युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रज्ञा, ५-६ पट पाणी घाल. तेही उकळून. मी नेहमी सहा पट पाणी घालते. शीरा करतानाही दूध/पाणी ५ ते ६ पट घाल.

हा बीबी प्रचंड मनोरंजक आहे .. Lol

५-६ पट पाणी? म्हणजे प्रज्ञाला उपाय म्हणून ठीक आहे पण नेहेमी एव्हढं पाणी/दुध घालून जरा जास्तच सरसरीत होत नाही का शीरा/उपमा?

तिप्पट पाण्यात मऊ शीरा होतो. तसं प्रमाण अडीच पटीचं आहे माझ्या माहितीनुसार. ५-६पट घातलं तर खीर होइल खरंच Happy

इथे इं ग्रो मध्ये भाजलेला रवा मिळतो. त्यात एकदा नेहमीप्रमाणे ३ पट पाणी घालून केला होता तर तो खुप कोरडा झाला होता. तेव्हापासून प्रमाण वाढवत वाढवत उपम्यासाठी ६ पट आणि शिरा करताना ५ ते ६ पट अस प्रमाण ठरुन गेल आहे. या प्रमाणात मस्त मऊ आणि किंचित सरसरीत उपमा होतो. तेव्हढा मऊ नको असेल तर ५ पट पाणी घालून बघ.

आमच्याकडेही "उपमा रवा" नावाने मिळतो पण मला काही त्याची चव आवडली नाही .. आणि आमच्याकडे जो मिळतो त्याला असं जास्तीचं पाणी लागलं नव्हतं .. तुमच्या तिकडचं काय वेगळंच .. Wink Happy

Lol

धिरडी-डोसे म्हणजे बरोबर चटणी करायला पाहिजे. शिवाय थोडं तेल/तूप पाहिजे घालायला. लेकीसाठी हेल्दी ऑप्शन शिरा-उपमा आहे म्हणून खटाटोप. ती तुपावरची धिरडी आवडीने खाते, पण मग तहान जास्त लागून पाणी पिऊन बेचैन होते. पाणी थोडं कमी दिलं तर अपमानाने तिच्या डोळ्यातून पूर आणि कंठातून सनईचा सूर येतो. Proud

५-६ पट पाणी म्हणजे गिचका होणार कारण तो प्रयोग झालाय. आता शिरा करून संपवणार. कसा? तर कढईत तूप गरम करून त्यात रवा घालायचा. प्रमाण नेहमी घेईन तेच. असा रवा २ तास भिजत ठेवायचा. मग गॅस चालू करून नुसता कोमट होईतो हलवून नेहमीसारखा शिरा करायचा. हे जमलंय आत्ताच म्हणून लगेच लिहिलं. Happy

मी पण रवा कायमच भाजून ठेवते. अगदी पूर्ण भाजून.
अस कधी झालेले नाही.
पण मी पाणी कधीच मोजून घालत नाही . सगळ अंदाजेच असत .

रवा मैद्याची धिर डी करता येतील दही घालून. किंवा मैसूर बोंडे. तूपा ऐवजी अमूल बटर घालून द्या.

>>लेकीसाठी हेल्दी ऑप्शन शिरा-उपमा आहे
Jyane Rawa healthy mhatl tyala kaay sangaw. It's as bad as Maida to be very honest and with little knowledge I have defining healthy. If this is one thing she prefers then it's a different story else you can try switching to Daliya.

leenas | 3 December, 2015 - 12:54
आप्पे पात्रात केक केला आहे का कोणी? केला असल्यास प्लीज इथे रेसिपी देणार क? किंवा लिंक द्या प्लीज
ऑल्ररेडी कुठे असेल तर....>>>>>>>>>>>>>>>>

लीना , http://www.maayboli.com/node/38475?page=43 . माझीच रिक्षा Happy

प्र९, तेल तूप आपण कमी खायचं अस्तं. पोरांना चालतं. त्यांच्या शरीराला गरज असते तेवढी. आणि नॉनस्टिकवर कराय्ची धिरडी. एक थेंबभर तेल सुद्धा पुरतं मग...
शिरा, उपमा करतानाही लागणारच की तूप तेल Uhoh

रवा, तांदूळपिठी आणि कणीक असं घेऊन धिरडी करायची. त्याचे रवा-दोसे ही होतात पण मला तेवढा पेशन्स नसल्याने मी धिरडी घालते.

वरदा, अगं तिला तेलातुपाचं प्रस्थ न करता, कुठलाही अतिरेक टाळून नॉर्मल आहार देते मी. तो प्रॉब्लेम नाहिये. पण समहाऊ तिला बिनतेलाच्याही धिरड्यांनी खूप तहान तहान होते. सारखं पाणी हवंसं वाटतं. प्यायली की पोट खूप फुगतं. (याला वेगळी कारणं आणि उपचारही चालू आहेत, पण त्यामुळे वेळीच आवरतं घ्यावं लागतं.)
रवा खूप हेल्दी नाही याची कल्पना आहे मला, पण तिला इतर वेळी वेगवेगळी खूप फळं, भाज्या, सूप्स, वरण-आमट्यांचे प्रकार, मिश्र डाळी किंवा अन्य मिश्र पिठांची धिरडी, भाकरी, पोळी, तूप-सैन्धव-लिंबू-भात हे सगळं मी देत असते. शिवाय राजगिरा, अनेक प्रकारच्या लाह्या वगैरेही. अतिसात्त्विक नको म्हणून कधीतरी थोडं अबरचबरही. थोड्क्यात, खायचं प्यायचं तंत्र ओके आहे.
पण मधेच कधीतरी मी आमच्यासाठी उपमा वगैरे करते. या वेळी हा प्रॉब्लेम आला मला. आणि शिरा तर
मलाही प्र चं ड आवडतो! तो बिघडला की माझा मूड जातो. Wink

