Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्र अजुन ही सिरेल सुरुच आहे
हर्र अजुन ही सिरेल सुरुच आहे का?
सगळ्या कमेंट वाचल्या...
महाभारतात गांधारीचे असे झाले होते ना? अनेक महिने झाले तरी डिलीवरी नव्हती झाली का काहीतरी. मग इथे पण शंभर कौरव वगैरे येणार की काय?
श्रीबाळ जमिनीवरच्या मायक्रो
श्रीबाळ जमिनीवरच्या मायक्रो अॉर्गनिझ्म्सचं रक्षण करण्यासाठी रांगलाच नाही बहुतेक. >>> ह.ह. पु. वा.
बाळ ठीक असाव यासाठी सुनिताने
बाळ ठीक असाव यासाठी सुनिताने नवस केला गणपति ला. 5 व्यात सोनोग्राफी साठी नवस मग डिलीवरी ला काय???
यांच्या मानात आल तर स्वत: डिलीवरी करतील तिची काळजी पोटी .....
आशूडीला वाचा प्राप्त आहे.
आशूडीला वाचा प्राप्त आहे.
गोखले गृहोउद्योग आहे कि
गोखले गृहोउद्योग आहे कि साखरेचा कारखाना >>>
जाह्नवी ने 'आई मला कर्ट्स'
जाह्नवी ने 'आई मला कर्ट्स' म्हंटल्यावर तिने सोडून इतर सर्वांनी घातलेले दिसतात.
फा अरे गवसणी हवी ना कुणाला
फा अरे गवसणी हवी ना कुणाला तरी.
'आई मला कर्ट्स' मलाही हेच
'आई मला कर्ट्स' मलाही हेच आठवलं.
अमित
अमित
विकीवर मालिकेची माहिती बदलली
विकीवर मालिकेची माहिती बदलली आहे.
Then jahnavi's baby suffers a brain aneurysm and her baby dies. हे बुचकाळ्यात टाकणारे वाक्य काढुन टाकले आहे.
आता जान्हवी म्हणते त्याप्रमाणे २०१६ - २०१७ किंवा त्यानंतर कधीही बाळ होऊ शकते.
परवा प्रोमो add मध्ये ओटी
परवा प्रोमो add मध्ये ओटी भरण्याचा कार्यक्रम दाखवला होता .. म्हणजे सुधारणा आहे.. वर्षा दोन वर्षात होईल काहीतरी ...
वर्षा दोन वर्षात होईल काहीतरी
वर्षा दोन वर्षात होईल काहीतरी ... >>>
या गो़खल्यांना घरकामासाठी
या गो़खल्यांना घरकामासाठी नोकर परवडू नये? मोठी आई सोडल्या तर सगळ्या आया बाहेर असतात ना आपापले उद्योग सांभाळायला? मग स्वैपाक, धुणीभांडी यांच्यासाठी बाई परवडू शकत नाही? कपडे धुवायला मशीन आहे असं ऐकलं होते कुठल्यातरी भागात. पर्यावरणवादी श्रीला माणसांची कामं मशीनने केलेली बरी चालतात?
मोठी आई सोडल्या तर सगळ्या आया
मोठी आई सोडल्या तर सगळ्या आया बाहेर असतात ना >> मोठी आई नै, श्रीची आई घरात असते. स्वयंपाक, धुणीभांडीसाठी नै अन् वरकामासाठीपण नै. सर्व बायका घरातच असायच्या त्यामुळे त्यांना नोकराची गरज पडली नै.
अहो अजून एक पात्र वाढेल ना
अहो अजून एक पात्र वाढेल ना चीकू! ती आणखी अक्कल शिकवायला लागेल सगळ्यांना! श्रीबाळाला तिचे वगैरे पटायला लागेल. पिंट्याच्या चकरा वाढतील. त्यात ती टोमणे मारायला लागेल की असली प्रलंबित डिलीव्हरी पाहण्यात नव्हती. बेबीआत्याचा येताजाता पाणउतारा करू लागेल ती. नाही ते प्रकार व्हायचे. राबूदेत ह्याच भवान्यांना!
बेफि.
बेफि.
बेफि मोठी आई सोडल्या तर
बेफि
मोठी आई सोडल्या तर सगळ्या आया बाहेर असतात ना आपापले उद्योग सांभाळायला? <<< हे कधी झाल?काय उद्योग करतात ह्या??
जानी डोक्यावर पडायच्या आधी
जानी डोक्यावर पडायच्या आधी तिने सगळ्यांना कामाला लावल होतं...
