युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किन्वा ची उपीट/ बिर्याणी सोडून अजून काही सोपी रेसिपी? माबो वर सर्व पाहिल्या. पण मुळात किन्वा ची चव नाही आवडली घरी विशेष. पीठ करून काही करता येईल का धिरडे टाईप्स..आणि सकाळच्या नाश्त्याला ८ च्या आत होईल असं काहीतरी Wink

अकु, सगळ्या वाचल्या पण ज्यात किन्वा आख्खा लागेल अशी पाकृ नकोय Happy पिठात काय मसाला घातला कि काम होऊन जातं (असं वाटतंय) Wink एक चटणी असली कि डोसा, धिरडे छान लागतात. नुसता किन्वा दळायचा का भिजवून डोश्याच्या पिठासारखा भरडायचा..कोणी केलेत का हे प्रयोग?

किन्वाच्या आणखी काही रेसिपीस. सगळ्याच नाष्ट्याला चालतील अशा नाहीत, माहिती म्हणून लिंक्स देते आहे-
http://www.maayboli.com/node/51743 किन्वाच्या काही रेसिपीज
http://www.maayboli.com/node/21639 किन्वा खिचडी (डाळ-तांदूळ खिचडीसारखी)
http://www.maayboli.com/node/24483 किन्वा खिचडी (साबुदाणा खिचडीसारखी)
http://www.maayboli.com/node/45269 किन्वा पॅटिस
http://www.maayboli.com/node/51875 अ‍ॅझ्टेक किन्वा बोल
http://www.maayboli.com/node/47546 या धाग्यावर संकलन आहे किन्वा वापरून करायच्या पाककृतींचे. तिथेच कुणीतरी इडलीचं प्रमाण दिलं आहे.

भाजणीच्या किंवा ज्वारीच्या थालिपीठासाठी पीठ भिजवताना त्यात शिजवलेला किन्वा घालावा. नुसत्या किन्व्याची थालिपीठ तुटली असं कुणी तरी मायबोलीवरच लिहिलं होतं म्हणून हे वर्क अराउंड Happy

माझा नवरा एक महिन्यासाठी जर्मनीला जातोय, पहिल्यांदाच जाणार आहे, त्याला बरोबर काय काय देऊ? थोडाफार स्वयंपाक सुद्धा शिकवायचा आहे, सध्या त्याला कुकर लावणे आणि चहा हे सोडुन काहीच येत नाही. अजुन १५ दिवस आहेत. मदत करा, प्रश्न चुकिचा जागी असल्यास समर्पक धागा सुचवा.

गृहकृत्य-अदक्ष नवरा गटास सँडविचचे प्रकार सोपे पडतील. एखाद-दोन चटणी पाकिटे द्यावी लागतील.

असा डोमेस्टीकली चॅलेंज्ड एक इंटर्न भारतातून आला होता. येताना ३५ पाकिटे मॅगी, ३५ एमटीआर पाकिटे घेऊन आला होता. ३१ दिवसांचा महिना पर "रात बेरात भूक लगी तो क्या करू?" म्हणून ४ एक्स्ट्रा!!! Happy

मुग्धा, इंस्टंट ढोकळा पीठ, इडली पीठाची पाकिटे दे. संगीता तयार पीठे मिळतात त्यातही बरेच अॉप्शन्स असतात. बेबी कूकर आणि आपले घरचे मसाले दे म्हणजे पटकन खिचडी करता येईल.
पण भरमसाठ काही ओझं देऊच नका, तिकडे मिळतं बरंच काही. Happy

३५!! Proud
आमच्या बेटर हाफला स्वयंपाक येतो पण हॉटेल स्टे होता .. नो किचन अ‍ॅटेच्ड म्हणुन मग
मेथीचे थेपले (फ्रिज असल्याने आठवडाभर राहिले व्यवस्थित नंतर त्यालाच खायचा कंटाळा आला) ,बेसन लाडु, बाकरवडी नि सटरफटर, रेडीमिक्स उप्मा, मॅगी दिले होते..
म्युनिक्मधे हॉलिडे ईन हॉटेल शेजारीच 'काश्मीर ईन' नावाचे पाकिस्तानी रेस्तराँ आहे..मस्त जेवण मिळते तिथे .. हा रोज संध्याकाळी तिथेच जेवायचा .. दुपारी ऑफिसमधे Happy

