आधीचे लेख :
पहिला लेख : Autism.. स्वमग्नता..
दुसरा लेख : ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?
तिसरा लेख : Autism - लक्षणे व Evaluation
पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.
खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).
वरील चित्रातून कल्पना येतच असली तरीही बरीच मोठी लिस्ट असते लक्षणांची. त्यातून ही स्पेक्ट्रम disorder, त्यामुळे प्रत्येक मुल वेगळे, त्याची लक्षणं वेगळी. http://www.cdc.gov/ncbddd/autism/signs.html
पालकांनी वरील चित्राच्या आधारे आपले मुल हे कोणत्या गोष्टी करत आहे अथवा करत नाही ते पडताळून बघावे. कुठे शंकेची पाल चुकचुकत असेल तर नेटवरती प्रश्नमंजुषा मिळतात. त्याचे नाव : M-CHAT-R (Modified Checklist for Autism in Toddlers, Revised)
वरील लिंकवर तुम्हाला प्रश्नमालिका मिळेल. मी माझा मुलगा दोन वर्षाचा असताना याच प्रश्नामालीकेवरून माझ्या मुलाचे डायग्नोसीस घरबसल्या केले होते. डॉक्टरांच्या ऑफिशियल निदानाच्या वेळेस माझी मनाची तयारी होऊ शकली.
इथे मी डॉक्टर म्हणत आहे, पण हा नेहेमीचा लहान मुलांचा डॉक्टर नव्हे. याच्यासाठी शोधला पाहिजे Developmental Pediatrician. पहिल्या तासा-दीड तासाच्या भेटीत मुलाबरोबर खेळून , आमच्याशी गप्पा मारून वरीलप्रमाणेच प्रश्न विचारले व पुढील भेट निश्चित केली. ही होती जवळजवळ ३ तासाची. यात, developmental pediatrician, clinical psychologist, speech therapist & occupational therapist इत्यादी तज्ञ उपस्थित होते. सर्वांनी प्रश्न विचारून, मुलाशी खेळून टिप्पणी करून घेतली. एका आठवड्यात या सगळ्या तज्ञसमूहाची बैठक होऊन निदान निश्चित करण्यात आले व आम्हाला बोलावून घेऊन तो निर्णय आमच्याबरोबर डिस्कस करण्यात आला. निदान : "Autism Spectrum Disorder" (Moderate to Severe)
माझ्या मुलामध्ये तेव्हा असलेली व आत्तापर्यंत डेव्हलप झालेली लक्षणं मी इथे नमूद करते.
- १.५ वर्षे वयापर्यंत प्रत्येक डेव्हलपमेंटल माईलस्टोन व्यवस्थित , परंतु वृत्ती कायमच अस्थिर व हायपर.
- सव्वा वर्षापासून दीड वर्षापर्यंत आम्ही त्याच्या बोलण्याची बरीच वाट पाहिली. हळूहळू अडखळत का होईना प्रगती करत आहे असे वाटत असतानाच तिला अचानक खिळ बसला होता हे आमच्या तेव्हा लक्षात नाही आले. आम्ही कायमच डॉक्टरी सल्ल्यानुसार वाट पाहिली.
- २४व्या महिन्यापर्यंतही बोलेना, तेव्हा श्रवणदोष नाही ना हे तपासून घेतले. (तो नव्हता.)
- मग हळूहळू डेव्हलपमेंटला पिडियाट्रिशिअन वगैरे वगैरे रुतीनामध्ये जाऊन ४ महिन्यांनी निदान झाले.
- हायपर - आपण मुलांसाठी खूप सहज शब्द वापरतो, पण याची हायपर असण्याची लेव्हल प्रचंड वर होती. दुपारी झोपायाचाही नाहे, आणि रात्रीपर्यंत याचा दंगा, सतत इकडून तिकडे पळापळ, सतत डेंजरस वाटेल अशा वागणूकीकडे लक्ष देऊन रात्रीपर्यंत शक्ती उरायची नाही.
- आवडता कार्यक्रम पाहताना हातापायाचे स्नायू ताठरणे.
- hands flapping. पेम्ग्विंस जसे करतात तसे हात सतत उडवणे( flap करणे.)
- खाणे : प्रचंड लढा. कारण तोंड अजिबात न उघडणे. कित्येक महिने या मुलाचे केवळ baby formula व Pediasureवर निघाले आहेत. या मुद्द्यासाठी मेन अडथळा होता तो म्हणजे Sensory Integration Disorder. (मी याबद्दल वेगळ्या लेखात लिहीन. खूप व्याप्ती असलेला विषय आहे हा.)
- ओळखीच्या लोकांनाही ओळख न दाखवणे.
- आई किंवा बाबाच्या एखाद्या कपड्याविषयी अतोनात जवळीक.
- कारच्या चाकाशीच खेळत बसणे.
