Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चहा जळलेले स्टिलचे पातेले कसे
चहा जळलेले स्टिलचे पातेले कसे स्वच्छ करायचे?
>> बाईला घासायला द्यावे
कॉपर वूल मिळते का बघा, त्याने
कॉपर वूल मिळते का बघा, त्याने बर्यापैकी स्वच्छ होते.
चार पाच तास पाण्यात भिजवून
चार पाच तास पाण्यात भिजवून ठेवावे. मग स्टील वूल च्या घासणीने, व्हिमबार किंवा लि क्विड ने खूप
घासावे लागेल.
९, मी तुला कधीच एक सोप्पा,
९, मी तुला कधीच एक सोप्पा, प्रॅक्टिकल, करणेबल आणि मॅनेजेबल उपाय सांगितलाय. नीट वाच पाहू मागची पानं
अय्या! माझ्याकडे आहे असे एक
अय्या! माझ्याकडे आहे असे एक जळलेले चहाचे पातेले आणि एक मोठे (३ लिटरचे) पाण्याचे पातेले. एकदा मी घरात गॅसवर प्यायचं पाणी उकळवायला ठेवून विसरुन गेले होते तेव्हा जळलं होतं. अनंत वेळा घासूनही स्वच्छ असली तरी काळीच दिसतायत आता. खरंच ती पातेली उजळवायचा काही उपाय असेल तर सांगा.
हिंडालियमच्या (विमानाच्या पत्र्याच्या) कढया वगैरे खायचा सोडा घालून घासल्या की लगेच छान निघतात.
http://www.youthwill.com/easy
http://www.youthwill.com/easy-10-ways-to-clean-a-burnt-utensil-or-vessel/
यातले कोणकोणते उपाय उपयुक्त आहेत ते करून पाहून सांगा बरं
हे कॉपर वूल काय आहे?
हे कॉपर वूल काय आहे? माझ्याकडे मिळ्णंं कठीण आहे.
अमा, काल ५-६ वेळा घासून बरच स्वच्छ झालय.
पण तळाला आणि काठाला काळा प्लेन थर राहिलाय ,तो निघत नाहि.
भरत, ह्यातले वाईन सोडून सगळे
भरत, ह्यातले वाईन सोडून सगळे उपाय झालेत करुन. त्या स्टीलनेच आता काळा रंग धारण केलाय. स्टील तसं इनर्ट असल्याने त्यावर सोडा, लिंबाचा वगैरे प्रभाव पडत नाहिये बहुतेक. ती पातेली इतकी भयाण तापली असावीत की त्या धातूच्या आतच काहितरी बदल झाला असावा. खोल खोल परिणाम झालाय त्यांच्यावर
भरत मयेकर, लिंक बद्दल
भरत मयेकर, लिंक बद्दल धन्यवाद. करुन बघते एक एक.
अश्विनी के हो अगदि छान
अश्विनी के
हो अगदि छान मोरपंखी रंग आला होता पातेल्याला.त्याला घासून घासून काढलाय.आता फक्त काळं राहिलय.
करपलेल्या पातेल्यात मुठभरून
करपलेल्या पातेल्यात मुठभरून (हो मुठभरून. बेकिंग सोडा भरपूर पाहिजे.) बेकिंग सोडा घाला. पातेल पुर्ण काठपर्यंत पाण्याने भरून घ्या. आणि गदागदा चांगल उकळु दे पाणि. व्यवस्थित जळलेले भांडे स्वच्छ होते. नंतर नेहमी प्रमाणे भांड घासून घ्या. उकळताना जो भाग निघाला नसेल तो सहजा सहजी घासून निघतो.
इथे us मध्ये बार किपर्स सोप मिळतो. त्याने अगदी नव्यासारखे भांडे चकचकित होते.
भांद खूप चिक्ट किंवा तळाला लागलं असलं तर मी कधीच घासत बसत नाही. बेकिंग सोडा घालून उकळल कि बास आहे. अगदी तेलकट झालेल भांड सुद्धा मस्त स्वच्छ होत या ट्रीकने.
सीमा ,करुन बघते.
सीमा ,करुन बघते.
सीमा, दोन्ही पातेली स्वच्छ
सीमा, दोन्ही पातेली स्वच्छ निघाली आहेत गं. एकात तर पाणीच उकळवायला ठेवलं होतं. रंग काळपट झालाय स्टीलचा.
एक किलो बटरचं लोणी कढवताना
एक किलो बटरचं लोणी कढवताना नेमकी शेवटच्या टप्प्यात झोप लागली. तुप करपलं आहे. अगदी ब्राउन नाही तरी डार्क कॉफी कलरचं दिसतं आहे ( दुधवाल्या स्ट्राँग नेसकॅफेसारखा रंग). फेकायचं जीवावर आलं, म्हणुन गाळलं आहे पण गाळताना फाइन बर्न्ट पार्टिकल्स आले आहेत तुपात, त्यामुले करपट वास येतो आहे.
देवाला दिवा लावायला वापरुन संपवु कि दुसरा काही उपाय आहे करपलेला वास कमी करण्याचा? काही तरी विड्याचं पान, लवंग, वेलदोडा, मीठाचे खडे इ इ वाचलं होतं. पण ते कशासाठी ते माहित नाही. त्यातलाच किंवा तसाच दुसरा काही उपाय आहे का?
