गणपती बाप्पा ssss मोरया!
मंगलमूर्ती ssss मोरया!
श्रावण सुरू झाला की तुम्हा-आम्हाला सगळ्यात मोठे वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे .. लहान मुलांपासून ते अगदी वडीलधार्या मंडळींपर्यंत, समाजातल्या कुठल्याही स्तरांतल्या व्यक्तीला गणपती बाप्पा हे सगळ्यात लाडकं दैवत वाटतं .. गणेशोत्सवातल्या ह्या दीड किंवा पाच किंवा दहा किंवा काही काही ठिकाणी एकवीस दिवसांतला क्षणन् क्षण भारावून टाकणारा असतो .. गेली कित्येक वर्षं आपण गणेशोत्सव साजरा करतोय पण तरीही दरवर्षीचा गणेशोत्सव नेहमीच एक नविन अनुभूती देऊन जातो ..
आदल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत जागून केलेली आरास असो वा गणेशचतुर्थीच्या दिवशीचं ताला-वाद्यातलं आगमन असो, प्रतिष्ठापना असो, पहिली आरती असो, उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असो, बाप्पाजवळ बसून केलेलं प्रसाद वाटण्याचं काम असो, रोजच्या आरत्या, रात्र रात्र जागून सादर केलेले किंवा आस्वाद घेतलेले कार्यक्रम असोत आणि अगदी महाआरती आणि 'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ..' म्हणत दरवर्षी दिलेला भावपूर्ण निरोप असो... दरवर्षीचा गणेशोत्सव एक सुखद, प्रफुल्लित करणारा आणि नव्याने पुन्हा वर्षभर वाट बघायला लावणारा एक अनोखा सोहळा असतो !!
तेव्हा तुमच्या मनातल्या, घरातल्या, कॉलनीतल्या, आळीतल्या, देशातल्या, विदेशातल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हां-आम्हां सगळ्यांना घडवून आणा .. लिखीत, छायाचित्रीत, ध्वनीमुद्रीत अगदी कसल्याही स्वरुपात ..
तसेच, घरी किंवा कॉलनीत, तुम्ही कार्यरत असलेल्या गणेश मंडळांकडून केल्या जाणार्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिलीत तर उत्तमच!
उदा. एखादे गणेश मंडळ निर्माल्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणाचे भान ठेवून काम करत असेल तर त्यापासून मायबोलीकरांना आणि इतरांनाही प्रेरणा घेणे शक्य होईल.
हा आमचा घरचा
हा आमचा घरचा बाप्पा-
नैवेद्य
गणपती बाप्पा मोरया!!
वाह!!! मस्त!!!! गणपती बाप्पा
वाह!!! मस्त!!!!
गणपती बाप्पा मोरया!!!!
नमस्कार, घरी गणपती बसले
नमस्कार,
घरी गणपती बसले असतील. बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा झाली असेल. आता आरतीची वेळ..
लोकहो, आपली मदत हवी आहे....
टाळ-मृदूंगाच्या साथीने, झांजांच्या गजरात आपल्या घरातल्या, मंडळातल्या आरत्या रेकॉर्ड करून आम्हाला पाठवा.
त्या आपल्याला गणपतीच्या मांडवात वाजवता येतील.
धन्यवाद.
~ गणेशोत्सव संयोजन समिती
लालू, मस्तच.. हा आमच्या
लालू, मस्तच..
हा आमच्या घरचा.. गणपती बाप्पा मोरया!!!
हा आमच्या घरचा गणपती.
हा आमच्या घरचा गणपती.