- हाताने एखादी गोष्ट point करून न दाखवणे.
- तसेच, आम्ही विमान वगैरे दाखवल्यास कधीच त्या दिशेला न बघणे.
- Toe-walking. पायाच्या चवड्यांवर सतत चालणे/धावणे.
- cuddling न आवडणे
- इतर मुलांमध्ये न रमणे
- अर्थातच नजरेला नजर नाही. त्यामुळे मोठ्यांचे 'पाहून' शिकणे हा मुद्दा बाद.
- बर्यापैकी हिंसक वागणूक - चावणे, ओरबाडणे, केस ओढणे, डोके आपटणे. डोके कधी दुसर्या व्यक्तीला आपटेल तर क्वचित कधी भिंतीवर.
इत्यादी.
नशीबाने वय वाढले म्हणून असेल किंवा खरंच ABA चा फायदा होतो म्हणून असेल, पण बिहेविअरल थेरपी चालू झाल्यावर हिंसक वागणूक तसेच इतर काही लक्षणं सौम्य झाली. Thanks to all the therapists!
Without a doubt, this is all written just for the information purpose. It is just a journal of our journey of my son’s Autism. Some things could be wrong or incorrect as I am still learning, and basically because I am not the Medical Doctor. If by reading this blog makes you concerned about your child, you can talk to your doctor about it. If you are planning to try some of the methods or strategies mentioned in the blog, PLEASE keep in mind that it is completely your responsibility and you would always consult your Doctor before proceeding.
हो, ते वाटलंच मेंदूज्वर
हो, ते वाटलंच मेंदूज्वर शब्दावरून. पण माझ्या मुलाला गळ्यात कुठलीही लस मारली नव्हती त्यामुळे विचारात पडले.
माझ्याही मुलाला हे वॅक्सिन
माझ्याही मुलाला हे वॅक्सिन दिल्याचं आठवत नाही. मँडेटरी नसावं बहुतेक. बाकी चिकन पॉक्स वॅक्सिन अजिबात गरज नाही माझ्यामते.
'गळ्यात मारणे' वाक्प्रचार या
'गळ्यात मारणे' वाक्प्रचार या अर्थी वापरले असावे.
मेंदुज्वराची वॅक्सिन युएस मधे
मेंदुज्वराची वॅक्सिन युएस मधे कॉलेजला जाऊ घातलेल्या आणि डॉर्म मधे रहाण्याचा प्लॅन असलेल्या मुलांना जरूर द्यावी. माझ्या मुलाला १०वीत असताना दिली होती. आमच्या इथे कांजिण्यांची वॅक्सिन किंवा कांजिण्या येवून गेल्याचे डॉक्युमेंटेशन हे मिडलस्कूल/हायस्कूलसाठी लागते. माझ्या मुलाला कांजिण्या आल्याच नाहीत त्यामुळे मग शेवटी वाट बघून सातवीत वॅक्सिन दिली. बाकी माझ्या मुलाला हेल्थ कंडीशन लक्षात घेऊन फ्लू वॅक्सिन रेकमेंड केलेय. एकदा प्रीस्कूलला आणि एकदा ६वीत असताना असा दोनदा वाईट न्युमोनिया झाला होता. त्यामुळे मग ७वीत न्युमोनिया वॅक्सिन दिली. पुढील दोन वर्ष ठीक गेली त्यानंतर त्याने वॅक्सिन घेणे टाळळे. एकदा माइल्ड वॉकिंग न्युमोनिया झाला. पण त्रास कमी झाला. यावर्षी फॉलब्रेक मधे तो घरी आला तेव्हा वॅक्सिनबद्दल विचारले तेव्हा डॉकने आता तो मोठा झालाय तेव्हा नको असे सांगितले.
स्वताईंनी वर दिलेल्या
स्वताईंनी वर दिलेल्या चित्रांचा तक्ता फॅमिली डॉक, पेडीच्या ऑफिसमधे असेल तर आईबाबांना बाळाची प्रगती बघताना मार्गदर्शक ठरेल असे वाटते. कदाचित निदान लवकर व्हायला मदत होईल.
साती, इब्लीस वगैरे डॉक्टर मंडळींसाठी प्रश्न -
ऑटिझमचे वाढते प्रमाण लक्षात घेता फॅमिली डॉक्टर्स आणि पेडी यासाठी काही ऑटिझम संबंधी रिफ्रेशर कोर्सेस/ वर्कशॉप्स असतात का? जेणे करुन बाळाच्या आरोग्यासंबंधी ते आईबाबांना मार्गदर्शन करु शकतील. कारण मोठी शहरे सोडल्यास याबाबतचे रिसोर्सेस फारसे उपलब्ध नाहित. अशावेळी मर्यादित स्वरुपाची मदत देखील मोलाची ठरू शकते.
