तुझ्यावरची कविता

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

तुझी कविता .. तुझ्यासारखीच
अगदी आठवणीनं जपून ठेवलेली.
पण कितीही शोधली
आत - बाहेर,
तरी नाहीच हाती लागत शेवटी

तुझ्यावरची कविता ...
ती ही अगदी तुझ्यासारखीच !
अखंड शोध; आत - बाहेर
नुसतेच भास; आत - बाहेर
नाहीच सापडत शब्दांत शेवटी ..

शब्दांचे मात्र बघवत नाहीत हाल;
ते अगदी माझ्या वळणावर.
आत - बाहेर घुटमळतात
घुसमटतात;
कधी हुरहुरत
कधी हुळहुळत ...

प्रकार: 

जीयो दोस्त!

तुझ्यावरची कवीता मस्तच ... बर्याच वेळेस मला वाटत कितिही लिहिली तरी सुरुच होत नाही... नमनाच गाडाभर तेल... शब्द आणि आपण दोन्ही निसरडे होत रहातो..... मस्त रे आवडलीच!

धन्यवाद !

श्रीमंतः अगदी अगदी ...

BTW, यंदा मायबोलीच्या दिवाळी अंकाला सुट्टी आहे का? कुठेच काही लिहिलेलं दिसलं नाही त्याबद्दल म्हणून विचारलं.