घरातून निघतानाच जरा धाकधूक वाटत होती.ट्रिपला निघायचं तर पाऊस थांबलेलाच हवा. मागचा पूर्ण आठवडा सलग पाऊस पडत होता. माझ्या एका सहकार्याने सांगितलही होतं,या वर्षीचा पाऊस वेळ काळ पाहून आलेला नाही. उत्तर इस्राईल मध्ये काही ठिकाणी पूरही आलेला. पण आमचा दौरा दक्षिणेकडचा होता...बरंच म्हणायचं...पावसाच्या निरुत्साही वातावरणातून बाहेर पडायला आमच्यासोबत ३० जण तयारच होते...
सकाळचं वातावरण 'कूल' होतं. गारठा होताच, पण बोचरी म्हणावी अशी हवा निदान नव्हती...पण आम्ही चाललो तरी कुठे होतो म्हणा... ज्या वातावरणात आता होतो त्याच्या विरुद्ध...कृषीभूमीच्या वैराण आणि उजाड वाळवंटात...म्हणजेच नेगेव ला... सकाळी ८ वा. आम्ही दक्षिणेकडे कूच केली. सोबत गाईड्, आमचे देशी-विदेशी संशोधक मावळे आणि रसदेसह बस असा सगळा लवाजमा होता. काही टूरीस्टपण होते. ९ वाजेपर्यंत ढगाआड लपलेल्या 'सुर्व्या' ने डोकावून पाहिलं... हुश्श... पंधरा दिवसांनी त्याचा लख्ख चेहरा दिसल्यावर काय छान फिल आला.
काले मेघा काले मेघा...
थांबून एके ठिकाणी ब्रंच घेतलं...आज सगळ्यांनी काम बाजूला ठेवलेलं...बस-टूरमधला पेटंट गेम अंताक्षरी मनात आलं तरी खेळू शकलो नाही... देश वेगळे... भाषा वेगळी...गाणी नाही पण गप्पा सुरु होत्या.
नेगेव चा मूळ अर्थ हिब्र्युमध्ये 'कोरडा" असा होतो, शिवाय 'दक्षिण' असाही अर्थ आहे (इति आमचा गाईड)...गाईडचाच उत्साह पोतंभर. सगळे व्हिसीटींग सायंटीस्ट आणि परदेशस्थ आहेत म्हटल्यावर त्याने पण त्याचा डोक्यातला गूगलबाबा फुल स्पीडने प्ले केला. रस्ता तसा विराण होता. हळूहळू पिवळसर लॅटेराईटची मैदानं दिसू लागली. वार्यासोबत भुरभुरणारी माती आणि बुटूकबैंगण काटेरी झुडपं म्हणजे नेगेवची सुरुवात.
नेगेवला गेलं की, छोटी बसक्या पद्धतीची घरं दिसतात. एक घर दुसर्या पासून काही ठराविक अंतरावर. प्रत्येक घराच्या अंगणात गवताचेभारे,शेळ्या-मेंढ्या,लाकडं वगैरे...! ही मालमत्ता होती 'बेडॉईन्स'ची...एक वाळवंटी अरब-सिरीयन भटकी जमात. सतत जागा बदलणारे. याच ठिकाणी इस्राईलची भूदलप्रशिक्षण संस्था आहे. इस्राईलचं सैन्य जगात भारी का ते इथे येऊन बघा. अशा रफ-ट्फ वातावरणात प्रशिक्षण मग आणखी काय निपजणार…
पुढे लागतो तो हा अन अविदात राष्ट्रीय उद्यानाचा भाग. (En Avedat National Park)
बियर ग्रील चँलेंज पाहता ना...?त्यात त्याचं एक वाक्य असतं. अशा भागात पाऊस जरा जरी पडला तरी मोठा पूर येतो. अशा जागांवर फार वेळ थांबू नका वगैरे...त्याची प्रचिती. आदल्या दिवशी येऊन गेलेल्या पुराच्या खुणा. वाळूमध्ये पाणी लगेच जिरुन जातं.
Nubian Ibex :
वाळवंटी भागात आढळणारी शेळी. आठवण आली ती आपल्या निलगीरी तहर ची.
ये हसी वादियाँ,ये खुला आसमाँ... चपखल बसत होतं गाणं...
या वैराण वाळवंटात हा सुरेख पाण्याचा झरा व त्याचा धबधबा. पाण्यातील सुंदर प्रतिबिंबांची दृश्य.
दोन डोंगरांमधून गेलेला ओढा. अत्यंत खारट पाणी आणि याच पाण्यावर वाढणारी झाडे इथे दिसतात.