माझ्या सासरी गणपती नसतात. पण लग्न झाल्यापासून मी दरवर्षी पूर्ण दहा दिवसांचा गणपती बसवते. कारण श्रीगणेशावरील श्रद्धा. माझ्या बाबांचं नाव बाप्पाच्या नावांपैकी एक असल्याने की काय देवाशी एक वेगळेच नाते आहे असे वाटते. ऑफिस असेल तर रोज सकाळ/संध्याकाळचा प्रसाद/आरती वगैरे करायला जर्राशी पळापळ होते. पण मग सकाळच्या आरतीला एखादे फळ आणि संध्याकाळच्या आरतीला घरी केलेला प्रसाद असे असते. अगदी पहिल्या वर्षी गणपती बसवला तेव्हा घरच्या गौरी-गणपतींच्या आठवणीने मी आरती म्हणायचे सोडून रडतच बसले. आणि अगदी आजपर्यंत प्रत्येकवेळी गणपती बसवला की डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत यंदा आमच्या बालगणेशाच्या भितीने सजावट काहीच केली नाही. मागच्या वर्षीच त्याच्यापासून बाप्पाला वाचवता वाचवता नाकी नऊ आले होते. तरी एके दिवशी 'बा काऊ' (बाप्पाला खाऊ- हे मीच शिकवले होते) म्हणून खेळण्यातली कोंबडी देवाला अर्पण बाप्पांनी अर्थातच हा "अगळा वेगळा नैवैद्य" गोड मानुन घेतला असणार
गणपती बाप्पा मोरया !!!
जर्मनीतला गणेशोत्सव :-
जर्मनीतला गणेशोत्सव :- माझ्या माहेरी गणपती नसतो , पण मला स्वतःला गणपती बसवायची नेहमीच इच्छा होती . योगायोग असा की सासरी १० दिवसांचा गणपती असतो . परंतु एकाही गणेशोत्सवासाठी भारतात जाता आलेले नाही . म्हणून मग गेले ३ वर्षे घरी १० दिवसांचा गणपती बसवत आहोत . या वर्षी आई बाबा इकडे आहेत . म्हणून मग आईने हाताने केलेले उकडीचे मोदक आणि माझे साच्यातले मोदक असा नैवेद्य होता . त्याचे हे फोटो .
पूजेत गणपतीच्या दोन मूर्ती असतात , ज्याचे विसर्जन करायचे ती मातीची मूर्ती भारतातून येते. इथे जर्मनीत ४ वर्षांपूर्वी ध्यानीमनी नसताना अचानक दुकानात गणपतीची लाकडी मूर्ती दिसली . म्हणून विकत घेतलेली पण ज्याचे विसर्जन होत नाही ती मूर्ती मखरात ( फोटोत ) मागे दिसतेय .
जेवणाच्या ताटाचा फोटो दुसर्या बाजूने काढल्याने अन्नाचा क्रम जरा नीट दिसत नाहीये .
आम्ही दीड दिवसाचा गणपती
आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. लहान चांदीची मूर्ती आहे त्याचीच पूजा करतो. यावर्षी एका मैत्रिणीच्या कृपेने मला दुर्वा मिळाल्या मस्त वाटले पूजा करताना. आज रविवार असल्याने सजावट, आरत्या, प्रसाद, नैवेद्य सगळ्याचीच रेलचेल आहे.
गणपतीचा फोटो नाही पण नैवेद्याचे पंचखाद्य आणि उकदीचे मोदक -
सगळ्यांचेच गणपती छान आहेत.
सगळ्यांचेच गणपती छान आहेत.
आज मित्रांबरोबर जॉर्जिया टेक
आज मित्रांबरोबर जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटी मधे गेलो होतो गणपतीला.
सुमारे ५०/६० मराठी मुलं/मुली आणि बाकीचं पब्लिक पण होतं. अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत सगळं होतं. गणपतीची आरास, पुजा, आरत्या, रांगोळी, एव्हडया सगळ्यांना पुरेल एव्हडं जेवण त्यात वरण भात, मसाले भात, पंचामृत, कोशिंबीर, पापड, खिर, प्रसादाला शिरा/ तळलेले / उकडीचे मोदक, अथर्वशिर्षाची आवर्तनं...!
