सहिष्णु - असहिष्णु

Submitted by धनंजय भोसले on 30 November, 2015 - 04:24

परवा 'टीम लंच' साठी ऑफिस पासून जवळच असलेल्या हॉटेल मध्ये गेलो. शुक्रवार असल्याने आधीच सर्वजण वीकेंड मूड मध्ये आणि त्यात टीम लंच म्हणजे पर्वणीच..! पंधरा जणांची आमची टीम. म्हटले तर छोटी म्हटले तर मोठी. या टीम मध्ये मी नवीनच असल्याने ठराविक जणांशीच ओळख. टीमसोबत चांगल्या हॉटेलमध्ये कंपनीच्याच खर्चाने जेवायला जाणे, मौज-मजा करत वेगवेगळे मेन्यु टेस्ट करणे म्हणजे एक एंजॉयमेंट असते.

१५ जणांच्या टीम मध्ये एक जण दिसायला वेगळा. साधारण सहा फुट उंची, वीतभर वाढवलेली दाढी, सुरमा लावल्याने काळ्या झालेल्या डोळ्यांच्या कडा आणि डोक्यावर सफेद रंगाची गोल टोपी. साधारण बावीस-तेवीस वर्षांचा हा तरुण इतर टीम मेंबर्सपेक्षा दिसायला निश्चितच वेगळा. टीममधे नविनच जॉइन झालेला. थोडसा अबोल, प्रसन्नचित्त, सात्विक आणि हसरा चेहरा असलेला हा तरुण म्हणजे असिफ..!

सर्वजण टेबलावर येणाऱ्या मेन्यूजचा आस्वाद घेत होते. त्या लज्जतदार मेन्युजमुळे खाण्यात एक वेगळीच मजा येत होती आणि प्रत्येकजण हास्य-विनोदात रमला होता. अचानक वीकेंडला कोण-कोण कुठे-कुठे जाणार आणि काय-काय करणार याची चौकशी सुरु झाली. सगळ्यांचे प्लान्स सांगून झाल्यावर असिफने सुद्धा तो आज संध्याकाळच्या एस.टी. ने त्याच्या घरी म्हणजे औरंगाबादला जाणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद हे नाव ऐकताच एक टीममेट क्षणाचा देखील वेळ न दवडता असिफकडे पाहून म्हणाला, "औरंगाबाद नाही... संभाजीनगर..!"

त्याचे हे बोलणे ऐकून लंच टेबलवर क्षणभर शांतता पसरली. प्लेट्मधील अन्न प्लेट्मधे, चमच्यातले अन्न चमच्यात आणि तोंडातले अन्न तोंडातच ठेऊन सर्वजण एकमेकांकडे आणि नंतर असिफकडे पाहू लागले. मात्र चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि हास्य जराही विचलित न करता असिफ अंदाज घेत सावरून म्हणाला, "संभाजीनगर तो संभाजीनगर... अपनेको क्या फरक पडता है..!!"

मी मात्र असिफ च्या उत्तराने व्यथित झालो. मुळात चार-चौघात असे लंच टेबलवर त्याला अथवा कुणालाही 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न विचारणे मला गैर वाटले. औरंगाबाद हा केवळ ५ अक्षरी शब्द नसून त्यामागे जोडलेल्या मानवी भावना असू शकतात याचा आपणाला विसर का पडावा..?

तसा माझा आणि औरंगाबादचा दुरान्वयेही संबंध नाही. माझे गाव पश्चिम महाराष्ट्रात. सगळे पै-पाहुणे देखील पश्चिम महाराष्ट्रात. औरंगाबादला कामानिमित्तही कधी येणे-जाणे नाही. आत्तापर्यंत १-२ वेळा औरंगाबादला जाणे झाले तेही केवळ पर्यटनासाठी. मग असिफला विचारल्या गेलेला 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न अप्रस्तुत का वाटवा..?

या प्रश्नाचे कारण शोधता शोधता मन थेट भूतकाळात गेले. हायस्कूलला असताना शैक्षणिक सहलीनिमित्त औरंगाबाद शहर आणि जिल्हा पाहण्याचा योग आला होता. त्याआधी औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातील एक जिल्हा आणि ते आपल्या गावाहून फार-फार लांब आहे एवढीच काय ते माहिती. औरंगाबाद म्हणजे काहीतरी हिरवे आणि आपले गाव म्हणजे भगवे असले काही शाळेत शिकवलेले नसल्याने औरंगाबाद हे नाव तेव्हा सुद्धा छानच वाटायचे आणि अजुनही वाटते.

