होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि मालिका माझ्या अगदी डोक्यात जाते… सोशल मिडिया वर एवडे जोक्स येतात ह्यांच्या नावावर तरीही ह्या लोकांना 'काहीही' कस काळात नहि….
अरे कुठे नेउन ठेवलाय 'बाळ जान्हवीचा'…।

सोशल मिडिया? स्वरा, यावेळच्या झी मराठी अ‍ॅवॉर्ड्समध्ये आणि या आठवड्याच्या चला हवा येउ द्या मध्ये त्यांच्या तोंडावर त्यांची टर उडवलीय, लाईव्ह! तरी पण यांच दळण कै संपत नाही..

साबा म्हणत होत्या कि त्या १ नोव्हें. ला प्रक्षेपित होणार्‍या कार्यक्रमात दोघे शेजारी-शेजारी बसले होते.
मध्यंतरी ते एकमेकांच्या आसपासही दिसायचे नाहीत असल्या कार्यक्रमात.
बहुतेक सगळं सुरळीत झालं असावं (इति साबा).

>>> राहुल१२३ | 30 October, 2015 - 21:05 नवीन

जान्हवीचे बाळ आणि अच्चे दिन कधी येणार?
<<<

टीव्ही बंद केलात की

दोघेजण जानी आणि श्री नाचताहेत की गळ्यात गळा घालून त्या झी अ‍ॅवॉर्ड्स मध्ये....मलाही शंका आहे त्यांचा घटस्फोट कॅन्सल झालाय बहुदा!! नाहीतर असतील एवढे प्रोफेशनल....

ते मालीकेतील मुख्य "पात्र" आहेत म्हणून जवळजवळ बसलीत. >>>> भगवती, ते दोघे चला हवा येउ द्या मध्ये आले होते तेव्हाही मालिकेतील मुख्य पात्रच होती ती तेव्हा कुठे जवळ जवळ बसले होते? बघत पण नव्हते एकमेकांकडे

Chala hava yeu dya chi gosht vegaliye mugu

Hope ki tyancha divorce cancel ch zalela asava.
Tarihi ya nirikshananwarun cancel zala as mhanala yenar nahi.

तेजश्री ची नविन जाहिरात पहा तोच सोज्वालपनाच ! आणि पुरुषी मानसिकता तीच नवरयाला एवढा बायकोच्या कामाची काळजी वाटतंय तर स्वत का kaart नाही काम

AAdinath peksha 10-12 varshani mothi vatate ti tya Expert Bar chya add madhe. Tyachi bayko mhanun muli ch shobhat nahiye ti.

काल श्री, सिध्धीविनायक मंदीरात पिंट्याचे लग्न लावून देण्याविषयी बोलत होता, तेव्हा पिंट्याचे वय त्याने २५/२६ सांगीतले. जानीचे पण तेच बाळ २०१६/२०१७ साली येईल. जर पक्क वय, तारीख सांगीतली तर मायबोलीकर संदर्भासहीत स्पष्टीकरण देऊन कसे चुकीचे आहे हे सांगतील Biggrin

झी अॅवार्ड मध्ये पण जानी एकदम मंदासारखे वागत होती... वेड्यासारखं हसत काय होती आणि टाळया काय पिटत होती.. बावळटगिरी अंगात मुरलीय अगदी. Angry

निलेश साबळे गँगने या शिरेलीचे काॅमेडीच्या आधाराने अक्षरशः वाभाडे काढले. तरीपण निर्लज्जासारखे हसत होते सगळे.

सुधारण्याची शक्यता नाही कारण तेही त्यांना लोकांचे प्रेम वाटतेय. Angry

हो ना एवढी टर उडवली तरी त्यांना त्याच काहीच नाही ती जानी काय तो श्री काय आणि त्या सहा आया काय सगळे नुसते वेड्यासारखे हसत होते Sad ...ह्यातून काही बोध घेवून तरी मालिका लवकर बंद करतील अशी आशा आहे

निर्लज्जम सदा सुखी, अशी आहे ती सर्व टीम>> ++१...ते तर आहेच सगळे एका माळेचे मणी

तो दिग्दर्शक मंदे हल्लीच कोणत्यातरी मुलाखतीत सांगत होता, लोक नेहमी भरलेल्या झाडावरच दगड मारतात .... हे सगळे विनोद म्हणजे लोकांचं आमच्यावरच प्रेमच आहे Uhoh

Pages