावे व इतर गावांची/स्थळांची नावे टाकुन खोटे-खोटे लिहिले असते तर एवढा आकांड्तांडव केला असता का..? धर्माचा जाज्वल्य अभिमान असणारे बरेच लोक आजही 'वांद्रे' ला बांद्रा किंवा बँड्रा म्हणतात, 'शीव' ला सायन म्हणतात किंवा गेला बाजार 'हिंजवडी' का हिंजेवाडी आणि 'वानवडी' ला वानौरी म्हणतात तेव्हा कुठे जाते आपला धर्माभिमान-जात-पोटजात कुरवाळत बसण्याची सवय..? का फक्त सोयिस्कर ठिकाणीच (औरंगाबाद, उस्मानाबाद ई.ई.) ती दाखवायची असते..??
'औरंगाबाद' आणि 'असिफ' च्या
'औरंगाबाद' आणि 'असिफ' च्या ऐवजी 'सचिन' नाहीतर 'माधुरी' यांची नावे इतर गावांची/स्थळांची नावे टाकुन खोटे-खोटे लिहिले असते तर एवढा आकांड्तांडव केला असता का..?
>>
अय्यो मी पण तेच म्हणतोय … तो आसिफ होता म्हणूनच तर तुम्ही असहिष्णू असहिष्णू करत सुटलात !!
@ अनिरुद्ध_वैद्य - असे
@ अनिरुद्ध_वैद्य - असे तुम्हाला वाटतेय..! तुम्हाला तसे वाटत असेल तर तुम्ही हव्या त्या धर्मातील व्यक्तिंची आणि हव्या त्या गावांची नावे टाकुन पुन्हा वाचु शकता..!
नाही, तुम्ही तसे दाखवत आहात.
नाही, तुम्ही तसे दाखवत आहात. 'असिफ' च्या ऐवजी 'सचिन' असता तर तुम्ही लेख छापलाच नसता!
@ अनिरुद्ध_वैद्य - तरिहि मी
@ अनिरुद्ध_वैद्य - तरिहि मी लेख लिहिलाच असता आणि 'काही' लोकांना तो पचायला सोपा गेला असता इतकेच...! 'काही' आयडी सोडता इतर सर्वांनी लेखातील आशयावर कंस्ट्रक्टीव पद्धतीने विचार मांडले शिवाय त्यांनी कुठेही विषयांतर करुन 'स्वत:ला हवे ते' सिद्ध करायला सांगितले नाही.
ऊलट सुजाण माबोकरांनी दिलेला 'काही आयडींकडे दुर्लक्ष करा' हा सल्ला मी मानायला हवा होता... आणि तो योग्यच होता हे 'काही' आयडींनी पटवुनही दिलेले आहे..! इथुन पुढे नक्की काळजी घेइन..!!
@धनंजय भोसले, मुद्दा
@धनंजय भोसले,
मुद्दा भरकवटण्यात मला काही स्वारस्य नाही.
मुद्दा शिल्लक राहिला नाही की असे आरोप केले जातात. तुम्ही नंदनवन शब्द वापरलात तेव्हाच मी पुढे लिहणे बंद करायला हवे होते. मुद्यावर चर्चा करायला मी अजुनही तयार आहे.
@ अनिरुद्ध_वैद्य - तरिहि मी
@ अनिरुद्ध_वैद्य - तरिहि मी लेख लिहिलाच असता आणि 'काही' लोकांना तो पचायला सोपा गेला असता इतकेच...
>>
असय का? बर मग ठीके!!
@ नितीनचंद्र : तुमच्या मताचा
@ नितीनचंद्र : तुमच्या मताचा आदर व्हायलाच हवा..! फक्त तुमची मते 'सहिष्णु-असहिष्णु पार्ट-३' लेखातुन वाचकांसमोर आणावित... म्हणजे प्रतिक्रिया त्याला अनुसरुन अशाच येतील..!
@ अनिरुद्ध_वैद्य :
धनंजय, चांगले लिहिता तुम्ही
धनंजय, चांगले लिहिता तुम्ही नविन धागा काढा.
@ सकुरा : थोडा रिकामा वेळ
@ सकुरा : थोडा रिकामा वेळ मिळाला तर नक्कीच लिहिन... लिहिल्यामुळे खरंच छान वाटतंय...
आता एखादी रेसिपी लिहिन म्हणतो... तिकडे पण इन्टरेस्ट आहे
काही वादग्रस्त नगरांची नावे
काही वादग्रस्त नगरांची नावे बदललेल्यामुळे पुढच्या पिढीला इतके समजेल की औरंगजेब काही आदर्श नव्हता. जी सहिष्णुता संताजी - धनाजी यांनी दाखवली. ( तो नमाज पडत होता म्हणुन जीवनदान दिले ) ती सहिष्णुता त्याने संभाजी महारांजांना दाखवली असती तर हे कडवेपण दिसले नसते.
<<
यू मीन आणिबाणीत बाईंनी संघिष्ठांना जेलची हवा खिलवली नसती तर आजचा गांधीद्वेष दिसला नसता?
औरंग्याने तसे केले असते, तर बाबराने बांधलेलली मशीद टॉलरेट झाली असती?
किंवा कोकराच्या पणज्याने झर्यात 'वरच्या' बाजूला पाणी प्याल्याचे विसरून लांडग्याने त्याला सोडून दिले असते?
कम्मॉन चंद्रूभौ. उग्गं शमत झालो वरती. तुम्ही तुमच्या नेहेमीच्या लाडक्या पुंगीवादनाशीच येऊन थांबलात शेवटी..
Pages