Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्पेन, सही! वरच्या
हर्पेन, सही!
वरच्या स्फुर्तीदायक दुव्यासाठी धन्यवाद.
मी काल माझी दूसरी हाफ मॅरेथॉन
मी काल माझी दूसरी हाफ मॅरेथॉन पळलो. एप्रिलमध्ये फुल मॅरेथॉन नंतर आठवड्यात जेमतेम एकदा पळत होतो. त्यात मागला महिना रस्त्यावर होतो. तरी २.३० मध्ये पूर्ण केली. एक लक्षात आले की एकदा हाफ फूल पळलात की पायांना बहुतेक सवय झालेली आहे असे वाटले. पाय अजिबात थकले नाहीत. वेग कमी होता पण ते अपेक्षित होते. पळताना मजा आली. आता पुन्हा एकदा एक फूल मॅरेथॉन ऑक्टोबरमध्ये. तेव्हा पुन्हा भेटू
अभिनंदन टण्या.
अभिनंदन टण्या.
अभिनंदन टण्या .
अभिनंदन टण्या .
टण्या अभिनंदन !
टण्या अभिनंदन !
मस्तच रे टण्या, हार्दीक
मस्तच रे टण्या, हार्दीक अभिनंदन
हार्ट रेट ट्रेनिंग बद्द्ल
हार्ट रेट ट्रेनिंग बद्द्ल लिहिले थोडक्यात. http://www.maayboli.com/node/55259
अभिनंदन टण्या. आमचे ट्रेनिंग
अभिनंदन टण्या.
आमचे ट्रेनिंग सध्या गंडलेले आहे त्यामुळे आता फॉल मध्ये फुल होणार नाही. बहुतेक एक हाफ करेन आणि मग एप्रिल मध्ये फुल. पळत रहा.
येत्या रवीवारी, ३० ऑगस्टला
येत्या रवीवारी, ३० ऑगस्टला हैदराबाद ला मॅरॅथॉन आहे कोणी माबोकर भाग घेताहेत का? मी यावर्षी नाही घेते .
धनि, बहुतेक/जर-तर नको. सरळ
धनि, बहुतेक/जर-तर नको. सरळ रजिस्टर कर हाफ-फुल जे काय ध्येय आहे त्या स्पर्धेला. मग आपोआप पावले उचलली जातात.
टण्या ऑक्टोबर चालूही झालाय,
टण्या ऑक्टोबर चालूही झालाय, कुठे कधी धावतोयस ?
मी पुढच्या रविवारी ११ ऑक्टोबरला होणार्या पुणे रनिंगच्या 'रन बियाँड मायसेल्फ' नावाच्या चॅरिटी रन मधे हाफ धावतोय
अनेक महिन्यांनी धावणार आहे मधे ट्रेनिंगमधे बराच सलग खंड पडलाय बघू आता काय होतय.
तिथे अजून कोणी आहे का पुण्यातले
मी जानेवारीत धावणारेय, पण
मी जानेवारीत धावणारेय, पण आत्तापासून हळूहळू सरावाची सुरुवात करत आहे.
फुल मॅराथॉन नाही ऑक्टोबरमध्ये
फुल मॅराथॉन नाही ऑक्टोबरमध्ये पण १८ ऑक्टोबरला हाफ पळणार आहे. आजपासून तयारीला सुरुवात (दोनच आठवडे आहेत पण होईल काही तरी)
गजानन, जानेवारीत म्हणजे एस सी
गजानन, जानेवारीत म्हणजे एस सी एम एम ना ?
मी पण येणारे... मलाही तयारीला सुरुवात करायच्ये !
टण्या - दोनच आठव्डे म्हणजे जरा कमीच वेळ आहे पण हाफ असल्यामुळे चालून जाईल तुला शुभेच्छा !
काल पार पडलेल्या पुणे रनिंग
काल पार पडलेल्या पुणे रनिंग च्या रन बियोंड मायसेल्फ ह्या चॅरिटी रन मधे भाग घेतला
हाफ मॅरेथॉन अंतर १ तास ५६ मिनिटात पार केले. मागच्या वर्षीपेक्षा ६ मिनिटे जास्त लागली.
स्पर्धेआधीच्या आठवड्याच्या सुरिवातीला सर्दी ताप घसादुखी असा बेजार होतो त्याचे प्रतिबिंब पडलेच
अर्थात त्यामुळे फारशा काही अपेक्षा न ठेवताच धावलो होतो. जेम तेम सबटू झाली तरी बास असं म्हणून धावलो आणि त्यामानाने वेळे बाबत खूपच आनंदी आहे.