सगळे जणं एकदम कडक traditional कपड्यांमधे.. आणि VIT, PICT, COEP इथली प्रचंड जनता असल्याने एकदम पुण्यात आल्यासारखे वाटत होतं. ! त्या बिल्डींग मधे बहूतेक सगळे विद्यार्थिच असल्याने एका घरात पुजा आणि बाकी ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती. सगळे जण रात्रभर जागून तयारी करत होते. Limited resources मधे एव्हडा स्वैपाक आणि इतकं सगळं नीट करणं खरच लई भारी.. !! गेले २/३ दिवस चाललेली मायबोली गणेशोत्सवाची तयारी आणि आजचा सकाळचा जीटेक गणपती त्यामूळे ह्यावर्षी जरा छान वाटतय... गणपतीचं वातावरण जाणवतय.
हे पहा १/२ फोटो..
गणपती बाप्पा
आणि हा प्रसाद
खूप छान वाटलं सगळ्यांचे
खूप छान वाटलं सगळ्यांचे गणपती, प्रसाद, सजावट पाहून. माहेरी दहा दिवसांचा गणपती, उभ्या गौरी सगळं असतं. सासरी फक्त गौरी. गणपती बसवत नाहीत. त्यामुळे इकडे पण आम्ही बसवत नाही. माहेरच्या गणपती गौरीची आठवण मात्र खूप येते.
सगळ्यांचेच गणपती मस्त आहेत..
सगळ्यांचेच गणपती मस्त आहेत.. एकदम प्रसन्न वाटलं सकाळी सकळी बाप्पाचे आणि प्रसादाचे फोटो पाहुन
आदमा,सहीच रे.. विद्यार्थी असुन हे सगळं त्यांनी जमवुन आणलं त्याचं विशेष कौतुक.....
आमच्या सिंगापुरातल्या घरी
आमच्या सिंगापुरातल्या घरी बसवलेला (आणि घरी मूर्ती घडवलेला) गणपती :
तिकडून :
इकडून :
पूजा मांडल्यावर :
फ दादा... नेहमीप्रमाणेच
फ दादा... नेहमीप्रमाणेच जबरी...
सह्हीच फ.
सह्हीच फ.
झ्क्कास आहेत
झ्क्कास आहेत सगल्यान्चे
गन्पती बाप्पा
ग्न्प्ती बाप्पा मोर्या!!!!!!!!!!!!!!
वा ! सगळ्यांचेच गणपती सुरेख.
वा ! सगळ्यांचेच गणपती सुरेख.
सुंदरच! फ, मूर्ती आणि पूजा
सुंदरच!
फ, मूर्ती आणि पूजा सुरेख!
वा प्रसन्न वाटले इथले गपणती,
वा प्रसन्न वाटले इथले गपणती, त्यांची आरास, नैवेद्य, प्रसाद, मोदक आणि तुमच्यातली श्रद्धा पाहून. अगदी केवळ!!!!!!
सुंदर मुर्ती आहेत एकेक !लालू,
सुंदर मुर्ती आहेत एकेक !लालू, संपदा तुमचे प्रसाद पाहुन तर तोंडाला पाणी सुटलं !
फ मुर्ती मस्त बनविली आहे. पण गणपतीला थोडेतरी पोट हवे होते नं !
गेले ३ वर्ष घरचा गणपती हुकला.
गेले ३ वर्ष घरचा गणपती हुकला. हल्लीच इथे आल्यामुळे हे फारच जाणवत होत आणि जुई पण मोठी होत्ये आपले सण तिला कळावेत म्हणुन गणपती बसवायच ठरवल.
मुर्ती मी घरीच बनवली आणि यंदा गणेशोस्तव झालाच पाहिजे अस मनात असल्याने बहुदा मुर्ती अपेक्षेपेक्षा सुंदर झाली.
गणपती बाप्पा मोरया!!!
