पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका व्हावी म्हणून बरेच प्रयत्न करत आहेत असे वाचले. खालील बातमीमधे लिहिले आहे त्याप्रमाणे, त्यांनी त्यासाठी ढाका - कोलकाता प्रवास केला, त्यादम्यान पोलीसांनी पकडल्यावरही त्याबद्दल काही न बोलता दालमियांचे कौतुक केले इत्यादी.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5120885376480359052&Se...संपादकीय&NewsDate=20150512&Provider=-&NewsTitle=पाकिस्तानचा ‘न्योता’
एकूणात पाकिस्तान क्रिकेटला अतिशय हालाखीचे दिवस आले आहेत. गेल्या ६ वर्षात पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. आणि तिथे खेळायला कोणी उत्सुकही नाही. गेली अनेक वर्षे पाकिस्तानने दहशतवादाला पोसल्याचे हे फळ त्यांना मिळाले आहे. (बाकि तिथल्या सामाजिक परिस्थितीबद्दल तर काय बोलायचे? पण धाग्याच्या विषय क्रिकेट असल्यामुळे त्याबद्दल इथे लिहित नाही)
क्रिकेटच्या जगात सद्ध्या सोन्याचे अंडे देणार्या दोन कोंबड्या आहेत. त्यातली एक म्हणजे आय पी एल. ज्यात आपण जगभरच्या खेळाडूंना मधे घेतो पण पाकिस्तानी खेळाडुंना नाही. आणि दुसरी म्हणजे भारताशी एकदिवसीय सामने खेळणे! तेही आपण टाळत आलो आहोत. त्यामुळे पाकिस्तान दुबई मधे हे सामने खेळले जावे म्हणून प्रयत्न करत आहे.
तेव्हा प्रश्न असा कि भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळावे का?
मतप्रवाह १ - क्रिकेट (खेळ) / संगीत, चित्रपट इ. कला ह्यांना राजकारणाचे बंधन नसावे. दोन देशांमधील संबंध वाढवण्यास, सुधारण्यास त्यांचा वपर केला जावा. तेव्हा पाकिस्तानशी कितीही राजनैतिक वैर असले तरी क्रिकेट खेळण्यास हरकत नाही.
मतप्रवाह २ - पाकिस्तानने आजवर पोसलेला दहशतवाद आणि दाऊदसारख्या भारतातील माफियांमर्फत केलेली कृष्ण्कृत्ये ह्यांच्यामुळे अनेक निरपराध लोकांचा जीव गेला आहे व अनेक लोकांच्या आयुष्याचे नुकसान झाले आहे. तेव्हा त्या देशाशी क्रिकेट खेळून त्यांचीच धन करणे अयोग्य आहे.
वरीलपैकी मी दुसर्या मतप्रवाहाचे समर्थन करतो आणि बीसीसीआय ने पैशाच्या लोभापोटी असे सामने आयोजित केले तरी भारतीय खेळाडुंनी अशा दौर्यावर जाण्यास / खेळण्यास असमर्थता दाखवावी असेही मला वाटते. अर्थात त्यात वर्ल्ड कप सामन्यांना समावेश करता येणार नाही कारण ती स्पर्धा जगातील सर्व संघात खेळली जाते व ४ वर्षातुन एकदा होते.
हे माझे मत आहे पण माबो वरील इतरांची मते, विचार जाणुन घेण्यास आवडेल म्हणुन हा धागा.
__________________________________________________
टीप - ह्याच्याशी मोदी सरकार, राहुल गांधी वगैरेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्या विषयावर घसरणार्या प्रतिसादांकडे इतरांनी दुर्लक्ष करावे.
उद्दु बाळ ..
उद्दु बाळ ..
खास गॅमा पैल्वानासाठी विसु :
खास गॅमा पैल्वानासाठी
विसु : गामा ह्या धाग्यावर उपस्थित असल्यामुळे इथे हे डकवलय
The "Great" Gama (22 May 1878
The "Great" Gama (22 May 1878 - 1960)[1][2] also known as "Gama Pahalwan" (Urdu: گاما پھلوان) born Ghulam Muhammad (Urdu: غلام محمد), in Amritsar, Punjab, British India, was a Pakistani Kashmiri Muslim pehlwan (wrestler). He was awarded the Indian version of the World Heavyweight Championship on 15 October 1910. Undefeated in a career spanning more than 50 years, he has been billed as the greatest pahalwan of his time. After Independence in 1947, Gama moved to the newly created state of Pakistan
मी पण माहीती देतो म्हणतो
(No subject)
(No subject)
उद्देश, पंजाबात भीषण दंगली
उद्देश,
पंजाबात भीषण दंगली चालू झाल्या होत्या. मग मरण्यापेक्षा जिवंत राहिलेलं काय वाईट? तसंही पाहता पाकिस्तानातल्या मुस्लिम आणि हिंदू दोन्हीही जनतेला भारत तोडायचा नव्हताच. काही विशिष्ट नेत्यांनी ब्रिटीशांशी संगनमत करून भारत तोडला. त्या नेत्यांना फुकटचं कशाला डोक्यावर चढवून ठेवलंत?