तुझे अन तुझ्या कुटूंबाचे
तुझे अन तुझ्या कुटूंबाचे अभिनंदन. (त्यांच्याबद्दल लिहि की. किती तो स्वार्थीपणा )
धन्यवाद केदार लिहितच होतो अरे
धन्यवाद केदार
लिहितच होतो अरे !
काल एकूण ७००० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. हा एक उच्चांकच
ह्या उच्चांकात हातभार लावणार्यां मधे माझ्या घरचेही होते.
माझी बायको आणि दोन्ही मुले ५ किमी अंतरात सहभागी झाले होते. मी धावता धावता त्यांनाही (विशेषतः बायकोला) प्रोत्साहित करू शकलो त्याचे समाधान काही औरच !
अभिनंदन हर्पेन! दीड - दोन
अभिनंदन हर्पेन!
दीड - दोन महिन्यांच्या गुडघेदुखी + भारतवारी नंतर या आठवड्यात परत पळायला सुरवात केलीय. शनिवारी ६ मैल थोडे चालण्याचे ब्रेक घेऊन केले. फुल ची तयारी सध्या नाही होणार त्यामुळे आता हळू हळू परत अंतर वाढवत नेतो.
टण्या तुला शुभेच्छा !!
हर्पेन, झकास रे..... मस्तच.
हर्पेन, झकास रे..... मस्तच.
त्या दिवशी मी पहाटे ३ ला उठलो, ४ ला निघुन पाच पर्यंत पोहोचायचे या बेताने. पण कसल काय अन फाटक्यात पाय....
दोन दिवस आधीपासून ताप अन पाठीत उसण या मुळे बेजार होतो... कोणही "जा रे बिनधास्त" असे म्हणायला नाही, बरोबर येणे फार लांबचे... शेवटी तस्साच तंगड्या वर करुन पडलो न काय.... मागल्या शुक्रवार पासुन झोपुन आहे, आज ऑफिसला आलोय कसातरी. असो. मी समाधान करुन घेतो की "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान." बेटर नेक्स्ट टाईम...
हर्पेन, सही! जानेवारीत म्हणजे
हर्पेन, सही!
जानेवारीत म्हणजे एस सी एम एम ना ? <<< नाही पवईचे.
गजानन, पवई किती तारखेला
गजानन, पवई किती तारखेला आहे
लिंटी बेटर लक नेक्स्ट टाईम
हर्पेन (आणि कुटुंबिय)
हर्पेन (आणि कुटुंबिय) अभिनंदन
टण्या, गुड लक...
मी बॅक्ड डाउन. तीन तास
मी बॅक्ड डाउन. तीन तास ड्राइव्ह करायचे जीवावर आले आहे. आता एकटाच पळेन आणि जे पैसे वाचतील त्यातून काहितरी घेऊन येईन!
हर्पेन, जाने. पहिल्या रविवारी
हर्पेन, जाने. पहिल्या रविवारी असते.
मी देखील पुणे रनिंग च्या रन
मी देखील पुणे रनिंग च्या रन बियोंड मायसेल्फ ह्या चॅरिटी रन मधे भाग घेतला.
पहिलाच इव्हेंट होता त्यामुळे ५किमीच पळालो. आणि मस्त फज्जा झाला. लिंबुदांनी ज्याप्रमाणे प्रांजळपणे त्यांच्या बिआरएमच्या चुका लिहील्या तशाच माझाही प्रयत्न.
१. पुरेसा सराव नाही. अर्थात ५ किमी फार सराव लागत नाही असे अनेकांनी सांगितले होते पण तरीही. तीन चार वेळेला जीमच्या ट्रेडमीलवर धावलो ३किमी. पण ट्रेडमिल आणि रस्त्यावर धावणे यात बराच फरक आहे...
२. अपुरी झोप आणि सकाळी उठून एक सफरचंद खात निघालो. घाई झाली त्यामुळे गाडीवरच खात होतो. त्यामुळे सुरुवातीलाच एकदम घशाशी आल्यासारखे झालो आणि उलटी होईल का असेही वाटले त्यामुळे अस्वस्थ वाटत होते.
३. गाडी पार्क करायला जागा मिळेपर्यंत शर्यतीची वेळ सुरु झाली आणि मी पोचायला आणि शर्यत सुरु व्हायला एकच वेळ. त्यामुळे कसलाही वार्मअप आणि स्ट्रेचिंग न करता डायरेक्ट पळायला सुरुवात. सुदैवाने क्रँप आले नाहीत पण नंतर पार वाट लागली.
