युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उतप्पे आधी जरा कोमट करून मग रोल किंवा तुकडे डब्यात भरायचे नाही तर चिकटतात. >> मधे एकेक पार्चमेंट पेपरचा तुकडा ठेवते मी .

अवांतर, मी जॉब करत नसते तेव्हा मुलींना दुपारचे जेवण ताजे गरम गरम नेऊन देते. सगळ्या शाळेत माहीत आहे आता. अर्थात शाळा अगदी जवळ असल्याने हे शक्य आहे. मोठीला आता आवडत नाही मी डबा घेऊन गेले तर >>>>
वत्सला, अस अलाऊ करतात का शाळेत? आमच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगितल जात, रोज शाळेत येवू नका. (हा रुल नाही. कर्टसी म्हणुन पाळा .) प्रत्यक्ष मुलांबरोबर जेवायला तर नाहीच पण इव्हन रोज डबा ड्रॉप करायला सुद्धा.
मुल डिस्टर्ब होतात, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन वर ताण पडतो इत्यादी कारण.

>>आमच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगितल जात, रोज शाळेत येवू नका. (हा रुल नाही. कर्टसी म्हणुन पाळा .) >>
आमच्या इथे उलट परीस्थिती. शाळेत मुलांबरोबर लंचला या असे आवर्जून सांगतात. फक्त कॅफेटेरीयातले जेवण मिळण्यासाठी सकाळी ९ पर्यंत कळवावे लागते. बरेच पालक शिफ्टमधे काम करणारे. मुलं दुपारी घरी जाईपर्यंत एक पालक दुसर्‍या शिफ्टला कामावर, घरी येइपर्यंत मुलं झोपी गेलेली. त्यामुळे एलिमेंटरी स्कूलमधे मुलांबरोबर वेळ घालवायला, स्टाफशी गप्पा मारायला बरेच पालक लंच ब्रेकमधे यायचे. बाकी डबे आणि विसरलेल्या वस्तू द्यायला पालक येत असायचे ते वेगळे. पण पॅरेंट वॉलेटियर्स असायचे मदतीला.

अल्पना, धन्यवाद. तुझी पोस्ट वाचून मला आठवले की मलाही डबा खरेदी करावी लागणार आहे. Happy

आशू, इकडे काही दिवसांनी एवढी थंडी असेल की तव्यावरची पोळी पण पानात पड़ेपर्यंत कोमट होईल. तेव्हा डब्यासाठी हा एवढा खटाटोप करावाच लागतो. Proud इकडचे शिक्षक आणि डॉक्टरही हा खटाटोप करतात. Wink

सीमा, हो. आमच्या शाळेत डबा नेऊन द्यायला परवानगी आहे. पण मी त्यांच्याबरोबर जेवत नाही. आठवड्यातले चार दिवस असा डबा नेऊन देते. पैकी दोन दिवस दोघीनच्या वर्गात मदत करते. लंच घेऊन गेले की शाळेतच थांबते. इतर दिवशी त्यांचे जेवण होईपर्यन्त स्टाफ रूम मध्ये थांबते किंवा ऑफिस मध्ये मदत करते. माझ्याकडे वर्किंग विथ चिल्ड्रन चेक (वालंटियर आणि प्रोफेशनल) आहे. त्यामुळे स्कूल एडमिन ला प्रॉब्लम नाही.
पण त्याचे लंच सुरु असताना मात्र मी कटाक्षाने त्यांच्या वर्गात थांबत नाही. इतर मुलांना (आईची आठवण येऊन) त्रास होऊ नये म्हणून.

बाई मधेच पळून गेल्याने घरात बरच ज्वारीच पीठ उरलय.. भाकरी सोडून त्याच काय करता येइल?
शीळी आमटी घालून थालिपीठ हा प्रकार झाला आहे.. अजून काहीतरी मला करता येतील असे पदार्थ सुचवा Happy

दह्यात साखर घालुन खाणे.. व्यतिरिक्त दही कसे खावे? म्हणजे गोड न करता आणखी काय करता येइल?
दही म्हणजे दहीच हं .. ताक करुन नाही.