विड्याचं पान, लवंग, वेलदोडा,
विड्याचं पान, लवंग, वेलदोडा, मीठाचे खडे इ इ >> हे लोणी कढवताना, तूप होण्याच्या आधीचे उपाय आहेत करपलेली चव आलेल्या तुपासाठी बहुदा काही उपाय नाहीये. म्हणजे, मला माहित नाहीये. कोणाला ठाऊक असेल तर बरंच होईल ऑल द बेस्ट!
तूप बराच काळ ( २-३ दिवस) न
तूप बराच काळ ( २-३ दिवस) न हलवता ठेवून द्या. वाटल्यास कोमट पाण्यात ठेवा, म्हणजे घट्ट होणार नाही. हळूहळू करपलेले कण खाली बसतील. मग हलकेच वरचं तूप गाळून आेतून घ्या.
एका मैत्रिणीने काळंमिचकूट
एका मैत्रिणीने काळंमिचकूट झालेलं तूप मेथीच्या लाडवांसाठी वापरून संपवलं. काहीही वास आला नाही म्हणाली. मी खाल्ले नाहीत ते लाडू, किंवा तुपाचा रंगही नव्हता बघितला. अगदी काळंमिचकूट नसेल झालं, थोडं तपकिरी असेल असं आपलं मी मनात मानून घेतलं.
तुम्ही थोड्यअ तुपाचा वापर करून बघा हवं तर. पण त्यासाठी लाडूंचा घाट घालायला हवा!
ऑलरेडी करपलेल्या तुपाचा वास
ऑलरेडी करपलेल्या तुपाचा वास (सहसा) कमी होत नाही. रंगाचे जाऊ द्या. चव लागते आहे का करपलेली ?
चालणार असेल तर खालील गोष्टी तूप खपवायला करता येण्यासारख्या आहेत.
-ठराविक भाज्या किंवा वरण करताना फोडण्या द्यायला (तेल+तूप) वापरुन पाहू शकता. मग तेवढा वास -जाणवणार नाही.
-फुलक्यांना लावणे
-पराठ्यांना लावणे
-पायाच्या तळव्यांना लावणे
- निरांजन लावायला वापरणे
माझे एकदा करपले होते असे. पण चव बरी होती. फार ग्रेट नसली तरी.
अगदी शिर्या/लाडवांना वापरता नाही येत ते तूप, बाकी चालवून घ्यायचे. बरणी कपाटात ठेवा. घरातल्या इतर मेंब्रांना दिसता कामा नये. डोळ्यासमोर दिसलं की उगाचच आपसूक चव बिघडल्यासारखे वाटते.
( आमच्याकडे तीक्ष्ण नाकाचे लोकं आहेत. त्यांना कळतेच. पण ते समजूतदार आहेत. टाकण्यापेक्षा संपवूया ही बॅच असा 'कल' असतो. )
एकदच तूप करपवलेले आहे.
एकदच तूप करपवलेले आहे. निरांजनासाठीच वापरणे योग्य वाटले कारण विनाकारण ते तूप संपव्ण्याआठी अजून इतर काहे एबनवणे मला तरी जमलं नसतं काही झालं तरी करपलेला वास जातच नाही.
नंदिनी +१
नंदिनी +१
पण जे तूप तुम्हाला खायला आवडत
पण जे तूप तुम्हाला खायला आवडत नाही ते तुम्ही देवांसाठी कसे काय वापरू शकता? (असा प्रश्न मायबोलीवरच आला होता )
तिचं तूप थोडं ब्राऊन झालंय
तिचं तूप थोडं ब्राऊन झालंय त्यामुळे वातीसाठी इंधन म्हणून चालेल, देवाला खायला (म्हणजे प्रसादाला) नको
काही विशिष्ट कारणासाठी धूप,
काही विशिष्ट कारणासाठी धूप, सुगंधी उदबत्त्या, सुगंधी वाती, सुगंधी तेलं वापरणारे तुम्ही (सगळेच!), इंधनासाठी जळकं तूप कसं काय बुवा वापरू शकता?
आधुनिक गुलामगिरी हो बाकी काही
आधुनिक गुलामगिरी हो बाकी काही नाही
अति वास येत असेल तर
अति वास येत असेल तर निरांजनात पण नको. उगाच वास सगळीकडे पसरेल आणि आपण दिवा देवाला, आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून लावतो, हे माझं वै मत.
अवनी, नाही गं! या वहीला
अवनी, नाही गं! या वहीला 'निव्वळ स्वार्थीपणा' असं लेबल लावायचं
अय्या.. प्रत्येक विषयाला
अय्या.. प्रत्येक विषयाला वेग्वेगळी वही कशाला?
जळकं तूप फेकूनच द्यावं लागतं
जळकं तूप फेकूनच द्यावं लागतं गं.
मंजुडी-अंजू +१, नंदिनी
मंजुडी-अंजू +१, नंदिनी +१(अजून काही पदार्थ करनेबाबत)
बरेच लोक तळलेल तेल समईत वापरतात हे ऐकून मला वरील प्रश्न पडले होते.
तळलेलं तेल समईत? असो, ते तूप
तळलेलं तेल समईत?
असो, ते तूप किंचित जास्त कढवलं जाऊन थोडंसं ब्राऊन झालंय असं समजून मी वरील प्रतिसाद दिले आहे.
Pages