Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फ्रीजची आवाराआवर करताना
फ्रीजची आवाराआवर करताना लहानसा डबा भरुन (जवळ जवळ दोनशे ग्राम) चारोळ्या हाताशी लागल्यात. चांगल्या आहेत. खवट झालेल्या नाहीत. मी घरी श्रीखंड-बासुंदी करत नाही. नुसत्या खायला आवडत नाहीत. त्यांचे काय करावे?
कुळथाच्या पिठाचे पिठल्या व्यतिरिक्त काय करता येते?
भरलेल्या सांडगी मिरच्या तळण्याव्यतिरिक्त अजून कशा प्रकारे खाता येतील?
कुळथाच्या पिठाचे पिठल्या
कुळथाच्या पिठाचे पिठल्या व्यतिरिक्त काय करता येते?>>
http://www.maayboli.com/node/37824
http://www.maayboli.com/node/52664
सांडगी मिरच्या फोडणीत घालून दही वाल्या कोशिंबीरीत छान लागतात. मी बरेचदा मावेत शेकून घेतलेल्या मिरच्या दलिया खिचडीत घालते. प्रेशर पॅनचे झाकण उघडले की शेकलेल्या मिरच्या चुरुन , फ्रोजन मटार /फरसबी घालून परत झाकण ठेवते. डबा भरेपर्यंत स्वाद मुरतो.
कुळथाच्या पिठाच्या शेंगोळ्या.
कुळथाच्या पिठाच्या शेंगोळ्या.
CharoLya tikhaT
CharoLya tikhaT padaarthaatahee vaaparataat, udaa. PuDachya vaDya.
kuLathachya piThache, shegoLe, maaDage karataat. Tyaat tikhaT meeTh ghaatalele nasalyas laaDuhee katataat
SaanDagee mirachya taLoon mag
SaanDagee mirachya taLoon mag itar padarthat churaDun ghalatat. KaTaachee aamaTee, dahi buttee, faNasachee bhaajee, foDaNeeche pohe, khichaDee vagaire
आभार सगळ्यांचे. सांडगी
आभार सगळ्यांचे. सांडगी मिरच्या, कुळथाचे पिठ यासंदर्भातले सल्ले लगेच अमलात आणण्यात येतील. मात्र चारोळ्यांकरता पुडाच्या वड्यांचा घाट घालणं केवळ अशक्य. बाकी काही पर्याय सुचतो आहे का?
सातपुड्यात प्रचण्ड चारोळी
सातपुड्यात प्रचण्ड चारोळी पिकत असे. लहानपणी आदीवासी लोक चारं घेउन येत विकायला. मूठभर चारोळ्या खिशात खाऊ म्हणून अनेकदा मिळत.
शेंगदाण्याचा कूट वापरतात तसा चारोळीचा वापरता येतो भाजीला लावायला. सॅलडमधेही नट्स म्हणून घालता येतील.
चारोळीच्या वड्या करतात साखरेच्या पाकात. किंवा चिक्की.
हसू नका. एक रिच ग्रेव्ही
हसू नका. एक रिच ग्रेव्ही करताना खसखस नाही हे ऐनवेळी लक्षात आलं तेव्हा चारोळ्या मिक्सरमध्ये वाटून वेळ मारून नेली. करंज्या ,लाडवांतही वापरतात. कुकीज, नानकटाईतही चालाव्यात
चारोळीचा कूट? मस्त कल्पना
चारोळीचा कूट? मस्त कल्पना आहे. (अर्थात बंगालीत चारोळीला काय म्हणतात ते आधी शोधलं पाहिजे)
रच्याकने, अति अवांतरः
चारोळीचा सगळ्यात जुना पुरावा महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगात मिळतो - साडेतीन हजार वर्षांपूर्वी. तेही चारं चरत असणार आणि बहुदा चारोळ्या पण
काजूच्या साटोर्या करतात
काजूच्या साटोर्या करतात तश्या चारोळीच्याही करतात. पण चारोळीचा कूट वगैरे केला आणि एखादी जरी खवट असली तर सगळ्याचीच चव खराब होते. अखंड वापरल्या कि एखादी खराब निघाली तरी फारसे बिघडत नाही.
पुडाच्या वड्या नको तर आपल्या पद्धतीने केलेल्या कोथिंबीर वड्यातही वापरता येतील.
पण चारोळीचा कूट वगैरे केला
पण चारोळीचा कूट वगैरे केला आणि एखादी जरी खवट असली तर सगळ्याचीच चव खराब होते.
<<
आधी थोडी थोडी चव घेऊन पहायची प्रत्येक चारोळीची. हाकानाका
चारोळीचा सगळ्यात जुना पुरावा
चारोळीचा सगळ्यात जुना पुरावा महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगात मिळतो - साडेतीन हजार वर्षांपूर्वी.
<<
इंटरेस्टिंग.