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद अग्निपंख!
धन्यवाद अग्निपंख!
आ.न.,
-गा.पै.
फुकट ? अहो चांगले ५५ कोटी
फुकट ? अहो चांगले ५५ कोटी दिले ना? इतक्यात विसरलात काय? फुकट कसे म्हणतात तुम्ही?
या धाग्यावर देखील आपण "स्वातंत्र्य मिळवुन देणारे फुकट नेते" सारखे बरीच लांछनास्पद वाक्य वापरुन भरकटवण्याचा प्रयत्न करत आहात याबद्दल हार्दिक अभिनंदन
नमस्कार, गामा
नमस्कार,
गामा स्वातंत्र्यसंग्रामातील नेत्यांबद्दल अनुद्गार काढू नये ही विनंती. आपल्या सगळ्यांची लायकी त्यांच्या पायधूळ्ची देखील नाही याचे भान सदैव राहू द्यावे.
धन्यवाद
पाकिस्तानी कलाकार चालतात,
पाकिस्तानी कलाकार चालतात, कॉम्ंटेटर चालतात, कोच चालतात पण खेळाडू नाही हा कसला न्याय...करायचा तर ब्लँकेट बॅन करा सरसकट सगळ्याच पाकिस्तानी लोकांवर.... >>>> सहमत आहे.
मी पण.
सरसकट सगळ्याच पाकीस्तान्यांना बंदी करायची नसेल तर मग तिथल्या आयसिस, अल-कायदा, तालीबान इ. मधील लोकांनाहि तितकेच अगत्याचे आमंत्रण देऊन मुंबईच्या ताजमहाल सारख्या हॉटेलात इतमामाने ठेवावे.
आपल्याला काय पडलीय? (हु) उच्च भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्राण पण देऊ.
महाढोंगी लोक भारतातले - सगळे नुसते क्रिकेट, बॉलीवूड नि पैशाच्या मागे, संस्कृती कसली?
मोठ्या लॉजिकच्या गप्पा मारतात - क्रिकेटवरच बंदी का? इतरांवर का नाही? सुरुवात तर करा, एकदम सगळे जेवण तोंडात कोंबता का थोडे थोडे?
बाकी काय, शेवटी भारतीय लोक - देशाची सुरक्षा असो, न्याय असो, एकदा थोडे पैसे चारले की काय वाट्टेल ते करतील. चर्चा कशाला करता?
असं काय हो करता तुम्ही कामी
असं काय हो करता तुम्ही कामी पडतं ते ,
काही हल्ले झाले की "आम्ही क्रिकेट संबंध तोडले" असं बोलायल मिळतं...! विरोध दर्शवता येतो ना मंग...!
उद्देश, "स्वातंत्र्य मिळवुन
उद्देश,
"स्वातंत्र्य मिळवुन देणारे फुकट नेते" असा उल्लेख मी कुठेही केलेला नाहीये. भारत तोडणाऱ्या नेत्यांना डोक्यावर चढवू नये इतकंच म्हणालोय.
इत उप्पर हामाशेसं.
आ.न.,
-गा.पै.
यंदाच्या आयपीएलमध्ये
यंदाच्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू दिसण्याची शक्यता आहे.
जर पाकिस्तानी माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन भारतात येऊन करू शकतात तर क्रिकेटनेच काय घोडे मारलेय.
यावेळी पुन्हा शाहरूख पाकिस्तानी खेळाडू हवेत म्हणून आवाज उठवेल. भाजपा त्याला साथ देईल आणि शिवसेना त्यांच्याशी भांडत बसेल.
ऋमेश दादा गर्लफ्रेंड कशी
ऋमेश दादा गर्लफ्रेंड कशी पटवावी, कोणतीही गर्ल ......फ्रेंड नसताना यावर एक धागा , दोरा, काढा.....
जर पाकिस्तानी माजी
जर पाकिस्तानी माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन भारतात येऊन करू शकतात तर क्रिकेटनेच काय घोडे मारलेय.
अहो, उदाहरणे कशाला देता? सरळ क्रिकेट घेऊन या. खेळाडूंबरोबर त्यांचे मित्र, खेळ पहायला येऊ इच्छिणारे, सगळ्यांना येऊ द्या. उद्या स्टेडीयम मधे स्फोट होऊन लाखो लोक मेले, आपल्या खेळाडूंसकट, तरी आपले क्रिकेटवेड कमी होणार नाही.
तसेच पाकिस्तान्यांना भारतात येऊन बॉलिवूडवाल्यांबरोबर सिनेमे करायची नवीन योजना करा. जरी बॉलीवूडवाले लोकहि मेले तरी पाकीस्तान्यांचे प्रेम कमी होणार नाही.
बरे होईल. एकदा का लोकसंख्या अर्धी झाली की प्रगति होणे कठीण नाही.
जर पाकिस्तानी माजी
जर पाकिस्तानी माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन भारतात येऊन करू शकतात तर क्रिकेटनेच काय घोडे मारलेय.