औरंगाबाद हे नाव कुठून आले आणि का आले असले प्रश्न न पडता आम्ही विद्यार्थ्यांनी तेव्हा औरंगाबाद, पैठण, वेरूळ,खुलताबाद, अजिंठा, दौलताबाद यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना दिलेली भेट अजुनहि आठवते. दौलताबादचा देवगिरी किल्ला पाहताना विस्फारलेले डोळे, विस्मयचकित होउन पाहिलेल्या वेरुळच्या लेण्या व घृष्णेश्वर मंदिर. अजिंठ्याचे जगप्रसिद्ध लेणे आणि त्यातील चित्रांची मोहमय दुनिया पहताना मिळालेली मन:शांती. लेण्यांशेजारून वाहणारी निर्मळ नदी आणि तीवर असलेला पांढराशुभ्र धबधबा पाहताना झालेला अवर्णनीय आनंद. पैठणचे नाथमंदिर, गोदावरी नदीवर बांधलेले धरण आणि त्याच्या पुढे पसरलेला अवाढव्य नाथसागर जलाशय पाहून प्रसन्न झालेले मन. धरणाच्या पायथ्याशी असलेले उद्यान आणि त्यात असलेले म्युझिक फाउंटन पाहून डोळ्याचे फिटलेले पारणे. औरंगाबाद शहरातील बीबी-का-मकबरा आणि पाण्यावर चालवली जाणारी आटे कि चक्की पाहताना इतिहासात डोकावण्याची मिळालेली संधी. औरंगाबादच्या रस्त्यांवर मिळणारे चविष्ट रोट खाऊन भागवलेली भूक. कधीही न पाहिलेले परदेशी लोक आम्ही औरंगाबादच्या सहलीत मात्र मोठ्या प्रमाणात पाहिले. काहीतरी प्रेक्षणीय असल्याशिवाय जगभरातील पर्यटक नक्कीच औरंगाबादला येत नसणार. हे सगळे अनुभव आठवल्यावर 'औरंगाबाद' या नावामुळे तिथल्या प्रेक्षणीय स्थळात काही बदल होणे दुरापास्त वाटते.

असे असताना एखद्याच्या जात-धर्म-पंथावरुन त्याची टिंगल-टवाळी करणे किंवा टोचुन बोलणे मला बरोबर वाटले नाही. आपण जिथे जन्मलो त्या गावाशी आपली नाळ आपोआप जोडली जाते. त्या गावाचे-शहराचे नाव बदलले जाणे हे कुणालाही क्लेशकारकच वाटत असणार. मग तो कोणत्याही धर्माचा-जातीचा किंवा पंथाचा असो. आपण ज्या शहरात राहतो अथवा ज्या पेठेत राहतो त्या पेठेचे नाव बदलण्याचा विचार मनात आणून पहिला तरी या विषयाची दाहकता मनाला स्पर्शून जाते आणि मग असिफला असा प्रश्न विचारणे हे सहिष्णु कि असहिष्णु याचे उत्तरही आपोआप मिळते...!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हीटी चे सीएसटी काँग्रेसने केले आहे. सेनेने नाही (हे मला तुला सांगायला हवे? >> इतक्यात हवा काढायला नको होती. आता ते कसे चुकिचे होते वगैरे यावर लिंबूभाउ भलीमोठी पोस्ट ठळक अक्षरांसहीत पोस्ट करतील आणि त्यात ब्रिगेडी ब्राह्मण वगैरे त्यांच्या आवडीचे लोक सोईस्कर आणले जातील. Proud

>>>> लिंबू - व्हीटी चे सीएसटी काँग्रेसने केले आहे. सेनेने नाही (हे मला तुला सांगायला हवे? स्मित ) <<<<
अरे फारेण्डा, बाबारे, त्यावेळेस ते सत्तेत होते पण नाव बदलण्याचे आंदोलन शिवसेनेचेच होते. व कॉन्गिंचा जाम विरोध होता, त्यांना कोणतरी गांधी-नेहेरु नाव सुचवले असते तर उड्या मारत केले असते. शिवाय या विषयावरुन अन कॉन्गी आशिर्वादाने रेल्वे खात्याचा त्यावेळचा "माज" काही औरच होता.
उद्या तुम्हि असेही म्हणाल की "संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती" कॉन्ग्रेसने केली...... स्ट्रिक्टली लिगली करेक्ट उत्तर असे की कॉन्ग्रेसच्या राजवटीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनाच्या परिणामामुळे कॉन्ग्रेसला ती करावी लागली. हुतात्मा स्मारक आठवते ना? उद्या असे म्हणु नका की ते हुतात्मा ही कॉन्ग्रेसी होते.... काय सांगावे.... अर्थ तर तसाच होतो ना .. असो.

