Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदिनी , साल काढुन मिक्स्रला
नंदिनी , साल काढुन मिक्स्रला वाटुन घे, जी काही पावडर होइल त्याच्या नीम्मी साखर आणि साखरेच्या निम्मे पाणी घेउन एक्तारी पाक झाला की बदाम पावडर घालुन गोळा झाला की लाटुन वड्या कर. बदाम कतली तयार
ती खीर नको म्हणते आणि वर्षा
ती खीर नको म्हणते आणि वर्षा कतली सुचवते अश्विनी के एकदम सही पोस्ट आहे. (फ्रिज ऐवजी फ्रिजर मध्ये ठेवले तरी चालतील एक एक काढून डिफ्रॉस्ट करून खा.)
रावी, मग आतून घट्ट आणि वरुन
रावी, मग आतून घट्ट आणि वरुन खरवडल्यासारखे झाले ना? > ते जे काही झाले तेव्हापासून मला गुलाब्जाम आवडेनासेच झाले ! आणि आश्चर्य म्हणजे लेकाला इन्स्टंट चे च आवडतात.(गुणी बाळ तो! ). परत काही खव्याचे गुलाबजाम केले नाहीत कधी.:D
हो ना, लेक म्हणत असेल खव्याचं
हो ना, लेक म्हणत असेल खव्याचं भयाण खाण्यापेक्षा इन्स्टंटचे खाल्लेले बरे. दिवा घे गं रावी...
तेजू अगदी हलक्या हाताने पीठ
तेजू अगदी हलक्या हाताने पीठ मळुन गोळे केलेत तर आत गुठळी रहाणार नाही. इन्स्टंटच तेच आहे, जास्त मळल कि गुलाबजाम हमखास बिघडतात....>>> धन्यवाद सीमाताई. पीठ मळुन लगेच तळायला घ्यायचे का? आणि तुपात का तळायचे नाही म्हणे.
सी. ठंडाईची रेडीमेड बाटली
सी. ठंडाईची रेडीमेड बाटली आहे. ते परत नको.
नीम्मी साखर आणि साखरेच्या निम्मे पाणी घेउन एक्तारी पाक झाला की बदाम पावडर घालुन गोळा झाला की लाटुन वड्या कर<<< हे जर केलंच यदाकदाचित तर माकाचु बीबीवर धाय मोकलून रडताना दिसणारच हमखास.
पाकबिक अपने बसकी बात नही. फ्रीझरलाच ढकलते. लेकीलाच खायला लावते!!
बदाम कतली करायला खरचं सोप्पी
बदाम कतली करायला खरचं सोप्पी आहे.
माझ्या बहिणीने एकदा असेच भरपुर बदाम चुकुन भिजवले होते मी यु ट्युब वरच्या काजु कतलीच्या रेसिपीने बदाम कतली केली.
बदाम सोलायला लगेल तोच वेळ नाहीतर वडी पाडायला गोळा पटकन होतो.
भिजलेले बदाम दुधात वाटून; १.
भिजलेले बदाम दुधात वाटून;
१. रबडी/ बासुंदीला लावता येतील.
२. मेथी मटर मलई/ पनीर माखनी/ माखनवालासारख्या भाज्यांत घालता येतील.
३. बदाम वाटून समप्रमाणात खवा/ ओलं खोबरं वापरून बर्फी/ खव्याच्या पोळ्या करता येतील.
केश्वे, अन्न व औषध प्रशासनात धाडी घालण्याचे काम करणार्या मैत्रिणीने त्याच्याकडून कधीही खरेदी करू नका असं सांगितलं आहे. त्या दुकानाचं लायसन्स रद्द का करत नाही असं विचारलं तर यावर बोलण्या-सांगण्यासारखं काहीही नाही असं म्हणाली ती.
भिजवलेले बदाम ग्रेव्हीत
भिजवलेले बदाम ग्रेव्हीत वापरता येतील...
रबडी/ बासुंदीला लावता येतील.
रबडी/ बासुंदीला लावता येतील. >>> ये हुइ नाबात. हम फिरनी करेंगा. वो इझी पडेंगा.
धन्यवाद.
केश्वे, अन्न व औषध प्रशासनात
केश्वे, अन्न व औषध प्रशासनात धाडी घालण्याचे काम करणार्या मैत्रिणीने त्याच्याकडून कधीही खरेदी करू नका असं सांगितलं आहे.>>> अरे बापरे! बरं झालं सांगितलंस ते. वरची पोस्ट एडिट केलेली बरी. कारण हे पुढचं बोलणं न वाचताच कुणी तिकडे जावून खरेदी करायचं.
अवांतर : यापुर्वी मी जेव्हा
अवांतर :
यापुर्वी मी जेव्हा जेव्हा रेडीमिक्स गुलाबजामुन केलेत ते गिट्सचेच केलेत परंतु नेहमी २५० ग्रॅमच्या पाकिटाला १०० ग्रॅम खवा वापरला आहे कारण फक्त पावडरचे एकदा केलेले ते कुणालाच आवडले नव्हते. दरवेळी सॉफ्ट आणि पाक पुर्णपणे आत मुरलेले गुलाबजामुन झाले आहेत.
