Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिंक द्यायला जर प्रॉब्लेम
लिंक द्यायला जर प्रॉब्लेम येतोय
गुगल सर्च केल्यावर सापडेल
www smiley lol com सर्च करताना मधे . देऊ नकोस
LOL
LOL
काल त्या रोह्न्याच्या बायकोचे
काल त्या रोह्न्याच्या बायकोचे वडिल म्हणाले, "हिच्या तोंडात तीळ भिजत नाहीत तुमचे कौतुक करताना" .
काय्तरी चुकतंय ऐकायला...तीळ भिजत नाहीत हे एखादे गुपित सांभाळता येणार नाही ह्यासाठी वापरतात ना? इथे कसे काय?...( इंद्रधनुष्य झाले वाटते)
काल त्या रोह्न्याच्या बायकोचे
काल त्या रोह्न्याच्या बायकोचे वडिल म्हणाले, "हिच्या तोंडात तीळ भिजत नाहीत तुमचे कौतुक करताना" .>>
हो, पण याचा लेखक कुठेही काहीही शब्द वापरतो. '
तीळ भिजत नाही' हे त्याने कुठेतरी ऐकले असेल अन् कॅची वाटले म्हणून इथे वापरले.
ए हो, मलाही झाल. तीळ भिजत
ए हो, मलाही झाल.
तीळ भिजत नाही' हे त्याने कुठेतरी ऐकले असेल अन् कॅची वाटले म्हणून इथे वापरले. >>>>
मनाली स्मायलीज भारी आहेत कालचा अख्खा एपिसोड लग्नात फुकट घालवला उगाचच आणि कलाबाईंचा थयथयाट ५ मिन्टात आवरतील..
कलाबाईंचा थयथयाट ५ मिन्टात
कलाबाईंचा थयथयाट ५ मिन्टात आवरतील..>>> काल मुद्दाम पूर्ण भाग पाहिला. कलाबाईंचा हतबल झाल्याचा अभिनय, चिडचिड पहायला धमाल आली. भारीच उभं केलंय ते कॅरॅक्टर. पिंट्याचे सासरे वैभव मांगले चे नातेवाईक आहेत काय
हो, स्पेशली पंतांशी फोनवर
हो, स्पेशली पंतांशी फोनवर बोलताना आणि बोलुन झाल्यावरची चिडचिड एकदम क्लास. आजचा तिचा थयथयाट ५ मिन्टात आवरतील.. आणि बाकीची २५ मिन्ट टिपे गाळणे कार्यक्रम सुरु राहील.
पिंट्याच्या सासर्यांचा चेहरा
पिंट्याच्या सासर्यांचा चेहरा गिट्सच्या जाहिरातीतल्या गुलाबजामसारखा वाटतो नाही?
झाल का लग्न ?? जानी ताई
झाल का लग्न ??
जानी ताई रडल्या वगैरे की नाही .
खाली मान घालून टिपं गाळणं .मग श्रीचं तिच्याकडे वाकड्या मानेने बघणं , मग श्रीने तिच्याजवळ जाणं आणि काय झाल असं खूणेने विचारणं , परत जानुतै ने मान खाली घालून बळेच हसायचा प्रयत्न करून मान "नाहि नाहि " अशी डावीकडून उजवीकडे परत परत हलवणं , मग श्रीने तिला जवळं घेणं आणि तिथे जमलेल्या प्रत्येकाने तिच्याकडे काळजीयुक्त कवतिकमिश्रीत नजरेन बघणं .
हा असंख्य वेळा रिपिट झालेला सीन काल परत झाला का?
झालं लग्न. नवरी एकदम छान
झालं लग्न. नवरी एकदम छान दिसत होती. व मंदिरा चे व मूर्तीचे दर्शन मस्त प्रसन्न वाटले.
आईचा अभिनय एकदम टॉपक्लास. त्यांना दूर ठेवले जात आहे म्हणून उगीचच वाइट वाटले. आज त्रागा असेल्. व तो जस्टिफाइड ही असेल.
दोन बीएच के फ्लॅट मध्ये राहायला जाणे, अंगाला सोने असे कधी लागलेच नाही म्हणून अंग ठी घालून हर्षित होणे. ह्यात कितीतरी स्त्रियांचे मनोगत व्यक्त केले आहे. असा ही एक वर्ग आहे अजून समाजात.