पेरू रव्यामध्ये फायबर कटेंट जवळ जवळ नसतं त्यामुळे त्याला हेल्दी म्हणता येईल असं वाटत नाही. शिर्‍यामध्ये तर आणखी तूप आणि साखर म्हणजे सगळं मिळून कार्ब आणि फॅट विथ नो फायबर. मला काँम्प्लेक्स कार्ब खायला सांगितले आहेत त्यामुळे निदान माझ्यासाठी तरी रवा आउट. कधीतरी ठीक आहे. जमलं तर त्याऐवजी दलिया वापरायला शिकायला ह्वं.
मुलांना वगैरे शिरा आवडतो म्हणून मी रवा भाजत आला की बदाम पावडर आहे (आल्मड मिल) ते मिक्स करते तेवढंच मानसिक समाधान Wink

मी रवा कायम भाजून रेडी टू इट करून ठेवते कधीही असा प्रॉब्लेम आला नाही. मी फोडणीत अथवा तुपावर रवा घालत नाही, पाणी उकळून घेऊन त्यात रवा घालते. त्यामुळे पाण्याच्या अंदाजानुसार रव्याचा अदमास बरोबर समजतो.

शिरा टाईपच हव असेल तर मी रूमझुम म्हणून रेसिपी लिहिली आहे ती बघता येईल. माझ्या लेकीला शिरा आवडत नाही त्यामुळे मी तिला रूमझूमचे छोटे छोटे पॅनकेक करून देते. त्यात तेल तूप फारसं वापरावं लागत् नाही. शिरा उप्म्याइतकंच तूप वापरता येईल.

लहान पोरांना द्यावं जरा जास्तीचं साजूक तूप. बिनातेलातुपाचं धिरडं कोरडं कोरड होत असेल. तुपावर घालून दे तिला.

आमच्या लहानपणी घरी रवा बनविला जात असे, म्हणजे गिरणीत दळायला देताना काही गहू रव्यासाठी आजी-आई देत. मग चाळून बारीक - जाड रवा त्या वेगळा करीत. त्याचा शिरा वा उपमा बनत असे. अर्थात आपल्याला हे अशक्य नसले तरी अवघड आहे. Happy

>>आमच्या लहानपणी घरी रवा बनविला जात असे, म्हणजे गिरणीत दळायला देताना काही गहू रव्यासाठी आजी-आई देत.>>+१
घरघंटीवर मिळतो गव्हाचा रवा दळून. त्याला वेगवेगळ्या जाळ्या असतात त्यामुळे घरी चाळून वेगळा करावा लागत नाही.

अगं मुलींनो, मी तिला तेलाचं नि तुपाचं देते सगळं छान करून. पण कसंही केलं तरी धिरड्याने तहान खूपखूपच लागते असं लक्षात आलंय. (कधीतरी तिच्या डोळ्यासमोर तूप घालताना दिसलं नाही तर "पा..पा...पा" असा धोशा असतो! Happy )असो.

आणि तिचं ठीक आहे, पण आम्हाला कधीतरी उपमा वगैरे लागतोच ना नाश्त्याला, तेव्हा तरी काहीतरी सोल्युशन पाहिजे ना.... तर ते आता निदान शिर्‍यापुरतं तरी मिळालंय. बाकी बघू.

आपल्याकडे बाजारात जो तयार रवा मिळतो, त्याची उत्पादनप्रक्रिया वेगळी आहे. त्यासाठी गहू पाण्यात भिजवून मग ते रोलरमधे घालून आतला मगज बाहेर काढतात. या मगजाचे आकारानुसार तुकडे करून वेगवेगळ्या नंबरचे रवे बनतात. म्हणजे हे रवे खरे तर मैदाच असतो. म्हणून तो पांढरा दिसतो. तसेच पाण्यात भिजवला तर त्याचा साका बनतो. त्याच्या ( तो न गाळताही ) कुरड्या वगैरे करता येतात. वरच्या प्रक्रियेत जे टरफल वेगळे निघते, त्याच्या चुरा करून त्यापासून व्हीट ब्रान, व्हीट पोलार्ड, व्हीट जर्म वगैरे बनते. तसेच त्या मगजाला वाळवून त्याचे पिठ करतात तो मैदा. तो आधी गव्हाळ रंगाचाच असतो, हवेत उघडा ठेवल्यावर तो शुभ्र होतो.

दलिया मात्र गहू दळून करतात. म्हणून तो लवकर शिजत नाही. त्यामूळे घरी दळून केलेला रवा हा खरा रवा म्हणायला हवा.

गेल्या काही वर्षात " चक्की आटा" हे नाव प्रचलित झालेय, तो बहुदा अखंड गहू दळून करतात. पुर्वी वरीलप्रमाणे केलेल्या मैद्यात काही प्रमाणात कोंडा मिसळून कणीक बनवत असत.

तहानेसाठी नाचणी सत्व किंवा सत्तूचे पिठ ( दोन्ही पाण्यात मिसळून, नाचणी सत्व शिजवावे लागेल, सत्तूचे पिठ तसेच म्हणजे न शिजवता ) किंवा खजूराचे पाणी वापरून पहा. बार्ली वॉटरही चांगले.

Pages