भारतातले पेडी पालकांनी
भारतातले पेडी पालकांनी विचारलं नाही तर डेवलपमेंट माईलस्टोन्स बघतात का? तिचा तिकडचा पेडी आणि इकडचा खूप फरक आहे..
तिकडचा बाळाची वाढ ह्याविषयावर भरपूर बोलायचा.. (फिजिकल वाढच नव्हे तर बौद्धिक वाढीबद्दल जास्त) . इकडे वेलनेस विजिट असा प्रकार असतो का?
पेडी बदलावा का?
स्वमग्नता, तुम्ही म्हणालात की वॅक्सिन नंतर रिग्रेशन झालं. म्हणजे तोपर्यंतचे इमोशनल माईल्स्टोन्स व्यवस्थित होते का?
उदा. cuddling आवडायचं का आधी? ओळख दाखवणे, भेटून आनंद व्यक्त करणे वगैरे असायचं का?
पालकांना रिग्रेशन ओळखता येण्याचे हे महत्त्वाचे एरियाज आहेत का? का बाकीचेही तितकेच महत्त्वाचे?
उदा. एखाद्या मुलाचं बोलण डिले झालय, पण इमोशनल अॅटॅचमेंट्स आहेत.. नॉन्वर्बल कम्युनिकेशन आहे, तर इज इट सेम थिंग? किंवा एखादं मुल, माईलस्टोन नुसार बोलतय, इमोशनल अॅटॅचमें टस् आहेत, पण फिजिक ल कॅरॅक्टरिस्टिक्स दाखवतय ( उदा त्याच क्रिया पुन्हा करणे, हात फ्लॅप करणे वगैरे) - is that still the issue?
मुल किती वर्षाचं झालं की रिग्रेशन येण्याचा संभव नाहिसा हो तो?
(सॉरी खूप प्रश्न आहेत, पण काय शक्यता आहेत त्याचा अवेअरनेस असावा म्हणून विचारतेय)
भारतातले पेडी पालकांनी
भारतातले पेडी पालकांनी विचारलं नाही तर डेवलपमेंट माईलस्टोन्स बघतात का? <<< तिकडचा पेडी वगैरे माहित नाही, पण मंगलोरचा पेडी आणि इथला चेन्नईमधला पेडी गेल्यावर "काय झालंय " ते विचारतानाचा डेवलपमेंट माईलस्टोन्स चेक करतात. चेन्नईतला पेडी तर माळेत मणी ओवून घे, पिरॅमिड रचून दाखव असले सर्व करून चेक करतो. शिवाय इतरही बरेच प्रश्न वगैरे चालू असतं.
रत्नागिरीमधली पेडीसुद्धा व्यवस्थित चेक करायची. आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण उत्तर द्यायची. वेळ नसेल तर ईमेलमधे लिंक अथवा इतर माहिती पाठवून देते.
भारतातले पेडी पालकांनी
भारतातले पेडी पालकांनी विचारलं नाही तर डेवलपमेंट माईलस्टोन्स बघतात का? >>> हो. आमचे बघायचे, बाय डीफॉल्ट. दर इम्युनायझेशन च्या वेळी देखील पहायचे, सर्व प्राकारची ग्रोथ मार्क करायचे. हातात पेन किंवा खेळणे धरुन इकडे तिकडे फिरवून बाळ फॉलो करते का ते पाहणे, आवाज फॉलो करते का ते पाहणे इत्यादी जे काय ज्या त्या स्टेजचे असायचे ते सर्व चेक करायचे. व आम्हालाही बाळ अमुक करते का, तमुक करते का सर्व विचारायचे. त्यांच्याक्डे चेकलिस्ट असायची त्या त्या स्टेजची. अमेरिकेतले माहीत नाही, पण भारतात (बंगळुरात) हे होते माझ्या मुली लहान होत्या तेव्हा.
'गळ्यात मारणे' वाक्प्रचार या
'गळ्यात मारणे' वाक्प्रचार या अर्थी वापरले असावे. - हे कळलेच नाही मला!
नानबा, मला तिकडचा, इकडचा म्हणजे कुठला नाही कळले.
cuddling आवडायचं का आधी? ओळख दाखवणे, भेटून आनंद व्यक्त करणे वगैरे असायचं का? - हे सगळे होते आधी. शिवाय आय काँटॅक्टही व्यवस्थित होता. नावाला बघायचा..
नानबा, अशा वेळेस वर दिलेली प्रश्न मंजुषा सोडवून पाहावी. किंवा लक्षणांच्या चित्रातील किती लक्षणे मॅच होतात हे बघावे. शंकेची पाल चुकचुकल्यास डॉक्टरांशी बोलावे. मी कसं सांगू ऑनलाईन बसून? ही खूप गुंतागुंतीची डिसॉर्डर आहे. सिम्प्टम्सचा क्लस्टर असतो. हँड फ्लॅपिंग आहे का, आवाजाबद्दल, व्हिज्युअल गोष्टींबद्दल ओव्हरसेन्सितीव्हिटी आहे का? स्टिमिंग इतके आहे का की ते त्याच्या प्रगतीस अडथळा आणेल? अजुनही कित्येक गोष्टी आहेत.