हर्पेन, छान पोस्ट.

नाही लिंबू, सेना व्हीटीच्या मागे नव्हती. तसे कधी आठवत नाही. बॉम्बे-मुंबई वगैरे होते, पण व्हीटीचे नव्हते.

नाही लिंबू, सेना व्हीटीच्या मागे नव्हती. तसे कधी आठवत नाही. बॉम्बे-मुंबई वगैरे होते, पण व्हीटीचे नव्हते.>>>> शिवसेना व्हिटी चे नामांतर नाना उर्फ जग्गनाथ शंकरशेट (मुंबईचे आद्य शिल्पकार) यांचे नाव देवु पाहात होती.. तसेच डोमेस्टिक विमानतळास छ. शिवाजी महाराजांचे तर ईंटरनॅशनल विमानतळास जे.आर.डी. टाटा यांचे नाव देवु इच्छित होति.. पण सेनेला शह देण्यास कलमाडि रेल्वेमंत्री असताना व्हिटिचे नाव छ. शिवाजी टर्मिनस करण्यात आले..

सहज आठवले, जमलेले नामांतरण, वीजेटीआय कॉलेजचे..
विक्टोरीया ज्युबिली चे वीरमाता जिजाबाई (की वीरबाई जिजामाता?) झाले ..
कॉलेजचे ब्रांडनेम तसेच राहिले !

ऋन्मेषनी वीजेटीआय बद्दल लिहिलेलं माझ्याही मनात आले होते. तत्सदृष्य बॉम्बे चं मुंबई केल्यावरही महापालीकेला बृहन्मुंबई बनवून 'बी एम सी' कायम ठेवण्याचे कौशल्यही लई भारी!

बरेचदा असे करत असताना दुसर्‍याच्या जात-धर्म-पंथावरुनही टिंगल टवाळी होतेच.

सरदारजींवरचे जोक्स, ज्यु, मारवाडी आणि कोकणस्थांवरचे कंजूषीचे किस्से आवडीने चघळले जातातच...

इतकेच काय शारिरिक आकार (जाडी) /व्यंगांवरून (तोतरेपणा) केले गेलेले विनोदही सर्वमान्य आहेत. अगदी चित्रपटांमधूनही (सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या) दाखवले जातात.

माणसाच्या भाषेवरून - कोणी गावरान तर गावरान पण टिपिकल शहरी 'अशणार-नशणार-बशणार-घाशणार-पुशणार' असल्या सानुनासिक शब्दांनी युक्त अशा भाषेवरूनही करमणूक करून घेतो आपण डोळा मारा दिवा: (नथिंग पर्सनल)
>>

अरेरे, हे ही असहिष्णू? मग जोक्स कशावर करायचे? Sad

मोग्या,

औरंगाबादेचे नाव औरंगजेबाने ठेवले, आधी फतेहनगरका काय होते. आणि हो त्याची समाधी औरंगाबादेत नाहीये. उगा फेकू नको Wink

ज्या लोकांनी गावे, शहरे स्थळे उभारली किंवा बांधली त्या त्या लोकांचे नावे ठेवावीत! वर कुणीतरी म्हटले तसे जर संभाजीनगरचा पुरस्कर्ता असल्यास रमेश / सुरेश ह्यांनी असते तरी तो तसाच बोलला असता. अर्थात हे गृहितकावर आधारलेले असल्याने पास!

जोपर्यन्त समोरच्या माणसाच्या अभिव्यक्ती स्वातन्त्र्यावर गदा येत नाही तोपर्यंत सहिष्णुता. एखाद्याचे खाणे-पीणे-फिरणे-रहाणे-अधिवास ई.ई. मुलभुत गरजांवर एखाद्यामुळे गदा येत असेल तर ती असहिष्णुता ...! (वागणे-बोलणे नव्हे..! ते प्रत्येकाचे प्रत्येकापाशी असते.. जसे कि धर्म-जात..! )

आपल्या वरच्या व्याख्येनुसार 'औरंगाबाद नव्हे संभाजीनगर' ह्या डायलॉगमध्ये नाही आढळली असहिष्णुता.
ठीके, मतांतरे असू शकतात, तेव्हा Happy

बाकि फारफारतर शिवसेनेचा नामांतरवाद म्हणा Wink

औरंगाबाद असिफ चा 'अधिवास' आहे... त्याचे अधिकृत नाव त्याने घेतले तर दुसर्‍या टीममेट ने त्याच्या अधिवासाचे नाव 'संभाजीनगर' आहे असे सान्गुन प्रेशराइज केले.. हे असहिष्णु वाटत नाही का..?