मोठी आई - बुटीक
छोटी आई - ऑफिसमध्ये काम करते बहुतेक सुपरवायजर
सरू - वधूवर सूचक मंडळ
बेबो - ब्युटीपार्लर
मोठी आई - बुटीक
छोटी आई - ऑफिसमध्ये काम करते बहुतेक सुपरवायजर
सरू - वधूवर सूचक मंडळ
बेबो - ब्युटीपार्लर
त्ये मोठी आई अन छोटी आईचे
त्ये मोठी आई अन छोटी आईचे डबल का लिवले ग निधी?:फिदी:
मोठी आई - बुटीक ?? ती सदैव
मोठी आई - बुटीक ??
ती सदैव तोंडात बोळा घालून रडत असते तीच बाई ??
ती आणि बुटीक ???
अहो शाहीर ती मोठी आई म्हणजे
अहो शाहीर ती मोठी आई म्हणजे इन्दु वहिनी. आणी श्रीची आई नुसतीच आई.
रश्मी सगळ्यांचच डबल झालं
रश्मी
सगळ्यांचच डबल झालं गं.
शिरेलीत सारखं तेच ते बोलतात त्याची लागण झाली वाट्ट माझ्या पोष्टीला.
डबल का लिवले ग निधी>>>>>
डबल का लिवले ग निधी>>>>> घाबरलो ना
मला वाटलं तिघींच्या कुंभ के मेले में बिछड्या हुव्या जुळया बहिणी उगवल्या की काय गेल्या २-३ दिवसांत !!!!
मित सान्गता येत नाही काही.तो
मित सान्गता येत नाही काही.तो मन्द आणी ती मधु सिरीयल चालवायला काहीही करतील.
आज मुपि मध्ये उन्हाळी शिबीर
आज मुपि मध्ये उन्हाळी शिबीर लेखात प्रतीक्रिया बघीतल्या. ही खालची भारीये!:हहगलो:
कला सहस्रबुद्धे - शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 - 09:40 AM IST
कुणाला कशाचं तर बोडखीला केसाचं..! अहो इथे मरणाची थंडी वाजतेय आणि उन्हाळी शिबीर काय लिहित बसलात..?? मला मेलीला एक कळत नाही... अहो म्हशीला सुद्धा गाभण राहिल्यावर १० महिन्यात टोणगा होतो पण आमच्या जानुचं काही म्हणजे काही खरं नाही. वर्ष होऊन गेलं हो अजून कसली चिन्हं दिसेनात. जानुचे बाबा म्हणजे कळस आहेत अगदी. जानुची जरा सुद्धा काळजी नाही त्यांना... लंगडा पाय घेऊन पिंट्याची वकिली सुरु केलीय हल्ली ... एकीकडे पिंट्याचे 'प्रकरण' आणि दुसरीकडे जानुचे लांबलेले बाळंतपण.. माझी मात्र मधल्यामध्ये ससेहोलपट होतेय हो अगदी..!!
रश्मी
रश्मी
विनोदाच्या धाग्यावरील विनोद
विनोदाच्या धाग्यावरील विनोद संपले की मी या धाग्यावर एक चक्कर मारुन जाते मस्त करमणुक होते
जानी आणि सासवांना घातलेल्या शिव्या पाहिल्या की मन कस प्रसन्न होतं आणि रात्री पुन्हा त्यांची तोंड बघायला सॉरी आवाज ऐकायला मी नव्या जोमाने तयार होते. (मी स्वयंपाक करत असताना ही सिरेल चालु असते त्यामुळे फक्त कानांवरच अत्याचार होतो)
रश्मी
रश्मी
निल्सन अगदी अगदी. हि सीरिअल
निल्सन अगदी अगदी. हि सीरिअल मला पाहिली नाही तरी ऐकावीच लागते. कारण घरी चालू असते. पण त्यातल सगळच माहित असल्याने या धाग्यावर जे चालू असत ते ही कळत आणि छान करमणूक होते. मायबोलीवरचा सगळ्यात मस्त धागा.
यातलं काहीच न आवडून सुद्धा याच्यावरच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत कदाचित मीच जिंकेन. असेल तर सांगा मला
विनोदाच्या धाग्यावरील विनोद
विनोदाच्या धाग्यावरील विनोद संपले की मी या धाग्यावर एक चक्कर मारुन जाते मस्त करमणुक होते>> मी त्र मालिका पाहतच नाही. तरी इथले कमेंट्स वाचून हसू येतंच.
Pages