पण सर्वात महत्वाचा पॉईंट आय काँटॅक्ट.
खूप चांगली लेखमाला. बापरे अस
खूप चांगली लेखमाला. बापरे अस काही निदान झाल कि पालकांची काय अवस्था होत असेल ?
पालकांच्या पेशन्स ला सलाम
भारतातले पेडी पालकांनी
भारतातले पेडी पालकांनी विचारलं नाही तर डेवलपमेंट माईलस्टोन्स बघतात का? <<< तिकडचा पेडी वगैरे माहित नाही, पण मंगलोरचा पेडी आणि इथला चेन्नईमधला पेडी गेल्यावर "काय झालंय " ते विचारतानाचा डेवलपमेंट माईलस्टोन्स चेक करतात. चेन्नईतला पेडी तर माळेत मणी ओवून घे, पिरॅमिड रचून दाखव असले सर्व करून चेक करतो. शिवाय इतरही बरेच प्रश्न वगैरे चालू असतं. >>>>>>>>>
अशी चेकलिस्ट कुठे मिळेल का ? आमचे बाळ तीन महिन्याचे आहे. आम्ही डॉ ने सांगितलेल्या सगळ्या लस काही न विचारता वेळेचे वेळी देतो
मवा ने लिहिलं आहे तसा आमचे डॉ काही करत नाही. गेलो कि लगेच लस टोचुन आम्हला पुढची तारीख देतो
माझ्या ओळखीत काही मुलं आहेत
माझ्या ओळखीत काही मुलं आहेत त्यांना ऑटिझम स्पेक्ट्रम असे निदान झालेय. पण वर वर बघता काहीच जाणवत नाही. मुलांच्या पालकांनी सांगीतले म्हणूनच कळले. त्यातील दोन मुलांना तर अगदी प्रीस्कूलर असल्यापासून ओळखते. माझा मुलगा दादा म्हणून सगळ्या बच्चे कंपनीला खेळवायचा. त्यालाही कधी काही वेगळे जाणवले नव्हते. मध्यंतरी त्यांचे रिडिंग ग्रेड लेवलच्या खाली आणि मॅथ अॅक्सिलरेटेड असे होते. मग एकदम हे निदान झाले. बाकी वर्तन व्यवस्थित आहे.
भारतातले पेडी पालकांनी
भारतातले पेडी पालकांनी विचारलं नाही तर डेवलपमेंट माईलस्टोन्स बघतात का? तिचा तिकडचा पेडी आणि इकडचा खूप फरक आहे..
तिकडचा बाळाची वाढ ह्याविषयावर भरपूर बोलायचा.. (फिजिकल वाढच नव्हे तर बौद्धिक वाढीबद्दल जास्त) . इकडे वेलनेस विजिट असा प्रकार असतो का? >>> हो नानबा. हल्ली वेलनेस चेकअप असतो. अगदी रेग्युलरली. निदान माझ्या लेकीच्या बाबतीत तरी होता.
चिकन पॉक्स वॅक्सिन अजिबात गरज
चिकन पॉक्स वॅक्सिन अजिबात गरज नाही माझ्यामते. >>> असे का सायो? खास कारण आहे म्हणुन विचारतेय. आपल्यावेळी हे दिले नाहि जायचे पण. यामुळे लहानपणी चिकन पॉक्स बरा झाला तरी त्याचा व्हायरस राहतो आणि तो नंतर जर अॅक्टीव झाला तर Shingles (मराठीत काय म्हणतात बरे?)होऊ शकते. हल्लीच एका मैत्रीणीला Shingles झाले तेव्हा मला हे कळले.
मुंबईत मी ज्याच्याकडे जायचे तो पेडी ५०० नुसते रुटीन चेकप चे घ्यायचा. आणि ५मिनीट पण बघायचा नाहि. नुसते वजन व उंची बघितली जायची. बौद्धिक वाढीबद्दल काही विचारलेले आठवत नाही.
इथे त्यामानाने बर्यापैकी खुप काही प्रश्न विचारतात. बेबी सेंटरवर चार्ट आहे त्यानुसारच बहुतेक प्रश्न असतात.
गेलो कि लगेच लस टोचुन आम्हला पुढची तारीख देतो >>+++१ हे न चुकता सगळीकडे असतेच.