पहिल्या सीन मध्ये आई आजी फार मस्त एक्स्प्लेन करतात की हा तुमचा प्रश्न कसा काय? जस्ट कीप डिस्टन्स अँड विश देम खूप कुटुं बांना ह्याची गरज आहे.
जानव्ही ची साडी सुरेख. पिंक विथ अ ब्रॉड जरी काठ. नवरीची पिव्ळी पण छान. मुंडावळ्या बांधल्या नाहीत पण.
अमा + १११११
अमा + १११११
जानी ताई रडल्या वगैरे की नाही
जानी ताई रडल्या वगैरे की नाही .
खाली मान घालून टिपं गाळणं .मग श्रीचं तिच्याकडे वाकड्या मानेने बघणं , मग श्रीने तिच्याजवळ जाणं आणि काय झाल असं खूणेने विचारणं , परत जानुतै ने मान खाली घालून बळेच हसायचा प्रयत्न करून मान "नाहि नाहि " अशी डावीकडून उजवीकडे परत परत हलवणं , मग श्रीने तिला जवळं घेणं आणि तिथे जमलेल्या प्रत्येकाने तिच्याकडे काळजीयुक्त कवतिकमिश्रीत नजरेन बघणं .
हा असंख्य वेळा रिपिट झालेला सीन काल परत झाला का?>>>
हे सगळं झालं, श्री सोडून सगळ्यांचं थोडं थोडं चमचाभर का होईना रडून झालं. त्यामुळे काही क्षण नक्की कोण सासरी चाललं आहे, पिंट्या की सुनिता असं कन्फ्युजन ही झालं !
त्यामुळे काही क्षण नक्की कोण
त्यामुळे काही क्षण नक्की कोण सासरी चाललं आहे, पिंट्या की सुनिता असं कन्फ्युजन ही झालं ! >>>>
अमांच्या अख्ख्या पोस्टीला +१
अमा सुरेख पोस्ट जानी देवळात
अमा सुरेख पोस्ट
जानी देवळात घुसल्यावर सारखी भारावल्यागत श्रीदाढ्या कडे पहात होती ते पाहून रागच येत होता. इतकं काय सारखं भारावून जायचं ते? भराभरा दर्शन घेऊन बाहेर यायचं ते नाही, नुसती ठुमकत नाटकं करत बसायचं.
त्यापेक्षा ती सुनिता कित्ती सुंदर दिसत होती आणि नखरे पण नाही करत.
काल चक्क कलाबाई दरवाजा निदान
काल चक्क कलाबाई दरवाजा निदान लोटताना तरी दिसल्या, बाकीच्या मालिकात कधी कोणी कुलूप लावता-काढताना दिसत नाही आणि घरात कोणीही कधीही शिरून वाट्टेल ते ऐकू, बोलू शकतो.
ती सुनिता कित्ती सुंदर दिसत
ती सुनिता कित्ती सुंदर दिसत होती आणि नखरे पण नाही करत.>> + १
पण ती बोलायला लागली की अगदी नको वाटते. आवाज किती कर्कश आहे तिचा.
श्रीदाढ्या>>> श्रीदाढ्या,
श्रीदाढ्या>>>
श्रीदाढ्या, पिंट्या दाढ्या, अस्सं कस्सं झालं
अस्सं कस्सं झालं माझ्या नशीबी आलं..
---इति जानी
जानी देवळात घुसल्यावर सारखी
जानी देवळात घुसल्यावर सारखी भारावल्यागत श्रीदाढ्या कडे पहात होती >> आपण, आपले मूल आणि पति एकत्र एका पवित्र ठिकाणी पहिल्यांदाच येत आहोत. आपल्या मुलाला देवाचा आशिर्वाद मिळावा.
असे काही त्या कॅरेक्टरच्या मनात येत असेल. अशी शक्यता आहे. म्हणून बघत असेल नवर्याकडे.
ते देवाचे दर्शन आहे. शांतपणे घेतलेले बरे कि.
लग्नाच्या आधी च्या एपिसोड मध्ये श्री तयार असतो व जान्हवीला लवकर तयार हो म्हणतो. ती दोन साड्या दाखव ते तो ही सीन छान आहे. अगदी नॉर्मल वाटतो.