मुर्ती रंगवण्याआधी
रंगवल्यानंतर
पुजेनंतर
धन्यवाद. फ, परशुरामाच्या
धन्यवाद.
फ, परशुरामाच्या रुपातली मूर्ती आहे ना? सुरेखच.
वा! अमृता, मस्तच. बरं झालं सुरुवात केलीस.
सर्वांचा उत्साह, विशेषतः त्या विद्यार्थ्यांचा, बघून छान वाटलं.
सगळ्यांचेच बाप्पा मस्त
सगळ्यांचेच बाप्पा मस्त आहेत.
व्वा अमृता, मस्त झालाय गणपती!!
|| श्री|| मला गणपतीला
|| श्री||
मला गणपतीला मुंबईला जायची इच्छा स्वाईन फ्लु चक्कर मध्ये ह्यावर्षीही पुर्ण झाली नाही. आई पप्पा पण ह्या गोंधळात अगदी तीन दिवसापुर्वी गेले मुंबईला मला सोडून. खूप वाईट वाटले, शुक्रवारी रडले पण. आई आधी म्हणायची थोडी जबाबदारी असते, पण काहीच त्रास वाटला नाही. घरी आमच्या ७ दिवस दर वर्षी गणपती असतो. आई पप्पा खास भारतातच जावून साजरा करतात, मी इथे आठवणीने रडायची मला जाता यायचे नाही काहीना काही कारणाने. १० वर्षे मुंबईतला गणपती खूप मिस करायची. रडत बसायची. रविवारी सकाळी मनाशी ठरवून मुर्ती आणलीच शेवटी. मग अगदी सर्व सामानाची बहीणीला विचारून, अर्धी चातुर्मास वाचून तयारीला सुरुवात. काहीच तयारी न्हवती,अगदी कुठे बसवायचे, टेबल पण म्हवते. मुर्तीला पाहूनच एकदम प्रेमात पडले असे झाले. घ्यावीच असे वाटले. तो पर्यन्त करावे का नाही ह्या विचारात गाडी चालवत होते. पण मनात इच्छा खूप असल्याने गणरायाचे आगमन झालेच. एकदम रेखीव मुर्ती मिळाली, प्राण प्रतिप्रतिष्ठा करून ह्यावरर्षी मी माझ्या घरी गणपती बसवला आवडीने. खूप मनाला छान वाटतेय. रव्याची उकड करून मस्त मोदक केले. तांदूळाच्या उकड पेक्षा जरा भारी आहेत करायला. सुट्टी ठोकून प्रसाद करायचाय आजचा. असो.
गणपती बप्पा मोरया!
सगळ्यांचे गणपती प्रसन्न आहेत.
सगळ्यांचे गणपती प्रसन्न आहेत. मस्त वाटतेय.
आमचे बाप्पा. मंगलमूर्ती
आमचे बाप्पा. मंगलमूर्ती मोरया.
हा आमच्याकडचा गणपती. फोटो
हा आमच्याकडचा गणपती. फोटो पुजा करण्यापुर्वी काढला आहे.
अमृता, सुरेख बनवला आहेस
अमृता, सुरेख बनवला आहेस गणपती.
आमचा बाप्पा. घरी
आमचा बाप्पा. घरी केलाय.
जवळुन
बाजुलाच हरितालिकेची पुजा मांडली आहे.
सगळ्यांचे गणपती सुरेख आहेत...
सगळ्यांचे गणपती सुरेख आहेत... अम्रुता गणपति कसा बनवलास्?छान आहे,रांगोळीसुद्धा अगदि कल्पक आहे..
काय एक से बढकर एक घरी
काय एक से बढकर एक घरी केलेले गणपती आहेत ! केवळ अप्रतिम .
आर्च, तुझे मोदक कुठायेत ? म्हणजे मोदकांचा फोटो ? तुझे मोदक पाहिले की मला अजून काय मजल गाठायची आहे हे कळतं .
Pages