>>चिकन पॉक्स वॅक्सिन अजिबात
>>चिकन पॉक्स वॅक्सिन अजिबात गरज नाही माझ्यामते. >>> असे का सायो? >> माझ्या ऐकीव माहितीनुसार एकदा कांजण्या येऊन गेल्या की लाईफटाईम इम्युनिटी होते. चिकन पॉक्स वॅक्सिन ने तसं होत नाही असं वाटतं. जर अॅडल्ट वयात कांजण्या झाल्या तर त्याचा त्रास होतो खूप.
शिंगल्स= नागीण
बेबी सेंटरवर चार्ट आहे
बेबी सेंटरवर चार्ट आहे त्यानुसारच बहुतेक प्रश्न असतात.>>>>>
केशर हा चार्ट कुठे आहे ? लिंक देता का ? मी शोधलं पण मला Baby developement Calender सापडलं फक्त. तुम्ही त्या Baby developement Calender बद्दल बोलताय कि अजुन कोणता दुसरा चार्ट आह जो मला नाही सापडला ?
आमचा डॉक बौद्धिक वाढीबद्दल, डेवलपमेंट माईलस्टोन्स बद्दल काहीच सांगत किंवा विचारत नाही. मला आता या धाग्या मुळे हे सगळे कळले नाही तर मी कधी ईतका खोलात गेलो पण नसतो.
सातीजी,
कोणत्या लस द्यायलाच हव्यात आणि कोणत्या नाही दिल्या तरी चालतील याची यादी कुठे मिळेल का? तुम्ही देउ शकाल का? मी गेलेल्या दोन्ही इस्पितळामधे लसीकरणाचा तक्ता लावला आहे. आमचा डॉक त्याप्रमाणे सगळे देतो.
सायो धन्यवाद ...नागीण बरोबर.
सायो धन्यवाद ...नागीण बरोबर. मैत्रीणीला कांजण्या येऊनही नागीण झाली. अजुनही काहिजणांना असे झालेय. टीव्हीवर एकले होते की कांजण्या झाल्या तर शिंगल्सचा व्हायरस घुसलेला असतोच. योग्य वातावरण मिळाले की डोके वर काढतो. माझी पण ऐकीव माहिती.
अतरंगी इथे बघा.
सुनिता लेले या साद ट्रस्ट व
सुनिता लेले या साद ट्रस्ट व पुणे सपोर्ट ग्रुप फॉर ऑटिझम च्या ट्रस्टी आहेत. १७-१८ वर्षांच्य चॅलेंज्ड मुलांसोबत काम, अशा मुलांच्या पालकांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम,औपचारिक शिक्षण व्यावहारिकदृष्ट्या देण्याचे काम करतात. त्यांचा मिळून सार्याजणी च्या दिवाळी २०१३ च्या अंकात "सिद्धार्थची गोष्ट आणि..... "हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात स्वत:च्या
विशेष मुलाची पालक ते विशेष मुलांच्या पालकांची पालक अशा विस्तारत जाणार्या पालकत्वाच्या परिघाबद्दल हा लेख लिहिला आहे.त्यांनी ऑटिझम- एक बिकट वाट ते वहिवाट हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाच्या उपलब्धतेबद्दल व इतर माहितीबद्दल तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मोबाईल 9822028015 E mail - lelesunita@hotmail.com
मी त्यांना या लेखमालेबद्दल फोनवरुन कळवले आहे.
मिळून सार्याजणीच्या अंकात त्यांच्या पुस्तकात असलेली रोहित कुलकर्णी यांची स्वमग्न मुलांवर एक अतिशय सुंदर कविता आहे.
खूप आभार प्रकाश घाटपांडे! मी
खूप आभार प्रकाश घाटपांडे!
मी ते पुस्तक नक्की मिळवायचा प्रयत्न करते. तसेच त्यांच्याशी संपर्क देखील साधते. थँक्स.
प्रकाश घाटपांडे, यांनी वरती
प्रकाश घाटपांडे, यांनी वरती लिहिलेलेच पुस्तक मी आता वाचायला सुरुवात केली, मुलाच्या टीचरनी हे सजेस्ट केले मला.
Hats off to you Dear Mother
Hats off to you Dear Mother Worriers – Swamagnta and Anju !!
Reading all your article and responses on it....
Bai ga, je kahi nibhawate aahes, te khup wegale aahe.
Knowing and accepting this without getting depressed require huge courage..
Good that you are making others aware of all these things..
This IS very useful to all parents.
Very very good work, please keep it up !!
Lots of best wishes for you and the entire family, and all the families having “gifted” children.
Sorry for response in English…
Mazya machine varun Marathi type nahi hot aahe..
Khup diwas praytna karat hote, pan Marathi madhun pratisaad deta yet nhavata..
Aaj rahawale nahi mhanun outlook madhe type karun eethe chikatawate aahe..
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे.