आमच्या लहानपणी म्हणजे अर्ध्या शतकापूर्वी घनदाट जंगल अन सागवान, आंबा, पळस, चारोळी, मोहाची अमाप झाडी असलेला सातपुडा अक्षरश: १५-२० वर्षांत नागवला गेलाय मा. वनमंत्र्यांच्या कृपेने....
दोनशे ग्रॅम चारोळ्या रोज
दोनशे ग्रॅम चारोळ्या रोज चमचा-चमचा खाऊन संपतील.
सांडगी मिरची मुडाखिच्या फोडणीत घातली तर खिचडी ऑस्सम लागते.
आमटीसाठी फोडणी करशील तेव्हा फोडणीत खमंग परतून बाजूला काढून ठेव, मग वरण फोडणीत घाल. आमटी भातावर घ्यायच्या आधी त्यात ती सांमि चुरून घाल, मिटक्या मारत खाशील.
भम, मी आतापर्यंत ३-४ वेळा मलई
भम, मी आतापर्यंत ३-४ वेळा मलई कोफ्ता करी केली होती तेव्हा ग्रेव्हीत दोन-दोन चमचे चारोळ्या वाटून घातल्या होत्या.
भोपळीमिरची-कांदा मिक्स भाजी
भोपळीमिरची-कांदा मिक्स भाजी फोडणीत लाल केलेला लसूण + आमसूल + कुळथाचं पीठ पेरुन अशीही करते अधूनमधून. मस्त लागते.
चारोळी तोंडाला उगाळून लावली
चारोळी तोंडाला उगाळून लावली तर चेहरा गुळगुळीत होतो. तिघींना लावता येईल. खरच.. जोक नाही. आणि खऊट चारोळी निघाली तरी लेपाला चालेल.
चारोळी उगाळायची कशी?
चारोळी उगाळायची कशी?
चारोळी उगाळायची??!!!!! एवढी
चारोळी उगाळायची??!!!!! एवढी पिल्लूशी असते की. चेहरा नाही बोट गुळगुळीत होतील गं.
भिजवलेली चारोळी दूध-केशरात वाटून (मिक्सरवर) लेप ऐकला होता. नवरीला लावतात.
चारोळी उगाळायची ????
चारोळी उगाळायची ????
वरदा, तेही चारं चरत असणार >
वरदा, तेही चारं चरत असणार > म्हणजे काय गं. खरच कळलं नाही. (आणि साडेतीन हजार वर्षांपूर्वी.मिळालेला चारोळी चा पुरावा म्हणजे खायच्याच ना कि कवितेतल्या?)
तळायच्या मिरच्या उपम्यात आणि
तळायच्या मिरच्या उपम्यात आणि गाजराच्या कोशींबिरीत नेहेमी घालते मी. ऑस्सम चव येते. या मिरच्या नुसत्या हिरव्या मिरचीला पर्याय म्हणून वापरून बघ, पदार्थाचा मेकोव्हरच होतो!
(आणि साडेतीन हजार वर्षांपूर्वी.मिळालेला चारोळी चा पुरावा म्हणजे खायच्याच ना कि कवितेतल्या?)>>
खाण्याच्याच असाव्यात. इन्टरेस्टिंग माहिती वरदा. थँक्स!
चारोळी उगाळायची??!!!!! एवढी
चारोळी उगाळायची??!!!!! एवढी पिल्लूशी असते की. चेहरा नाही बोट गुळगुळीत होतील गं.
>>
साडेतीन हजार वर्षांपूर्वी.मिळालेला चारोळी चा पुरावा म्हणजे खायच्याच ना कि कवितेतल्या?
>>>
सांगता येत नाही. पेपर नाही
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
तसं असेल तर तेंव्हा ते काय उगाळायचे म्हणे?
(No subject)
चारोळ्या लिहिलेला ताम्रपट
चारोळ्या लिहिलेला ताम्रपट उगाळत असतील. कैच्याकै.
कहर आहे! तेव्हा उगाळली
चारोळ्या उगाळायला नका लावू
चारोळ्या उगाळायला नका लावू बायानो, फारच खटोटापाची रेस्पी होईल
ग्रेवीत घालून संपवून टाकायची आयडिया आवडलेली आहे. धन्यवाद.
शर्मिला, ग्रेव्हीसाठी वाटशील
शर्मिला, ग्रेव्हीसाठी वाटशील तेव्हा मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली काढून गंधासारखी चेहर्याला लावून टाक
अर्र्र्र विषय संपलाय तरी एक
अर्र्र्र विषय संपलाय तरी एक फाको (आवरत नाहीये म्हणुन )
चारोळ्या लिहिलेला ताम्रपट उगाळत असतील.
>>
सोनं वगैरे उगाळून वापरलेलें चांगलं असतं म्हणे सतेज चेहर्यासाठी.... तसच तांब्याचंही की काय?
Pages