दह्यात मीठ घालून खाणे, दह्यातला काकडी कांद्याचा टोमॅटोचा रायता करणे, दह्यात खर्डा घालून खाणे. बुंदी रायता करणे. दह्यात पुदिन्याची चटणी घालून खाणे. चाटमसाला/आमचूर मसाला शेंदेलोण पादेलोण घालून खाणे.

अवनी, ज्वारीच्या पीठात थोडे बेसन अथवा तांदळाचे पीठ मिक्स कर. ताक-मीठ-मसाले-वगैरे घालून नीट कालवून घे. कन्सिस्टन्सी साधारण इडलीच्या पिठाइतकी. मग त्याचे नॉनस्टिक तव्यावर छोटे जाडसर डोसे घाल.

दह्यात मेतकूट घालून.
दहीभात
दहीपोहे (हिरवी मिरची + कोथिंबीर)
दही हा बेस असलेल्या ग्रेव्हीज.
काकडीची कोशिंबीर.

परातीत ज्वारीच्या पिठाचा डोंगर करून अवनीची बाई पळून गेली असं दृश्य माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं Proud

मी अशक्य हसतेय हे इमॅजिन करून..
डोसे करून बघते उद्याच.. बादवे ते डोसे डब्यात न्ययला कित्पत सोईचे आहेत ४ च्या खाण्या करता?

ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी मस्त होते. नेहेमीच्या फोडणीवर (जरा सढळ तेलाच्या) , शेंगदाणे खमंग तळून; ज्वा पी खमंग भाजून उकडपेंडी करायची. आंंबटपणाकरता ताक + पाणी असं वापरायचं. भक्कम आधार असतो या डीशचा. सकाळी खाल्ली तर पार दुपारपर्यंत भूक नाही लागत Happy

अवनि,ज्वारीच्या पीठाची आंबोळी छान लागतात. भरपूर कोथिंबीर मस्ट आहे. बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, जीर्,मीठ घालुन पातळ पीठ कालवून आंबोळी घालायची . शक्यतो बीडाच्या तव्यावर. चिकटत असतील तर नॉन स्टीक वर. मस्त लागतात. आजी श्रावणात करायची . तेव्हा ताजी कोथिंबीर शेतातून यायची ती घालून.
नाहीतर सरळ वांगी भाजून घ्यायची भरताची. त्यात ज्वारीच पीठ मिक्स करुन थालीपीठ/धपाटे. एका मिनिटात संपेल ज्वारीचे पीठ.
सोलाणे मिक्सर मध्ये काढुन ते ज्वारीच्या पीठा घालुन त्याची थालीपीठ तर अतिशय छान लागतात.

सोलाणे मिक्सर मध्ये काढुन ते ज्वारीच्या पीठा घालुन त्याची थालीपीठ तर अतिशय छान लागतात - मस्त लागेल. पण सोलणे किती लागतील . सोलता सोलता काहीच हाती लागत नाही सगळे सोलणे तोंडीच लागतात

आज ज्वा.पी. ची उकड केली होती नाश्त्याला .. मस्त झाली होती Happy
उद्या घावन्/डोसे/आंबोळ्या करुन बघेन..

खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे

सोलाणे मिक्सर मध्ये काढुन ते ज्वारीच्या पीठा घालुन त्याची थालीपीठ तर अतिशय छान लागतात.
>> सोलाणे म्ह्ण्जे काय?

मट्रेल काय आहे? साबणाच्या पाण्यानं पुसून मग वेट वाइप्सनं पुसले तर जातील.

माझ्या आधीच्या घराचे कॅबिनेट्स बाहेरून खूप स्टिकी होते. सोडा+लिंबाचा रस किंवा डिशसोप घातलेल्या पाण्यानं अनेकवेळा पुसल्यावर तो चिकटपणा गेला. २-३ महिने तरी जाणवायचाच हाताला.

Pages

Back to top