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे. मोरया हॉस्पिटल ला काल त्याला स्पीच थेरोपिस्ट कडे काल
नेले होते. त्यांच्या म्हणण्या नुसार त्याला ऑटिझम असण्याची शक्यता आहे. त्याला फोर्बेस मार्शेल येथे IQ
टेस्ट साठी नेणार आहोत.
आम्हाला आढळलेली लक्षणं -
- तो फक्त १०-१५ शब्द बोलतो.
- फक्त नातेवैकांच्या मुलांशी च छान खेळतो. सोसायटीतील मुलांशी खेळत नाहि जास्त.
- मनासारखं न झाल्यास ओरडणे, हातातील वस्तू समोरच्याच्या अंगावर फेकणे, मारणे सुरु होते (हे प्रमाण २ दिवसापसुन जास्त दिसतेय).
- न बोलता आल्यामुळे त्याची घुसमट होतेय अस जाणवतंय आणि आक्रस्ताळ पण करतो
- हेच जर त्याला हवी असणारी वस्तू दिली कि लगेच शहाणा बाळ होतो.
त्याचा स्वभाव -
शाळेत आवडीने जातो
मादाम च्या सांगण्या नुसार शब्द बोलायचं प्रयत्न करतो.
मोबाईल वरचे सगळे puzzles काही सेकंदात सोडवतो.
त्याच्या आवडीचेच movies बघतो (उदा. Toy story, UP, )
movies दाखवल्या प्रमाणे नकला करतो, आवाज काढतो, Dhance करतो.
व्यवस्थित झोपतो, जेवतो.
भूर जायला खूप आवडते. सांगितलेला सगळा काम नीट करतो (उदा. कपबशी किचन मध्ये ठेव, pant काढ, शु कर, पाणी टाक, वाटी चमचा आण इ.)
माझ्या शंका -
- IQ टेस्ट मध्ये काय सिद्ध होते ?
- IQ टेस्ट -ve किवां +ve असते का ?
- पुण्यामध्ये/चिंचवड-पिंपरी मध्ये कोणाला नेमके दाखवावे ?
- नुसत्या स्पीच थेरोपि ने ऑटिझम पूर्ण बारा होतो का ?
त्याला सध्या माझ्या गावी होमेओपथि गोळ्या आणि शंखपुष्पी सुरु केला आहे.
होमेओपथिक डॉक्टरांच्या बोलण्यात आले कि त्याची २०% मेंटल ग्रोथ कमी आहे.
एक महिन्या पासून गोळ्या न संख्पुश्पी सुरु आहे.
औषध सुरु केल्यापासून आम्हाला आढळलेला फरक -
- त्याला अब्च्द ची आम्ही ओळख करून दिल्या वर आता घरात लावलेल्या चार वर येत जाता स्व खुशीने अब्च्द म्हणतो.
रस्त्याने जाताना जे मोठे बोर्ड लावलेले दिसतात त्यातले इंग्लिश अक्षर वाचतो. (उदा. काल HOTEL लिहिलेले त्याने पूर्ण अक्षर वाचले न आपल्याला वाचता आल्याचा आनद त्याचा चेहऱ्यावर दिसत होता)
प्लीज मला मदत करा न योग्य उपचार कुठे घेऊ याच मार्गदर्शन करा
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे.
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे. मोरया हॉस्पिटल ला काल त्याला स्पीच थेरोपिस्ट कडे काल
नेले होते. त्यांच्या म्हणण्या नुसार त्याला ऑटिझम असण्याची शक्यता आहे. त्याला फोर्बेस मार्शेल येथे
टेस्ट साठी नेणार आहोत.
आम्हाला आढळलेली लक्षणं -
- तो फक्त १०-१५ शब्द बोलतो.
- फक्त नातेवैकांच्या मुलांशी च छान खेळतो. सोसायटीतील मुलांशी खेळत न्हे जास्त.
- मनासारखं न झाल्यास ओरडणे, हातातील वस्तू समोरच्याच्या अंगावर फेकणे, मारणे सुरु होते.
- हेच जर त्याला हवी असणारी वस्तू दिली कि लगेच शहाणा बाळ होतो.
- न बोलता आल्यामुळे त्याची घुसमट होतेय अस जाणवतंय आणि आक्रस्ताळ पण करतो
त्याचा स्वभाव -
शाळेत आवडीने जातो
मादाम च्या सांगण्या नुसार शब्द बोलायचं प्रयत्न करतो.
मोबाईल वरचे सगळे puzzles काही सेकंदात सोडवतो.
त्याच्या आवडीचेच movies बघतो (उदा. Toy story, UP, )
movies दाखवल्या प्रमाणे नकला करतो, आवाज काढतो, Dhance करतो.
व्यवस्थित झोपतो, जेवतो.
भूर जायला खूप आवडते. सांगितलेला सगळा काम नीट करतो (उदा. कपबशी किचन मध्ये ठेव, pant काढ, शु कर, पाणी टाक, वाटी चमचा आण इ.)