अहो, उदाहरणे कशाला देता? सरळ क्रिकेट घेऊन या. खेळाडूंबरोबर त्यांचे मित्र, खेळ पहायला येऊ इच्छिणारे, सगळ्यांना येऊ द्या. उद्या स्टेडीयम मधे स्फोट होऊन लाखो लोक मेले, आपल्या खेळाडूंसकट, तरी आपले क्रिकेटवेड कमी होणार नाही.
तसेच पाकिस्तान्यांना भारतात येऊन बॉलिवूडवाल्यांबरोबर सिनेमे करायची नवीन योजना करा. जरी बॉलीवूडवाले लोकहि मेले तरी पाकीस्तान्यांचे प्रेम कमी होणार नाही.
बरे होईल. एकदा का लोकसंख्या अर्धी झाली की प्रगति होणे कठीण नाही.》》》》 +1111111111......
आपका बम तो हमारी गन हम गम
आपका बम तो हमारी गन
हम गम लेने आये थे
आप बम देने आये थे
ये गम वो नही
ये बम वो नही
कितना मजा आया था?
जब तेरा बम फटा था
कितना मजा आया था ?
जब कब्रीस्तान बटा था
ये फटना वो नही
ये बटना वो नही
कितना मजा आया था?
जब सिस्टम हमारा
तुने हिलाया था
कितना मजा आया था?
जब कसाब हमारे झुलेपे झुला था
ये हिलाना वो नही
ये झुलाना वो नही
हम तुम्हे हमेशा झुकायेंगे
क्या शहर तुम हमारा
हमेशा उठाओगे
ये झुकाना वो नही
ये उठाना वो नही
तुम्हारे पास बम है
तो हमारे पास गन है
वो बम भी वो नही
और ये गन भी वो नही
जे.व्ही१११११११
(No subject)
खेळाडूंबरोबर त्यांचे मित्र,
खेळाडूंबरोबर त्यांचे मित्र, खेळ पहायला येऊ इच्छिणारे, सगळ्यांना येऊ द्या.
>>>>
जर खुर्शीद कसुरी एकटे आले असतील तर क्रिकेटरही एकटेच येणार.
जर ते सहकुटुंब आले असतील तर तसे
रमेशभाव ति कवीता कशी वाटली
रमेशभाव ति कवीता कशी वाटली
भारत पाकिस्तान चर्चा
भारत पाकिस्तान चर्चा बंद........
छान आहे .. सॉरी मी आधी
छान आहे
.. सॉरी मी आधी वाचली नव्हती, कविता म्हटले की मी उडी मारून पुढे जातो
@vj1111 कविता छान आहे
@vj1111 कविता छान आहे
धन्यवाद.....
धन्यवाद.....
पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये,
पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, असं माझंही कोणे एके काळी (ठाम वगैरे) मत होतं. शिशिर शिंदे आणि मंडळींनी खेळपट्टी उखडल्याचं (तेव्हा) कौतुकही वाटलं होतं. पण नंतर हे कळून चुकलं की, क्रिकेट काही फक्त खेळ राहिलेला नाही. म्हणजे खेळ सोडून ते बरंच काही आहे. अनेकांचे (पायात पाय नि हातात हात) हितसंबंध असलेला धंदा आहे. त्यामुळे पाकिस्तानशी खेळून नफा वाढणार असेल, तर पुन्हा एकदा `क्रिकेट फॉर पीस` असं (किंवा नवीन एखादं) लेबल लावून अगदी भारतातही मालिका खेळवली जाईल. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सध्या तरी त्यात काही रस दिसत नाही. कलावंत, खेळाडू वगैरे मुद्देही सापेक्ष असतात. म्हणजे सत्तेवर कोण आहे, यावर भूमिका ठरवली जाते. तूर्तास पाकिस्तानशी काय कुणाशीच क्रिकेट खेळू नये, इतका त्याचा अतिरेक झालाय, असं म्या पामराला वाटतं!
झक्की अहो तुम्ही जे -----
झक्की अहो तुम्ही जे ----- "इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, न्यू झीलंड इथले लोक घेतील. पैशाचा लोभ त्यांनाहि आहे. त्या देशातील लोक मुसलमानांचे फालतू लाड करत नाहीत".-- लिहिले ते खरे नाही. सर्व पाश्चात्य मुसलमानांना घाबरून आहेत. आजच एका सेनेताराने मुलाखतीत म्हटले आहे कि येथील मिडिया मुसलमानांना घाबरून त्यांचा उदोउदो करत असते.
दिगोचि , मुसलमानांचा उदो उदो
दिगोचि ,
मुसलमानांचा उदो उदो करण्याच उदाहारण बघायला देशाबाहेर जायची गारज नाही !
इथल्या डॉक्टर मंडळींना बघा !
इथल्या काहींना सगाळे हिंदु दहशतवादीच वाटतात आणी देशातले सगळे स्फोट हिंदु संस्थानींच केलेत आसा त्यांचा दावा आहे !
>>>>तूर्तास पाकिस्तानशी काय
>>>>तूर्तास पाकिस्तानशी काय कुणाशीच क्रिकेट खेळू नये, इतका त्याचा अतिरेक झालाय, असं म्या पामराला वाटतं!<<<< +१११११
Pages