गणपती बाप्पा ssss मोरया!
मंगलमूर्ती ssss मोरया!
श्रावण सुरू झाला की तुम्हा-आम्हाला सगळ्यात मोठे वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे .. लहान मुलांपासून ते अगदी वडीलधार्या मंडळींपर्यंत, समाजातल्या कुठल्याही स्तरांतल्या व्यक्तीला गणपती बाप्पा हे सगळ्यात लाडकं दैवत वाटतं .. गणेशोत्सवातल्या ह्या दीड किंवा पाच किंवा दहा किंवा काही काही ठिकाणी एकवीस दिवसांतला क्षणन् क्षण भारावून टाकणारा असतो .. गेली कित्येक वर्षं आपण गणेशोत्सव साजरा करतोय पण तरीही दरवर्षीचा गणेशोत्सव नेहमीच एक नविन अनुभूती देऊन जातो ..
आदल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत जागून केलेली आरास असो वा गणेशचतुर्थीच्या दिवशीचं ताला-वाद्यातलं आगमन असो, प्रतिष्ठापना असो, पहिली आरती असो, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असो, बाप्पाजवळ बसून केलेलं प्रसाद वाटण्याचं काम असो, रोजच्या आरत्या, रात्र रात्र जागून सादर केलेले किंवा आस्वाद घेतलेले कार्यक्रम असोत आणि अगदी महाआरती आणि 'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ..' म्हणत दरवर्षी दिलेला भावपूर्ण निरोप असो... दरवर्षीचा गणेशोत्सव एक सुखद, प्रफुल्लित करणारा आणि नव्याने पुन्हा वर्षभर वाट बघायला लावणारा एक अनोखा सोहळा असतो !!
तेव्हा तुमच्या मनातल्या, घरातल्या, कॉलनीतल्या, आळीतल्या, देशातल्या, विदेशातल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हां-आम्हां सगळ्यांना घडवून आणा .. लिखीत, छायाचित्रीत, ध्वनीमुद्रीत अगदी कसल्याही स्वरुपात ..
तसेच, घरी किंवा कॉलनीत, तुम्ही कार्यरत असलेल्या गणेश मंडळांकडून केल्या जाणार्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिलीत तर उत्तमच!
उदा. एखादे गणेश मंडळ निर्माल्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणाचे भान ठेवून काम करत असेल तर त्यापासून मायबोलीकरांना आणि इतरांनाही प्रेरणा घेणे शक्य होईल.
सगळ्यांचे छान नैवेद्य आणि
सगळ्यांचे छान नैवेद्य आणि सजावटी. श्रद्धा, मोदक, फुले सुरेख. लाजो, मोदक आणि लाडू बर्फी मस्त दिसत आहेत, आणि ते ठेवलेली तबकेही.
हा आमच्या घरचा गणपती.
हा आमच्या घरचा गणपती.
बाप्पाच्या दर्शनाने दिवसाची
बाप्पाच्या दर्शनाने दिवसाची सुरु झाली..
सगळ्यांचे बाप्पा आणि प्रसाद् , नैवेद्य मस्तंच..
लहानपणापासुन लग्नं होईपर्यंत मला बाबा २१ गणपती दाखवायला घेऊन जायचे दरवर्षी...:)
चेन्नईत करतात साजरा गणेश उत्सव पण खुप प्रस्थ नाहीए..त्यामुळे यावेळी २१ गणपतींचं दर्शन राहुन जाईल की काय असं वाटत होतं..
मा बो करां मुळे मात्र मला २१ गणपतींचं ऑनलाईन दर्शन झालं..सगळ्यांना धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया!!
ऋनी, प्रिती, मनुस्विनी, आर्च,
ऋनी, प्रिती, मनुस्विनी, आर्च, परागकण, लालू...खुप धन्यवाद. फुलं सध्या ऑफिसमधे वाटली आहेत. हातात घेई पर्यन्त खरीच वाटत होती सगळ्यांना. आणि मोदक पुरणपोळ्या तर माझ्या आई ची खासियतच. प्रयत्न चालु आहेत तिच्या जवळपास जाण्याचे
परागकण 'आ' तसाच असुदे...सध्याच्या दिवसात त्यात काही न काही गोड-धोड पडायचे भरपुर चान्सेस आहेत
हा माझ्या घरचा गजवदन!
हा माझ्या घरचा गजवदन!
सर्व माबो करांचे गणपती पाहुन
सर्व माबो करांचे गणपती पाहुन खुप आनंद झाला , दुरदेशी आपली संस्क्रुति टेकवणार्या या सर्वांना खरा सलाम !!!!! माझ्याघरी दर चार वर्षांनी बाप्पा येतात आनि मग मधलीतीन वर्ष मात्र त्यांच्या आठ्वणीत बाकी.... पण इथे हा उत्सव पाहुन मन दोन वर्ष मागे गेले
बाप्पा मोरया सर्वांकडे असाच आनंद राहु द्या
अशाच आरत्या अन मोदक प्रसाद होउ द्या
मस्त गणपती आहेत!! युगंधर आणि
मस्त गणपती आहेत!!
युगंधर आणि श्रद्धादिनेश : देखणी मुर्ती अन आकर्षक सजावट्...खूप आवडली !!!
हा आमचा गणपती..... हा सजावट
हा आमचा गणपती.....
हा सजावट झाल्यावर..
वा घरी केलेले गणपती एकापेक्षा
वा घरी केलेले गणपती एकापेक्षा एक सुंदर आहेत. तुम्ही सगळे लोक मुर्ती बनवण्याची थोडी माहीती द्याल का ?
कुठल्या प्रकारची माती वापरता.. शाडूचा गणपती म्हणतात तो कुठल्या मातीचा असतो.. ती वापरली का?
