होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्र अजुन ही सिरेल सुरुच आहे का? Rofl
सगळ्या कमेंट वाचल्या...
महाभारतात गांधारीचे असे झाले होते ना? अनेक महिने झाले तरी डिलीवरी नव्हती झाली का काहीतरी. मग इथे पण शंभर कौरव वगैरे येणार की काय? Wink

बाळ ठीक असाव यासाठी सुनिताने नवस केला गणपति ला. 5 व्यात सोनोग्राफी साठी नवस मग डिलीवरी ला काय???
यांच्या मानात आल तर स्वत: डिलीवरी करतील तिची काळजी पोटी .....

विकीवर मालिकेची माहिती बदलली आहे.
Then jahnavi's baby suffers a brain aneurysm and her baby dies. हे बुचकाळ्यात टाकणारे वाक्य काढुन टाकले आहे.
आता जान्हवी म्हणते त्याप्रमाणे २०१६ - २०१७ किंवा त्यानंतर कधीही बाळ होऊ शकते.

परवा प्रोमो add मध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम दाखवला होता .. म्हणजे सुधारणा आहे.. वर्षा दोन वर्षात होईल काहीतरी ...

या गो़खल्यांना घरकामासाठी नोकर परवडू नये? मोठी आई सोडल्या तर सगळ्या आया बाहेर असतात ना आपापले उद्योग सांभाळायला? मग स्वैपाक, धुणीभांडी यांच्यासाठी बाई परवडू शकत नाही? कपडे धुवायला मशीन आहे असं ऐकलं होते कुठल्यातरी भागात. पर्यावरणवादी श्रीला माणसांची कामं मशीनने केलेली बरी चालतात?

मोठी आई सोडल्या तर सगळ्या आया बाहेर असतात ना >> मोठी आई नै, श्रीची आई घरात असते. स्वयंपाक, धुणीभांडीसाठी नै अन् वरकामासाठीपण नै. सर्व बायका घरातच असायच्या त्यामुळे त्यांना नोकराची गरज पडली नै.

अहो अजून एक पात्र वाढेल ना चीकू! ती आणखी अक्कल शिकवायला लागेल सगळ्यांना! श्रीबाळाला तिचे वगैरे पटायला लागेल. पिंट्याच्या चकरा वाढतील. त्यात ती टोमणे मारायला लागेल की असली प्रलंबित डिलीव्हरी पाहण्यात नव्हती. बेबीआत्याचा येताजाता पाणउतारा करू लागेल ती. नाही ते प्रकार व्हायचे. राबूदेत ह्याच भवान्यांना!

बेफि Lol

मोठी आई सोडल्या तर सगळ्या आया बाहेर असतात ना आपापले उद्योग सांभाळायला? <<< हे कधी झाल?काय उद्योग करतात ह्या??

जानी डोक्यावर पडायच्या आधी तिने सगळ्यांना कामाला लावल होतं...

मोठी आई - बुटीक
छोटी आई - ऑफिसमध्ये काम करते बहुतेक सुपरवायजर
सरू - वधूवर सूचक मंडळ
बेबो - ब्युटीपार्लर
मोठी आई - बुटीक
छोटी आई - ऑफिसमध्ये काम करते बहुतेक सुपरवायजर
सरू - वधूवर सूचक मंडळ
बेबो - ब्युटीपार्लर

रश्मी Happy

सगळ्यांचच डबल झालं गं.

शिरेलीत सारखं तेच ते बोलतात त्याची लागण झाली वाट्ट माझ्या पोष्टीला. Proud

डबल का लिवले ग निधी>>>>> घाबरलो ना
मला वाटलं तिघींच्या कुंभ के मेले में बिछड्या हुव्या जुळया बहिणी उगवल्या की काय गेल्या २-३ दिवसांत !!!!

आज मुपि मध्ये उन्हाळी शिबीर लेखात प्रतीक्रिया बघीतल्या. ही खालची भारीये!:हहगलो:

कला सहस्रबुद्धे - शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 - 09:40 AM IST

कुणाला कशाचं तर बोडखीला केसाचं..! अहो इथे मरणाची थंडी वाजतेय आणि उन्हाळी शिबीर काय लिहित बसलात..?? मला मेलीला एक कळत नाही... अहो म्हशीला सुद्धा गाभण राहिल्यावर १० महिन्यात टोणगा होतो पण आमच्या जानुचं काही म्हणजे काही खरं नाही. वर्ष होऊन गेलं हो अजून कसली चिन्हं दिसेनात. जानुचे बाबा म्हणजे कळस आहेत अगदी. जानुची जरा सुद्धा काळजी नाही त्यांना... लंगडा पाय घेऊन पिंट्याची वकिली सुरु केलीय हल्ली ... एकीकडे पिंट्याचे 'प्रकरण' आणि दुसरीकडे जानुचे लांबलेले बाळंतपण.. माझी मात्र मधल्यामध्ये ससेहोलपट होतेय हो अगदी..!!

विनोदाच्या धाग्यावरील विनोद संपले की मी या धाग्यावर एक चक्कर मारुन जाते मस्त करमणुक होते Proud

जानी आणि सासवांना घातलेल्या शिव्या पाहिल्या की मन कस प्रसन्न होतं आणि रात्री पुन्हा त्यांची तोंड बघायला सॉरी आवाज ऐकायला मी नव्या जोमाने तयार होते. (मी स्वयंपाक करत असताना ही सिरेल चालु असते त्यामुळे फक्त कानांवरच अत्याचार होतो)

निल्सन अगदी अगदी. हि सीरिअल मला पाहिली नाही तरी ऐकावीच लागते. कारण घरी चालू असते. पण त्यातल सगळच माहित असल्याने या धाग्यावर जे चालू असत ते ही कळत आणि छान करमणूक होते. मायबोलीवरचा सगळ्यात मस्त धागा. Lol

यातलं काहीच न आवडून सुद्धा याच्यावरच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत कदाचित मीच जिंकेन. असेल तर सांगा मला

विनोदाच्या धाग्यावरील विनोद संपले की मी या धाग्यावर एक चक्कर मारुन जाते मस्त करमणुक होते>> मी त्र मालिका पाहतच नाही. तरी इथले कमेंट्स वाचून हसू येतंच.

Pages