धनंजय, तुम्ही सहज एक अनुभव शेअर करावा या हेतूने लिहिलेत, पण इथे प्रत्येकाने त्यात वेगवेगळे रंग भरून मजा (?) आणली की नाही. Happy
पण तुम्ही फक्त एकाच विरोधी रंगाच्या प्रतिसादकर्त्यांना चांगले म्हणालात. असे का ?
दोन्ही बाजुच्या मतांना समसमान दाद द्यायला हवी होती. असो, मर्जी आपली. पु.ले.शु.

प्रेशराइज केले..
>>
होय! प्रेशराइझ म्हणण्यापेक्षा टोकले म्हणणे अधिक संयुक्तिक राहील का?

हे असहिष्णु वाटत नाही का..?
>>

नाही! कदाचित मी निगरगट्ट असेल, संवेदनशील मनास वाटेलाही ते वाक्य असहिष्णू.

>>>> औरंगाबाद असिफ चा 'अधिवास' आहे... त्याचे अधिकृत नाव त्याने घेतले तर दुसर्‍या टीममेट ने त्याच्या अधिवासाचे नाव 'संभाजीनगर' आहे असे सान्गुन प्रेशराइज केले.. हे असहिष्णु वाटत नाही का..? <<<<<
नाही, ठामपणे नाही. मत मांडल्याने कोणी प्रेशराईज्ड होते असे नाही. कायद्यानेही "प्रेशराईज्ड केले" हे सिद्ध करणे महा अवघड आहेच.
हां, तू त्या गावाला "औरंगाबाद" हे नाव उच्चारूच नकोस, असे स्पष्ट आदेशवजा सांगितले असते तर ते "प्रेशराईज्ड " करणे झाले असते.

लिंबूदा, अगदीच सहमत !
इतर लोकांनी देखील असे घाबरून गप्प होण्यापेक्षा खेळीमेळीत घेता आले असते.

@ अनिरुद्ध_वैद्य, limbutimbu : २ दिवस दोन्हि बाजुंकडुन वैचारिक मंथन घडल्यावर शब्द्खेळ करुन असिफ ला विचारलेला प्रश्न 'प्रेशराइज्ड' कसा नव्हता हे पटवुन देता येउ शकते.. परंतु हॉटेल च्या डायनिंग टेबल वर ऑन द स्पॉट अशी सिच्युएशन आल्यावर काय होते याची कल्पना करा. इन्फॅक्ट 'असिफ' च्या जागी आपण असतो तर मनाला काय वाटले असते..? व त्याच 'टीम' सोबत पुढे ऑफिस मधे काम करावे लागणार आहे हे वास्तव क्लेश्कारक असेल का याचा विचार पण करावा... म्हणजे सहिष्णु कि आसहिष्णु ते समजायला मदत होइल..!

>>>> इन्फॅक्ट 'असिफ' च्या जागी आपण असतो तर मनाला काय वाटले असते..? <<<<<
हा विचार करण्याचे कारण? असिफ "भारतीय" असेल, या भुमिशी इथल्या राष्ट्रवादाशी जुळलेला असेल, तर त्याला काहीही वाटणार नाही. ध चा मा केला म्हणून राघोबा व त्याच्या बायकोच्या नावाने कुणी शिमगा केला तरी आम्हाला काही वाटत नाही. कृष्णाने कंसाला ठार मारले ही कथा ऐकताना मामाला मारले असेही वाटत नाही. ब्रिगेडी लोक अफजलखानाचा वकिल कुलकर्ण्याचे उदाहरण देत आख्ख्या ब्राह्मण वंशावर जी काय गरळ जाहीरपणे ओकतात, त्यामुळेही तुम्हाला काही वाटत नसेलच. लक्षात घ्या भोसलेसाहेब, की जेव्हा (छत्रपती) संभाजी भोसलेंना दग्याने पकडले गेले त्या मागिल हात असलेल्या नात्यातील मराठा सरदाराचे नाव कुणी घेतल्यासही आम्हाला व तुम्हालाही काहीही वाटत नाहीच, नै का? Proud
मग असिफच असा कोण वेगळा लागुन गेलाय की त्यांना काही वाटत रहावे व त्याची काळजी तुमच्यासहित इतरांनी करत बसावे?