गेल्या आठवड्यात लेकीच्या वाढदिवशी १२०० ग्रॅमचे चितळेचे गुलाबजामुन केले खवा न घालता. गिट्सपेक्षा नक्कीच उजवे झाले होते. बर्याच पाहुण्यांनी गुलाबजामुन मस्त झाल्याची पावती दिली आणि मी ठाण्यात राहुन पुण्याच्या चितळ्यांची जाहिरात करत होती
भिजवलेले बदाम सोलून, एकाचे ४
भिजवलेले बदाम सोलून, एकाचे ४ तुकडे करून उन्हात वाळवायचे, वाटल्यास नंतर हलके भाजून घ्यायचे. मग त्याची पावडर करून ठेवायची. लहान मुलं बदाम चावून खात नसतील तर ही पावडर शिर्यात, पँनकेकमध्ये वगैरे घालायची. तशी बर्यापैकी टिकते, शंका असल्यास फ्रिजमध्ये ठेवायची.
मिक्स् चे एवढे लाड
मिक्स् चे एवढे लाड पुरवण्यापेक्षा मग डायरेक्ट खव्याचे गुलाब्जाम का करू नयेत?>> खवा मिळत नाही म्हणून ह्या मिस्कचे एवढे लाड करायचे.
नंदिनी, पालक पास्ता बनव.
नंदिनी, पालक पास्ता बनव. त्यात वाटलेले बदाम मस्त लागतात. ही घे माझीच रेसीपी.
http://www.maayboli.com/node/50040
नन्दिनी रिक्षा!
नन्दिनी रिक्षा! http://www.maayboli.com/node/31553
चितळेंचे गुलाबजाम सागरघीमधे
चितळेंचे गुलाबजाम सागरघीमधे तळले होते.पाकात घालण्याआधी तसेच मटकावायला छान लागत होते.
बदामाच्या वाटीतील पाणी काढून फ्रीजमधे ठेवा आणि रोज खात चला.हाकानाका.
मिक्स (चितळेच्या सुद्धा)
मिक्स (चितळेच्या सुद्धा) पेक्षा पण मस्त गुलाबजाम करायचे असतील आणि खवा नसेल तर मी लिहिलेली बिन खव्याच्या गुलाबजामची रेसिपी वापरा.
पण सिरिअसली , खरच जास्त चांगले गुलाबजाम होतात.
ज्वारीचे पीठ खुप आहे घरात.
ज्वारीचे पीठ खुप आहे घरात. भाकरी शिवाय अजुन काय करता येइल? थालीपीठ करुन झाले...
पिठलं. हो. ज्वारीच्या पिठाचं.
पिठलं. हो. ज्वारीच्या पिठाचं. सीमाची रेस्पी आहे; वाहत्या बाफावरची. मी केलेलं ट्राय. चांगल लागलं. लाल तिखट नाही घालायचं.
उकडपेंडी, कुठलीतरी पालेभाजी (शक्यतो मेथी) घालून मुटके (वाफवून मग तेलात परतायचे) इ..
उकरपेंडी ही चांगली लागते.
उकरपेंडी ही चांगली लागते. धपाटे - कांदे, टमाटे घालून ....
छान योकु ..पिठ्ल्याच माहीत
छान योकु ..पिठ्ल्याच माहीत नव्ह्त. चव चान्गली लागते का? मुटक्याची रेसिपी दे ना..
मंजूताई , धपाटे - कांदे,
मंजूताई , धपाटे - कांदे, टमाटे घालून ....छान औप्शन वाटतोय!
तर, या भिजवलेल्या बदामांचे
तर, या भिजवलेल्या बदामांचे काय करता येईल. (हलवा आणि खीर हे दोन ऑप्शन नेटवर वाचले. तेवढा सुगरणपणा माझ्यत नाहीये) सोपे सुटसुटीत काहीतरी सांगा.>>
वाटीभर बदाम म्हणजे साधारण २५-३० असतील. दोघांनी रोज चार खा ल्ले तरी चार दिवसात संपतील. हाकानाका.
ते करायचं सोडून त्याचं काहीतरी टिकाऊ करायचा विचार करणं हेही माझ्यामते सुगरणपणाचं लक्षण आहे.
ज्वारीच्या पिठाची ताकातली
ज्वारीच्या पिठाची ताकातली उकड, लसूण घालून.... (यालाच उकडपेंडी म्हणतात का?)
लले, नोप. ती उकडच. उकडपेंडी
लले, नोप. ती उकडच.
उकडपेंडी करताना, सढळ हाताच्या तेलाच्या फोडणीत कांदा, शेंगदाणे खरपूस तळून, त्यावर पीठ खमंग भाजायचं. मस्त सुवास यायला हवा. मग बेताबेतानी पाणी घालून साधारण मोकळी होईस्तोवर दणदणीत वाफ आणायची. साधारण कृती सारखी असली तरी चवीत बराच फरक असतो. त्यातही ज्वारीच्या पिठाच्या उकडपेंडीला तेल जास्तच लागतं.
नुसत्या ज्वारीच्या पिठाची
नुसत्या ज्वारीच्या पिठाची धिरडीपण मस्त होतात. तिखट-मीठ-धनेजिरेपूड-कोथिंबीर-बारीक चिरलेला/ पातळ उभा चिरलेला कांदा. असतील तर चिमूटचिमूट मेथी, ओवा आणि बडीशेपेच्या पावडरी. लसूण ऑप्शनल.
ते जवार नु खिंचू का काय
ते जवार नु खिंचू का काय गुजराथी पदार्थ होईल. ताक-लसूण उकड सहसा तांदळाच्या पिठाची करतात.
बदाम घालून फिरणी केली. चांगली
बदाम घालून फिरणी केली. चांगली झाली. २५-३० नाही त्याहून जास्त बदाम होते.
फिरणी खाताना लेकीनं बाबाला "मी आईला हेल्प केली" असं सांगितलं!!
फिरणी खाताना लेकीनं बाबाला
फिरणी खाताना लेकीनं बाबाला "मी आईला हेल्प केली" असं सांगितलं!! >>
Pages