हायकिंगसाठी अरुंद पायर्या पाडलेल्या आहेत.या चढता येतात मात्र उतरता येत नाहीत. माथ्यावर असलेल्या वाहनतळापासून गाड्यांची सोय आहे.
अगदी वरून घेतलेला एक टॉप-स्नॅप
आमची पुढची भेट होती मिड्रेशेत, डेव्हिड बेन गुरीऑन यांच्या थडग्याला. इस्राईलची स्थापना ज्यांनी केली आणि याच देशाचे पहिले पंतप्रधान. आज ते असते तर इस्राईलचा, तिथल्या लोकांचा त्यांना निश्चितच खणखणीत अभिमान वाटला असता. मी कधी तुलना करीत नाही पण उगाच भारत आठवतो अशा वेळी. जेरुसलेमसारखी पुण्यभूमी सोडून 'मला नेगेवच्याच मातीत जमा होऊ द्या' म्हणणारे गुरीऑन. अब्राहम लिंकन, महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला या तीन महान व्यक्तींचा त्यांनी कायमच आदर्श ठेवला. शेजारीच त्यांची पत्नी पॉलाचीही समाधी आहे. याच भागात सोलार एनर्जी रिसर्च सेंटर आणि अॅग्री-बायोटेक रिसर्च सेंटर आहे. इवल्याशा इस्राईलमध्ये आणखी काय काय बघायला मिळणार याची लांबलचक यादीच बनते.
वाळवंटातील सुंदर शहर
सौरऊर्जेचा भरपूर वापर इथे केला जातो. भुसभूशीत भागात केलेले हायवे आणि टिकाऊ रस्तेपण.
सर्वात मोठे विवर (crater)-
जगात अशी सहा विवरे आहेत पैकी पाच इस्राईल मध्ये असून एक इजिप्त मध्ये आहे. इथे हिब्र्यू मध्ये यालाच 'माखतेश' असं म्हणलं जातं. आजुबाजूचे डोंगर चुनखडी आणि मधली जमीन वाळू पासूनच्या खडकाने बनलेली आहे. भूगोलात आपण भूरूपे आणि त्यांचे क्षरण शिकलो. इथल्या कमी पावसाने आणि जोराच्या वादळवार्यानी इथे वळ्या-वळ्यांची कलाकुसर करुन ठेवली आहे. खनिज आणि सुर्यप्रकाशात त्यांचे मनमोहक रंग दिसतात.
थोडी मौज-मजा
जवळच थांबलेली बस... ड्रायव्हरला पेनांचा नाद असावा.
त्याचं हे पेनाळं.
माखतेश च्या शेवटी एक नदी आहे. त्याभोवती वाढलेली अकॅशियाची झुडपं. हा आमच्या हाईकचा शेवटचा टप्पा.
ही बिळं बहुदा कृदंतवर्गीय प्राण्याची असावीत.एखादवेळेस नेगेव श्र्यू किंवा उंदीर. झुड्पाखाली ओलावा-थंडावा असतो म्हणून त्याखाली हे 'लोक्स' घरं करतात. अशी बरीच बिळं तिथे होती बहुधा. खाली जाळं असावं. समोरच सँड स्पायडरचा 'मौत का कुआ' दिसतोय. या गोलाकार वाळूच्या विहिरीत किडा पडला की फसतो. जितका बाहेर पडायचा प्रयत्न करेल तेवढी वाळू त्याला 'ट्रॅप' करुन ठेवते. शिकार मिळालीच म्हणून समजा.
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा...
अशी सुरेख संस्मरणीय संध्याकाळ. थकवा कसा उरेल ब्वा.
त्या सुंदर जागेचा निरोप घेऊन परत उत्तरेला निघालो. नेगेव आठवणीत राहणार होतं.
अप्रतिम! लिहिते रहो...!
अप्रतिम!
लिहिते रहो...!
सुरेख!! डोंगर कि पाणी
सुरेख!!
डोंगर कि पाणी खेळण्यासारखी जागा
निशःब्द! नुसते आशिया-युरोप
निशःब्द! नुसते आशिया-युरोप आणी अमेरीकेतले फोटोरुपी सौन्दर्य पाहुन असे वेगळे काही अद्वितीय, रम्य असु शकते हे स्वप्नवतच होते. पण हे फोटो पाहिल्यावर याच्या प्रेमात हरवुन जायला होतय. अजून येऊ द्या.
मस्त आहे..
मस्त आहे..
वॉव! वेगळ्याच प्रदेशाची झलक
वॉव! वेगळ्याच प्रदेशाची झलक दिसली.
मस्त!
मस्त!
आउटस्टँडिंग...
आउटस्टँडिंग...
अदभुत आहे हे.
अदभुत आहे हे.
मस्त आहेत सगळेच फोटो. या
मस्त आहेत सगळेच फोटो.