रंग कुठले वापरले.. इ. जरा करुन पहावं असं वाटतंय.. माती कालवायला काय वापरता..वेगवेगळे भाग चिकटवायला काही वापरायला लागतं का वगैरे..
छान आहेत सगळ्यांचे गणपती !
छान आहेत सगळ्यांचे गणपती !
माझ्या आई कडे गौरी गणपती
माझ्या आई कडे गौरी गणपती असतात.
गणपती गौरींबरोबर विसर्जन होतो.
लहानपणीचे मस्त धमाल केलेले दिवस आठवतात इकडे !!
माझ्या बाबांनी ही फुलांची रांगोळी काढली आहे !! (गालीचा)
हे काही फोटो !!
गालीचा काय सुरेख काढला आहे.
गालीचा काय सुरेख काढला आहे.
सुरेख आहेत ग पल्लवी सगळेच
सुरेख आहेत ग पल्लवी सगळेच फोटो.
(No subject)
Runi मी थोडा sequnce change
Runi मी थोडा sequnce change करत होते. लावलेत परत !!
(No subject)
अतिशय सुरेख गालिचा!.
अतिशय सुरेख गालिचा!.
गालिचा सुंदर ..
गालिचा सुंदर ..
गालिचा खुपच सुरेख. सगळ्यांचेच
गालिचा खुपच सुरेख. सगळ्यांचेच गणपती छान आहेत.
हा आमच्या घरचा
हा आमच्या घरचा गणपती.
प्रशांत
आणि हि मुर्ति पुजेनंतरची.
आणि हि मुर्ति पुजेनंतरची. आरास साधीशीच आहे.
माझ्या कडचा गणपती आणि
माझ्या कडचा गणपती आणि खड्याच्या महालक्ष्मी!
सगळ्यांचे बाप्पा मस्तच. घरी
सगळ्यांचे बाप्पा मस्तच.
घरी मुर्ती बनवणार्या कलाकाराना तर सलामच.
छान गणपती बनवले आहेत.
अमृता यानी जो रंग दिलाय त्यामुळे अष्टविनायकातील गणपती असल्याचा फील आलाय.
खुपच छान गणपती आहेत.सगळेच!
खुपच छान गणपती आहेत.सगळेच!
अहाहा, किती ती रुपे बघायला
अहाहा, किती ती रुपे बघायला मिळताहेत इथे
खास करुन ज्यान्नी स्वतः बनविली मूर्ति, त्याचे विशेष अभिनन्दन
या वर्षी अनेकानेक कारणान्नी मला घरि मूर्ति बनविता आली नाही, तसेच सजावटीवर देखिल फारसे लक्ष देता आले नाही!
तरीही यन्दा बरेच वर्षान्नी प्रथमच देवघरातून बाहेरच्या खोलीत येऊन स्थानापन्न केलेल्या आमच्या गणपतीची ही "इको फ्रेण्डली (?)" आरास
काल झकोबाच्या क्यामेरातुन टिपायचा केलेला एक अयशस्वी प्रयत्न!
-----------------------------
----------------------------------
हा आमच्या मुंबईचा घरचा बाप्पा. आई पप्पा मुंबईला जावून साजरा करतात दर वर्षी. आईला चालता येत नसले व कितीही बरे असो वा नसो ,ती कशी तरी उभे राहून जागरण करून सजावट ,बप्पाला मस्त दागिने घालून सजवणे,रवा बेसन लाडू,मोदक,रोज नवीन रांगोळी,नेवेद्य सर्व अगदी ७ दिवस पुर्णपणे एकटीने घरीच बनवते वगैरे करत असते. ह्या वर्षी फक्त तीन दिवस आधी जावून सर्व तिने केले हिच गणेशाची कृपा.
धन्यवाद राधा पल्लवी, फुलांचा
धन्यवाद राधा
पल्लवी, फुलांचा गालीचा सुंदरच.
आमच्याकडे गणपतीचे हे तिसरे
आमच्याकडे गणपतीचे हे तिसरे वर्ष. पुण्या,मुंबई ला आमच्या दोघान्च्या घरी गणपती , गौरी असतात. इकडे आल्यावर दरवर्षी खूपच आठवण यायची. त्यातून वरमॉन्ट सारख्या ठिकाणी केवळ आम्ही ७-८मराठी कुटुंबं असल्याने गणेशोत्सव साजरा होत नव्हता.
म्हणुन मग ३ वर्षांपुर्वी आम्ही गणपती मांडायला सुरवात केली. गौरी विसर्जनाच्या दिवशी गणपती विसर्जन करतो. एक दिवस आमच्याकडे मोठी आरती होते.
यावर्षी सासू सासरे इकडे आहेत त्यामुळे गौरी ही होत्या.
तसचं आम्ही सगळी इथली मराठी मंडळी मिळुनसुद्धा एक दिवस गणपती साजरा करतो.
राधाजी, धन्यवाद!! घरी
राधाजी, धन्यवाद!!
घरी केलेल्या मूर्त्या म्हणजे लै भारी. मिनूंना अनुमोदन..खरंच घरी हे कसं काय करू शकतात (आणि तेही इतकं सही) याची उत्सुकता आहे.
किती वेगवेगळे प्रकार ते
किती वेगवेगळे प्रकार ते गौरींचे ! मी गेले वर्षी टाकले होते महालक्ष्म्यांचे फोटो पण ह्यावर्षी फोटो काढले नाहीत कुणाकडे राशींच्या गौरी, कुणाकडे खड्यांच्या,चांदीच्या छोट्या उभ्या असलेल्या ... अनेक प्रकार!! हे वरचे पितळी मुखवटे खूप सुंदर आहेत..
Pages