पिंट्या बाबांना तुम्ही आहात तेच किती मह त्वाचे आहे म्हणतो तो ही सीन छान आहे. दोन वेगळ्या जातीतले मीलन आ णि तरूण लोकांना आपला साथी सिलेक्ट करायचे फ्रीडम असायला हवे हे दोन चांगले मेसेज दिले गेले आहेत. असे धाडस न करू शकणा रे किती तरूण असतात त्यांना हुरूप येईल हे बघून..
पिंट्या बाबांना तुम्ही आहात
पिंट्या बाबांना तुम्ही आहात तेच किती मह त्वाचे आहे म्हणतो तो ही सीन छान आहे. दोन वेगळ्या जातीतले मीलन आ णि तरूण लोकांना आपला साथी सिलेक्ट करायचे फ्रीडम असायला हवे हे दोन चांगले मेसेज दिले गेले आहेत. असे धाडस न करू शकणा रे किती तरूण असतात त्यांना हुरूप येईल हे बघून..>>> पटेश
लग्नाच्या आधी च्या एपिसोड मध्ये श्री तयार असतो व जान्हवीला लवकर तयार हो म्हणतो. ती दोन साड्या दाखव ते तो ही सीन छान आहे. अगदी नॉर्मल वाटतो. >>> अजिबात नाही पटेश. नाही तेव्हा अती समजुतदार वागत असते. पिंट्याच्या सगळ्या गोष्टींना स्वतःला जबाबदार मानत असते आणि आता लग्नाची घाई आहे तेव्हा साडीचा गोंधळ घालते. इतर नॉर्मल लग्नात हे चालले असते पण ह्या गोंधळाच्या लग्नात नक्की कोणती साडी नेसू जरा अतीच वाटले.
अमा तुम्ही सगळे एपिसोडस पाहता
अमा तुम्ही सगळे एपिसोडस पाहता का या शिरेलीचे?
बारा महिने चोविस काळ ती जानी हेच एक्स्प्रेशन्स घेऊन फिरत असते. कुणी काळजी केली की हाच चेहरा, पिंट्याच्या लग्नाची काऴजी हा च चेहरा.... सगळी कडे हाच.
ओकारी येते तिच्या आती समंजसपणा दाखवण्याची. मिळमिळित आयुष्य नुसतं. एक वाद नाही का तंटा नाही. ६-६ बायका एकत्र रहात असून एक साधा वाद होत नाही, सतत एक वाक्यता हे काही पटत नाही. वरून कितीही उत्तम दिसणार्या कुटूंबात पण थोडी थोडी कटकट असतेच.
अगदी नुसतं शुट पुरतं एकत्र येणार्या या बायका कॅमेर्यासमोर मारे गोग्गोड बोलतात. सेटवर एकमेकींच्या झिंज्या उपटत असतील
पण तुला ते बघायची इच्छा आहे
पण तुला ते बघायची इच्छा आहे का दक्षिणा?
बारा महिने चोविस काळ ती जानी
बारा महिने चोविस काळ ती जानी हेच एक्स्प्रेशन्स घेऊन फिरत असते. कुणी काळजी केली की हाच चेहरा, पिंट्याच्या लग्नाची काऴजी हा च चेहरा.... सगळी कडे हाच.
>> चेहरा कसा बदलणार? मी पन्नास एक्कावन्न वरशे एकाच चेहर्याने सर्वत्र वावरते.
ओकारी येते तिच्या आती समंजसपणा दाखवण्याची. मिळमिळित आयुष्य नुसतं. एक वाद नाही का तंटा नाही
>> त्या वयोगटात कितीतरी मुली सुना माता असतात ज्या सगळीकडे नीट नाती राहावी म्हणून जपत अस्तात स्वतःला खर्च करत अस्तात. स्वतःचे राग लोभ दाखवत नाहीत किंवा दाखवू शकत नाहीत.
काही महिने आधीच ती सेपरेशन व कदाचित घटस्फोट परेन्त जाईल इतक्या टोकाच्या वादातून गेली आहे की. . एक बाबा, नवरा, पिंट्या व आई आजी, आणि गीता हे तिचे खरे फ्रेंड लिस्ट. बाकी
तिला अगदी काट्यातूनच चालावे लागते.आई ती तशी व सावत्र. बेबी भांडकुदळ, दोन बाव्ळट सासवा.
एक खरी सासू. अश्या मुली खूप सहन करत असतात. ती त्यांचे प्रतिनिधित्व करते.
वरून कितीही उत्तम दिसणार्या कुटूंबात पण थोडी थोडी कटकट असतेच.