मुग्दधा, खरंतर यावर एक बीबी काढायला हवा आहे. आमचे घरधनी थोडेफार स्वयंपाककुशल असल्याने कधी फार जाणवत नाही, पण येणारे काही ज्युनिअर्स अगदीच चहा कसा करू या प्रश्नानं भांबावलेले असतात. मध्यंतरी एका किचन चॅलेंज्ड आतेबहिणीला वर्षभर युरोपात रहायचे असल्याने आठ दहा दिवसांत स्वयंपाकाच्या बर्‍याच टीप्स व्हॉट्सअ‍ॅप मार्फत देत होतो. अजूनही काही अडल्यास ती व्चारतेच. पण साध्यासुध्या गोष्टी ज्या रेसिपीबूक्समध्ये कधीच लिहिलेल्या नसतात अशा बेसिक गोष्टींबद्दल बीबी काढूया का?

गृहकृत्य-अदक्ष नवरा गट .... सीमंतिनी लै भारी शब्द दिलास आज नवर्‍याला खुप चिडवणार.
अगं तो मॅगी खात नाही. एमटीआर देईन बरोबर. आशुडी आणि चनस म्हणाली तस पण देता येईल. तसा तो नॉनव्हेज प्रेमी आहेच. खिचडी आणि आमटी करायला शिकवणार आहे.

खरचं धागा काढायला हवा, खुप उपयोग होईल.
माझा नवरा लग्नाआधी मित्राबरोबर रहायचा तेव्हा त्याचा एक रुममेट जो अगदी जवळचा बालपणीचा मित्र आहे तो उत्तम स्वयंपाक करतो, तो अगदी प्रेमाने खाउ घालायचा आणि माझा नवरा भांडी घासायचा Proud Proud त्यामुळे कधीही स्वयपाक करायच्या फ़ंदात पडला नाही.

जौद्या. बाफची प्रस्तावना परत वाचली आत्ताच. चुकीच्या प्रश्नाबद्दल स्वारी.
टायटलात योग्य बदल केला तर बरं पडेल Happy

दीमा, बाफ़चा ग्रुप आहे पाककृती आणि आहारशास्त्र; शब्दखुणा स्वयंपाकघरासंबंधी आहेत. त्यामुळे ९९.९९% युक्त्या त्याच्याशीच संबंधित आहेत. अधूनमधून वेगळे प्रश्नही आहेत. टायटलात कोणता बरं बदल करावा असं सुचवताय?

तुमची शंका कोणती आहे याचं उगाचंच कुतुहल वाटतंय आता Proud

@मुग्धा - पुण्यात आहेस का ? अशील तर direct दुकान सांगते
१. आजकाल फ्रोझेन पोळ्या मिळतात . २४ तास फ्रीज बाहेर राहिल्या तरी चालतात . परत डीप फ्रीज मध्ये ठेवायच्या. महिनाभर राहाव्यात .
२. Heat & Eat मध्ये बरेच options आहेत
३. घरी मसाले भात / खिचडी परतून, गार करून १ वेळेला पुरेल अशी पाकिटे बनवून देणे . डीप फ्रीज मध्ये ठेवून हवी तशी शिजवून खाणे ( कांदा / भाजी न घालता)
४. पिठले, आंबाडीची भाजी, पोहे सुद्धा मला दिसल्या होत्या . फक्त पाणी घालून शिजवणे .
५. खिचडी प्रमाणे उपमा / उपीट पण देता येयील.

मुग्धा, पुण्यातील देवश्री फूडस ची उत्पादने चांगली आहेत. उकळते पाणी घातले की, पोहे,वाटली डाळ उपमा, शिरअ, मूग डाळ खिचडी इत्यादी तयांर. मुंबईत असाल तर मी एक सेट तुम्हाला देउशकेन. विपू करा प्लीज.

धन्यवाद मृणाल १ आणि अमा, मी पनवेल मध्ये राहते.
सध्या उपमा आणि खिचडी कोरडी पाकिटे करुन देइन असा विचार आहे. उपमा आधी कोरडा करुन वापरलेला आहे पन खिचडी कशी करायची? कोणाकडे सविस्तर कृती असेल तर द्या ना प्लीज.

अमांना बहुतेक धनश्री फूड्स म्हणायचे आहे. हो त्यांची उत्पादने छान आहेत. मी वापरून बघितली आहेत. मुगडाळ खिचडी, मसालेभात,पोहे,सबुदाणा खिचडी यांची चव चांगली आहे.
मला स्टार बझार मध्ये मिळाली.

नन्दिनी बाफ लगेच काढ. काही टिप्स देऊ शकु.