शहाबुद्दिन निकाल/डोन्गर पळाला या उदाहरणांमुळे जर तुमच्याच मनात किंतु/न्युनगंड निर्माण झाला असेल, तर त्याची मात्र काळझी घ्या बोवा.

त्यातुनही असिफच्या जागी आपण अस्तो असा विचारच करायवयाचा झालाच, तर आधी मी काश्मिर मधल्या पंडितांना काय वाटले असेल, पाकिस्तान/बाम्गलामधे शिल्लक असलेल्या व संपत चाललेल्या हिंदुंना काय वाटेल त्याचा विचार करेन, व जे त्यांना वाटत असेल, तेच मलाही कदाचित वाटेल, असिफला काय वाटेल ते मला वाटेलच असे नाही व त्यालाही दरवेळेस तुम्ही किंवा तुमच्यासारखे जो बागुलबुवा उभाकरुन भितीने वाटुन घेत अस्ता,तसेच वाटेल असेही नाही. सरदारजीवरचे कसलेही जोक सरदारजी पचवु शकतात, १९८४ नंतर देशभरातील पुढे ५/१० वर्षे सर्वांकडुनच रोखलेल्या संशयाच्या नजरा सरदारजी हसतमुखाने सहन करुन परत याच समाजाशी/देशाशी आपली खुणगाठ पक्कीच बांधुन ठेवतात, त्यावेळेस त्यांना काय वाटेल, ब्राह्मणांना काय वाटेल याचा विचारही तुम्हाला व कुणालाच सुचत नाही, तर असिफचे बाबतीतही का सुचवुन घ्यावा? तुम्ही सुचवला म्हणून? जमणार नाही.

>>>>>> व त्याच 'टीम' सोबत पुढे ऑफिस मधे काम करावे लागणार आहे हे वास्तव क्लेश्कारक असेल का याचा विचार पण करावा... <<<<<
माझ्या सर्वात आधीच्या पोस्ट मधे मी नि:सन्दिग्धपणे सांगितले होते की नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी असे विषय काढायलाच नको होते. पण जर कुणी काढला तर ते आभाळ कोसळण्यायेवढेही मोठे नाही हे निश्चित.

अर्थात अफजलखानाच्या वधाचे कोथळा बाहेर काढतानाचे लावलेले पोस्टर "कुणाच्या तरी भावना दुखावतात म्हणून" काढायला लावण्याची सवय असलेल्यांना यातिल मर्म व गर्भितार्थ कळणे अवघडच आहे. तसे तर मशिदीपुढुन वाद्ये न वाजविण्याचा असाच एक अशास्त्रीय /अधार्मिक व अलिखित नियम ज्या देशात मुकाट पाळला जातो, तिथे तुम्ही विचारलेला प्रश्न अगदीच गैरलागु वा आश्चर्यकारकही वाटत नाही.

पण आता असाही धागा काढायला हरकत नसावी तुमची, की सर्वदेशभर अनन्वित धार्मिक अत्याचार करणार्‍या, संभाजीचा अतिशय घ्रुणास्पद व वेदनादायी अप्द्धतीने छळ करित खुन करणारा क्रूरकर्मा, महाराष्ट्रातील स्वराज्यास नष्ट करण्यास येथे पंचवीसहून अधिक वर्षे मृत्युचे तांडव खेळवणार्‍या एका नराधम परकीय सुलतानाचे नाव "एका शहराच्या नावा निमित्ताने" परत परत माझ्या/आमच्या समोर उच्चरुन आम्हास त्या कटु प्रसंगांची/इतिहासाची/हानीची दु:खकारक वेदनादायि आठवण परत परत करुन दिल्यामुळे आम्हांस काय वाटत असेल, याचा विचार "औरंगाबाद" असे म्हणणार्‍यांना करावा का? Wink

ज्या प्रमाणात चर्चा होत आहे ते प्रमाण लक्षात घेतले तर विषय नगण्य वाटत आहे.

बाकी पहिल्या प्रतिसादात जे म्हणायचो ते म्हणून झालेलेच आहे.

लक्षात घ्या कुलकर्णी साहेब, की जेव्हा संभाजीला दग्याने पकडले गेले त्या मागिल हात असलेल्या नात्यातील मराठा सरदाराचे नाव कुणी घेतल्यास आम्हाला काहीही वाटत नाही.
<<

प्रतिसाद लिहिण्यात लिंबुभौ इतके दंग झाले की त्यांना हा धागा जिलिब्या सम्राट राजेश कुळकर्णी यांचा नसुन 'धनंजय भोसले' यांचा आहे हे देखिल लक्षात राहीले नाही. Happy

Pages