माझ्या शंका -
- IQ टेस्ट मध्ये काय सिद्ध होते ?
- IQ टेस्ट -ve किवां +ve असते का ?
- पुण्यामध्ये/चिंचवड-पिंपरी मध्ये कोणाला नेमके दाखवावे ?
- नुसत्या स्पीच थेरोपि ने ऑटिझम पूर्ण बरा होतो का ?
त्याला सध्या माझ्या गावी होमेओपथि गोळ्या आणि शंखपुष्पी सुरु केला आहे.
होमेओपथिक डॉक्टरांच्या बोलण्यात आले कि त्याची २०% मेंटल ग्रोथ कमी आहे.
एक महिन्या पासून गोळ्या न शंखपुष्पी सुरु आहे.
औषध सुरु केल्यापासून आम्हाला आढळलेला फरक -
- त्याला ABCDची आम्ही ओळख करून दिल्या वर आता घरात लावलेल्या चार वर येत जाता स्व खुशीने ABCD वाचतो, म्हणतो.
रस्त्याने जाताना जे मोठे बोर्ड लावलेले दिसतात त्यातले इंग्लिश अक्षर वाचतो. (उदा. काल HOTEL लिहिलेले त्याने पूर्ण अक्षर वाचले आणि आपल्याला वाचता आल्याचा आनंद त्याचा चेहऱ्यावर दिसत होता)
प्लीज मला मदत करा आणि योग्य उपचार कुठे घेऊ याच मार्गदर्शन करा
नम्रता, माफ करा. मी तुमची
नम्रता, माफ करा. मी तुमची कमेंट खूप उशीरा पाहात आहे.
तुमच्या एकंदरीत वर्णनावरून हा सिव्हिअर ऑटीझम नसावा. परंतू काय आहे हे अर्थातच मी सांगू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशन्ची मदत घ्यावी लागेल. ऑटीझम म्हणजे फक्त स्पीच प्रॉब्लेम्स नाहीत. तुम्ही जे मेन्शन केले, "मनासारखं न झाल्यास ओरडणे, हातातील वस्तू समोरच्याच्या अंगावर फेकणे, मारणे सुरु होते.- हेच जर त्याला हवी असणारी वस्तू दिली कि लगेच शहाणा बाळ होतो." हे व अशासारखे बिहेविअर इश्यूज तसेच सेन्सरी प्रोसेसिंग इश्यूज ऑटीझममध्ये बर्याच प्रमाणात असू शकतात. त्यामुळे तुमच्या मुलाला फक्त स्पीच डिसॉर्डर आहे की सेन्सरी इश्यूज पण आहेत, ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे का हे सर्व तुम्हाला (अमेरिकेत असलात तर) डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशनने सांगणे अपेक्षित आहे. मला भारतातील ह्या प्रोसेसचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे तुम्ही कृपया मुलाच्या पिडियाट्रिशनला विचारून किंवा तुमच्या भागातील डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशनच्या आधाराने पुढे जा. होमिओपॅथीची औषधे एक सपोर्ट म्हणून ठिक आहे. परंतू मुलाच्या इश्यूजचे व्यवस्थित डायग्नोसिस होणे हे अत्यंत जरूरी आहे.
बाकी, ३ वर्षाच्या मुलाची आयक्यू टेस्ट करणे गरजेचे आहे का हे ही विचार करण्यासारखे आहे. आम्ही अशी कोणतीही टेस्ट अजून केली नाही. जेव्हा मॉडरेट टू सिव्हिअर ऑटीझम असतो, तेव्हा आयक्यूपेक्षाही रोजचा दिवस त्या मुलासाठी कमीत कमी त्रासाचा कसा जाईल व बेसिक कम्युनिकेशन तो कसे शिकेल ह्याकडेच जास्त लक्ष दिले जाते.
प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद. मी
प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद. मी मुलाला होमीओपाथी औषधे सुरु केली अहेत. आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या बरोबर गप्पा मारणे, पुस्तकातील चित्रे दाखवणे इ.
शंखपुष्पी सारखेच अस्पी सिरप (रिलायन्स फर्मासुटिकल) सुरु अहे. ट्रिट्मेण्ट १ वर्ष घ्यावी लागणार आहे.
त्याची प्रगती -
आता त्याचा शब्द संग्रह ८०-९० पर्यंत गेला आहे.
सोसयटीतिल मुलांशी खेळतो. स्वतालाच TV बघणे आता आवडत नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पुस्तक वाचायचे असते.
४-५ गाणी म्हणतो (शब्द इतके स्पष्ट नसतात तरी अजून प्रयत्न चालू अहेत.)
शाळेतील शिक्षिका आम्हाला विचारतात कि कुठे घेताय ट्रिट्मेण्ट नाव सांगा म्हणजे बाकीच्या पालकांना सांगता येइल.