या वैराण वाळवंटात हा सुरेख पाण्याचा झरा व त्याचा धबधबा. पाण्यातील सुंदर प्रतिबिंबांची दृश्य>>> ह्याखालचे ३-४ फोटो तर जबरीच आहेत.
खरेच अप्रतिम. मला जायचेय इथे
खरेच अप्रतिम. मला जायचेय इथे (पण) !
पुर्वी इस्रायलच्या व्हीसानंतर बाकीच्या अरब देशांचा व्हीसा मिळत नसे. ते विमानही त्या देशांवरून उडू शकत नसे. अजूनही तसेच आहे का ?
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना
दिनेशजी,अजूनही तसेच आहे .... नवीन पासपोर्ट बनवावा लागतो... इस्राईलची सर्व विमाने खूप उंचावरुन उडतात (अरब देशांमार्गे)किंवा समुद्रावरुन जातात...
पुर्वी इस्रायलच्या व्हीसानंतर
पुर्वी इस्रायलच्या व्हीसानंतर बाकीच्या अरब देशांचा व्हीसा मिळत नसे >> याच्या उलटंही होत असेल ना?
पुर्वी इस्रायलच्या व्हीसानंतर
पुर्वी इस्रायलच्या व्हीसानंतर बाकीच्या अरब देशांचा व्हीसा मिळत नसे >> याच्या उलटंही होत असेल ना?>>> हो ..अरब देशात जाउन आलेल्या लोकांना सुद्धा इस्राईलचा व्हीसा मिळत नाही
निसर्गा, मस्त फोटो. अजून
निसर्गा, मस्त फोटो. अजून माहिती येऊ द्या त्या देशाची. तुम्ही हिब्रू शिकताय का?
Sunder
Sunder
धन्यवाद.... हिब्र्यूचा कोर्स
धन्यवाद.... हिब्र्यूचा कोर्स वगैरे नाही लावलाय अजुन पण आसपासचे लोक आणि सहकारी शिकवतात ...
खुप छान फोटो, काही ठिकाणी
खुप छान फोटो,
काही ठिकाणी (सिंगापुर मध्ये) इस्राईलचा व्हीसा एका वेगळ्या कागदावर देतात, त्यामुळे तुम्हाला बाकीच्या देशात जायला त्रास होत नाही. पण इस्राईल मध्ये ईन् आणि आउट चा स्टॅप मात्र पासपोर्ट वर मारतात .
अमेरिकेत आमच्या गावात ८०% लोक ज्यु असल्याने सरकारी शाळेत १ वर्ष हिब्रु शिकणे सक्तीचे आहे. मुलीच्या शाळेतले अरब पण ती भाषा शिकतात. शाळेत बरेच इस्राईल ची मुले असल्याने मुलाना पण त्या देशाचे कुतुहल आहे.
साहिल शहा, तुमचं मुक्काम
साहिल शहा, तुमचं मुक्काम पोस्ट कुठे? आमच्या टाऊनमध्ये अमेरिकेतलं सगळ्यात जास्त ज्यू पॉप्युलेशन आहे असं विकी मागे म्हणत होतं.
मुक्काम पोस्ट
मुक्काम पोस्ट beachwood,
89.5% ज्यु आहेत. (https://en.wikipedia.org/wiki/Beachwood,_Ohio#cite_note-13) शाळेला सगळ्या ज्यु सणाना पण सुट्टी असते. कदाचित तुमच्या कडे त्याहुन जास्त असतिल
मस्त फोटोज एका वेगळ्याच
मस्त फोटोज
एका वेगळ्याच प्रदेशाची रम्य सहल आवडली . लिहित रहा अजून
जुईश सणांना आम्हांलाही
जुईश सणांना आम्हांलाही सुट्ट्या असतात पण शाळेत हिब्रू शिकायची सक्ती नाही, शिकवला जात नाही. त्यामुळे कदाचित तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त % असावं.
अप्रतिम.
अप्रतिम.
आहाहा... ऑस्सम!!!!!!!!!!
आहाहा... ऑस्सम!!!!!!!!!!
आहाहा... ऑस्सम!!!!!!!!!!
आहाहा... ऑस्सम!!!!!!!!!!
धन्यवाद.. __/\__
धन्यवाद.. __/\__
मस्त..
मस्त..
शेवटचा फोटो मस्तं..
शेवटचा फोटो मस्तं..
मस्त फोटोज एका वेगळ्याच
मस्त फोटोज
एका वेगळ्याच प्रदेशाची रम्य सहल आवडली . लिहित रहा अजून >>>>+१११११
अरे व्वा....हेही मस्तच!
अरे व्वा....हेही मस्तच!