४. प्रचंड दमट हवा होती, आणि घामाने चिंब झालो पण तरीही सिंबायोसिसचा चढ चढून चतुश्रुंगीपर्यंत व्यवस्थीत गेलो. नंतर मात्र पाय साथ देईनात. आणि येताना पुन्हा सिंबीचा चढ पळवेना. त्यामुळे निवांत चालत चालत पार केला.
५. शेवटचे अंतर एकदम वेगात जायचा प्रयत्न केला पण तोही अंगाशी आला कारण हवा गेली होती आणि निकरानी पळलो तर वेगच घेता येईना.
त्यामुळे तब्बल ५० मिनिटे लागली हे अंतर पार करायला. पण पार केले याचा आनंद आणि आता पुढच्या इव्हेंटमध्ये व्यवस्थित तयारी करून जायचे ठरवले आहे.
अभिनंदन आशुचँप ! प्रत्येक
अभिनंदन आशुचँप ! प्रत्येक रेस मधून माणूस काही तरी नविन शिकत असतो पण तू पुढच्या इव्हेंटचे नाव घेतले यातच सगळे आले. आता तयारी करून पुढील रेस मध्ये भाग घे. शुभेच्छा !!
प्रत्येक रेस मधून माणूस काही
प्रत्येक रेस मधून माणूस काही तरी नविन शिकत असतो >> +१ शिकने ही एक कॉन्स्टंट प्रक्रिया आहे. पुढच्यावेळीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद धनि लिंटी गजानन रार
धन्यवाद धनि लिंटी गजानन रार
आशू - अगदी नेटाने ५ किमी पुर्ण केलेस हार्दीक अभिनंदन ! पण काय करू नये त्याचा वस्तूपाठच ठेवलास समोर अगदी
आणि आता पुढच्या इव्हेंटमध्ये व्यवस्थित तयारी करून जायचे ठरवले आहे. >>> हे खूप महत्वाच
सराव हा हवाच... फार लागत नाही वगैरे खूप सापेक्ष आहे.
आदल्या रात्री झोपही नीट व्हायला हवी त्या करता लवकर (म्हणजे साडेसात आठ) जेवून लवकर (म्हणजे दहा) झोपावे म्हणजे स्पर्धेच्या दिवशी आपले अंतर सुरु होण्याची वेळ असेल त्या आधी १ तास तिथे पोचायला हवे. त्या आधी काय ते खायचे नाहीतर नाहीच खाल्ले तरी चालेल. खाऊन लगेच पळायला सुरुवात करू नये.
वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग न करता डायरेक्ट पळायला सुरुवात करू नये. माझ्यामते ५ मिनिटे वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग केले असतेस तर उशीरा चालू करूनही अजून १० मिनिटे आधीच पोचला असतास
ह्या वेळेस खरोखरच प्रचंड दमट हवा होती. पाणी कमी पिण्यानेही क्रँप येऊ शकतात.
मधेच खूप चालले तर सांध्यांमधे लॅक्टीक अॅसीड जमा होते ज्यामुळे परत पळताना त्रास होतो तसेच रेटून पळालो तर इंज्युरी होऊ शकते. जे नाही केलेस ते बरे !
तू भाग घेणारेस हे माहीत नव्हते. नाहीतर हे आधीच सांगीतले असते असो.
आता पुढच्या वेळेस १०/२१ किमी तरी धाव तयारी करायला भरपूर वेळ आहे.
लिंटी सारख्या कबुलीजबाबाचे काही एक कौतुक करणार नाही
आशुचँप सर्व प्रथम तुमचे
आशुचँप
सर्व प्रथम तुमचे अभिनंदन.
मी पण पहिल्यांदा अशा स्पर्धेत भाग घेतला आणी यशस्वीरीत्या ५ किमी ची फेरी पूर्ण केली.
आयोजकांपैकी एक "मि. सुधींद्र" हे दर शनिवारी आणी रविवारी पुणे विद्यापीठ मध्ये सराव घेतात (सकाळी ६ वाजता) आणी विशेष सुचना ही देतात.
मी त्यांच्यासोबत दोन शनिवार आणी रविवार भाग घेतला. त्यानी दिलेल्या सूचनांचा विशेष फायदा झाला.
आणी अजून एक गोष्ट ५ किमी चा जो मार्ग होता ते अंतर खरे तर ६ किमी होते.
आता पुढचे लक्ष्य १० किमी.
आशुचँप, अभिनंदन! सुरुवात झाली
आशुचँप, अभिनंदन! सुरुवात झाली हे फार महत्त्वाचं.
Pages