एक आई म्हणून होणारा आनंद सांगता येणार नाहि.
काल मला म्हणाला "आई दुदु दे" माझ्याशी बोललेले पाहिले वाक्य ….
त्याच्या ऑटिझम विषयी माझे होमेओपाथिचे डॉक्टर म्हणाले कि काही प्रमाणात आहे पण तुम्ही बघा मी कस त्याला नीट करतो. काही वर्षात तुम्हाला कळणार देखील नाही कि ह्याला काही प्रोब्लेम होता.
मी ताई तुम्हाला विनंती करते कि तुम्ही होमेओपथि गोळ्या आणि आयुर्वेदिक औषधे सुरु करा. मला खात्री आहे नक्की फरक पडेल.
आपल्या बाळाची प्रगती बघून डोळे भरून येतात हे मी स्वानुभवावरून सांगते
काल मला म्हणाला "आई दुदु दे"
काल मला म्हणाला "आई दुदु दे" माझ्याशी बोललेले पाहिले वाक्य ….
>>
अभिनंदन!
सगळं तुमच्या मनासारखं आणि मस्तच होणार आहे
ऑल द बेस्ट
"आई दुदु दे" माझ्याशी बोललेले
"आई दुदु दे" माझ्याशी बोललेले पाहिले वाक्य >>> नम्रता, तुमचे अभिनंदन
त्याच्या ऑटिझम विषयी माझे होमेओपाथिचे डॉक्टर म्हणाले कि काही प्रमाणात आहे पण तुम्ही बघा मी कस त्याला नीट करतो. काही वर्षात तुम्हाला कळणार देखील नाही कि ह्याला काही प्रोब्लेम होता.>>> तुमचे डॉक्टर म्हणतात तसेच होईल
"आई दुदु दे". वा नम्रता, किती
"आई दुदु दे". वा नम्रता, किती छान वाटलं वाचायला, डोळ्यातून पाणी आले. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या बाळाला खुप खुप आशीर्वाद.
मदर वॉरीयर, तुमची लेखमालिका
मदर वॉरीयर, तुमची लेखमालिका सर्व भाग वाचले आणि ओळखीच्याना पाठवलेही.
यावर सकाळ फॅडॉ मध्ये (हो तोच तांबे साम्राज्य असलेला!) ही लेख मालिका लिहीता येईल का? तिथे खूप लोक वाचतात. त्यात आलेला एक मेंदूच्या ऑपरेशन च्या संदर्भातला लेख वाचून माझ्या आत्याचे ऑपरेशन केले होते आणि तिचा बर्याच वर्षांचा त्रास नाहीसा झाला होता.
संबंधित लोक मायबोली एअ वाचत नसतील तर त्यांना माहिती कळावी आणि ऑटीझम शी संबंधित नसलेल्यांनाही ती माहिती कळून जागरुकता निर्माण व्हावी असे वाटते.
Namrata Siddapur , तुमच्या
Namrata Siddapur , तुमच्या मुलाच्या प्रगतीबद्दल वाचून खूप आनंद झाला. मात्र काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटल्या.
दोन महिन्याच्या काळात तुमच्या मुलाची शब्दसंपदा इतक्या प्रमाणात वाढली हे वाचून त्याला खरोखर ऑटीझम आहे का ? असा प्रश्न उमटला. किंवा असलाच तरी तो अतिशय माईल्ड प्रमाणात असणार आहे. हे मी असं म्हणण्याचे कारण प्रत्येक ऑटीस्टीक मूल वेगळे असते. काही न्युट्रिशनल चेंजेस व सप्लिमेंट्समुळे फरक पडतो हे वाचले आहे, परंतू होमिओपथीच्या गोळ्यांनी ऑटीझम बरा झाला असता तर आज ऑटीझमसाठी होमिओपथी सगळ्यात पहिली उपाययोजना म्हणून गणली गेली असती. गैरसमज नसावा, पण तुमच्या पोस्ट्स वाचून ऑटीझम हा खूप ओव्हरसिम्प्लिफाय केल्यासारखा वाटला व आम्हा सिव्हिअर ऑटीझम असलेल्या मुलांच्या पालकांसाठी 'खोटी आशा' ही फार धोकादायक आहे. मी एकवेळ अतिशय सावध, प्रॅक्टीकल अप्रोच घेईन रादर दॅन ओव्हरली ऑप्टीमिस्ट. कृपया गैरसमज नको. मला खूप आनंद झाला तुमच्या मुलाची प्रगती वाचून. पण माझ्या घरातला ऑटीझम खूप वेगळा आणि खूपच स्लो प्रोग्रेस दाखवणारा आहे. तुम्हाला तसेच इतर वाचकांना हे सांगणे आवश्यक वाटले मला. बेस्ट विशेस टू युअर किड!
Pages