मुग्धा, खालच्या लिन्क बघ. भात आवडत असेल तर बरेच आहे. परदेशातही फ्रोझन पराठे मिळतात. अशोका फुडस चुकुनही ट्राय करु नका, त्यापेक्षा इथले सल्ले बघा.

http://www.maayboli.com/taxonomy/term/1817

http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/264

या वरील लिन्कमधल्या सोप्या भाताच्या कृतीन्ची प्रिन्टच मारुन दे की नवरोबाला.

मुग्धाकेदार, नवर्‍याला कुकरला डाळ-तांदूळ लावता येतात ना? त्यासोबत बटाटे? मग त्याला बेसिक येतंय.
मूगडाळ +तांदूळ + मीठ एकत्र करून लावल्यास खिचडीची कच्ची तयारी होते. नंतर शिजवलेल्या तांदूळ मूगडाळीच्या मिश्रणातत थोडे पाणी घालून उकळले व वरून तेल / तूप, जिरे, मिरे, दालचिनी, तमालपत्राची फोडणी व किंचित हळद घातली की गरमागरम खिचडी तयार होईल. नेहमीसारखी लागणार नाही, पण बरीच जवळची.

उकडलेले बटाटे फोडी करून तेलात परतायचे, वरून तिखट मीठ मिरपूड, हवा असल्यास एखादा मसाला भुरभुरायचा किंवा चाट मसाला / जलजिरापूड वगैरे. झाले एक तोंडीलावणे तयार. किंवा त्याची भाजी करा, मॅश करून दही-जिरेपूड-मिरपूड-मीठ घालून रायते करा, किंवा नुसता बटाटा मीठ लावून खा.

डाळ कुकरला शिजवता येत असेल तर वरण / डाळ कांदा / फोडणीचं वरण वगैरे पुढचा प्रकार सोपा आहे.

पोळीऐवजी ब्रेड / होल व्हीट / मल्टी ग्रेन ब्रेड नाही का खाऊ शकत महिनाभरासाठी? (सुरुवातीच्या दिवसांत आठवडाभरासाठी फ्रोझन पोळ्या नेऊ शकतात. पण दिवसाला किमान ४ - ५ याप्रमाणे आठ दिवसांच्या ४० पोळ्यांचे वजन वगैरे बघून घ्या.)

फोडणीत भाज्या व तांदूळ, मसाले परतून कितीपट पाणी घालून कुकरला शिजवल्यास झटपट मसालेभात / खिचडी / पुलाव होतो ते नवर्‍याला शिकवा.

सूप्सची भरपूर पाकिटे द्या. गरमागरम नूडल्स व सूप्स हे पोटभरीचे काँबो. अंडे खात असेल तर अंडे उकडायला, स्क्रँबल्ड / हाफ फ्राईड एग करायला किंवा ऑम्लेट करायला शिकवा. फ्रेंच टोस्टही सोपा प्रकार आहे. फोडणीचा ब्रेड / ब्रेड उपमा करायला शिकवा.

खाकरे सोबत देता येतील. वरून तेल / तूप व चटणी लावून खाता येतील. उडदाचे पापड सोबत द्या (पापड भाजायला शिकवून). भूक नाही भागली तरी क्विक एनर्जीसाठी चांगले आहेत.
चिक्की-बार्स, लाडू, शंकरपाळे, वड्या वगैरे नेहमीचे फराळी प्रकार तर आहेतच.

पुरणपोळ्या ८-१० दिवस तरी टिकू शकतात. त्याही देता येतील. तिखटमिठाच्या पुर्‍याही सहा-सात दिवस बर्‍या टिकतात. भोपळ्याचे घारगे सहा-सात दिवस टिकू शकतात. (फ्रीजबाहेर)

परंतु हे प्रकार जास्त तेलातले / तळलेले वगैरे असल्यामुळे व वारंवार खाल्ल्यामुळे अ‍ॅसिडिटीही होण्याची शक्यता आहेच.

Dhanashree is now Devashree. >>
मला वाटलं चिन्मय 'जुना आयडी == नवा आयडी' अशा जोड्या देतोय की काय म्हणून सावरून बसलो. Proud

धन्यवाद अकु तुम्ही खुप उपयोगी महिती पोस्ट केलीत. नवर्‍याला पोळ्या लागतातचं पण पुरणपोळ्या विशेष आवडीने खात नाही. फ़्रोजन पोळ्या म्हणजे नेहमीसारख्या घडीच्या पोळ्या करुन फ़्रीज करायच्या का?

Pages