>> बेबी आहे की. बेबी आणि तिच्या भावाचा संवाद ऐकला का? तो तिला खूप छान समजावतो.
माणसे धरून ठेवावीत छान आहे तो सीन.
गदी नुसतं शुट पुरतं एकत्र येणार्या या बायका कॅमेर्यासमोर मारे गोग्गोड बोलतात. सेटवर एकमेकींच्या झिंज्या उपटत असतील>> मला नाही वाट्त. ते मुंबईचे प्रोफेशनल्स आहेत. काम केले. हाय हलू बाय. पैसे घेतले. काम खतम. लंचला वगैरे जात असतील उलट.
जानीचे कौतुक करणार्यांमधे वाढ
जानीचे कौतुक करणार्यांमधे वाढ अधी फक्त मामा होते आता अमा पण आल्या
इथे जितकी निगेटिव्हीटी आहे
इथे जितकी निगेटिव्हीटी आहे तितकी प्रत्यक्ष सीरीअल मधे नाही.
ओकारी, आदळ आपट झिज्या उपट, जीव दे फासावर लटक. वाचून बोअर झाले. शो इज नॉट दॅट बॅड इतकेच.
अमानी डिटेलिंग छान लिहिलंय
अमानी डिटेलिंग छान लिहिलंय मात्र. मी बघत नाही पण वाचायला आवडलं.
अमा तुम्ही सीन उत्कृष्ट लयदार लिहू शकाल सिरीयलचे.
अमा छान लिहिलं आहेत . पणही
अमा छान लिहिलं आहेत .
पणही सिरियल खरच फार गुळवणी वाटते .
ओकारी येते तिच्या आती समंजसपणा दाखवण्याची. मिळमिळित आयुष्य नुसतं. एक वाद नाही का तंटा नाही
>> त्या वयोगटात कितीतरी मुली सुना माता असतात ज्या सगळीकडे नीट नाती राहावी म्हणून जपत अस्तात स्वतःला खर्च करत अस्तात. स्वतःचे राग लोभ दाखवत नाहीत किंवा दाखवू शकत नाहीत >> कबूल . पण कुठेतरी मनातून अस्वस्थ असतिलच ना. कधीतरी तो राग , असंतोश बाहेर येतो . सासूशी भांडणार नाही , पण एकटी असल्यावर तरी. नवर्यावर तरी. ते पण नाही.
श्री-जानु ची भांडणे पण फारच लाडेलाडे वाटतात .
श्री नको तेवढा गुणी वाटतो.
आई आजी तेवढ्या एकच प्रॅक्टिकल वाटतात .
कलाबाईचा थयथयाट पटतो पण रोजच्या आयुश्यात अतिशयोक्ती वाटेल .
बेबीची भांडणे पटतात.
यापेक्शा "जुयेरेगा' जास्त जवळची वाटायची.
अमा चेहरा बदलता येत नाही
अमा चेहरा बदलता येत नाही माहित आहे, मी हावभावांबद्दल बोलते आहे.
आणि खरंच माझ्या ३०-३५ वर्षाच्या आयुष्यात असली गोड गिट्ट सून पाहिलेली नाही.
जाऊ दे बाकी तुमच्या मताचा मला आदर आहे.
मी आज विनोद वाचला की
मी आज विनोद वाचला की फ्लिपकार्ट आता त्यांचं स्लोगन बदलणार आहे.
नविन स्लोगन असं आहे
"डिलिव्हरी जाह्नवी च्या आधीच"
डिलिव्हरी जाह्नवी च्या
डिलिव्हरी जाह्नवी च्या आधीच>>>>> flipkart ka mazyyamate aliexpress ne theval tari chalel ki
पहिल्या सीन मध्ये आई आजी फार
पहिल्या सीन मध्ये आई आजी फार मस्त एक्स्प्लेन करतात की हा तुमचा प्रश्न कसा काय? जस्ट कीप डिस्टन्स अँड विश देम खूप कुटुं बांना ह्याची गरज आहे. > बाकीचं माहीत नाही, पण "तो त्यांचा प्रश्न आहे" हा डायलॉग त्या बाईने ह्या सिरीयलमध्ये वेगवेगळ्या वेळी 'य' वेळा म्हटला असेल. त्यातून कोणी काही शिकत नाही. फीलर भरायचे म्हणून तसले प्रसंग असतात.
Pages