बाळंतपण सासरीही नको माहेरीही नको, असं श्री- जान्हवी ठरवतात.
पेपरात 'फक्त जोडप्यांनाच भाड्याने जागा देणार' अशी जाहिरात पाहून तिथे शिफ्ट होतात.
जान्हवी स्टेटसः-
Shifting today to our new house..
नवीन पत्ता: लीलाबाई काळभोर बंगला, पाषाण रोड, पुणे
लाईक्सः श्री, आई आजी, कला
डिसलाईक्सः बेबी आत्या आणि तत्सम .
कॉमेन्ट्सः
पार्वती माने: नव्या सूनेने घरात येताना उखाणा घेण्याची पद्धत आहे घ्या घराची !
लाईक्सः श्री, आई आजी, बेबी आत्या आणि तत्सम.
जान्हवी: हो का.. ! बरं घेते...
गोखल्यांची सून आता होणार लीलामावशींची भाडेकरु
गोखल्यांची सून आता होणार लीलामावशींची भाडेकरु
त्या बळीची बाई फार भिती वाटते, आईआजी आता मी काय करु
... अनेsssssक दिवसांनंतर...
जान्हवी स्टेटसः-
आठवा महिना! feeling excited !
लाईक्सः श्री, आई आजी, पिंट्या, बाबा, बेबी आत्या आणि तत्सम.
कॉमेन्ट्सः
धनंजय माने: कितवा महिना ते आम्ही कसं आठवणार ! तुम्हीच आठवा ! हा हा हा....
विश्वासराव सरपोतदारः हा हलकटपणा आहे माने !
लाईक्सः माधुरी मॅडम
माधुरी मॅडम: बायकांशी जरा सभ्यपणे बोला माने!
लीला मावशी: प्रसादाचा आंबा पावला की नाही जान्हवी
लाईक्सः श्री, आई आजी, पिंट्या, बाबा, बेबी आत्या आणि तत्सम.
जान्हवी: काहीही हां मावशी!
पार्वती माने: सारखं सारखं.. तेच तेच 'काही ही' काय ?
श्री: तिला 'काहीही हां' म्हणायचे डोहाळे लागलेत !
धनंजय माने: नशीब आमचा बायको सारखे डोहाळे नाहीत... नाहीतर !
कला: मी काय म्हणते जानु, आठवा महिना लागलाय. सोड आता तरी ती नोकरी, कुठेतरी धडपडलीस वगैरे तर...
लाईक्सः अनिल आपटे, तानू आणि बळी.
डिसलाईक्सः बेबी आत्या आणि तत्सम.
पिंट्या: आई गं.. प्लीज !
बाबा: कला, तुझ्या जीभेला काही हाड!
कला: तुम्ही फक्त मलाच बोला चारचौघात. पोरीच्या काळजीपोटी बोलते हो मी. एवढ्या तालेवार घराण्याची सून ही, गोखलेंचा वारस येणार आहे आता.. तर अश्या अवस्थेत काळजी घ्यायला नको का...
बाबा: कला गप्प बैस !!!!!
लीला मावशी: कित्येक वर्षांत या घरात डोहाळे जेवण झाले नव्हते, पार्वती बरोबर तुझंही करुया आता !
डिसलाईक्स चा आकडा इकडे लिहित नाही, वाचणार्यांना आकडी येऊ शकते !
टीपः
१. प्रसादाचा आंबा पावायला, जान्हवी आणि लीला मावशी एकमेकांना ओळखत नव्हते! अशी शंका काढू नये. लीलामावशी आणि आई आजी ह्या बालमैत्रीणी आहेत. प्रसादाच्या आंब्याचा पहिला प्रसाद म्हणजे श्री !!!
२. बळीची भिती वाटायला त्याला कुठे जान्हवी ओळखते अशीही शंका काढू नये. पार्वती आणि जान्हवी पण एकमेकांना ओळखतात. पार्वतीला बाटल्यांना लेबलं लावायच्या कारखान्यात नोकरी लागली असून, त्या कारखान्याला जान्हवीच्या बँकेनेच कर्ज दिले होते. तसेच पार्वतीचे त्या बँकेत खाते उघडायला पण जान्हवीनेच मदत केली होती.
ही मालिका कधी पाहिली नाही, पण
ही मालिका कधी पाहिली नाही, पण त्यावरील विनोदांमुळे जुजबी माहिती आहे. शिवाय सगळ्यांचे लाडके माने.
तर एकूण वाचायला मजा आली
मित, प्रवेशिका देण्याची वेळ
मित, प्रवेशिका देण्याची वेळ समाप्त झालेली असल्याने ही प्रवेशिका मतदानासाठी स्पर्धेत दाखल करता येणार नाही. परंतु, मायबोलीकर वाचनाचा आनंद जरूर घेऊ शकतील. धन्यवाद.
टीपा भारी आहेत
टीपा भारी आहेत
मस्त मज्जा आली वाचायला
मस्त मज्जा आली वाचायला
गर्भसंस्कार केले का ?
गर्भसंस्कार केले का ?
अरे ही तर आमची आरती आहे.
अरे ही तर आमची आरती आहे. हलकटपणा करण्यापासून मान्यांना कोणी रोखू शकत नाही हेच खरे .
दिनेशदा
(No subject)
धनंजय माने: कितवा महिना ते
धनंजय माने: कितवा महिना ते आम्ही कसं आठवणार ! तुम्हीच आठवा ! हा हा हा.... >> हे भारीये.
टिपा जोरदार आहेत...
टिपा जोरदार आहेत...